कोव्हिद लस देण्यासाठी प्राधान्यक्रम काय असावा?.

Submitted by विक्रमसिंह on 21 November, 2020 - 08:05

करोना वायरस मुळे होणार्‍या आजार होऊ नये म्हणून प्रतिबंधक लस लवकरच उपलब्ध होईल अश्या बातम्या येत आहेत.
जवळपास १२ कंपन्या याबाबदच्या चाचण्या घेत आहेत यात भारत बायोटेक ही हैदराबाद येथील कंपनी पण आहे. लस कुणीही शोधली तरी भारताची उत्पादनाची क्षमता पहाता एकूण उत्पादनापैकी कमित्कमी ५० % उत्पादन भारतात होइल असे दिसते.

एकदा लस उपलब्ध झाल्यावर ती कुणाला प्राधान्यक्रमाने द्यावी याबाबत विचार आणि माहिती गोळा करण्याचे काम चालू झाले आहे. मला खालीलप्रमाणे प्राधान्यक्रम अअसावा असे वाटते.

१. वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्ति. डॉक्टर्स, नर्सेस, आणि रुग्णालयातील कर्मचारी;
२. अत्यावश्यक क्षेत्रातील विविध आस्थापनातील कर्मचारी. सैन्य, पोलिसदले, फायर ब्रिगेड, स्वच्छता विभाग, पाणिपुरवठा, शेतकरी, सार्वजनीक रस्ते वाहतूक (सरकारी व खाजगी ;
३. जीवनावश्यक वस्तुपुरवठा साखळी - दुकानदार, किरकोळ भाजी, दूध विक्रेते अशी व इतर सर्व सुपर स्प्रेडर प्रकारातील मंडळी;
४. वैद्यकिय उत्पादन ( फार्मा) आस्थापनातील कर्मचारी, आधीचे गंभीर आजार असणार्‍या व्यक्ति:
५. इतर आस्थापनातील प्रत्यक्ष उत्पादनाचे काम करणारे कर्मचारी, रेलवे, विमान वाहतूक, न्यायव्यवस्था कर्मचारी;
६. शिक्षक, मुले व शिक्षणक्षेत्रातील कर्मचारी वर्ग;
७. इतर आस्थापनातील इतर सर्व कर्मचारी;
८. उर्वरीत सामान्य जन

यात मी जेष्ठ नागरीक असा भेदभाव केलेला नाही. ते जर काम करत नसतील तर त्यांनी शांतपणे घरात बसावे. मुलांनीही शाळा सुरू होईपर्यंत घरी बसावे.

यात अजून एक सध्याच्या कोविद प्रादुर्भावानुसार अति, मध्यम व कमी अशी शहरी/ग्रामीण क्रमवारी करून मग वरचा क्रम लावता येइल. तरी १,२,३ साठी सर्वत्र लस पुरवल्यावर मग इतर क्रमांकावर जाता येइल.

तुमच्यावर जर प्राधान्यक्रम ठरवण्याची जबाबदारी असेल तर तुम्ही काय सुचवाल.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१ ते ३ नंतर तर काही वेळा आधीच ,कुमार यांनी म्हटल्याप्रमाणे
दीर्घकालीन आजार असलेले आणि अन्य ज्येष्ठ नागरिक.

माझ्या समजुतीनुसार लस टोचून घेतल्याने आपल्याला होणारा संसर्ग टळणार नाहीए, तर त्या संसर्गाचा त्रास = आजार होणार नाहीए.
लस टोचल्यावर संसर्ग झाला तरी मनुष्य कॅरियर राहीलच. (हे चूक असल्यास सांगा)

त्यामुळे ज्यांना आजार होण्याची शक्यता अधिक आहे, त्यांना लशीसाठी प्राधान्य मिळायला हवे. यात वैद्यक क्षेत्रातले लोक आले कारण त्यांना संसर्ग होण्याची आणि व्हायरल लोड अधिक असण्याची आणि त्यातून ते आजारी पडण्याची शक्यता अधिक आहे.
तसंच ज्येष्ठ नागरिक , मधुमेहादि आजार असलेले लोक यांची प्रतिकारक्षमता कमी असल्याने त्यांना आजार होण्याची शक्यता अधिक.

