विंडोशॉपिंग

Submitted by जाई. on 28 December, 2020 - 00:35

घरापासून जवळपास एक मॉल आहे. म्हणजे येण्याऱ्या जाण्याऱ्या रस्त्यावरच आहे. मॉल म्हटलं की दर्शनी भाग महत्वाचा. दर्शनी भागावर नेमकी कपड्याची छान छान दुकानं आहेत. मॉल जेव्हा पहिल्यांदा सुरू झाला तेव्हा मी कॉलेजात होते . दुपारी परतताना त्या कपड्यांच्या दुकानात असलेल्या सजवलेल्या मॅनेक्वीनवर नजर टाकणे हा छंद होता. काही काही ड्रेस खरंच सुंदर असायचे .इतके सुंदर की लगेच घेऊन टाकावेत आणि मिरवावेत असे. पण तेव्हा विद्यार्थीदशेत होते , मिळण्याऱ्या पॉकेटमनीत ड्रेस परवडणारे नव्हतेच आणि मातोश्री भलते लाड पुरवणाऱ्या नव्हत्याच. त्यामुळे विंडो ड्रेसिंगद्वारे नेत्रसुख हा एकच पर्याय होता.

*कट २*

पुढे यथावकाश नोकरी लागली. त्यामार्गे स्वतः ड्रेस विकत घेण्याची पतही आली. आजही त्या मॉलमध्ये ती दुकाने आहेत. दर्शनी भागात छान छान ड्रेस घातलेल्या मॅनेक्वीन आहेत . थोडक्यात मौका भी है और दस्तुर भी . पण आता ड्रेस विकत घ्यायची इच्छा होत नाही. तेव्हा त्या गोष्टीच अप्रूप होत. आजही त्या रस्त्यावरुन जाताना ते सुंदर ड्रेस दिसतात आणि छान वाटत . पण पुढे जायची इच्छा होत नाही . एखादी गोष्ट अस्पर्श राहावी , ती मिळून तिचं अप्रूपपण संपू नये असं काहीसे फिलिंग येते आणि त्यामुळे पाऊल पुढे टाकलं जात नाही. खूप सारी मेहनत करून एखादी गोष्ट मिळवावी नि हातात आल्यावर हातीच्या! एव्हढ्यासाठी अट्टाहास करत होतो होय अस काहीसं होत.

कदाचित काही गोष्टींची मजा विंडोशॉपिंगमध्येच असावी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

किंमत परवडणारी होती आणि साडी आवडली म्हणून मी ज्या साड्या घेतल्या त्या फारशा नेसल्या जात नाहीत ( इन जनरल साड्याच फारशा नेसल्या जात नाहीत) यावरून धडा घेऊन मी साड्या विकत घेणं टाळते.
>>>>>

हा धडा आपल्याला आपल्या ऐपतीनुसारच मिळतो. जर एकदा नेसूनही साडी फेकायची, चला फेकू नका पण दान करायची आपली ऐपत असेल तर ..

असो, हे ऐपत वगैरे सोडा. उगाच कोणी याला चुकीचे घेतले तर त्याला वाटेल हा आम्हा विंडो शॉपिंग करणार्‍यांची ऐपत काढतोय का Happy

पण मुळात विंडो शॉपिंग या शब्दातच शॉपिंगची आस लपली आहे असे नाही का वाटत..
एखादे चित्रांचे प्रदर्शन वा एखादी फुलांची सजावट वा रोषणाई आपण बघतो, नेत्रसुख घेतो, मन रमवतो.. यात आणि विंडो शॉपिंगमध्ये हाच बेसिक फरक आहे ना.
जर समोर मांडलेले वस्तूंचे प्रदर्शन बघताना आपल्या मनी ते विकत घ्यायची सुप्त ईच्छा नसेल तर त्याला विंडो शॉपिंग का म्हणावे? काहीतरी वेगळा शब्द वापरा Happy

जाई, खूप छान व्यक्त केल्या आहेत भावना.

लिहित रहा.

