कोव्हिद लस देण्यासाठी प्राधान्यक्रम काय असावा?.

Submitted by विक्रमसिंह on 21 November, 2020 - 08:05

करोना वायरस मुळे होणार्‍या आजार होऊ नये म्हणून प्रतिबंधक लस लवकरच उपलब्ध होईल अश्या बातम्या येत आहेत.
जवळपास १२ कंपन्या याबाबदच्या चाचण्या घेत आहेत यात भारत बायोटेक ही हैदराबाद येथील कंपनी पण आहे. लस कुणीही शोधली तरी भारताची उत्पादनाची क्षमता पहाता एकूण उत्पादनापैकी कमित्कमी ५० % उत्पादन भारतात होइल असे दिसते.

एकदा लस उपलब्ध झाल्यावर ती कुणाला प्राधान्यक्रमाने द्यावी याबाबत विचार आणि माहिती गोळा करण्याचे काम चालू झाले आहे. मला खालीलप्रमाणे प्राधान्यक्रम अअसावा असे वाटते.

१. वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्ति. डॉक्टर्स, नर्सेस, आणि रुग्णालयातील कर्मचारी;
२. अत्यावश्यक क्षेत्रातील विविध आस्थापनातील कर्मचारी. सैन्य, पोलिसदले, फायर ब्रिगेड, स्वच्छता विभाग, पाणिपुरवठा, शेतकरी, सार्वजनीक रस्ते वाहतूक (सरकारी व खाजगी ;
३. जीवनावश्यक वस्तुपुरवठा साखळी - दुकानदार, किरकोळ भाजी, दूध विक्रेते अशी व इतर सर्व सुपर स्प्रेडर प्रकारातील मंडळी;
४. वैद्यकिय उत्पादन ( फार्मा) आस्थापनातील कर्मचारी, आधीचे गंभीर आजार असणार्‍या व्यक्ति:
५. इतर आस्थापनातील प्रत्यक्ष उत्पादनाचे काम करणारे कर्मचारी, रेलवे, विमान वाहतूक, न्यायव्यवस्था कर्मचारी;
६. शिक्षक, मुले व शिक्षणक्षेत्रातील कर्मचारी वर्ग;
७. इतर आस्थापनातील इतर सर्व कर्मचारी;
८. उर्वरीत सामान्य जन

यात मी जेष्ठ नागरीक असा भेदभाव केलेला नाही. ते जर काम करत नसतील तर त्यांनी शांतपणे घरात बसावे. मुलांनीही शाळा सुरू होईपर्यंत घरी बसावे.

यात अजून एक सध्याच्या कोविद प्रादुर्भावानुसार अति, मध्यम व कमी अशी शहरी/ग्रामीण क्रमवारी करून मग वरचा क्रम लावता येइल. तरी १,२,३ साठी सर्वत्र लस पुरवल्यावर मग इतर क्रमांकावर जाता येइल.

तुमच्यावर जर प्राधान्यक्रम ठरवण्याची जबाबदारी असेल तर तुम्ही काय सुचवाल.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विक्रम,
योग्य क्रम.
एक सुधारणा:

तुमच्या १ नंतर / बरोबर हे यावे:
दीर्घकालीन आजार असलेले आणि अन्य ज्येष्ठ नागरिक.

काही तरी गंभीर pre existing condition असलेल्यांना तीन नंबरवर टाकता येईल. बाकी प्राधान्यक्रम चांगलाच वाटतोयं. (यात तरूण व लहान मुलं,ज्येष्ठ सगळेच येतील)

मी टाईपकरेपर्यंत कुमारसर यांचा प्रतिसाद आला.
मलाही हे दोन का तीन असावे कळत नव्हते.

ज्येष्ठ नागरिकांना यादीत आधी टाकेन. घरी बसावे हे बरोबर असले तरी ते घरी एकटे बसणार असतील तर ठीक. घरात मुलं /नातवंडे पण रहात असली तर घरी बसण्याला काही अर्थ उरत नाही. भारतात सर्वाँना (फक्त शहरे नाही) लस मिळे पर्यंत दोन/ तीन/ चार वर्षे लागतील असं मध्यंतरी वाचलं. इतका वेळ कुणालाही घरी बसा सांगणे अमानुष आहे. ज्ये ना जास्त vulnerable आहेत म्हणून त्यांना आधी. बाकी ठीक आहे क्रम.
कुमार +1