ज्ये ना घराबाहेर पडले नाहीत तरी त्यांच्या सोबत राहणारे तरुण बाहेर जातात व वृद्धांना संसर्ग पोचवू शकतात.

वृद्धांना पूर्णपणे आयसोलेशनमध्ये ठेवणं अशक्य आणि अयोग्य आहे.

करोना बाधित झालेल्यांपैकी ४% लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आपण किती मुलांच्या भविष्याचा बळी देत आहोत? >> ह्या ऐवजी एक दुसरा विचार मांडते-
अचानक एवढ्या प्रमाणावर जेव्हा लोक मृत्यूमुखी पडतात तेव्हा सर्व यंत्रणांवर ताण येतात. प्रेतं शीतगृहात ठेवून टप्प्याटप्प्याने जाळावी लागतात. पुरणे इ जशा इच्छा असतील ते ते तसं तसं करावे लागते. जिथे अशा सोयी करता येत नाहीत तिथे प्रेतांची विल्हेवाट लावणे मोठी समस्या होवून बसते व इतर रोगराई फैलावू लागते. स्टडी-अ‍ॅट-होममुळे मुलांचे ह्या इतर रोगराईपासून संरक्षण होते. एकूण कोव्हीड रूग्णसंख्येच्या ११% रूग्ण बालके आहेत तर हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले अशा रूग्णात ३% रूग्ण मुले आहेत. मुले मरत नाहीत म्हणून शाळा इ उघडून त्यांना एका अनोळखी व्याधीच्या सामोरे जाऊ द्यायचे हे पटत नाही. ह्या व्याधीचे दूरागामी परिणाम काय हे अजून लक्षात आलेले नाही.

शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे हे मान्य आहे पण ती फार छोटी किंमत आहे.

महाराष्ट्रात सरकारने दहावी पास होऊन अकरावीत कॉलेजात गेलेल्या मुलांचे प्रवेशच होऊ दिले नाहीयेत. मराठा आरक्षण प्रकरणामुळे. याआधी कधी नोव्हेंबर एंडपर्यंत प्रवेश झाले नाहीत असं झालं नसेल. कोविद चा काही संबंध नाही.
निदान 11वी प्रवेश झाले असते तर ऑनलाइन तरी कॉलेज सुरू झालं असतं.
इथे लिहायचा उद्देश इतकाच की कोविदमुळे हे सगळं होतंय असा लोकांचा गैरसमज आहे पण खरं कारण वेगळंच आहे. बाकी निदान नववीतून दहावीत त्याच शाळेत गेलेल्या मुलांचे ऑनलाइन वर्ग तरी सुरू आहेत. मीडिया देखील याबद्दल बिस्कीट खाऊन गप्प आहे.
ही तीन आठवड्यांपूर्वीची एक बातमी सापडली.

https://m.lokmat.com/mumbai/eleventh-admission-process-controversy-marat...
अकरावी प्रवेश प्रक्रिया मराठा आरक्षणाच्या कचाट्यात

लस किती वेळ प्रभावी. राहिल याचे उत्तर आजुनही नाही.

लस जरी ९५% यशस्वी असली आणि सगळ्याना दिली गेली तरी भारतात सध्या दर रोज १२०० केसेस येउ शकतात (४८००० च्या ५%) . जर शाळा , ऑफिस , लोकल ट्रेन्स चालु केल्यास हे प्रमाण खुप वाढु शकते.

लसीकरणात काय side effect आहेत ते माहित नाही.

काही दिवसा पुर्वीच्या बातमीनुसार पुण्यातील ७५% लोकात अ‍ॅण्टीबॉडीक नैसर्गिकरित्या निर्माण झाल्या आहेत. लस येईल तेव्हा हे प्रमाण ९०% च्या वर पोहोचले असेल जे लस देण्या एवढेच effective आहे.

लस आल्यावर ती अती श्रीमंत , राज्कारणी लोक त्याचे नातेवाईक याना भरपुर पैसे चार्ज करुन द्यावे जेणेकरुन. सामन्य लोकाना लस देण्याचा आधी side effect माहिती पडतिल आणि जे जास्त पैसे मिळाले त्यातुन बाकी लोकाना कमी किमतीत लस मिळेल.

