भारतात, परतावे अथवा नाही?

Submitted by सामो on 18 November, 2020 - 02:05

माबोवरती निवासी-अनिवासी दोन्ही गटातले सुजाण आय डीज आहेत. विविध अनुभव घेतलेलेले आहेत, प्रत्येकाला आपापल्या स्थानिय परीघातील बलस्थाने, उणीवा, मर्यादा माहीत आहेत. त्यामुळे हा प्रश्न मांडण्याचे धाडस करते आहे. कारणं वैयक्तिक आहेत तशीच सांगता येण्यासारखीही आहेत. गेले अनेक वर्षे हा विचार होताच पण आता अधिक जोराने मूळ धरतो आहे. सांगता येण्यासारखी कारणे खाली मांडते.

प्रश्न- अमेरीकेचे नागरीकत्व मिळून आताबरीच वर्षे होतील. म्हणजे येतील जीवनाचा उपभोग घेउन खूप वर्षे होतील. इथे कधीच मन रमले नाही. आता जर मी (एकटी) भारतात परतले तर मला अ‍ॅडजस्ट होता येइल का? काय काय अडथळे येतील?

मी स्वतः एक यादी बनवलेली आहे ज्यामध्ये प्रोज आनि कॉन्स मांडलेले आहेत. प्रत्येक मुद्द्याला एकेक वजन दिलेले आहे. यात भारतात परतण्याकरता जे प्रोज आहेत ते सध्या तरी १३ एकक वजन राखून आहेत. न जाण्याच्या कारणांचे वजन आहे १७ एकक. म्हणजे न जाण्याचे पारडे जड आहे. असणारच कारण नवरा व मुलगी यायला तयार नाहीत. त्यांचयशिवाय मी एकटीच जाणार हाच एक नॉन-निगोशिएबल मुद्दा 'कॉन्स' मध्ये आहे. नॉन-निगोशिएबले म्हणजे अतिशय गंभीर/आवश्यक मुद्दा. या मुद्द्याला सर्वात जास्त वजन आहे. अन्यथा पारडे समसमान आहे.

(१) मला, घर नवीन घ्यावे लागेल. शक्यतो (९०%) पुण्यात घ्यायला आवडेल. घरांच्या किंमती, स्वारगेट्/डेक्कन/कोथरुड/औंध भागात काय आहेत कोणाला माहीती आहे का? १ बी एच के इज सफिशिअंट फॉर मी.

(२) जॉब शोधावा लागेल. मॅन्युअल टेस्टिंगला काही स्कोप आहे का? माझे वयही जास्त आहे. आता मी जवळजवळ पन्नाशीला आले आहे. २ ईयर्स शाय ऑफ फिफ्टी. किंबहूना म्हणुनच वाटतं - अब नही तो कब?

मुख्य म्हणजे असा निर्णय तुमच्यापैकी कोणी घेतला आहे का? किंवा तुमच्या परिचयात असा निर्णय घेतलेले कोणी आहेत का? त्यांचा काय अनुभव? ते कसे अ‍ॅडजस्ट झाले? मी साईड बाय साईड, युट्युब वर, ब्लॉग्जवरती तशा केसेसच्या मुलाखती/ माहीती वाचतेच आहे.

प्लीज डु नॉट मेक फन ऑर गिव्ह नी-जर्क रिस्पॉन्सेस. विचार करुन, उपयोगी पडावा याकरता, सल्ला द्या. दोन्ही स्वाती, अमा, वर्षा, अस्मिता, देवकी, मीरा,मृणाल, भरत, मानव,च्रप्स, ऋन्मेष, हीरा, अनु, सीमंतिनी, हर्पेन, रुपाली, किल्ली, आणि अन्य सर्व रेग्युलर्स. कोणाचे नाव राहीले असेल, तर माफ करा. पण सगळेच एक से बढकर एक हुषार , दयाळू, परखड, व्यवहारी आय डीज आहेत, त्यांचा अनुभव परीघही विस्तारीत अहे. म्हणुन इतका वैयक्तिक व अगदी अर्धा कच्चा प्रश्न मांडायचे धाडस करते आहे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद सामो Happy
आपला कंफर्ट/आनंद शोधणे म्हणजे कच खाणे असे नाही. ते नैसर्गिक व तारतम्याचे सुद्धा आहे.
तुलाही शुभेच्छा. Happy

