भारतात, परतावे अथवा नाही?

Submitted by सामो on 18 November, 2020 - 02:05

माबोवरती निवासी-अनिवासी दोन्ही गटातले सुजाण आय डीज आहेत. विविध अनुभव घेतलेलेले आहेत, प्रत्येकाला आपापल्या स्थानिय परीघातील बलस्थाने, उणीवा, मर्यादा माहीत आहेत. त्यामुळे हा प्रश्न मांडण्याचे धाडस करते आहे. कारणं वैयक्तिक आहेत तशीच सांगता येण्यासारखीही आहेत. गेले अनेक वर्षे हा विचार होताच पण आता अधिक जोराने मूळ धरतो आहे. सांगता येण्यासारखी कारणे खाली मांडते.

प्रश्न- अमेरीकेचे नागरीकत्व मिळून आताबरीच वर्षे होतील. म्हणजे येतील जीवनाचा उपभोग घेउन खूप वर्षे होतील. इथे कधीच मन रमले नाही. आता जर मी (एकटी) भारतात परतले तर मला अ‍ॅडजस्ट होता येइल का? काय काय अडथळे येतील?

मी स्वतः एक यादी बनवलेली आहे ज्यामध्ये प्रोज आनि कॉन्स मांडलेले आहेत. प्रत्येक मुद्द्याला एकेक वजन दिलेले आहे. यात भारतात परतण्याकरता जे प्रोज आहेत ते सध्या तरी १३ एकक वजन राखून आहेत. न जाण्याच्या कारणांचे वजन आहे १७ एकक. म्हणजे न जाण्याचे पारडे जड आहे. असणारच कारण नवरा व मुलगी यायला तयार नाहीत. त्यांचयशिवाय मी एकटीच जाणार हाच एक नॉन-निगोशिएबल मुद्दा 'कॉन्स' मध्ये आहे. नॉन-निगोशिएबले म्हणजे अतिशय गंभीर/आवश्यक मुद्दा. या मुद्द्याला सर्वात जास्त वजन आहे. अन्यथा पारडे समसमान आहे.

(१) मला, घर नवीन घ्यावे लागेल. शक्यतो (९०%) पुण्यात घ्यायला आवडेल. घरांच्या किंमती, स्वारगेट्/डेक्कन/कोथरुड/औंध भागात काय आहेत कोणाला माहीती आहे का? १ बी एच के इज सफिशिअंट फॉर मी.

(२) जॉब शोधावा लागेल. मॅन्युअल टेस्टिंगला काही स्कोप आहे का? माझे वयही जास्त आहे. आता मी जवळजवळ पन्नाशीला आले आहे. २ ईयर्स शाय ऑफ फिफ्टी. किंबहूना म्हणुनच वाटतं - अब नही तो कब?

मुख्य म्हणजे असा निर्णय तुमच्यापैकी कोणी घेतला आहे का? किंवा तुमच्या परिचयात असा निर्णय घेतलेले कोणी आहेत का? त्यांचा काय अनुभव? ते कसे अ‍ॅडजस्ट झाले? मी साईड बाय साईड, युट्युब वर, ब्लॉग्जवरती तशा केसेसच्या मुलाखती/ माहीती वाचतेच आहे.

प्लीज डु नॉट मेक फन ऑर गिव्ह नी-जर्क रिस्पॉन्सेस. विचार करुन, उपयोगी पडावा याकरता, सल्ला द्या. दोन्ही स्वाती, अमा, वर्षा, अस्मिता, देवकी, मीरा,मृणाल, भरत, मानव,च्रप्स, ऋन्मेष, हीरा, अनु, सीमंतिनी, हर्पेन, रुपाली, किल्ली, आणि अन्य सर्व रेग्युलर्स. कोणाचे नाव राहीले असेल, तर माफ करा. पण सगळेच एक से बढकर एक हुषार , दयाळू, परखड, व्यवहारी आय डीज आहेत, त्यांचा अनुभव परीघही विस्तारीत अहे. म्हणुन इतका वैयक्तिक व अगदी अर्धा कच्चा प्रश्न मांडायचे धाडस करते आहे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सामो - हा खूप मोठा निर्णय आहे विशेषतः तुम्ही खूप काळ जास्त बाहेर राहिला असाल तर. भारत देखील आता खूप बदलला आहे बऱ्याच गोष्टी online झाल्या आहेत. भारतात तुम्हाला जी सर्विस इंडस्ट्री मिळेल ती इतर कुठेही मिळणार नाही, म्हणजे अगदी सगळ्या गोष्टींसाठी माणूस मिळेल. तशी सर्विस USA मध्ये शक्य नाही. परंतु त्याच बरोबर इतर गोष्टीचा विचार करा जसे, तुमचा किती मित्र परिवार आहे तिकडं, नातेवाईक आहेत का? आई -वडील, सासू सासरे आहेत का? अन्यथा आता जाऊन ग्रुप बनवणे शक्य नाही. तसेच इतर बाबी जसे कि light नसणे, ट्रॅफिक वगरे यांचा पण विचार करा. मग काय तो योग्य निर्णय घ्या.
शेवटी परतीचा दोर कापू नका ...