मुले मरत नाहीत म्हणून शाळा इ उघडून त्यांना एका अनोळखी व्याधीच्या सामोरे जाऊ द्यायचे हे पटत नाही. >> करोना ही अनोळखी व्याधी आहे आणि त्याचे दूरगामी परिणाम माहीत नाही म्हणून शाळा उघडायच्या नाहीत. मग online शिक्षणाचे दूरगामी परिणाम तरी कुठे माहीत आहेत आपल्याला? त्यातून निर्माण होणार्‍या शारिरीक आणि मानसिक व्याधींचा विचार करायचा नाही का?

शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे हे मान्य आहे पण ती फार छोटी किंमत आहे. >> राज्यातलं बालविवाहांचे प्रमाण वाढले आहे. शाळेविना असणारी कितीतरी मुले/मुली कदाचित पुन्हा कधीच शाळेत जाणार नाहीत. त्यामुळे त्यातील काही गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नविन जन्मलेल्या मुलांना योग्य त्या लसी (इतर आजारांपासून बचाव करण्यासाठी) मिळत नाहीत. त्यामुळे अश्या मुलांना भविष्यात अनेक दुर्धर आजारांचा सामना करावा लागणार आहे.
ही सर्व तुम्हाला छोटी किंमत वाटत असेल आणि करोनामुळे मरणार्‍यांच्या प्रेतांची विल्हेवाट कशी लावणार? हीच समस्या मोठी वाटत असेल तर मात्र लॉकडाऊन पुढची २-३ वर्ष असेच चालू द्या. ही सर्व छोटी किंमत चुकवून आपण करोनावर नक्कीच मात करू असा तुम्हाला विश्वास वाटतोय ना? मग होऊन जाउ दे अजून एक लॉकडाऊन. आहे काय आणि नाही काय?

करोना ने जगापुढे असा खोडा टाकलाय की कोणतंच एक सोल्युशन पूर्ण परफेक्ट नसणार आहे.त्यामुळे प्रत्येक एरिया ने आपल्याला त्यातल्या त्यात फायदेशीर निर्णय घ्यावा.
ऑनलाईन शिक्षण गावांकडे कठीण आहे.इंटरनेट, फोन च्या अडचणी आहेत.अश्या प्रसंगी जर 5-10 चे छोटे गट तयार करून एखादे नेट कॅफे सारखे ठिकाण करून तिथे मुलांना शिकता आले तर प्रश्न सुटतील.
शहरांमध्ये तसाही ऑनलाईन शिकत राहिल्याने फार फरक पडत नाहीये.डे केअर बंद असल्याने नोकरी करणारे आईबापही पूर्वी सारखा दिनक्रम चालू ठेवू शकणार नाहीयेत.काहीतरी करून कोणा एकाने घरी थांबणे, वेळा वेगवेगळ्या ठेवून मॅनेज करणे असंच काहीतरी करावं लागणार आहे.
थोडक्यात हे शैक्षणिक वर्षं भूताला गेलं असं म्हणावं लागणार आहे.

उपासमार होउ नये म्हणून व आर्थिक अधोगती थांबवण्यासाठी व्यवहार चालू ठेवण भाग आहे. व्यवहार थांबवण राष्ट्राला परवडणार नाही. व्यवहार चालू ठेउन कमीत कमी मृत्यू होतील अशी स्ट्रूटेजी पाहिजे. हे गाइडिंग प्रिन्सीपल असावे.
एक वर्ष शाळा बंद राहिल्यातरी काही फरक पडत नाही. बंद ठेवाव्यातच.
एकदा लशीची उपयुक्तता सिद्ध झाली की अँटीबॉडीज नसलेल्या जनतेला लस कंपल्सरी करावी असे मला वाटते. येलो रेशन कार्ड वाल्यांना मोफत द्यावी.