तुम्ही आत्तापर्यंत किती वेळा भारतात भेटीसाठी आला आहात आणि किती दिवस राहिला आहात?
काही बाबतीत भारत आपल्या लहानपणीचा आहे तर काही बाबतीत खूप बदलला आहे.
तुम्हाला दुचाकी येते पण नुकतीच पुण्याच्या रहदारीत चालवून बघितली आहे का?
मेडिकल, health insurance याची सोय केली आहे का?
मी अमेरिकेत नाही पण इथे आजारी असताना हॉस्पिटलमध्ये admit व्हावं लागलं तर काहीही बघावं लागत नाही. औषध, खाणे, पिणे इ.
भारतात बऱ्याच ठिकाणी हे करावं लागतं. गरज पडली तर यासाठी लागणारं नेटवर्क आहे का?
इथे मला सगळ्यात आवडतं ते म्हणजे पावलोपावली स्त्री म्हणून विशिष्ट नजरांचा सामना करावा लागत नाही. भारतात गेले की हा एक मोठा cultural shock असतो.
तुम्ही जिथे राहणार तिथे एकट्या स्त्रीने राहणे हे कितपत मान्य आहे? मुलगी - नवरा सोडून आली यावरून कुजबूज झाली तर ठाम राहता येईल ना?
मी १५ वर्षांपूर्वी इथे १ वर्षानंतर नोकरी मिळत नव्हती म्हणून परत भारतात जाऊन राहिले होते. गल्लीतल्या काही लोकांनी तर 'परत आली' म्हणून समज करून घेतलेच. पण तेव्हा भावाच्या लग्नाचे बघणे चालू होते तर एका अत्यंत जवळच्या, उच्चशिक्षित, माझी स्वत:च्या पायावर उभी राहण्याची ओढ माहित असलेल्या मैत्रिणीने 'परत आलेली नणंद असेल तर लग्न कसे ठरेल' असे विचारले होते. कोणी असा विचार करू शकेल या शक्यतेचाच आम्ही दोघांनी विचार केला नव्हता.
जर आत्तापर्यंत परिस्थिती बदलली असेल तर उत्तमच आहे.
तुमच्यासाठी मुलांचे शिक्षण इ. विचार करायचा नाही ही मोठी जमेची बाजू आहे.

@चिऊ,
>>>>मेडिकल, health insurance याची सोय केली आहे का?>>>> हा मुद्दा कसा काय नजरेतून सुटला? खरे तर माझ्या बाबतीत, इट इज अ‍ॅन एलिफंट इन द रुम Sad
हा भयानक म्हणजे डील-ब्रेकर मुद्दा आहे माझ्यासाठी.
धन्यवाद!! धन्यवाद!!!

