भारतात, परतावे अथवा नाही?

Submitted by सामो on 18 November, 2020 - 02:05

माबोवरती निवासी-अनिवासी दोन्ही गटातले सुजाण आय डीज आहेत. विविध अनुभव घेतलेलेले आहेत, प्रत्येकाला आपापल्या स्थानिय परीघातील बलस्थाने, उणीवा, मर्यादा माहीत आहेत. त्यामुळे हा प्रश्न मांडण्याचे धाडस करते आहे. कारणं वैयक्तिक आहेत तशीच सांगता येण्यासारखीही आहेत. गेले अनेक वर्षे हा विचार होताच पण आता अधिक जोराने मूळ धरतो आहे. सांगता येण्यासारखी कारणे खाली मांडते.

प्रश्न- अमेरीकेचे नागरीकत्व मिळून आताबरीच वर्षे होतील. म्हणजे येतील जीवनाचा उपभोग घेउन खूप वर्षे होतील. इथे कधीच मन रमले नाही. आता जर मी (एकटी) भारतात परतले तर मला अ‍ॅडजस्ट होता येइल का? काय काय अडथळे येतील?

मी स्वतः एक यादी बनवलेली आहे ज्यामध्ये प्रोज आनि कॉन्स मांडलेले आहेत. प्रत्येक मुद्द्याला एकेक वजन दिलेले आहे. यात भारतात परतण्याकरता जे प्रोज आहेत ते सध्या तरी १३ एकक वजन राखून आहेत. न जाण्याच्या कारणांचे वजन आहे १७ एकक. म्हणजे न जाण्याचे पारडे जड आहे. असणारच कारण नवरा व मुलगी यायला तयार नाहीत. त्यांचयशिवाय मी एकटीच जाणार हाच एक नॉन-निगोशिएबल मुद्दा 'कॉन्स' मध्ये आहे. नॉन-निगोशिएबले म्हणजे अतिशय गंभीर/आवश्यक मुद्दा. या मुद्द्याला सर्वात जास्त वजन आहे. अन्यथा पारडे समसमान आहे.

(१) मला, घर नवीन घ्यावे लागेल. शक्यतो (९०%) पुण्यात घ्यायला आवडेल. घरांच्या किंमती, स्वारगेट्/डेक्कन/कोथरुड/औंध भागात काय आहेत कोणाला माहीती आहे का? १ बी एच के इज सफिशिअंट फॉर मी.

(२) जॉब शोधावा लागेल. मॅन्युअल टेस्टिंगला काही स्कोप आहे का? माझे वयही जास्त आहे. आता मी जवळजवळ पन्नाशीला आले आहे. २ ईयर्स शाय ऑफ फिफ्टी. किंबहूना म्हणुनच वाटतं - अब नही तो कब?

मुख्य म्हणजे असा निर्णय तुमच्यापैकी कोणी घेतला आहे का? किंवा तुमच्या परिचयात असा निर्णय घेतलेले कोणी आहेत का? त्यांचा काय अनुभव? ते कसे अ‍ॅडजस्ट झाले? मी साईड बाय साईड, युट्युब वर, ब्लॉग्जवरती तशा केसेसच्या मुलाखती/ माहीती वाचतेच आहे.

प्लीज डु नॉट मेक फन ऑर गिव्ह नी-जर्क रिस्पॉन्सेस. विचार करुन, उपयोगी पडावा याकरता, सल्ला द्या. दोन्ही स्वाती, अमा, वर्षा, अस्मिता, देवकी, मीरा,मृणाल, भरत, मानव,च्रप्स, ऋन्मेष, हीरा, अनु, सीमंतिनी, हर्पेन, रुपाली, किल्ली, आणि अन्य सर्व रेग्युलर्स. कोणाचे नाव राहीले असेल, तर माफ करा. पण सगळेच एक से बढकर एक हुषार , दयाळू, परखड, व्यवहारी आय डीज आहेत, त्यांचा अनुभव परीघही विस्तारीत अहे. म्हणुन इतका वैयक्तिक व अगदी अर्धा कच्चा प्रश्न मांडायचे धाडस करते आहे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

इतकी वर्षे अमेरिकेत घालवल्यावर भारतात ( त्यातून पुण्यात) परतू नये अशा मताचा मी आहे > +१
भारतातली व्यवस्था प्रामाणिक माणसाला नाडणारी आहे > +१

परत आलेला माणूस पुण्यात निश्चित रमू शकतो ...इथल्या वास्तू , मित्र मंडळ आणि गोतावळा , आठवणी... इथे असल्मुयामुळे.
१७५ दिवस राहून परत तिकडे जायचं

माझा मित्र आहे..५५ ला रिटायरमेंट घेतली..सप्टेंबर ते फेब्रुवारी इथे आणि मग परत कँलिफोर्नियाला जातो
जीवनाचा पुरेपूर आनंद घेतो.