आता 1 वर्ष झाले.
100 टक्के नसेल पण 80 टक्के तरी लोक संक्रमित झाली असतील .
श्वसन मार्गातून होणारे इन्फेक्शन रोखणे तसे कठीण च असते.
मास्क, sanitizer, स्वच्छता,हे काही 100 टक्के रक्षण करू शकत नाहीत.
विषाणू हवेतून किती लांब जातो,हवेत किती वेळ राहतो ह्याचे अंदाज बघितले तर सुरक्षित अंतर ठेवणे केवळ अशक्य आहे.
आता शरीराने ह्या विषाणू ची ओळख नक्कीच पटवली असणार .
बिना लस च सर्व ठीक होईल.

मुले गुन्हेगारीकडे वळतील, त्यांचे बालविवाह होत आहेत हे निश्चितच चांगले नाही. पण मुले हातीपायी धड आहेत म्हणून ह्या गोष्टी होत आहेत. मुले वाचली तर पुढच्या सर्व लढाया लढता येतील. बचेंगे तो और भी लडेंगे.

एक वर्ष शाळा बंद राहिल्यातरी काही फरक पडत नाही. बंद ठेवाव्यातच.>> १ वर्ष बंद रहाणारच आहेत. २०२१ च्या academic year मधे तरी सुरू होतील का हा प्रश्न आहे.
२०२१ च्या मार्च/ एप्रिल पर्यंत लस उपलब्ध होईल असे वाटत नाही. त्यानंतर तुम्हीच दिलेल्या क्रमाने लस द्यायला सुरवात केली तर मुलांचा आणि शिक्षकांचा नंबर लागेपर्यंत २०२१ संपत आलं असेल.
शहरांमध्ये तसाही ऑनलाईन शिकत राहिल्याने फार फरक पडत नाहीये. >> शहरातही अनेक मुलं ऑनलाईन शिक्षणापसून वंचित आहेत. ज्यांना मिळतय हे शिक्षण त्यातून ती मुलं खरचं किती शिकताहेत याचं नीट मुल्यमापन होत नाहीये. शिवाय मुलांचा स्क्रीनटाईम वाढल्याने इतर अनेक शारिरीक आणि मानसिक समस्या निर्माण होत आहेत. असं असूनही बहुतांश पालक लस मिळेपर्यंत मुलांना शाळेत पाठवणार नाही असा हट्ट धरून बसले आहेत.
शिवाय काही पालकांचे असेही मत आहे की लशीच्या पुरेश्या चाचण्या होईपर्यंत ते लस घेणार नाहीत. पुरेश्या चाचण्या झालेली लस उपलब्ध होईतोवर कदाचित २-३ वर्षही जातील. तेवढा काळ मुलांना online शिक्षण देण्याची पालकांची खरचं तयारी आहे का? online शिक्षणाचे कोणतेही दुष्परिणाम जाणवत नाहीत का?
त्यामुळे प्रत्येक एरिया ने आपल्याला त्यातल्या त्यात फायदेशीर निर्णय घ्यावा. >> शाळांच्या बाबती हा निर्णय कसा घ्यायचा? एका शाळेत शहरातल्या वेगवेगळ्या एरियातून मुलं येतात.

Soha
तुमची मुल शाळेत जाण्याच्या वयाची आहेत का?
आणि तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत पाठवायला तयार आहात का?
हा प्रश्न ऐच्छिक च असावा .ज्यांना वाटत त्यांनी मुल शाळेत पाठवावी .ज्यांना भीती वाटते त्यांनी online शिकावे.