इथे भारतात आल्यावर पहिली दोन तीन वर्षे नक्की त्रासाची जातात.
पुण्यात येणार असाल तर बेशिस्त वाहातुकीत दुचाकी चालवण्याची हिम्मत दाखवणे हा पहिला टास्क. भाड्याचे घर सुसज्ज मिळाले तर ठीक. नाहीतर गॅस शेगडी पासून घ्यावे लागेल, धावाधाव करावी लागेल. सुतारकाम वगैरेसाठी आपण सांगू तसे वाजवी भावात करून देणारे कमीच. एकंदर workmanship कमी जाणवते. उर्मटपणा फार. सरकारी कामकाजात अरेरावी, दिरंगाई आणि बेफिकिरी. मानसिकदृष्ट्या खंबीर असाल तर निभेल. उरले सुरले नातेवाईक मदतीस येण्याची शक्यता कमी. शिवाय तुम्ही कायम स्थायिक होण्यासाठी आला आहात हे एकदा स्पष्ट झाले की "तिकडचे " असण्यामधले ग्लॅमर खाडकन उतरेल. तुम्ही भाव देण्याजोग्या राहणार नाही. तुम्हांला इतरांची गरज आहे हे त्यांना कळले की त्यांचे भाव खाणे सुरू होईल. शिवाय बहुतेक वेळा बायकांतच उठबस करावी लागेल, गॉसिपला सामोरे जावे लागेल.
आध्यात्मिक दृष्ट्या म्हणाल तर स्वयंसेवक बनून शांतिसमाधान मिळेल ही फार ताणलेली कल्पना आहे. आश्रमातील शिस्तीशी जुळवून घेऊन वाट्याला येतील ती कामे आनंदाने करावी लागतील. लवकर उठावे लागेल. एखाद्या दिवशी मस्त थंडीत कॉफीचा मग घेऊन लोळत पडावेसे वाटले तर तसे करता येणार नाही.पोशाख, खाणेपिणे, राहाणी austere बनून जाईल. समाधीजवळ बसून ध्यानधारणा करणे सोपे नाही आणि नेहमी साधेल असेही नाही. समाधीवर सतत उपचार चालू असतात. लोकांची जा ये असते. भजन कीर्तन असते. त्यात आपल्या आवडीची भजने स्तोत्रे असतीलच असे नाही. बहुधा नसतीलच. प्रत्येक ठिकाणची उपासना वेगवेगळी असते.
ह्या विषयावर बरेच लिहिता येईल.
भाड्याच्या घरात राहिलात तर माणुसकीचे अनुभव येतीलच असे नाही. वैद्यकीय सुविधा (हॉस्पिटल वगैरे) वेळेवर मिळतीलच असे नाही.
तुम्ही परतीचे दोर कापून न टाकता एक दोन वर्षांसाठी इथे राहून बघा. कायम राहाण्याचा निर्णय तडकाफडकी घेऊ नका किंबहुना घेऊच नका असे सुचवेन.

@हीरा नाही नाही स्वयंसेविका बनणे हे माझे स्वप्न नाही.
>>>>नाहीतर गॅस शेगडी पासून घ्यावे लागेल, धावाधाव करावी लागेल. सुतारकाम वगैरेसाठी आपण सांगू तसे वाजवी भावात करून देणारे कमीच. >>>>> खरे आहे, याचा विचार केलेला आहे. फार अवघड आहे हे सर्व विशेषतः आधार-पॅन अन अमकं न तमकं.

लाइफ स्टाइल आणि सोईसुविधा ह्या बाबतीत पुणे असेल किंवा मुंबई .
खूप प्रगती झालेली आहे.
इथे सर्व काही आहे जे अमेरिकेत आहेत.
एकट्या राहणाऱ्या स्त्रिया दोन्ही शहरात खूप आहेत,मॉडर्न कपड्या बाबत अमेरिकेला पण माग टाकतील अशी ही शहर आहेत.
काही कोणाला काही वेगळे वाटत नाही.
फक्त प्रश्न आहे ते तुम्ही कुटुंब ला सोडून मानसिक दृष्ट्या समाधानी राहू शकाल का ?
माणसाला आपल्या माणसांची प्रचंड ओढ असते आणि तशी मानसिक गरज पण असते.
त्या बाबतीत तुमची मानसिक तयारी किती आहे हे महत्वाचे आहे.
तुम्हाला इथे येण्यास का आवडत म्हणजे कशाची ओढ आहे.
मन रमणाऱ्या गोष्टी प्रत्येकाच्या वेगळ्या असतात .
काही ना डोंगर,निसर्गात छान वाटत तर काही ना गर्दी चा शहरी भाग आवडतो.

जर तुमची फैमिली यायला तयार नाहीये.. तर परमनंटली इकडे येण्यात काही पॉईंट नाही.. वैकेशन म्हणून दोन-तीन महिने येऊन जाऊ शकता.. अदरवाईज फैमिलीला येण्याबाबत कनवीन्स करायचा प्रयत्न करा.
माझे मत असे आहे, तुम्ही कुठेही राहा पण बी वीथ फैमिली..Place doesn't matter. Happy

