डायरी

Submitted by Ved dalvi on 31 December, 2020 - 11:19

मायबोलीकर सदस्यांच्या गझला वाचत वाचतच , गझल पहिल्यांदाच लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.यावर
सुधारणेसाठी जाणकारांच्या सूचना याव्यात,म्हणून टाकत आहे.

आयुष्याची याही वर्षी नवी डायरी आली आहे..
तुझ्यावीना जगायचीही माझी तयारी झाली आहे..

नव नव्या संकल्पांच्या शपथा घेऊन झाल्या आहेत..
मुद्दाम या ही वर्षी तुला त्यातून सूट दिली आहे !

तसं माझं भविष्य मी आधीच लिहून ठेवलंय बघ !
प्रत्येक दिवशी फक्त तुझीच आठवण लिहिली आहे!

आधी जेव्हा तू नसायचीस तेव्हा त्रास व्हायचा..
पण आता रेटत जगायची मात्र सवय झाली आहे..!

तुला माझे कोरे जगणे जेव्हा कळेल तेव्हा कळो ...
आत्ता पानभर शुभेच्छा तुला धाडणे हाती आहे..

मी नववर्षाची आतषबाजी खिडकीतूनच पाहीन..
तुझ्याविना मज एकांताची खुळी व्याधी जडली आहे..

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Use group defaults