>>इतकी वर्षे अमेरिकेत घालवल्यावर भारतात ( त्यातून पुण्यात) परतू नये अशा मताचा मी आहे.

+1

अमेरिकेत मन न रमायची कारणे काय? ट्रम्प हरल्याने उद्विग्नता आली आहे का?
भारतात नक्की कशाची ओढ वाटतेय?
भारतात आल्यावर नोकरी करायची खरंच गरज आहे का? की अजून दोन वर्षात लाखभर डॉलर साठवून इथे येता येईल?
नवरा/मुलगी यांच्या मनाविरुद्ध इथे एकटीने राहण्याइतपत प्रबळ कारण आहे का?
अमेरिकेतील जीवनशैलीनुसार तुमची मुलगी लवकरच वेगळी राहण्याची शक्यता आहे. मग empty nest syndrome ला हाताळण्यासाठी तुम्ही हा विचार करता आहात का?

माझ्या मते तुम्हाला मिडलाईफ क्रायसिस भेडसावत असावा. या शक्यतेचा विचार करून निर्णय घ्या.

परतावं वाटत असेल तर नक्की परता. पण पहिला टेस्ट पिरियड हे तर योग्यच म्हणायचे. १-२ महिने राहून पुढचे ठरवा.

बाकी अमेरिकेच्या मानाने बरेच मायनर डिस्कम्फर्ट आहेत, पण माझ्या मते ते पूर्ण मायनर आणि मानसिक आहेत. मध्यमवर्गीय (रादर उच्च मध्यमवर्गीय, अंदाज. चुभुद्याघ्या.) व्यक्ती इथेही चांगले जीवन नक्की जगू शकतो, मायनर गोष्टी सोडून.

भारताबाहेर कधीही गेलो नसलो तरी भारतात आनंदाने जगतो आहे म्हणून हे सांगतोय.

१ बीएचके १.२ लाख.>२ बीएचके १.५ लाख.>> कुठे ? मी आजच घेवुन टाकतो >>> अर्र, अस झाल व्हय. लाख नाही, कोटी, कोटी. Happy

व्यत्यय, + १
माझी एक मै कॅलिफोर्नियात असते. ती मुलगा पाच व मुलगी एक वर्षाची असताना तिकडे गेले. नवऱयाने नोकरी सोडून व्यवसाय सुरू खूप चांगला सुरुये. मुलीने पोस्ट केल्यावर न्युयाॅर्कला नोकरी केली. अन् काय डोक्यात आलं माहिती नाही टीच फाॅर इंडियाला अप्लाय केलं. निवड झाली. जाॅईन झाली पुण्यात..... आईवडिलांनाच काय इतरांनाही वाटलं धक्के बसतील अन् येईल परत. पण तसं झालं नाही. दोन वर्षे पूर्ण केल्यावर आकांक्षा जाॅईन केलंय तिच्याच क्षेत्रातल्या मुला बरोबर लग्न झालं. ह्या २६ ला लग्नाला वर्ष पूर्ण होईल. खूप खुश आहे. इतकी फोकस्ड मुलगी पाहिली नाही. आता आईला परतावंसं वाटू लागलंय. मुलगा व नवरा पूर्ण अमेरिकन झालेत, असं ती म्हणते. तिलाही साधना/अजातवासींनी सल्ला दिला तोच सल्ला दिला. तर तुमचा फोकस काय त्यानुसार निर्णय घ्या.