भारतात आध्यात्मिक साधना करणे सोपे आहे अशी एक कल्पना आहे. भारतीय तत्त्वज्ञान गहन आणि उच्च आहे हे खरे पण ते प्रत्यक्षात आणणारे लोक टक्केवारीत कमी आहेत. उलट पुस्तकांतल्या ह्या उच्च तत्त्वज्ञानाचा गर्व आणि घमेंड बाळगणारे जास्त. अनेक हाउसिंग कॉलनीज आणि सोसायट्यांमधून ज्येष्ठ नागरिकांचे गीता, ज्ञानेश्वरी , रामरक्षा, दासबोध वगैरेंच्या पारायणाचे वर्ग चालतात.स्पर्धाही असतात. अथर्वशीर्ष, श्रीसूक्त, रुद्र इत्यादींची आवर्तनं आणि स्पर्धा असतात. एखादा जपमंत्र सामूहिक रीत्या जपण्याचे उपक्रम चालतात. ह्याला आध्यात्मिक म्हणावे की धार्मिक ह्याबाबत मी संभ्रमात आहे.
येथे अनेक गुरूंची दुकाने आहेत. त्यांतल्या एखाद्याच दुकानात सच्चा माल मिळतो. तो मिळवण्यासाठी बाजारात खूप वणवण करावी लागते.

सर्वांचे प्रचंड आभार. बरेच नवीन मुद्दे कळले. ज्यांचा विचारच केलेला नव्हता. आपण आपल्या बुद्धीने, एककल्ली काहीतरी विचार करत असतो त्यात वेगवेगळ्या दृष्टीकोनांची भर पडली की धूसर चित्र अधिक स्पष्ट होत जाते. तसेच घडले. एककल्ली विचारात अतोनात ब्लाईंड स्पॉटस असतात. सर्व माबोकरांचे खरच आभार.

सामो, माझ्या पाहण्यात आहेत काही लोक असे.
एक काका अविवाहित आहेत. ते अनेक दशके अमेरिकेत राहून रिटायर झाल्यावर भारतात गेले.पुण्याला अथश्री मध्ये रहातात आणि खूप मजेत आहेत.

दुसरं एक जोडपं असंच अनेक दशकं अमेरिकेत राहून दोघे रिटायर झाल्यावर भारतात गेले. खर्चाच्या दृष्टीने बरं पडतं म्हणे. सर्व घरकामाला बायका, वाहन चालवायचं नसल्यास ऑटो/कॅब, स्वयंपाकाला बाई लावणे किंवा डबा आणणे, एखाद्या मेडिकल स्पेशालिस्टची गरज पडल्यास 500/1000 फी देऊन अगदी दुसऱ्या दिवशी भेट होऊ शकणे, प्लस सोशल लाईफ- हे सगळं त्यांना आवडलं. इथे मुलगे-सुना आहेत पण त्यांच्या घरी भारतात राहतात तसं कायमचं राहायला आपण वेलकम नाही हे त्यांना कळलं आहे.म्हणजे मुलगे सुना चार दिवस स्वागत करतील पण भारतात जसं कायमच एकत्र राहतात तसं त्यांना जड जाईल.

अजून एक तुलनेने यंग मित्रमैत्रिण जोडपं परत गेलं त्यांच्या पेरेंटससाठी. ते सिटीझन होते. पण तरी पेरेंटना इथे आणणे कठीण कारण ग्रीन कार्ड केलं तरी 24 तास नर्सची सेवा लागते त्याचा खर्च घरी पेरेंटना ठेवून खूप येतो असं काहीतरी गणित होतं. आता ते इंडियन सिटीझन झालेत.

अजून एक कपल आहे त्यात काका अमेरिकेत राहतात आणि काकू ज्ये ना ची सेवा करण्यासाठी भारतात राहतात. अधूनमधून ज्ये ना ची सोय करून अमेरिकेत येतात. पण अलीकडे त्यांना येता नाही आलंय कोविदमुळे. त्यांचा एकुलता मुलगा अमेरिकेत आहे सो दुसरीकडे असला तरी काकांना तो येऊन भेटतो अधून मधून.