राजकारणी
अति श्रीमंत, टॉप चे बिझनेसमन
पक्षाचे पदाधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय
सरकारी अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय
राजकीय वरदहस्त असलेली लोकं
डॉकटर, नर्सेस आणि ऍम्ब्युलन्स वाले
पोलीस, सैन्यदल आणि राखीव सुरक्षा दल
छोटे मोठे व्यापारी, बागाईतदार
आणि उरलीच यातून तर मग मध्यमवर्गीय आणि नंतर सामान्य कष्टकरी जनता

लस काही साईड इफेक्ट निर्माण करत नाही ना ह्याची जोपर्यंत 100% खात्री होत नाही तो पर्यंत सामान्य लोकांना नक्की प्राधान्य दिले जाईल.

राजकारणी
अति श्रीमंत, टॉप चे बिझनेसमन
पक्षाचे पदाधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय
सरकारी अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय
राजकीय वरदहस्त असलेली लोकं
डॉकटर, नर्सेस आणि ऍम्ब्युलन्स वाले
पोलीस, सैन्यदल आणि राखीव सुरक्षा दल
छोटे मोठे व्यापारी, बागाईतदार
आणि उरलीच यातून तर मग मध्यमवर्गीय आणि नंतर सामान्य कष्टकरी जनता
<<

This is THE correct sequence.

सर्व लसी अर्धवट ट्रायल्स घेउन व घिसाडघाईने बनवलेल्या आहेत. पहिले ५ गिनिपिग झाल्यानंतर बाकीच्यांना लस द्यावी हे माझे मत.

दुसरे, माझ्या अल्पज्ञानानुसार ही mRNA Vaccine आहे. कोल्ड चेन मेन्टेन होणार नाहिये. सब-झिरो टेम्परेचरला साठा व वाहतूक अपेक्षित आहे.

कुमारजी : दीर्घकालीन आजार असलेले >> हे जरा सब्जेक्टिव होइल. पण ठिक आहे. कोविद नसलेले पण दवाखान्यात भरती असलेले अस काही तरी ठरवता येइल.
तंदुरुस्त जेष्ठ नागरीक माझ्या मते घरीच असावेत. थोडा त्याग त्यांनी स्वतःसाठीच करायला हवा.

पण वाद विवाद न होता हा क्रम ठरवणे किती अवघड आहे हे आपल्या लक्षात येते.

वर दिलेल्या order ने जायचे असेल तर शालेय विद्यार्थी आणि शिक्षक याना लस टोचली जायला किती वेळ लागेल? कारण तोवर शाळा सुरू होणार नाहीत ना? आपल्या पाल्याला २-३ वर्ष घरी ठेवून शिकवायची किती पालकाची तयारी आहे? त्यात पाल्याचे शैक्षणिक नुकसान होईल असे खरोखरच वाटत नाहीत का?

राज्यात रिकव्हरी रेट वाढला होता. नव्या रुग्णांच्या दुपटीचे दिवस वाढत चालले होते. कोणते औषध नसताना देखील लोकांना आपण कोरोना झालाच तर बरे होऊ असा आत्मविश्वास येऊ लागला होता. पण मग लशीच्या संशोधनावर घातलेले अब्जावधी रुपये फुकट जातील म्हणून आता करोनाची दुसरी लाट येणार आहे.

मुळात जो रोग कोणत्याही औषधाविना बरा होऊ शकतो, ज्याचा रिकव्हरी रेट ९०% वर आहे. डेथ रेट ३% पेक्षाही कमी आहे (त्यातही इतर रोग निगडीत असलेल्या रोग्यांचं प्रमाण जास्त आहे. केवळ आणि केवळ करोनाने मरण पावलेल्या लोकांची सरकारी यादी कुठेच मिळत नाहीय), जे रोगी आहेत त्यातले अधिकतर asymptomatic किंवा minor sympotms असणारे आहेत, त्या रोगाला दिलं जाणारं अवास्तवी महत्व आता थांबवलं पाहिजे.