साधना ह्यांना big अनुमोदन +111
माझे नाव घेतल्याबद्दल धन्यवाद, अमेरिकेचा अजिबात अनुभव नाही.
इथे येऊन तुम्ही job करणार त्या बद्दल मला तरी फार भारी feeling येत नाही आहे, (manual टेस्टिंग आणि तुमचे package).
पुण्यात छान वाटेलच ह्याबद्दल शंका नाही. स्वतःच्या इच्छेने येत आहात तर comfortable असणार.
तुम्ही उल्लेख केलेल्या area मध्ये घर हा विचार खिशाच्या बाहेर असल्याने काही कल्पना नाही. पण it मध्ये काम करणार असाल आणि हिंजवडी किंवा मगरपट्टा ला कंपनी असेल (wfo case) असेल तर traffic आणि बेशिस्तीमुळे boar होईल, वैताग येईल तुम्हाला.
बाहेर कुठेतरी कंपनी जवळ(pcmc, किंवा दूरचे भाग) राहणार असाल तर टिपीकल पुण्यात राहतो आहोत ही feeling येणार नाही.
अर्थात wfh असेल तर no issues

एकदा प्रायोगिक तत्वावर येथे राहून पाहावे मग अंतिम निर्णय घ्यावा असे वाटते.
......
(असंही पुण्यात आता किल्ली नाही, काय करणार येऊन Proud Light 1 )

@कारवी -
>>>पूर्वी झालेली चर्चा थोडी वाचली होती ---https://www.maayboli.com/node/13157>>> प्रचंड उपयोगी लिंक. धन्यवाद.
@विक्रमसिंह
>>>>अजून ५वर्षानी/ १० वर्षानी/२० वर्षानी तुम्ही जीवनात कुठे असायला पाहिजे आणि तुम्हाला काय पाहिजे >>> हा एक मुद्दा खूप आवडला. या मुद्द्याचा विचार केलेला नव्हता.
@प्रणवंत, @हर्पेन -
>>>>>भारतात परतायची कारणे दिली असती >>>>> अध्यात्मिक आहेच. परंतु एकदाचंं नात्यांचे बटनही रिसेट करावेसे वाटते. आपण दुसर्‍याच कोणाचे तरी विचार, आयुष्य जगलो, त्यांच्या मनाप्रमाणे वागलो. आपल्याला आपलं आयुष्य कधी जगायला मिळेल असे वाटते. मानसिक स्वातंत्र्यही हवेसे वाटते. ड्रायव्हिंग येते पण ड्रायव्हिंगची भीती वाटत असल्याने, नवर्‍यावर अवलंबुन रहावे लागत असे. इफ यु डोन्ट नो ड्रायव्हिंग यु हॅव्ह नो लाइफ - अशी परिस्थिती बर्‍याच अमेरीकेच्या बर्‍याच राज्य/रिमोट भागात आहे. अगदी खरं सांगायचं तर वय होत जातं तसतसं, मन सर्व सिनॅरिओजचा विचार करु लागतं - उदा - उद्या नवरा नसेल, तर मग मी मॅनेज कशी करु? मुलगी तिच्या व्यापात असेल, माझं मन कसं लागेल वगैरे. मन चिंते ते वैरी न चिंते.
@साधना
>>>>इथे येऊन सहा महिने भाड्याच्या घरात राहा, ........... टाटा बाय बाय करा.>>>> हा सल्ला खरच गंभीरतेने घेउन, स्वतःची मानसिक तयारी अनुभवली पाहीजे.
@अज्ञातवासी
>>>>तर प्लॅन बी रेडी ठेवा.>>> खरच प्लॅन बी अवघडच आहे परंतु विचार केलाच पाहीजे.
@म्हाळसा -
>>>१० महीने अमेरिकेत जाॅब आणि २ महीने भारतात.>>>> माझी कंपनी या सेट अपला हो म्हणालेसं वाटत नाही.
@रॉनी -
>>>>>करण इथे काही पाश उरले नव्हते.>>>> करेक्ट माझेही बाबा ७७ आहेत आता. आई-बाबाना भेटायचे राहूनच गेलेले आहे. नोकरदार हीच माझी आयडेंटिटी. अन्य आयडेंटीटी नाही. तरी बाबांची ओढ सुटत नाही. पण किती काळ....??
@सियोना
>>>परदेशात एखादे वर्ष राहणे आणि खूप वर्षे राहिलेले हा फरक खूप होतो.>>> करेक्ट. माझ्या ओळखीत एक व्यक्ती मागे जाउन, आता पश्चात्ताप झालेला आहे - असे उदाहरण आहे.