धन्यवाद सनव. माहीतीतील उदाहरणं कमी आहेत या धाग्यावरती पण म्हळसा यांनी दिलेल्या धाग्यावर आहेत. तुम्ही दिलेली उदाहरणेही उपयुक्त आहेत. शेवटी प्रत्येकाला हा निर्णय स्वतःचा स्वतःच घ्यावा लागतो.
>>>>स्पेशालिस्टची गरज पडल्यास 500/1000 फी देऊन अगदी दुसऱ्या दिवशी भेट होऊ शकणे,>>>> होय हे फार महत्वाचे आहे.
>>>>ऑटो/कॅब, स्वयंपाकाला बाई लावणे किंवा डबा आणणे,>>> ही सोय खूप चांगली आहे हेही खरे आहे.
फक्त एका जोडीदाराचा निर्णय भारतात यायचा व एकाचा अमेरीकेत रहायचा हेच मुळी त्रांगड्याचं आहे. दोन डगरींवर पाय दिल्यासारखे. ते कितपत मला झेपेल हे पहायला हवे शिवाय मेडीकल इन्स्युरन्स ही एक जबरदस्त गरज आहे. किंबहुना माझ्या जॉबच्या पैशांमध्ये तो परवडणे म्हणजे चैन आहे, लग्झरी आहे. ती अमेरीकेत नवर्‍याच्या इन्श्युरन्स्वरती परवडते आहे.

गॅस शेगडी पासून घेण्यात नक्की अवघड काय आहे?
आजकाल पुण्या/मुंबईत पाईप गॅस कनेक्शन आहे. तो नसेल तर पोर्टेबल बारका सिलेंडर मिळतो तो पर्मंनंट मिळेस्तोवर वापरायचा. बाहेर आपल्याला हवं तसं खाणं सहज उपलब्ध असतं. पैसे खर्च केले की सिलेंडर कनेक्शनही इव्हेंचुअली मिळून जाईल.
भारतात ३० वर्षे राहिल्यावर परत जाताना एक्स्पेटेशन्स व्यवस्थित असतील मला वाटतं. आम्रविकेत जन्मलेल्यांना कठिण जाईल ते समजू शकतो.

बाकी नव्या जागेत गेल्यावर तिकडे जुळवुन घ्यायला कष्ट कुठेही पडतातच. अमेरिकेत कमी कष्ट पडतात असं वाटतं का?
अमेरिकेत नविन आल्यावर एसएसएन अप्ल्याय करुन ते कार्ड हातात येईपर्यंत महिना+ जातो. तो पर्यंत ड्रायव्हर लायसन्स काढता येत नाही. लर्निंग मिळालं तरी बिहाईंड द व्हील टेस्टला महिनोनमहिने वेट असतो. दुसर्‍या देशाचं लायसन्स व्हिजिटर असाल तर सहा महिने पण रेसिंडंट म्हणून आलात तर एक आठवडा व्हॅलिड असले यडचाप नियम आहेत डिएमव्हीचे. लायसन्स नसेल तर कार खरेदी करता येत नाही. दुसर्‍या देशाच्या लायसन्स वर रेंटल कार चालवणे (जे काटेकोर कायद्याप्रमाणे बेकायदा आहे) याशिवाय पर्याय नसतो. नाही तर मग पब्लिक ट्रांझिट वापरा. जो अर्थात उपलब्ध असेल तर वापरता येतोच, पण पूर्वीच्या लाईफ स्टाईलशी तडजोड करुन वापरतो आपण. ते करू लागलो की सगळं जीवन अर्धातासाच्या अंतराने प्लान करावं लागतं कारण बसची फ्रिक्वेंसी दर अर्ध्यातासाने असते. (जी तास दोन तासही नॉन पीक आवरला असते). पण एकदा सगळं सेट झालं की पहिला त्रास विसरुन जातो. भारतात जे आहे तो त्रास वाटत असेल तर जाण्याने आणखी त्रासच होईल. 'जे आहे ते असं आहे' म्हणून पुढे चालू लागलात तर आनंदाने जगता येईल.
कॅनडातील मेडीकल सिस्टिम मधून अमेरिकेत गेल्यावर बाय विकली (कंपनी बराच भार उचलुनही) हे भले मोठे पैसे इंशुरन्सला जाणे, इन नेटवर्क आऊट ऑफ नेटवर्क गोंधळ स्विकारायला काही महिने गेले. पण मग ते अंगवळणी पडले आणि परत मेडिकल विचार मनात आला नाही. कारण हे असं आहे हे स्विकारलं. कॅनडातील कार अमेरिकेत घेऊन जाण्यात एकदा काय तो त्रास झाला. मग परत काही नाही.
भारतात काही त्रास हे असे नजरे आड होणार नाहीत. गर्दी, प्रदुषण, भोंगळपणा तर काही होतील जसे आधार कार्ड, गॅस कनेक्शन, बँक अकाऊंट इ. एकदा झालं की झालं. तसे अमेरिकेत आपल्याला हवे तसे जगायला मिळत नाहीये हा (जर) तुमचा त्रास असेल तर तो कुठे गेलाय? त्या त्रासातच तुम्ही जगत आहात ना?
तुमच्या वडीलांचं वय ७५- ८० असावं. (ते दीर्घायुषी व्हावेत हीच इच्छा) पण जर धरुन चाललं की त्यांची अजुन १० वर्षे बाकी आहेत तर तुम्हाला ती दहा वर्षे त्यांच्या सोबत रहाता आलं तर फिअर ऑफ मिसिंग आऊट येणार नाही असं काही आहे का? देव न करो पण आधी काही बरं वाईट घडलं तर तुम्हाला तो सल कायम लागून रहाणार असेल तर काही काळ सोबत घालवून या. नुसता विचार करू नका. कृतीत आणून ट्राय करा. ते वाटतं तेवढं कठिण नाही.
मुलीने स्टुडंट लोन काढलंय 'म्हणून' असा विचार डोक्याच्या जवळही आणू नका. तुम्हाला राजीखुषी सहज मदत करता आली तर उत्तमच, पण शिकण्याचा/ लोन घेण्याचा निर्णय तुमचा नाही. त्याची जबाबदारी ओढवुन घेऊ नका.
शुभेच्छा!