एखादी गोष्ट अस्पर्श राहावी , ती मिळून तिचं अप्रूपपण संपू नये असं काहीसे फिलिंग येते आणि त्यामुळे पाऊल पुढे टाकलं जात नाही >> खूप आवडलं हे, can relate completely

जाई, खुप थोडक्यात आणि सुंदर लिहिलं आहेस. मी पण पुणे कॅम्प जवळ रहात असल्यामुळे खुप सारे मॉल्स आणि शॉपिंगची ठिकाणं जवळ आहेत, त्यामुळे तुझ्या वाक्यांशी रिलेट करता आलं.

वावे, तुझ्या सगळ्या प्रतिसादांशी सहमत. पटले आणि आवडले.

ऋन्मेष, शब्दच्छल करू नकोस >>>> लोकांना काँट्रॅडीक्ट करून वादातुन स्वतःची करमणूक करायची याचसाठी तर एवढे आयडी तयार केले आहेत. इग्नोर करावे हे बेस्ट.

शब्दछल नाही करत आहे हर्पेन. थोडे उलगडून सांगतो.

जेव्हा आपण शॉपिंग करतो तेव्हा ती वस्तू वापरायचा आनंद आपण ती नंतर वापरताना घेतोच. पण शॉपिंग करणे हि गोष्ट सुद्धा स्वत:मध्ये एक आनंददायी असते. सतरा गोष्टी चाळणे आणि त्यातून आपल्या आवडीच्या गोष्टी शॉर्टलिस्ट वा सिलेक्ट करणे हा प्रकार देखील एक आनंद देतो. विंडो शॉपिंगमध्ये आपण नेमका तो आणि तेवढाच आनंद घेतो. जर मनात ती वस्तू विकत घ्यायची सुप्त ईच्छा नसेल तर तो आनंद तितक्या उत्कटतेने अनुभवताच येणार नाही.

लोकांना काँट्रॅडीक्ट करून वादातुन......
>>>>>

जेव्हा जगातले बहुतांश लोकं एका थिअरीला सहजपणे मान्य करतात तेव्हा समजावे तो एक ट्रॅप आहे
त्यामुळे काँट्रॅडीक्ट करावे.. करत राहावे.. हे माझे तत्वच आहे Happy

ऋन्मेष, विंडो शॉपिंगमधे आवडीची वस्तू मनातल्या मनात सिलेक्ट किंवा शॉर्टलिस्ट केली जातेच असं काही नाही. नुसतंच 'किती मस्त आहे ना!' असं वाटतं. यात तुला सुप्त इच्छा बिच्छा दिसत असेल तर दिसो बापडी. पण 'मन मारणं' नसतं एवढं नक्की. मन मारलं जात असेल तर कुणाला आवडेल विंडो शॉपिंग करायला!

पण मुळात विंडो शॉपिंग या शब्दातच शॉपिंगची आस लपली आहे असे नाही का वाटत..

अजीबात नाही वाटत ऋन्मेष आणि तुझ्या माझ्या वाटण्यावर काही नसते.
एखाद्या इंग्रजी शब्दाचा अर्थ नीट माहीत नसेल तर / खात्री करून घायची असेल तर माणसे शब्दकोष बघतात. हल्ली आंतरजालावरही शब्दकोष असतात. बघावे जरा बरे असते.

https://dictionary.cambridge.org/dictionary/english/window-shopping
the activity of spending time looking at the goods on sale in shop windows without intending to buy any of them

https://www.collinsdictionary.com/dictionary/english/window-shopping
If you do some window shopping, you spend time looking at the goods in the windows of shops without intending to buy anything.

तुझ्यासाठी म्हणून विंडो शॉपिंग ह्या शब्दाचा मराठीत अर्थ - काहीही खरेदी करण्याचा हेतू न धरता दुकानाच्या प्रदर्शन–खिडक्यांत मांडलेल्या वस्तू पाहणे.