इथे कधीच मन रमले नाही. आता जर मी (एकटी) भारतात परतले तर मला अ‍ॅडजस्ट होता येइल का? काय काय अडथळे येतील?>>
थोडे दिवस भारतात जा आणि तिथे राहून पहा. तुम्हाला जर तिथे मन आनंदी वाटल तर हे बाकीचे व्यावहारीक इश्युज तुम्ही आपोआप सॉल्व्ह कराल.
निम्मे आयुष्य आता पार पडले. आता आनंदी रहाणे, मन रमणे गरजेचे आहे. नाहीतर मी हे करून बघणार होत पण राहून गेले अस म्हणत पुढचे आयुष्यही निघून जाईल.

छान चर्चा झालीय आणि चालूय या धाग्यावर. विविध अँगलने खरेच विचार झालाय.

काही मनात आलेले विचार आधीच प्रतिसादात आले आहेत.
जसे की ट्रायल पिरीअड !
मी साधे दक्षिण मुंबईहून नवी मुंबईला सेटल व्हायचे का हे डिसिजन घेण्याआधीही नवी मुंबईला भाड्याने सहकुटुंब राहिलो. आणि जमतेय हे लक्षात आल्यावरच फायनल डिसिजन घेतला. त्यामुळे अमेरीका टू भारत हा निर्णय नक्कीच पहले ईस्तेमाल करो और फिर विश्वास करो म्हणत तपासून घ्यायला हवा.

मला सगळ्यात मोठा फॅक्टर कुटुंबाशिवाय राहण्याचा वाटला.
तुम्ही कुटुंबाशिवाय राहणे हा निर्णय तुम्ही तुमच्यापुरता घेतलाय.
पण तुमच्या कुटुंबाने तुमच्याशिवाय राहणे ही याची दुसरी बाजू आहे. ती त्यांना स्वखुशीने मान्य आहे का? की तुमच्या निर्णयाचा त्यांना फटका बसणार आहे? म्हणजे अशी खुली चर्चा झाली आहे का? कदाचित ते खुलेपणाने यावर बोलणारही नाहीत. पण हे क्लीअर होणे मला तरी खूप गरजेचे वाटते.

आता अर्थात ईथे माय लाईफ माय चॉईस असाही एक विचार येण्याची शक्यता आहे.
पण कमिटमेंट म्हणूनही काही चीज असते असे मला वाटते. त्यामुळे हा निर्णय कुटुंबाने एकत्र मिळून घ्यावा असे वाटते.

मी फक्त एक मुद्दा मांडला आहे. हा विचारही जरूर करा. बाकी तुमचे आणि तुमच्या कुटुंबियांचे ईतर डिटेल्स तुम्हालाच ठाऊक आहेत आणि त्यानुसार तुमचा तुम्हालाच निर्णय घ्यायचा आहे ..

बाकी ते कुटुंबाशिवाय राहण्याच्या मुद्द्याच्या तुलनेत भारतात राहायला जमेल का वगैरे ईतके मोठे मुद्दे नाहीत असे पर्सनली मला वाटते. बरेचसे आयुष्य गेलेय तुमचे ईथे. जी तुमची मातृभाषा वा जे मूळ कल्चर आहे ते वातावरण आजूबाजूला असणार, तर अ‍ॅडजस्टमेंट अशी काही करायची नाहीये तर फक्त मनाची तयारीच करायची आहे. स्वखुशीने याल तर खुशीतच राहाल असे मला वाटते.