या रोगाचं अस्तित्व मी अमान्य करत नाहीय पण या रोगाला इतर रोगांसारखच ट्रीट करायची वेळ आली आहे. मान्य आहे या रोगाने माणसे मरतात पण ती अगदी सर्दी पडशाने देखील मरतात. कोणताही रोग म्हटला तर mortality rate हा आलाच. टीबी रोगाने २०१९-२० ला जगभरात करोनापेक्षा जास्त माणसे गेली पण टीबी रोग जेव्हा माहित झाला तेव्हा आपण मास्क लावला नव्हता. तो देखील असाच संसर्गजन्य रोग आहे.
मुळात मास्क लावून करोनाला थांबवणे म्हणजे कबुतराच्या जाळीने मच्छरला थांबवण्याचा प्रयत्न करणे आहे. पण ते जाऊ दे. नियम बनवला आहे तर लावू.
थोडक्यात आपली वैयक्तिक स्वच्छता ठेवणे, लक्षणं दिसली तर शक्य तितके दुसर्‍यांपासून दूर राहणं इतकं कराव आणि करोनाचा बाऊ न करता आपले दैनंदिन व्यवहार सुरू ठेवावे. लस येईल तेव्हा ज्यांना खूपच भिती वाटते त्यांनी घ्यावी. कमीत कमी मी तरी अशी घाई गडबडीत येणारी लस लगेच टोचून घेणार नाहीय.

कमीत कमी मी तरी अशी घाई गडबडीत येणारी लस लगेच टोचून घेणार नाहीय. >> १००% पटल. पण शाळेने सक्ती केली तर मुलीला लस द्यावीच लागेल अशी भिती वाटते.
कोणते औषध नसताना देखील लोकांना आपण कोरोना झालाच तर बरे होऊ असा आत्मविश्वास येऊ लागला होता. पण मग लशीच्या संशोधनावर घातलेले अब्जावधी रुपये फुकट जातील म्हणून आता करोनाची दुसरी लाट येणार आहे.>> हे सुद्धा पटले.

पण शाळेने सक्ती केली तर मुलीला लस द्यावीच लागेल अशी भिती वाटते. >> मम, उद्यापासून नववी ,दहावी शाळा सुरू होत आहेत. पालकांचे संमतीपत्र घेऊन शाळेत उपस्थित राहायचे आहे.
कोणते औषध नसताना देखील लोकांना आपण कोरोना झालाच तर बरे होऊ असा आत्मविश्वास येऊ लागला होता. पण मग लशीच्या संशोधनावर घातलेले अब्जावधी रुपये फुकट जातील म्हणून आता करोनाची दुसरी लाट येणार आहे.>> हे सुद्धा पटले.

सिरमच्या लशीची किंमत सुद्धा रुपये ४०० ते ७०० च्या मध्ये आहे असे वाचले. ही किंमत अधिकतर मध्यमवर्गीयाच्या खिशाला परवडेल अशी ठेवली आहे. कारण मध्यमवर्गीय व्यक्तीच या लशीच्या ग्राहक ठरणार आहेत. गरीब कष्टकरी लोकानी केव्हाच या रोगाबरोबर जगणे स्वीकारले आहे.
दुसरे असे की रेमीडिस्वीर हे औषध करोनापासून बचाव करण्यास उपयोगी नाही असे WHO ने नुकतेच जाहीर केले आहे. पुण्यात September मधे हे औषध मिळवण्यासाठी डॉक्टर्स/ हॉस्पीटल्स केवढी धडपड करत होती. ती सगळी धडपड आणि त्यासाठी खर्च केलेले लाखो करोडो रूपये अनावश्यकच होते का? WHO ने सुद्धा आत्ताच हे जाहीर का करावे? पुढच्या वर्षी जर WHO ने जाहीर केले की सिरमची लसही परीणामकारक नाही, तर काय करायचे? पुन्हा लॉकडाऊन करायचे?

हे निर्णय ज्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार असतात

WHO ला एकदम स्वप्न नाही पडत काय उपयोगी आहे आणि काय निरुपयोगी आहे

आपण आजची जी गाईड लाईन आहे ती फॉलो करायची

ज्येष्ठ नागरिकांना घरात बसून सुद्धा कोव्हिडची बाधा होते.

ज्यांना संसर्गामुळे त्रास ,मृत्यू होण्याचा धोका अधिक आहे त्यांना मी वर ठेवेन.

लस येणार त्या विषयी वरचेवर बातम्यांचा रतीब.
आणि corona परत येतोय ह्या बातम्यांचा रतीब.
समांतर चालु आहे.

लस येणार नाही.एप्रिलपर्यंत तरी.ऑक्सफर्डलस मागे पडली आहे व आजच भारतात चाचणी दरम्यान कोव्हॅक्सीन या भारतीय लसीचा ॲडवर्स इव्हेंट घडल्याचे वाचले.अमेरीकेत मॉडर्ना नावाच्या कंपनीची एमारेने लस ही वजा -८० डिग्रीला ठेवावी लागत आहे.ही लशीने सर्व चाचण्या पुर्ण केल्या आहेत व या लशीचे दुष्परीनाम नाहीत.भारतात ह्या लसीचे काम नाही कारण कोल्ड स्टोरेजचा प्रश्न आहे. पुढच्या सहा महिन्यांमध्ये लस येईल असे ज्यांना वाटत आहे त्यांना शुभेच्छा.