पण 'मन मारणं' नसतं एवढं नक्की.
>>>

हे मी म्हटलेच नाहीये. उलट मन राखले जाते. जे विंडो शॉपिंगचा आनंद घेतात ते वर म्हटल्याप्रमाणे शॉपिंग प्रोसेसचा आनंद घेतात हेच म्हणतोय.
मात्र त्यापुढे जाऊन आपल्याला ती वस्तू विकत घ्यायची नाहीये हे देखील मनाला अप्रत्यक्षपणे सांगितले गेले असते. मला ते जमत नाही म्हणून मी विंडो शॉपिंगचा आनंद ऊचलू शकत नाही.

एक उदाहरण देतो,

१) आपण गार्डनमध्ये कट्ट्यावर कोणाची वाट बघत थांबलो आहोत. शेजारी मुले क्रिकेट खेळत आहेत. आपण सहज बघायला सुरुवात करतो. आपला वेळ चांगला जातो. समोरची मुले क्रिकेट ऐवजी फूटबॉल खेळत असली तरी त्याने आपल्याला काही फरक नसतो.

२) आपण मुद्दाम वेळ चांगला घालवायला गार्डमधील एक कट्टा पकडून क्रिकेट खेळणारया मुलांना बघतो. काही कारणाने म्हणजे वय झालेय वा ओळख नाही म्हणून आपण त्यांच्यात खेळू शकणार नसतो तरीही ते मान्य करून ईन्व्हॉल्व्ह होत त्यांचा खेळ बघतो.

३) आपल्याला क्रिकेट खेळणारी मुले बघून स्वत:लाही खेळावेसे वाटते. ती ईच्छा दाबता येत नाही. त्यामुळे जर ते शक्य नसेल तर ते बघणे नकोच वाटते.

मी या ३ नंबरमध्ये येतो.

विंडो शॉपिंगचा मुद्दाम वेळ काढून आनंद लुटणारे २ नंबरमध्ये येतात.

बसस्टॉपवर उभे आहोत. बस येईपर्यंत काय तर मागच्या दुकानातील शर्ट बघत बसा हे १ नंबरमध्ये येतात.

आता या १ आणि २ मध्ये हाच फरक असतो की २ वाल्यांना मुळातच शॉपिंगची आवड असते. मनात एक सुप्त ईच्छा असते. पण ती मनातच ठेऊन विंडो शॉपिंगचा आनंद घेणे त्यांना जमले असते. काय बघावे आणि काय नाही हे देखील त्या सुप्त ईच्छेनुसारच ठरवले जाते. अन्यथा ते नंबर १ झाले...

तुझ्यासाठी म्हणून विंडो शॉपिंग ह्या शब्दाचा मराठीत अर्थ - काहीही खरेदी करण्याचा हेतू न धरता
>>>>>>

तुम्ही भाषेचे शिक्षक बनत मला डिक्शनरी अर्थ सांगत आहात आणि मी विंडो शॉपिंग आपल्याला का आनंद देते हे उलगडायचा प्रयत्न करत आहे.

मला शॉपिंगची 'आवड' अजिबात नाही. काही घ्यायचं असेल तरच मी ते घेते. वस्तू आवडली म्हणून घेऊन टाकली (मुळात घेण्याचा प्लान नसताना) असं माझं फारसं होत नाही. पण मला विंडो शॉपिंग आवडतं. मुद्दाम वेळ काढून (मैत्रिणीला शॉपिंग करायचंय, तिच्या सोबत जाऊ) असेल किंवा आपल्याला हवं असलेलं दुकान दोन चौक पुढे आहे, पण पार्किंग इथे मिळालंय..हरकत नाही, बाकी दुकानं बघत बघत मजेत जाऊ, असं असेल.

तुला शॉपिंगची इतकी आवड आहे की तू विंडो शॉपिंग करू शकत नाहीस. वस्तू पाहिली की तुला ती घ्यावीशी वाटते. प्रत्येक वेळी तर ती घेता येत नाही. म्हणून तू विंडो शॉपिंगच्या वाटेला जातच नाहीस. चांगली गोष्ट आहे.