असो,
योग्य निर्णय घेण्यासाठी शुभेच्छा Happy

>>>पण तुमच्या कुटुंबाने तुमच्याशिवाय राहणे ही याची दुसरी बाजू आहे. ती त्यांना स्वखुशीने मान्य आहे का? की तुमच्या निर्णयाचा त्यांना फटका बसणार आहे? म्हणजे अशी खुली चर्चा झाली आहे का? कदाचित ते खुलेपणाने यावर बोलणारही नाहीत. पण हे क्लीअर होणे मला तरी खूप गरजेचे वाटते.>>>>>>>>> Happy फार मस्त मुद्दा मांडलात ऋन्मेष. खरे आहे. याचा विचार केलेला आहे. हा मुद्दा अतोनात महत्वपूर्ण आहेच्च.
एका छान प्रतिसादाबद्दल आभार.

साधना, अज्ञातवासी यांच्याशी सहमत. सगळेच पाश तोडून येऊ नका, परतीचा मार्ग मोकळा असू द्या. काही दिवस राहून पहा. आजकाल सगळेच सगळीकडे असतंच, अगदी अध्यात्म ची आवड असेल तर समविचारी लोक देखील.. personal काही issues असतील तर तुम्हाला विचार करायला हवा..
खूप कठीण, life changing decision असेल तुमच्यासाठी हा. मनापासून शुभेच्छा सामो.

असे विचार राहु महादशेत येऊ शकतात. आहे ते आनंददायक वाटत नाही. मग ती नोकरी असो की संसार. आपली जन्मकुंडली उघडून पहा.

१००
शुक्र नहादशेत सेंच्युरी मारलीत Happy

सामो, इथे सगळ्यांनी वेगवेगळ्या बाजू विचारात घेवून खूप छान सल्ले दिले आहेत. त्यात माझे चार पैसे.
अमेरीकेत अनेक वर्षे राहिल्यावर भारतात रुळायला जमेल का ? तर हो. तुमच्या अपेक्षा आणि तिथले वास्तव हे सुसंगत असेल तर नक्की जमेल. त्यात तुम्हाला तिथली आतून ओढ असेल तर ज्या काही त्रुटी असतील त्यासह रहाणे जमेल.
आर्थिक मुद्दा - पैशाचे सोंग करता येत नाही. त्यामुळे भारतात रहायचे तर त्या दृष्टीने व्यवस्थित प्लॅनिंग हवे. माझ्या ओळखीत जी मंडळी भारतात शॉर्ट टर्म् जातात /कायमची गेली त्यांच्याकडे सबाटिकल/ पूर्ण रिटायर/ हातात जॉब ऑफर/ काही काळ तिथून काम/ तिथे हळू हळू बस्तान बसवून आता नीट चाललेला उद्योग/ तिथे पॅसिव उत्पन्नाची सोय-पालकांकडून आर्थिक पाठबळ असे काही तरी होते/आहे.
इथे नोकरी न करणार्‍या काही एम्टी नेस्टर स्त्रीया नोव्हे- मार्च असा काळ देशात घालवतात, इथे नवर्‍याची नोकरी सुरु असते, तिथे स्वतःचे/सासर-माहेरचे घर , खर्चाची तरतूद वगैरे असते. एखाद्या कलेचा प्रत्यक्ष गुरु सोबत अभ्यास, लेखन, स्वयंसेवक म्हणून सेवाभावी संस्थेत काम, अध्यात्म/ योग याबाबत काहीतरी अ‍ॅक्टिविटी-पुढील शिक्षण, केवळ पालकांसोबत/नातेवाईकांसोबत वेळ घालवणे , भारत बघणे असे वेगवेगळे उद्देश असतात.
भावनिक दृष्ट्या - पूर्ण कुटुंबच तिथे जाणार असेल तर काही प्रश्न नाही मात्र बाकीचे कुटुंब इथे आणि तुम्ही एकट्या तिथे असे असल्यास लाँग डिस्टन्स नाते कसे निभावणार याचा विचार हवा. मुळात असे वेगळे रहाणे तुमच्या आणि कुटुंबियांच्या मनाला नक्की कितपत झेपेल हे प्रामाणिकपणे तपासावे. कुटुंबातले सर्वजण याबाबतीत सहकार्य करणार असतील तर ' काहीतरी मिळवायचे ' म्हणून असलेला हा दुरावा सोसणे सुसह्य होते. कुटुंबाचे सहकार्य मिळणार नसेल, गिल्ट ट्रिप/ रिझेंटमेंट असे काही होणार असेल तर तो एक वेगळा ताण -तणाव. तिथे आणि इथे उद्भवू शकणार्‍या कौटुंबिक इमर्जन्सी/ तब्येतीचे प्रश्न विचारात घेवून सपोर्ट सिस्टिम-प्लॅन ए- प्लॅन बी वगैरे विचारात घ्या. आपण पँडेमिकचे लॉकडाऊन अनुभवले आहेच. 'घरी जायचे' म्हणून इथून तिथे जायला धडपडणारी मंडळी होती तशीच तिथून इथे यायला धडपडणारी मंडळीही होती. ते जे 'घर' आहे ते तुमच्या मनात कुठले? असा विचार करुन बघा. बरेच काही स्पष्ट होईल.