चिऊ यांनी जितके स्पष्ट लिहिले आहे एकट्या राहणार्या बाई बद्दल हाच विचार मलाही मांडायचा आहे. समाजाची मानसिकता अजूनही बदलेली नाही. मी 4वर्षांपूर्वी दोन्ही मुलांना घेऊन पुण्यात आले. नवरा एक वर्षाने आला कारण त्याला बदलीसाठी खूप धडपड करावी लागली.

पण त्या एक वर्षात बरेच अनुभव आले. सगळे नातेवाईक समजत होते की घटस्फोट केस चालू आहे किंवा नवर्याचे बाहेर काहितरी चालू असेल. त्यात सासू सासरे आणि आई वडिल सारखे तू त्याच्या आधी का आलीस म्हणूून
रागवायचे. माझ्या नवर्याचे दूरचे नातेवाईक व्हाटस अप ग्रुप मध्ये त्याला चिडवायचे की बायको आणि मुलांना पुण्यात सोडून तिकडे एकटा मजा मारत आहेस. सांगून सांगून थकले की बदली करुन घेणे इतके सोपे नाही. पण जेव्हा आपली घरची माणसे अशी वागत असतिल तर बाहेरच्या लोकाना काय बोलावे. असे अनुभव मला आणि नवर्याला दोघांनाही आले.

@ अमितव -
>>>गॅस शेगडी पासून घेण्यात नक्की अवघड काय आहे?>>> नाही फक्त तेवढेच नाही आधार कार्ड, पॅन कार्ड सगळ्यापासून सुरुवात आहे. आणि ती अडचण/बाब देखील फार मॉन्युमेंटल नाही.
>>>>>तसे अमेरिकेत आपल्याला हवे तसे जगायला मिळत नाहीये हा (जर) तुमचा त्रास असेल तर तो कुठे गेलाय? त्या त्रासातच तुम्ही जगत आहात ना?>>>>> करेक्ट!!
>>>>>मुलीने स्टुडंट लोन काढलंय 'म्हणून' असा विचार डोक्याच्या जवळही आणू नका. तुम्हाला राजीखुषी सहज मदत करता आली तर उत्तमच, पण शिकण्याचा/ लोन घेण्याचा निर्णय तुमचा नाही. त्याची जबाबदारी ओढवुन घेऊ नका.>>>> माझा स्वतःचा भयंकर स्वार्थीपणा वाट्तोय मला तो. एकीकडे आय फेल्ड आईबाबा आणि त्यांना वेळच देता आला नाही , कधीच, ही सल तर अजुन आता मुलीला आर्थिक मदत करता आली नाही ही अजुन एक बोच नाही घेता येणार. तेल गेलं-तूप गेलं हाती राहीलं धुपाटणं तशातली गत होइल.