पण मुळात विंडो शॉपिंग या शब्दातच शॉपिंगची आस लपली आहे असे नाही का वाटत.. हे तुझे आधीच्या प्रतिसदातले वाक्य दर्शवते की तुला विंडो शॉपिंगचा अर्थ माहीत नाहीये. आनंद वगैरे नंतरची पोस्ट आहे तुझी.
आणि तू उलगडत वगैरे नाहीयेस गुंडाळू पाहतोयस नेहेमीप्रमाणे.

आणि तू उलगडत वगैरे नाहीयेस गुंडाळू पाहतोयस नेहेमीप्रमाणे. >>> Lol

बाकी विंडो शॉपिंगचा डिक्शनरी अर्थ काय आहे हे बघून कोणी त्यानुसार आणि तसेच वागत नसेल.
तुमच्या त्या पुस्तकी व्याख्येनुसार काहीही खरेदी करण्याचा हेतू न धरता हा अर्थ आहे. मला वाटते आत ती एक सुप्त ईच्छा वा हेतू असतोच जो फक्त उघड केला जात नाही, स्वत:शीही उघड केला जात नाही वा आपल्याला स्वतःलाही तो कळत नाही.

जसे वर वावे म्हणतात तसे,
<< काही घ्यायचं असेल तरच मी ते घेते. वस्तू आवडली म्हणून घेऊन टाकली (मुळात घेण्याचा प्लान नसताना) असं माझं फारसं होत नाही. <<
आणि कदाचित म्हणूनच त्या विंडो शॉपिंग जास्त सहजतेने एंजॉय करू शकत असतील.

विंडो शॉपिंगचा डिक्शनरी अर्थ काय आहे हे बघून कोणी त्यानुसार आणि तसेच वागत नसेल. >> अर्थातच. हे उलटं असतं.
आता to jump या शब्दाचा अर्थ शोधला तर
"to move quickly into the air by pushing yourself up with your legs and feet, or by stepping off a high place.
पावले आणि पाय यांच्या रेट्याने हवेत उंच उडी घेणे, किंवा उंचावरून खाली उडी मारणे. "

हा अर्थ सापडला. आता हा अर्थ आपण आधी शिकतो की उडी मारायला आधी शिकतो?

किती तो शब्दछल!
लोक म्हणतात कि विंडोशॅापिंग मधेही आनंद मिळतो तर ते तसे नाही, ते मन मारणे आहे, विकत घ्यायची ऐपत नाही, आपल्याला काही विकत घ्यायचे नाही ही मनाची घातलेली समजूत आहे अशीच समजूत एखाद्याने करून घेतली असेल तर काय समजावाचे.

२) आपण मुद्दाम वेळ चांगला घालवायला गार्डमधील एक कट्टा पकडून क्रिकेट खेळणारया मुलांना बघतो. काही कारणाने म्हणजे वय झालेय वा ओळख नाही म्हणून आपण त्यांच्यात खेळू शकणार नसतो तरीही ते मान्य करून ईन्व्हॉल्व्ह होत त्यांचा खेळ बघतो.
३) आपल्याला क्रिकेट खेळणारी मुले बघून स्वत:लाही खेळावेसे वाटते. ती ईच्छा दाबता येत नाही. त्यामुळे जर ते शक्य नसेल तर ते बघणे नकोच वाटते.>>>>>>>> धडधाकट, खेळात उत्तम असलेला माणूस क्रिडांगणावर जाऊन शांतपणे आणि आनंदाने खेळ बघू शकतो ना.

विंडो शॉपिंगमधे आवडीची वस्तू मनातल्या मनात सिलेक्ट किंवा शॉर्टलिस्ट केली जातेच असं काही नाही. नुसतंच 'किती मस्त आहे ना!' असं वाटतं. यात तुला सुप्त इच्छा बिच्छा दिसत असेल तर दिसो बापडी. पण 'मन मारणं' नसतं एवढं नक्की. मन मारलं जात असेल तर कुणाला आवडेल विंडो शॉपिंग करायला >>>>>> u nailed it वावे. हेच असतं की विंडोशॉपिंग

सर्वांना धन्यवाद !