अवांतर -
तुम्ही वर मुलीच्या शैक्षणिक कर्जाविषयी लिहिले आहे तर त्याचे ओझे प्लीज तुमच्या शिरावर घेवू नका. तुम्हाला आत्ता जरी असे न करणे स्वार्थीपणा वाटत असले तरी दूरगामी विचार करता ते तुमच्या मुलीच्या आणि तुमच्याही हिताचे असेल. मुलीला मदत करायची आहे तर तिला आर्थिक दृष्ट्या साक्षर करा. शैक्षणिक खर्च आटोक्यात ठेवण्यासाठी पार्ट-टाईम जॉब, ट्युटरिंगचे काम, स्कॉलरशिप्स, वर्क स्टडी प्रोग्रॅम शोधावेत. अ‍ॅडमिशन घेतल्यावरही दरवर्षी स्कॉलरशिप्सच्या संधी येत असतात, प्रयत्न करत रहावे लागते. नोकरी लागल्यावर शैक्षणिक कर्ज कसे फेडायचे याबाबत स्पष्ट्पणे बोलून तिला तसे बजेट आखायला शिकवा. आपण घेत असलेले शिक्षण आणि त्यातून मिळू शकणारे उत्पन्न याची वास्तववादी सांगड आत्ताच घातली तर शैक्षणिक खर्च आटोक्यात ठेवण्याच्या दृष्टीने विचार होवून योग्य ती पावले उचलली जातील. शैक्षणिक कर्ज फेडण्यासाठी मुलीला वेगवेगळे पर्याय आहेत. तसेच काही नोकर्‍या तुम्हाला काही प्रमाणात कर्जमाफीही देतात. मुलांना आर्थिक दृष्ट्या साक्षर, आत्मनिर्भर होण्यास शिकवणे ही 'भेट' आहे स्वार्थीपणा नव्हे. मदत जरुर करावी पण त्यातून त्यांचे पुढे नुकसान होता कामा नये. मुलीचे शैक्षणिक कर्ज फेडायला आत्ता मदत करुन नंतर वार्धक्यात तुमचा बोजा मुलीवर पडणे असे झाले तर ते किती दु:खद असेल? तुम्ही तुमच्या रिटायरमेंटची तरतूद करा. मुलीलाही आर्थिक साक्षरतेबाबत योग्य मार्गदर्शन करा. पुढे मुलगी अर्थकारण व्यवस्थित सांभाळू लागली की इस्टेट प्लॅनिंगचा भाग म्हणून तिला दरवर्षी ठराविक रक्कम भेट द्या.

माझे अनुभव, त्याचे पैसे आणि रुपये तुम्हीच ठरवा.

माझा भाऊ परदेशात स्थायिक होता. त्याच्या आईवडीलांची आणि सासुसासर्‍यांची काळजी घ्यावी म्हणुन १० वर्षाच्या मुलासह भारतात आला. सगळ्यांनी त्याला कुठच्याही प्रकारे न हिणवता परत सामावून घेतलं. २ वर्षे भाड्याच्या घरात राहिला आणि आई वडीलांच घर असताना देखिल त्याने स्वतःच सोयीनुरुप घर घेतलं. तो, वहिनी आणि भाचा आता सुखात आहेत. १५ वर्षे झाली आहेत. तो ज्या परदेशी कंपनीत काम करतो तिथेच तो भारतात देखिल काम करतो.

दुसरी एक सुविद्य मैत्रिण भारतात परत आली आहे. तिचा परदेशात आयटी बिजनेस होता/आहे. तिचा पुण्यात रो हाऊस वै. आहे. पण ती आई जवळ अंधेरीला भाड्याने रहाते. तिने आणि नवर्‍याने आय आय टी मध्ये प्रध्यापकी स्विकारली आहे. मोठी मुलगी एकटी परदेशात शिकते आहे तर धाकटा भारतात आला आहे. हिची सख्खी बहीण, मावस भावंड परदेशात आहेत. परंतु आता ती भारतात रहाण्याच्या उद्देशाने आली आहे व गरजेनुसार प्रवास करते.