आणि तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत पाठवायला तयार आहात का? >> हो. मी आणि माझा नवरा ह्या वर्षी जून मधेच आमच्या मुलीला शाळेत पाठवायला तयार होतो. आजही आमची तयारी आहे. पण शाळेतले बहुतांश पालक लस मिळेपर्यंत मुलांना शाळेत पाठवणार नाही असा हट्ट धरून बसले आहेत. त्यामुळे ह्या academic year मधे शाळा सुरू होणार नाहीये.
ऑनलाईन शिक्षण मुलीला मनापसून आवडत नाही. गेल्या वर्षीपर्यंत माझी मुलगी अतिशय active, शाळेतील अनेक उपक्रमात मनापसून भाग घेणारी अशी होती. पण तिचा अनेक विषयातला रस आता कमी होत चालला आहे. पुरेसा व्यायाम/ शारिरीक हालचाल होत नाही त्यामुळे तब्येतीवरही परिणाम होईल अशी भिती वाटते. तिच्या वर्गातील अनेक मुलांना ह्या समस्या आहेत. पण कोविडचा बागूलबुवा एवढा मोठा आहे की आई-वडिलांना अश्या समस्या जाणवतच नाहीत.
दुसरीकडे माझ्या मोलकरणीच्या दोन मुली १२ आणि १४ वर्षाच्या आहेत. त्या तिच्या गावाकडे एका आश्रमशाळेत शिकत होत्या. लॉकडऊन मधे शाळा बंद झाली तशी मोलकरीण त्या मुलींना इथे (पुण्यात) घेऊन आली. आता ही दिवसभर कामाला जाते तेव्हा तरूण मुलींना घरात एकट ठेवायची तिला भिती वाटते. मोठ्या मुलीचे लग्न लवकर करून टाकावे असे विचार तिच्या मनात घोळत आहेत.
माझ्यापरीने मी तिला मदत करते आणि 'मुलींना माझ्या घरी थोडावेळ पाठवत जा' असे सांगते. पण माझ्या मोलकरणी सारख्या अनेक अशिक्षित आया असतील ज्यांना प्राप्त परिस्थितीत मुलींचे लग्न करणे हा सोपा उपाय वाटू शकतो.

तुम्ही जून मध्येच मुलीला शाळेत पाठवायला तयार होता?
त्या वेळी covid19 उच्च स्तरावर होता.
अनोखा virus, औषध नाही,मृत्यू शी गाठ.
तुमच्या सारखा विचार करणारे पालक 0.1 percent पण नसतील.
अतिशय दुर्मिळ .

तुमच्या सारखा विचार करणारे पालक 0.1 percent पण नसतील. >> असं नाहीये. आमच्या सारखा विचार करणारी अजून ५-६ जोडपी माहित आहेत मला. त्यामुळे हे percentage 0.1 percent पेक्षा जास्त असणार हे नक्की. ते आता अजून वाढावं आणि लोकांनी हळूहळू ह्या कोविडच्या paranoia मधून बाहेर यावं ह्यासाठीच सगळा खटाटोप. आता माझ्याकडून ह्या धाग्यावर शेवटची पोस्ट. आता वाचणार फक्त. Happy

शीर्षक दुरूस्त करा please प्राधान्यक्रम, कोव्हिड, ? हवे शेवटी>> धन्यवाद. चूक दुरुस्त केली आहे.

सक्ती केल्याशिवाय / गरज पडल्याशिवाय मी तरी घेणार नाहीये लस. पण प्रवासाची नोकरी असल्याने कदाचित विमान कंपन्या सक्ती करतील असा अंदाज आहे, त्यामुळे घ्यावी लागेल. पण आजिबात इच्छा नाहीये . माझा मिरे/लवंगा/ आलं/ दालचिनी काढ्यावर जास्त विश्वास आहे.

जागतिक आरोग्य संघटना रोज त्यांची वक्तव्य बदलत आहे, त्यामुळे अति संवेदन्शील क्षेत्रात काम करणार्‍यांना घाइघाइनं आजिबात लस देउ नये - वैद्यकिय क्षेत्रातले लोक, सैन्य, पोलिस, शास्त्रज्ञ, शेतकरी ( ग्रामीण भागात राहणारे लोक) इ.
ट्प्प्या ट्प्प्यानं द्यावी आणी लस.

लस आली की ती हृतिक रोशनकडे द्यावी म्हणजे तो हवेत उडत सगळ्या भारतातल्या लोकांना एक दोन दिवसात डोस देईल असं मला वाटतंय.

