प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीची धाड।आँपरेशन लोटस सुरु झाले का ।

Submitted by ashokkabade67@g... on 24 November, 2020 - 09:13

शिवसेना आमदार सरनाईक यांच्या घरी व त्यांच्या मुलांच्या घरी ईडीने धाड टाकुन त्यांच्या पुत्राला ताब्यात घेतले विषेश म्हणजे योग्य वेळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेवू या वक्तव्यानंतर लगेचच ही कारवाई करण्यात आली त्यामुळे महाराष्ट्रात चर्चेच वादळ उठले आहे ।ईडी या संस्थेचा केंन्द्र सरकार गैरवापर करत असुन आमदारांमधे भितीच वातावरण निर्माण करुन महाराष्ट्रातील महाआघाडी सरकार पाडण्यासाठी आँपरेशन लोटसची ही सुरवात आहे आसे तर्कही लढवले जात आहेत ।प्रश्न हा आहे कि खरोखरच ही आँपरेशन लोटसची सुरवात आहे का आज एबिपि माझा या चँनलवर या विषयावर चर्चा सुरु असतांना भाजपाचे प्रवक्ते बोलून गेले की या कारवाई विरोधात आरडाओरड सुरु करुन मोठ्या नेत्याला वाचवण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे याआधी भाजप नेत्यांनी उद्धवजींवरजमिन खरेदीबाबत नाईक प्रकरणात आरोप केले होते यावरून भाजपचे पुढचे टार्गेट मा.शिवसेना प्रमुख आहेत का हाही प्रश्न उभा रहात आहे ईडीच्या कारवाईची भिती सेना आमदारांना दाखवून त्यांनाही ब्लँकमेल करण्याचा तर हा प्रयत्न नाही ना । आज भाजपत प्रवेश केलेले अनेक नेतेही काही धुतल्या तांदळा सारखे स्वच्छ नाहीत भाजपनेच त्यांच्यावर अनेकदा आरोप केलेले आहेत मग त्या आरोपांचे काय झाले त्यांच्यावर आजपावेतो कारवाई का झाली नाही का ते भाजपच्या गोटात येताच पवित्र झाले का आमच्या सोबत या आम्ही तुम्हाला अभय देवू असा काही प्रकार आहे ,का सरकार पाडण्यासाठी हे सारे प्रयत्न आहेत आजतरी या प्रश्नांची उत्तरे काळाच्या पडद्याआड दडलेली असली तरी लवकरच उत्तर मिळेल अशि आशा आहे.जनतेनेच आता ईडी कडे मागणी करावी की आजपावेतो झालेल्या प्रत्येक आमदार खासदारांच्या मालमत्तेची चोकशी ईडीने करावी आणि सत्य उघड करावे।

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अदिलशाहीच्या दरबारात नोकरी केली ती चालली वाटते. आपला तो बाब्या.
नवीन Submitted by रश्मी.. on 4 January, 2021 - 12:14
--

ब्रिग्रेडी इतिहास वाचणार्‍यांच्या बेसिक मधेच लोचा असतो. तेंव्हा असली तथ्थे त्यांच्या बुद्धी पलिकडची आहेत. श्री समर्थ रामदास स्वामिंना अदिलशाहाचा हेर म्हणणारे डोक्यावर पडलेले ब्रिगेडीच असू शकतात याचा पुरावा म्हणजे विजापूरचा अफझलखान, श्री शिवाजी महाराजांवर आक्रमण करण्यास निघाल्याची सूचना महाराजांना देणारे हे समर्थ रामदास स्वामी यांचे अस्सल पत्र.

वि वेके करावे कार्यसाधन।
जा णार नरतनु हे जाणून।
पु ढील भविष्यार्थी मन।
हाटोचिं नये॥१॥

चा लो नये असन्मार्गी।

त्यता बाणल्या अंगी।
घुवीरकृपा ते प्रसंगी।
दा सामहात्म्य वाढवी॥२॥
जनीनाथ आणि दिनकर।

नि त्यनेमे करिती संचार।
घा लिताती येरझार।
ला विले भ्रमण जगदीशे॥३॥

दिमाया मूळ भवानी।
हे चि जगाची स्वामिनी।

येकांती विवंचना करोनी।
इष्ट योजना करावी॥४॥

>>इथले भाजप समर्थक नक्की कशाबद्दल नाचताहेत?<<

इडी किंवा तत्सम कुठल्याही संस्थेचा 'अतिवापर' वाईटच..... वापर सगळेच राजकीय पक्ष कमी अधिक प्रमाणात करतात पण अति झाले की सर्वसामान्य लोकांच्या डोळ्यावर येतेच!

असल्या स्टंटनी फक्त कार्यकर्ते आणि मिडियावाले खुष होतात.... सर्वसामान्य जनता नाही.