पहिल्या उदाहरणात सहकुटुंब स्थलांतर तर इतर अनेक उदाहरणात पार्शल स्थलांतर झाले आहे. ही झाली २ यशस्वी उदाहरणं, अनेक जण ठरवुन (म्हणजे आई वडील निर्वतल्यावर/ ५ वर्षे भारतात सामाजिक कार्य केल्यावर) तर अनेक जण आवडलं नाही/ अपेक्षाभंग झाला म्हणुन भारतातुन परत परदेशात आले आहेत.

टेस्टींग मध्ये नविन नोकरी शोधणं कठीण आहे. १० वर्षांपूर्वी एक मैत्रिण भारतात परतुन आली होती तेंव्हा मी तिथे असल्याने तिला नोकरी साठी मदत करता आली होती. पण २००९-१० मध्ये मार्केट डाऊन होतं त्यामुळे ५ महिने वाट बघावी लागली होती. आताचे चित्रही फारसं उत्साहवर्धक नसेल. Unless you are in AI or machine learning it is difficult to get a quick job, but then its not manual testing. You may also want to rephrase it as functional tester instead of manual tester. Which level do you plan to start at? You may need to get certified before you test the waters.

तुम्ही का परत येऊ इच्छित आहात ह्यावर सक्सेक ठरेल आणि इथे येण्याचा अ‍ॅप्रोच पण ठरेल. कोणाशी प्रत्यक्ष बोलुन परस्पेक्टीव्ह यायला मदत होणार असेल तर संपर्क करा.

सामो तुम्ही जॉब चा फारच विचार करताय... तुमचा इतका exp आहे तुम्हाला मॅन्युअल टेस्टर म्हणून जॉब मिळणे अवघड आहे असे वाटत आहे पण टेस्ट मॅनेजर किंवा टीम लीड म्हणून सहज जॉब मिळेल... ओव्हर ऑल सिनियर मॅनेजर वगैरे देखील मिळू शकेल consulting कंपनी मध्ये ( TCS, इंफि, hcl, विप्रो वगैरे वगैरे)
अमेरिकन सिटीझन आहात, भारतीय कंपनी ला विझा वगैरे भानगडी लागणार नाहीत तुम्हाला शॉर्ट ट्रिप वर पाठवायचे असेल अमेरिका युरोप ला.
हा तुमचा USP आहे... नीट वापरा नेगोशिएत करताना...
अमेरिकेतूनच भारतात जॉब अप्लाय मारा...

तसे तर आमच्या कंपनीची शाखाही आहे भारतत. बँगलोर व हायद्राबादेत. त्याचाही विचार करेन. कुठेतरी फ्लेग्झिबल रहावेच लागेल ना. पण मी २ वर्षे तरी निर्णय घेणार नाही. बघू २ वर्षात काय होते. सध्या तरी विचारांची 'डायरी' मेन्टेन करते आहे.

न परतण्यातच हित आहे.. स्वानुभव.
सुरवातीला खुप छान वाटले..
आपल्या माणसांमधे, जगात आलो, हे फिलींग होतं, पण ३-४ वर्षांनीं पश्चाताप झाला आणि तो पर्यंत परतीचे मार्ग बंद झाले होते. (PR सरेंडर केला होता)

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
अस्वच्छता, बेशिस्तपणा, भ्रष्टाचार, राजकारणी/ गावगुंड यांचा त्रास, पोलिस खाते, न्याय व्यवस्था यांची सद्य परिस्थिती हे सर्व विचारात घेतले असेल तर भारतात स्वागत आहे.

नवीन Submitted by अतरंगी on 18 November, 2020 - 14:35 >>>>>>
+ ११११११

सामो, मला बरंच काही लिहायचं होतं पण अनेक मुद्दे कव्हर झालेत. तुमचे अनेक विचार आणि चलबिचल माझी स्वतःची असल्यासारखी वाटली. परदेशात स्वतःच्या इच्छेपेक्षा कोणा इतर व्यक्तीमुळे, भले ते नवरा किंवा मुलं का असेना, राहावं लागणं हे किती पेनफुल आहे ते मला माहीत आहे. त्यात इतकी वर्षे काढल्या नंतर आता तुम्हाला कसं वाटत असेल ते मी खूप चांगलं समजू शकते. त्यामुळे तुम्हाला खूप खूप बिग हग!