ऑनलाईन शिक्षणाला ४० वर्षाची परंपरा आहे व त्याचे फार मोठे तोटे अद्याप दिसलेले नाहीत. अचानक ऑनलाईन पद्धतीत जावे लागल्याने 'सिंक्रोनस' शिक्षण (शिक्षक झूम इ वर सांगणार, मुले शिकणार) करावे लागले पण आता एसिंक्रोनस वर भर आहे. म्हणजे मुलांना त्यांच्या/पालकांच्या सोयीनुसार ६-८ तास शिकता येईल. ६वी पुढच्या ईयत्ता २०२१ मध्ये अंशतः सुरू होणे हा उद्देश आहे (उदा: सायन्स प्रॅक्टीकल, म्युझिक इ.). शांतिनिकेतन शैलीत शिक्षण हा पर्याय पुन्हा जोर धरत आहे. पहिली ते चौथी विद्यार्थ्यांना शाळेतच शिक्षण मिळावे ह्यासाठी सगळे प्रयत्नशील आहेत. पण सामान्यपणे दर १० विद्यार्थ्यांमागे एक प्रौढ लागतो (शिक्षक, कौन्सेलर, आया इ). ह्या प्रौढांचा बालकांशी जवळचा संबंध येतो. God forbid, या पैकी कुणी वारले तर मुलांवर खोलवर परिणाम होवू शकतो. मध्यमवर्गासाठी उन्नतीचा राजमार्ग म्हणजे शिक्षण. त्यामध्ये इतके मोठे फेरबदल होणे हे घाबरवणारे आहे. पण शाळा-कॉलेजेस एकत्र येवून विचार करत आहेत. कोव्हीड लशीसाठी हा गट महत्त्वाचा आहे पण प्राधान्याचा नाही.

सामन्य लसीकरण (ट्रिपल, पोलियो इ) मार्चमध्ये बंद होते. आता बहुतेक जागी पुन्हा सुरू झाले आहे. अपाँईटमेंट घ्यावी लागते, सुरक्षा नियम पाळावे लागतात.

मृत ४% मध्ये जोवर आपलं कुणी नसतं तोवर सगळं पॅरॅनोया वाटतं. ज्यांचे प्रियजन गेले त्यांना वेळीच लॉकडाऊन का नाही केला अशा पद्धतीचे प्रश्न पडतात. ही कोव्हीड मुळे गेलेल्या आजी-माजी शिक्षण क्षेत्रातील लोकांची रिपोर्टेड यादी. काही नव्वदीतील आहेत पण अनेक ४०-६० वयोगटात आहेत.
https://www.edweek.org/ew/section/multimedia/educators-weve-lost-to-the-...

सामन्य लसीकरण (ट्रिपल, पोलियो इ) मार्चमध्ये बंद होते. आता बहुतेक जागी पुन्हा सुरू झाले आहे. अपाँईटमेंट घ्यावी लागते, सुरक्षा नियम पाळावे लागतात.>> पोलिओ नाही पण माझ्या मुलाच इतर आजारांच लसीकरण व्यवस्थित चालु आहे. घराजवळच दवाखाना आहे. मे पर्यंत माहेरी कोल्हपूरला होते तिथेही आणि इथेही लसीकरण चालू होते अर्थात सुरक्षा नियम पाळून.

आमच्या राज्यात लस मंजूरीची प्रक्रिया सुरु होत आहे, ती साधारण तीन आठवडे चालेल. त्यानंतर हेल्थ सेक्टरमधील मंडळींना अग्रक्रमाने लस मिळेल. यात हॉस्पिटल्स, फॅमिली प्रॅक्टिस पासून असिस्टेड केअर्/नर्सिंग होम्/होम हेल्थ केअर असा मोठा स्पेक्ट्रम असेल. इमर्जन्सी मेडीकल वाल्यांना मदतीला प्रोटोकॉल म्हणून अँबुलन्स सोबत फायर ट्रक येतो त्यामुळे ती मंडळी यातच असावीत की पुढल्या फेरीत ते ठरत आहे. सगळ्यात शेवटी जॉबमधे आणि तब्येतीच्या दृष्टीनेही फारसा धोका नसलेली मंडळी . त्यांना वॅक्सिन मिळायला जून उजाडेल.