Astrezenca, भारत बायोटेक, मॉडर्ना, पिफायझर ई नी आपलीच लस जास्ती परिणामकारक असं जाहीर करण्याची स्पर्धाच लावलीय.
ह्यातली खरी परिणामकारक लस कोणती हे येणारा काळच ठरवेल.
त्यातून ती सर्वसामान्यांना कधी मिळणार हा तर त्या हून मोठा प्रश्न.
तो पर्यंत मास्क, सानिटायझर, सोशल डिस्टंसिन्ग हे पाळणे आलेच.

फायझरची लस उणे ७० ला ठेवावी लागते. Moderna ची उणे २० म्हणजे जवळपास फ्रीझर तापमानाला ठेवावी लागते.
आमच्या देशाच्या चीफ मेडिकल ऑफिसर ने/ हेल्थ सिस्टीम ने सर्टिफाय केली आणि उतरंडी मध्ये आमचा नंबर लागला की आम्ही घेणार.
>>जाहीर करण्याची स्पर्धाच लावलीय.>> तो पर्यंत शेअर्स घेऊ Wink

तो पर्यंत मास्क, सानिटायझर, सोशल डिस्टंसिन्ग हे पाळणे आलेच. >> आणि शाळा/ कॉलेजेस बंद ठेवणे, शिक्षणाची हेळसांड करणे हेही आलेच. Happy
लस येणार नाही.एप्रिलपर्यंत तरी. >> म्हणजे २०२१ च्या academic year मधेही शाळा सुरू होणार नाहीत.
Online शिक्षण समाजातील किती टक्के मुलांपर्यंत पोचते आहे? ती मुलं त्यातून खरचं किती शिकत आहेत?
करोना बाधित झालेल्यांपैकी ४% लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आपण किती मुलांच्या भविष्याचा बळी देत आहोत?

@अमितव,बरोबर फायजर बायॉनटेक -७० आहे आणि मॉडर्ना -२०.
mRNA लसी पहिल्यांदाच येत आहेत.त्या घेतल्याने DNA म्युटेट होऊन कॅन्सर होणार असे ॲन्टीव्हॅक्सर्स अमेरिकेत सांगत आहेत त्यात कितपत तथ्य आहे.?

https://www.loksatta.com/photos/picture-gallery-others/2334665/bharat-bi...

यात लशीच्या परिणामकारकतेची टक्केवारी किती आहे ते सांगितलं आहे. पण ६०% परिणामकारक असलेली लस देऊन काय फायदा? बातमी मध्ये म्हटलं आहे की ती लस ६०% पेक्षाही जास्त परिणामकारक ठरेल असा अंदाज आहे. बाकीच्या (देशी/विदेशी) लशींच्या तुलनेत हे फार कमी आहे.

त्यामुळे वाचताना अशी शंका आली की परिणामकारक असणं हे लोकसंख्येच्या प्रमाणात की शरीरात निर्माण होणाऱ्या प्रतिकारशक्ती बाबत आहे?(मला हे कदाचित नीट लिहीता येत नाही)

लस मी सुद्धा आल्याआल्याच काय तर पुढेही टोचून घेणार नाही असाच विचार करतोय. कारण आता घर शिफ्टींग, सुरू झालेले ऑफिस, गणपती, दिवाळी, एकूणच या सर्वानंतर कुठेतरी वाटतेय की कोरोना आता आम्ही पचवला आहे.

अर्थात अतिरीक्त सुरक्षा म्हणून ऐपत असल्याने लस नक्कीच घेऊ शकतोय. पण तिने आणखी काही समस्या उद्भवणार नाहीत ना याची खात्री नाही. ती खात्री लगेच दोन चार महिन्यात येणारही नाही असे वाटते.

बाकी मला आणखी एक टेंशन याचे आहे की लसीच्या नावावर एक महाघोटाळा होणार आहे. त्याचा नाहक फटका देशाला आणि मुख्यत्वे मध्यमवर्गाला बसणार आहे.

आता हि लस ऐच्छिक करणार आहेत की कंपलसरी याबद्दल कोणाला काही आयड्या?

Pages