गोंदावल्यात रूम घेऊन रहाता येतं. महाराजांची सेवा करायची, तिथेच जेवायचं आणि तिथेच राहायचं. आता यात आणखी काय काय नियम आहेत ते मी अजून नीट माहिती करून घेतलेले नाहीत पण असं वाटतंय की एकदा तिकडे स्वतःला वाहून घेतलं की मग संसार, पाश, इतर सगळी काळजी महाराजांच्या चरणी अर्पण करायची असते. तुम्हाला त्यातून 'सुट्टी' मिळणार नाही. असं जमेल का राहिला ?
नाही तर वर्षातून 15 दिवस सुट्टी घेऊन हे असं करायला येत जा. मानसिक शांती मिळेल.-

अवांतर :-
माझ्या आई बाबांनी ठरवलंय की त्यांची रिटायरमेंट आणि बहिणीचं लग्न, मुलं बाळं झालं की तिकडेच जाऊन राहायचं.
माझी आई कॅन्सर सरवायवर आहे त्यामुळे तिच्या या निर्णयाने मी आणखीनच आनंदी झाले आहे. महाराजच तिची काळजी घेतात, कायम घेणार आहेत, त्यांच्या जवळ ती आणि बाबा एकदम सेफ असतील. त्यांना भेटावं वाटेल तेंव्हा आम्ही तिकडे जाऊ शकतो. बाकी त्यांचं रुटीन सुरू राहील.

कोणी तरी काही तरी म्हणलं, आमक्याने तमकी अपेक्षा केली. तमक्याने ढमकी अपेक्षा पूर्ण नाही केली हे असले प्रकार वयाच्या साठी नंतर फार मानसिक त्रास देतात. त्यातून आजारपण वाढतं. त्यापेक्षा स्वतःला चांगल्या ठिकाणी रमवून घेतलेलं केंव्हाही चांगलं.

तुम्हाला कधी गप्पा मारायच्या असतील तेंव्हा जरून सांगा. मला आवडेल बोलायला.

रीया नक्की. आपल्या अनुभवांत खूप साम्य आहे हे मलाही जाणवलेलं आहे. खूप म्हणजे अनकॅनी. आपली पोस्ट उत्साहवर्धक आहे. खरं तर महाराजांच्या आश्रमात जरुर रहाता यावे. आता नीट प्लॅन करीन. एकदाची ही महामारीची साथ संपू देत.
माझी काही स्वप्न होती. एक तर दत्तक घेणे. मला नक्की एका अपत्याला दत्तक घ्यायचे होते. पण आयुष्याच्या धकाधकीत सेटलच न झाल्याने जमलेच नाही. दुसरे स्वप्न होते की रिटायरमेन्टनंतर भारतात जायचे. पण कसं आहे नं नवरा अज्जिबात म्हणजे तसूभरही तयार नाही शिवाय म्हातारपणीच एकमेकांची गरज लागते. शिवाय तितकेही आम्ही सेटल्ड नाही की वरची पुंजी आहे, व काही न करता भारतात मेडिकल वगैरे सर्व कव्हर होइल.
तेव्हा शक्य दिसत नाहीये. भारताचे आकर्षण बाबा तिथे आहेत हे आहेच पण ओळखीची पुस्तके, ओळखीचे खाणे, ओळखीच्या वंशाचे लोक आसपास दिसणे, समाजात एकजीव होणे, सोशल लाईफ असणे , अध्यात्माचे अंग डेव्हलप करता येणे व अन्यही बरीच आहेत. पण शक्य होइलसे वाटत नाही.
हां गोंदवल्याला १५ दिवस १००% जाउन रहाता येइल.
________
किंग ऑफ नेट आपण स्वानुभव शेअर केलात त्याबद्दल आभार.

कसं आहे सामोजी,तुमचे मिस्टर तयार नाहीत हा मोठा प्रश्न आहे आणि तो सूटेल असे वाटत नाही.तुम्हीच वरचे वर भारतात येत जा. इमिग्रेटच केलं पाहीजे असे नाही.
वडीलांशी ॲटॅचमेंट आहे ,जी मुलीची जास्त असते तर थोडा काळ वडीलांना अमेरिकेत घेऊन जा व कंटाळले की परत भारतात येऊ द्या.

Pages