आमच्याइथे फॅक्टरीतले जॉब असल्याने शाळा सुरु केल्याशिवाय इकॉनॉमी हलणार नव्हती. मात्र शिक्षक/बस ड्रायवर आजारी पडणे किंवा पॉझिटिव केसच्या संपर्कात आल्याने अलगीकरण, विद्यार्थ्याची फॅमिली बाधित म्हणून तो वर्ग अलगीकरणात वगैरे बरेच अडथळे आहेत. पुरेसे शिक्षक्/पर्यायी शिक्षक उपलब्ध नाही म्हणून प्रत्यक्ष शिक्षण काही काळ बंद असे नाईलाजाने करावे लागत आहे.

कोविडचा बागुलबुवा असे म्हणणे मलातरी योग्य वाटत नाही. कोविड बाबत अजूनही बर्‍याच गोष्टी उलगडत आहेत. १४ वर्षांखालील बाधीत मुलांना स्वतःला त्रास कमी होत असला तरी ही मुले इतरांना संसर्ग पसरवू शकतात. मुलांना मेटॅबॉलिकल ते न्युरोलॉजिकल काहीही प्रॉब्लेम्स असल्यास कोविड गंभीर स्वरुप धारण करतो.
फ्लू चा मृत्यूदर ०.१ % आहे त्या तुलनेने बघता कोविडचा ४% मृत्यू दर असा विचार केला तर ४% म्हणजे किरकोळ नव्हे हे लक्षात यावे. ६० + मंडळींचा विचार केला तर त्यातल्या वेगवेगळ्या गटासाठी हा मृत्यूदर २०% ते ३०% पर्यंत जातो. जे लोकं बरे होत आहेत त्यांनाही नंतर पूर्ण बरे होण्यास बराच वेळ लागतोय. काहींच्या बाबतीत सहा महिने झाले तरी अजून विचित्र लक्षणांमुळे नॉर्मल असे काही नाहीच आहे. न्युरॉलॉजिकल समस्यादेखील बर्‍याच जणांना उद्भवल्या आहेत. गेल्या सहा महिन्यात नात्यातील, ओळखीतील व्यक्तींचा कोविडने मृत्यू ते बरे होण्याची एकंदरीतच दीर्घ काल चालणारी वाटचाल असे बरेच काही बघितले. सौम्य लक्षणे ते आयसीयू अशी चार दिवसात उलथापालथ, मुलं बरी झाली पण आई-वडील दगावले अशा केसेसही बर्‍याच आहेत.

फ्लू चा मृत्यूदर ०.१ % आहे त्या तुलनेने बघता कोविडचा ४% मृत्यू दर असा विचार केला तर ४% म्हणजे किरकोळ नव्हे हे लक्षात यावे. >> सिरोसर्वेने दिलेल्या माहिती नुसार भारतात मोठ्या शहरांच्या (पुणे, मुंबई, दिल्ली) सोसायट्यांमधे १५ % व झोपडपटी सारख्या दाट वस्तीच्या ठिकाणी ६० % लोकांना लागण होउन गेली आहे असे दिसते. याचा अर्थ कोव्हिद लक्षात येण्याचे प्रमाण नगण्य (२० मधे एक) दिअसते. म्हणजेच मृत्यूदर ०.२ % असावा हे आपले माझे मत.

पुण्यात ७०% लोकांमध्ये ॲंन्टिबॉडी सापडल्या आहेत.याचा अर्थ कोव्हीडचा मृत्युदर हा खूप कमी आहे.कदाचीत .३ % असेल.

लशीची वाट बघण्यापेक्षा भाभीजी पापड खा.>> ते तर चाललच आहे हो. बरोबर काय?.
या कॉम्बीनेशने प्रतिकारशक्ति वाढते का ?. Happy

काही लस वैगेरे येत नाही.
Covid 19 म्हणजे काय हेच अजुन माहीत नाही.
करोडो रुपये फायद्या ची हमी सरकारने दिली तर उद्याच लस उपलब्ध असेल.
संशोधन क्षेत्रात आता काही राम राहिलेला नाही.
तर ते फक्त पैसे कसे मिळतील ह्या भोवती च फिरत आहे.

भाजपाच्या कुणीतरी भाभीजी पापड ची जाहिरात केली होती , हा पापड खाऊन करोना जातो म्हणून

आणि त्यालाच करोना झाला

https://www.deccanchronicle.com/nation/current-affairs/250720/bhabhiji-p...

Pages