पण "तुम्ही इडी लावली तर आम्ही सीडी लावू" किंवा "ईडी म्हणजे सरकारच्या हातातला पोपट" वगैरे डायलॉग ऐकताना आणि होर्डींग बघताना जश्या काय तुम्हाला गुदगुल्या झाल्याच नव्हत्या.

ज्या सर्वसामान्य जनतेला ईडीचा गैरवापर दिसतो त्या सर्वसामान्य जनतेच्या नजरेतुन हा "माज" पण सुटत नाही!

श्री शिवाजी महाराजांवर आक्रमण करण्यास निघाल्याची सूचना महाराजांना देणारे हे समर्थ रामदास स्वामी यांचे अस्सल पत्र.
ह्या माहितीचा स्रोत काय आहे?? आता म्हणू नका की तुम्हाला हे सकाळी शाखेत शिकवले.
जाता जाता , अफजलखान चालून येत होता तर तुमचा रामदास नुसताच सूचना का देत बसला? कासेची लंगोटी सोडून अफझुल्याच्या माथी काठी हाणण्यास का नाही आला?
नक्की कशाची कमतरता होती?? कासेला लंगोटी नव्हती की हातात काठी नव्हती? की अफझुल्या नाठाळ नव्हता? की आदिलशाहची खप्पा मर्जी परवडणारी नव्हती? भिक्षा/सबसिडी बंद झाली असती काय? पण मग सत्यनारायण कावला असता की आदिलशहावर. लढाई न करताच जिंकला असता की रामदास.

झंपु बाळा हे जाऊन तू एबिपी माझाला विचार. त्यांच्याकडे आहे तो पुरावा. तू तुझ्या अफजुल्ल्याची काळजी कर. आणी तरीही समाधान होत नसेल तर खा. अमोल कोल्हेंना विचार, त्यांनीच सिरीयल काढलीय. बघतो आम्ही रोज.

भाजप तून बाहेर पडताच नेत्यांमागे इ डी लागते.
आणि इतर पक्षातल्या असेल तर तो भाजपचं येईतो सीबीआय, इ डी मागे लागतात.
हेही सर्वसामान्य जनतेला दिसत असेलच

>>हेही सर्वसामान्य जनतेला दिसत असेलच<<

तेच लिहलय की..... पुढचे पण वाचा आणि शक्य असेल तर मतप्रदर्शन करा Proud

>>हेही सर्वसामान्य जनतेला दिसत असेलच<<

तेच लिहलय की..... पुढचे पण वाचा आणि शक्य असेल तर मतप्रदर्शन करा Proud

इतिहास घडवता येत नसलेले दुसर्‍यांनी घडवलेला इतिहास विखारी विचारधारेने अन लेखणीने बिघडवायला मात्र नेहमी पुढे असतात.. म्हणुन तर भविष्यात त्यांच्या आबा-आज्ज्या-पंज्याची नेहमी इज्जत निघते.. अनाजी पंतुकड्या सारखी...!! Biggrin

सुधारित ...

वाल्या कोळी रोज आपल्या कुटुंबासाठी वाटमारी करत होता. गरीब वाटसरूंना लुटून जे मिळेल ते घरी बायको जवळ देत असे.
एके दिवशी काय झालं, - नाही नाही, नारदमुनी नाही आले; तर वाल्याच्या बायकोला ED ची नोटीस आली. वाल्या चिंतेत पडला. आपले राजकीय गुरू नारदमुनींकडे गेला. मुनी म्हणाले, 'जा की बायकोकडे आणि विचार तिला, माझ्या पापात वाटेकरी होऊन ED ला तोंड देशील का?'
वाल्या कोळी गेला बायकोकडे आणि विचारू लागला. बायको जाम डाफरली त्याच्यावर. म्हणाली, 'तुमची पापं लपवण्यासाठी तुम्ही माझा वापर केलात. मी थोडंच तुम्हाला वाटमारी करून माझ्या खात्यावर जमा करायला सांगितलं होतं? आता निस्तरा तुमचं तुम्हीच.'
बिचारा वाल्या गेला पुन्हा नारदमुनींकडे. आता हे कलियुगातील नारद. त्यांनी काही वाल्याला 'राम राम' जप करायला सांगितला नाही. तर 'घे माईक आणि घाल शिव्या', ' उचल पेन आणि खरड अपशब्द' हा खाक्या स्विकारायला लावला.
तेव्हापासून वाल्याचा सैराट झालाय.
त्रेतायुगात वाल्याचा वाल्मिकी झाला होता.
आता कलियुगात वाल्याचा मवाली होणार.

इकडे नारदमुनी गालात हसताहेत.
वाल्याला काय ठाऊक, ED ला स्वप्नात दृष्टांत देणारे हे नारदच आहेत....
Happy

Pages