अरे लोकहो! जाऊदेत. आपण आपलं मत मांडतोय , रुन्मेष त्यांची मत मांडत आहेत. नाही पटत तर दुर्लक्ष करू. हाकानाका !

आता हा अर्थ आपण आधी शिकतो की उडी मारायला आधी शिकतो?
>>>>>
माझा मुद्दा यातले काय आधी घडते हा नसून शब्दार्थ आणि प्रत्यक्ष कृती यातला फरक दर्शवणे होता.
ज्यात वस्तू बघितल्या जातात पण खरेदी केली जात नाही ती विंडो शॉपिंग झाली हा ढोबळमानाने झालेला अर्थ आहे. यात फक्त काय घडते हे नमूद केले आहे. कृतीमागचे विश्लेषण नाही.

आता समजा कलाकृतींचे प्रदर्शन भरले आहे. एखादी कलाकृती आवडली तर बघणारे विकतही घेऊ शकतात. पण आपण नुसते कलाकृती बघायची आवड म्हणून प्रदर्शनाला मुद्दाम गेलो आहोत. तर त्या केसमध्ये आपल्यासाठी ती विंडो शॉपिंग नसेल.
पण तेच जर तुम्हाला मॉलमध्ये फिरता फिरता एखादे शोभेच्या वस्तूंचे दुकान दिसले. आता तुम्ही त्या विकायला ठेवलेल्या वस्तू बघायला दुकानात शिरतानाच आपसूक तुमच्या डोक्यात विचारांचे चक्र चालू होते, की या वस्तू विकायला आहेत. पण घ्यायची म्हटले तर काय किंमत पडेल. पण आपल्याला घ्यायची नाहीच आहे. फक्त बघायची आहे.. तुमच्या डोक्यात आलेले हे विचार तुम्हाला नुसते रसिक न ठेवता ग्राहकही बनवतात. आणि त्यानंतर तुम्ही काही न घेता बाहेर पडता ती होते विंडो शॉपिंग.

आता शोभेच्या वस्तूंबाबत मनाला आपण जितके सहज समजवू शकतो की या वस्तूंची आपल्याला गरज नाही तेच कपडे, दागिने, केक चॉकलेटस या रेग्युलर वापरातल्या वस्तूंबाबत समजावणे शक्य होत नाही. त्यासाठी तुम्ही विंडो शॉपिंगमध्ये एक्सपर्टच हवे

धडधाकट, खेळात उत्तम असलेला माणूस क्रिडांगणावर जाऊन शांतपणे आणि आनंदाने खेळ बघू शकतो ना.
>>>

हो नक्कीच. ते उदाहरण मी फक्त विंडोशॉपिंग म्हणजे मन मारणे नाही, मनातला सुप्त हेतू कसा एखाद्याला आनंद देतो आणि ज्याला तो हेतू सुप्तावस्थेतच ठेवणे जमत नाही त्यालाच मग मन मारण्यापेक्षा नकोच ती विंडो शॉपिंग कसे वाटते हे दाखवण्यासाठी दिले होते. बाकी त्या ऊदाहरणाला ईतरही पैलू असतील जे विंडो शॉपिंगशी मॅच होणार नाही.

अरे लोकहो! जाऊदेत. आपण आपलं मत मांडतोय , रुन्मेष त्यांची मत मांडत आहेत. नाही पटत तर दुर्लक्ष करू. >> असं नाय हां... काळजी वाटते त्याची Wink
रून्मेष >> म्हणजे असं बघा शारूख जूहीला गाडीच्या विंडो शॉपिंग साठी घेवून गेला तर पाहिलं, कदाचित पैसे देवून पाहिलं असणार... मग ते प्रकरण विश्लेषण सांग बरं काय Happy
(जाई, अवांतर वाटले तर उडवते पण गाडी जिथे जाणारच होती तिकडे मी जरा पटकन ढकलली... Wink )