नवर्‍याचा तर निर्धारच आहे की भारतात परत नाहि जायचे हा कारण त्याला ना तशी ओढ आहे ना त्याचं कोणी तिथे वाट पहातय. मलाच अर्धा ग्लास भरलेला आहे - असा दृष्टीकोन स्वीकारुन, मनाची समजूत घालावी लागणार आहे. आयुष्यातले बरेच (शिक्षण सोडून) निर्णय हे ऑटॉपायलटवर अकाविचार न करता घेतले गेलेले आहेत. म्हणजे पाण्यात पडलो-पोहलो. वन ऑफ डेम बीईग 'अमेरीकेत स्थलांतरीत होणे' तेव्हा निभावण्याशिवाय गत्यंतर नाही, असे वाटते.

Bipolar च्या मुळे असे द्विधा विचार करत आहात.तुमच्या लक्षात येत नाहीए .मॅनियामध्ये नाही असे म्हणता पण वाचताना मला तरी तसे वाटले.
भारतात सामान्य,भावनिक,इमानदार,हळव्या माणसाला काहीही भविष्य नाही.इकडे येऊ नका त्रास होईल ,सगळ्या पातळीवर.आर्थिक,भावनिक.,शैक्षणीक,वैवाहिक.तरीही निर्णय तुमचा आहे व तो घेण्यास शुभेच्छा .

केशव तुलसी तुमचे बरोबर आहे. माझ्या नीट लक्षात येतय ते आणि म्हणुनच वर म्हटल्याप्रमाणे, रोजनिशी ठेउन, वेळोवेळी काय वाटते हे चाचपून , २ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतरच निर्णय घेणार आहे.

तुम्ही मनाने तिथे कधीच रमला नाहीत आणि कायम तुम्हाला इकडे यावेसे वाटत होते की तुम्ही एका temporary phase मधून जात आहात याचाही विचार करावा असे मला वाटते.

केशव तुलसी +11
म्हणूनच मी लिहिलं की मानसिक दृष्ट्या खंबीर असाल तरच या.
गेल्या गेल्या ह्या किरकोळ पण अनेक समस्या समोर आल्या तर मन: स्वास्थ्य कोलमडण्याची शक्यता.

काही गोष्टी-संकटं-धास्ती केवळ आपल्या मनातच/विचारांतच अस्तित्त्वात असतात. प्रत्यक्षात त्यांची शक्यता फार कमी / नगण्य असते. प्रत्यक्षात पाहिले तर बाहेर छान स्वच्छ सूर्यप्रकाशाचा निवांत दिवस चालू आहे, हे आढळते. ही बाबही विचारात घ्या. Happy

अमितव +१
कुठेही गेलात तरी अ‍ॅडजस्टमेन्ट आहेच, तुमचा जॉब रिमोटली करण्यासारखा असेल तर ४-५ महिने तुम्ही वडिलाबरोबरच राहु शकता त्यातले काही दिवस सुट्टि घेवुन टाइम स्पेन्ड करा त्यात जॉब साठि लागणारी सेट्लमेन्टही करता येइल.तुम्हाला वडीलाबरोबरच राहायच असल्याने लगेच काही इन्फ्रास्ट्क्चर लागणार नाही.... असे पिरियॉडिकल ब्रेक घेवुनही डिसिजन घेता येतिल.

>जॉब शोधावा लागेल. मॅन्युअल टेस्टिंगला काही स्कोप आहे का? माझे वयही जास्त आहे.