सी , बिनधास्त ! ती गाडी पुढे जाणार आहेत याची कल्पना आहेच Biggrin माझ्या भावना शाकाहाऱ्यासारख्या नाजूक नाहीत अवांतर वगैरे वाटायला Light 1 Biggrin

खरतर मला विंडोशॉपिंग या शब्दाचा शब्दश अर्थ लावलेला बघून हसायला आलं . विंडोशॉपिंग या शब्दात शॉपिंगची आस लपली आहे वगैरे.
आमच्या अकाउंटिंगमध्ये विंडोड्रेसिंग नावाची संज्ञा आहे . तिचा अर्थ तसाच शब्दशः लावून बघितला आणि गंमत वाटली. Lol

जाई. - छान लिहीले आहे.

कपडे वगैरेच्या बाबतीत विंडो शॉपिंग मधे बिलकुल इण्टरेस्ट नाही. पण इलेक्ट्रॉनिक्स, गॅजेट्स, पुस्तके, फार्मर्स मार्केट वगैरे मधे भरपूर आहे. सकाळच्या वेळी फार्मर्स मार्केट सारख्या ठिकाणी नुसते फिरायला सुद्धा मजा येते. हे सगळे हेल्दी भाजीपाले, फळे आपण आता खाणार आहोत या कल्पनेनेच एकदम मोटिवेशन येते Happy

पण तुझ्या वरच्या उदाहरणासारखेच एक - पुण्या लक्ष्मी रोडवर विजय टॉकीज चौकातून पुढे - म्हणजे बहुधा गोखले हॉलच्या आसपास एक बिस्कीटे, चॉकोलेट्स वगैरेंचे दुकान होते. दुकान मोठे नव्हते पण ठेवलेली बिस्किटे फॅन्सी असत. पुलंच्या भाषेत तेव्हा आम्हाला ते एकदम "सो हाय क्लास" वाटे. लहानपणी ती सहज घेण्याइतके पैसे हातात नसत. आईवडिलांना मागितले तर ते देणार नाहीत असे नव्हते पण एकूणच फॅन्सी गोष्टी तेव्हा कमीच घेतल्या जात. त्यामुळे त्याचे अप्रूप होते. त्याकाळात लक्ष्मी रोडवर खूप जाणे होत असे, त्यामुळे ते नेहमी दिसत असे.

जेव्हा नोकरी सुरू झाली तेव्हा ते कधीही घेता येइल असे असूनसुद्धा आवर्जून कधी जाउन घेतले गेले नाही. आता ते दुकान सुद्धा आहे की नाही माहीत नाही. पण ब्रिटानियाची बर्बॉन बिस्किटे पाहिली की अजूनही ते दुकान आठवते.

खरतर मला विंडोशॉपिंग या शब्दाचा शब्दश अर्थ लावलेला बघून हसायला आलं .
>>>>>
विंडोशॉपिंगमध्ये शॉपिंगचा शब्दशा अर्थ घेऊ नये? हि काहीतरी वेगळीच टर्म आहे का जिचा शॉपिंगशी काही संबंध नाही?

@ सिमंतिनी, आपला प्रश्नच कळला नाही Sad
सॉरी शाहरूख Sad

सीमंतिनी फार सुंदर लिक शेअर केलीत. सुंदर चित्रपट आणि विंडो शॉपिंगचे उत्तम उदाहरण. त्या काळी कित्येक मध्यमवर्गीय जोडपी गाडी घेण्याची स्वप्ने बघत असतील. पण कुठेतरी ऐपत आड येत असल्याने विंडोतूनच शॉपिंग करत असतील. ते देखील दुरूनच, शो रूमच्या बाहेर उभे राहूनच. शाहरूख मात्र त्यातही धाडस दाखवत एक पाऊन पुढे जात आपल्या हिऱोईनीसोबत गाडीत बसून वगैरे घेतो. कित्येकांना तो सीन भावला असेल मोजदाद नाही. जिओ शाहरूख Happy

Pages