इतर लोकांनी तुपात तळून व पाकात घोळवून जे लिहिले आहे ते मी स्पष्ट लिहितो.
तुम्हाला जॉब मिळणार नाही.
मिळालाच तर तुम्हाला अपेक्षित पगार देणे कंपनीला परवडणार नाही.
कंपनी जो पगार देइल त्यात तुम्हाला अपेक्षित लाईफ स्टाईल मिळणार नाही. ( मेडिकल इंसुरन्स वगैरे..)

भारतात अध्यात्माचा पूर आलेला आहे असे लोकांना का वाटते ? अमेरिका म्हणजे द्राक्ष संस्कृती व भारत म्हणजे रुद्राक्ष संस्कृती हे वाक्य भाषणात ठोकायला बरे आहे. प्रत्यक्षात इथे व तिथेही माणसेच आहेत.
एखादी सतरा अठरा वर्षाची मुलगी ( वा मुलगा) जेव्हा प्रेमात पडतात तेव्हा त्यांना सांगावेसे वाटते की
You are not in love. You are in love with the idea of love.
"साद देती हिमशिखरे", "एका योग्याचे आत्मवृत्त", "दास डोंगरी रहातो", अशी पुस्तके वाचून आपणही आध्यमिक मार्गाने जावे अशी क्षणिक भावना उत्पन्न होणे सहाजिक आहे पण थोडा विचारही आवश्यक आहे.

आता सिरियस ओव्हरडोस झाल्याने भरपूर दिवे घ्या. किंवा स्किप करा!
अध्यात्मात लाईफस्टाईल जपायला लागते का? मला आपलं एक पाय वर करुन हिमालायात तप करणारं अध्यात्म वाटलेलं. हे गुबगुबीत अध्यात्माचं ध्यानात न्हवतं आलं. Light 1
भारतात अध्यात्माला लागल्यावर गांजा ओढायला मिळते इकडे सांधे दुखायला लागल्यावर मिळते. पण यासाठी रिक्रिएशनल मेर्वाना मिळणार्‍या राज्यांत (किंवा देशात Wink ) जाणे हा एक पर्याय आहेच की! अनेक Light 1 Proud

एखादी सतरा अठरा वर्षाची मुलगी ( वा मुलगा) जेव्हा प्रेमात पडतात तेव्हा त्यांना सांगावेसे वाटते की
You are not in love. You are in love with the idea of love. >> Lol
काय राव विकू एवढेही ब्रुटल असू नये टीनएजर्स सोबत.. आपणही कधी एक दुजे के लिये पाहतांना 'आय वाँट टू प्ले द गेम ऑफ लव' मनातल्या मनात म्हणत असू, ते आठवा हो जरा. Proud

"साद देती हिमशिखरे", "एका योग्याचे आत्मवृत्त", "दास डोंगरी रहातो", अशी पुस्तके वाचून आपणही आध्यमिक मार्गाने जावे अशी क्षणिक भावना उत्पन्न होणे सहाजिक आहे पण थोडा विचारही आवश्यक आहे.>> ऊतारा म्हणून अमृतवेल, पहिले प्रेम असे समग्र खांडेकर वाचावे म्हणताय का मग. Wink

सामो - तुम्हाला जे वाटते ते करा... लोकांचे सल्ले उपयोगी नाहीत... हा खूप पर्सनल निर्णय आहे...
आणि एक मोठे adventure देखील...

@ssj, गजानन, विकु, उपाशी बोका, च्रप्स, स्पार्कल आणि प्राजक्ता धन्यवाद.
>>>>आपणही आध्यमिक मार्गाने जावे अशी क्षणिक भावना उत्पन्न होणे सहाजिक आहे>>> नाही अशी काहीही भावना माझ्या मनात नाही. माझं अध्यात्म म्हणजे गोंदवले गावाला जाता येणं इतपतच मर्यादित असणारे.
>>>>तुम्हाला जॉब मिळणार नाही.
मिळालाच तर तुम्हाला अपेक्षित पगार देणे कंपनीला परवडणार नाही.
कंपनी जो पगार देइल त्यात तुम्हाला अपेक्षित लाईफ स्टाईल मिळणार नाही. ( मेडिकल इंसुरन्स वगैरे..)>>>> सत्य आहे. ही वस्तुस्थिती असणारे.
सर्वांचे धन्यवाद.

Pages