@नीरु
>>>>ते १७ आणि १३ प्रोज आणि काॅन्स पर्सनल नसतील तर देता येतील का..?>>>
प्रोजमध्ये - आयुष्याची रिसेट कळ दाबणे, फॅमिलिअ‍ॅरीटी/रूटस, अध्यात्मिक अंग, मनासारखे संचार स्वातंत्र्य या गोष्टी आहेत
कॉन्स मध्ये - प्रदूषण, कम्युट, जॉब, घर, मुलगी-नवरा दुरावणे, गर्दी या गोष्टी आहेत
@अंतरंगी -
>>>अस्वच्छता, बेशि.......... विचारात घेतले असेल तर भारतात स्वागत आहे.>>> या गोष्टींची संपूर्ण पूर्वकल्पना अहे कारण पहीली ३० वर्षे तर तिथेच गेलेली आहेत. म्हणजे २/३ आयुष्य भारतात व १/३ अमेरीकेत गेलेले आहे. पण भारताची ओढ कणभरही कमी होत नाही.
>>>>तुम्ही लिहिलेल्या भागांमधे नविन १ बीएचके फ्लॅट जास्त मिळत नाहीत. आणि मिळाला तरी ८५ ते ९० लाखाच्या खाली मिळणे अवघड आहे>>>>>>> या माहीतीबद्दल, धन्यवाद
@पुणेकर -
>>>frankly, little difficult unless you carry a strong >>> अगदी हा मुद्दा फार वजन राखतो. जॉब नसेल तर मी सस्टेनही करु शकणार नाही आणि तसे आवडणारही नाही.
@जिज्ञासा -
>>>>>सामो, तुम्ही पुण्याच्या आहात का किंवा पुण्यात नातेवाईक/मित्रमैत्रिणी आहेत का?>>> होय. दुचाकीही येते Happy
>>> Test the waters first.>>> या सर्वाला घरुन किती पाठींबा मिळेल कोणास ठाउक. परंतु मुद्दा योग्य आहे.
@रेव्यु -
>>>>असा काही पाश नसल्यास इतर अनेक बाबतीत, तिथे सवय झाली असल्यास तो अनुभव अधिक समृध्द ठरेल,>>>> तेच होते आहे मला समृद्ध झाल्याची भावना येण्यापेक्षा, अजुनही मूळे न रुजल्याची, परकेपणाची भावना वाटते. याचे कारण इथे ना नातेवाईक ना मैत्र. पण भारतातही, बाबा सोडता ओढही तशी अन्य कोणाची नाही. बाबा किती दिवस पुरणार. तिथे जाउन, परत एकटच पडायचं असेल तर विचार केला पाहीजे. नवरा-मुलगी कायमचे दुरावले तर?????
@पुंबा -
>>>>अमेरिकेतल्या डिग्निटीची सवय झाल्यावर इथले फालतू जिणे कितपत मानवेल सांगता येत नाही.>>> एवढीही सवय झालेली नाही.
>>>. पुर्वीचे बंध घट्ट असले तरी आता ते तसेच असतील असे नसते. बऱ्याचदा सारे विसविशीत झालेले असते.>>> अतिशय सत्य!!!
@अनु, देवकी, प्रघा, बोकलत, अक्षांश - आभार
@किल्ली -
>>>असंही पुण्यात आता किल्ली नाही, काय करणार येऊन Proud Light 1 >>> आई ग्ग!!! किती गोड Happy

सामो, काही दिवस भारतात सुटीवर(wfhअसेल तर तोही प्रश्न सुटला) राहून पहाच.निदान सध्या दोलायमान झालेली मनस्थिती निवळेल.बाबांच्या सहवासाचे क्षण आनंद देऊन जातील.

रच्याकने, वय झाले वगैरे विसर.असं काही वय झालेले नाही.

सामो, सिरियसली पैसे कमावण्यासाठी जॉब चालू आहे की जॉबमधून मिळणारे उत्पन्न हे dispensable आहे? (प्रश्नाचे उत्तर स्वतःपुरते असू द्या.) हा मुद्दा अशासाठी मांडला की मला वाटतं की तुम्ही सरळ तुमचा विचार कृतीत आणा! पुण्यात तुम्हाला आवडणाऱ्या एरीआत एक फ्लॅट भाड्याने घ्या. अमेरिकेतल्या नोकरीला बाय बाय करा किंवा दीर्घ काळ रजा घ्या आणि इथे रहायला या! सगळ्यात महत्वाचे काय असते तर regrets शिवाय आयुष्य! तुम्ही कितीही विचारविमर्श करून निर्णय घेतलात तरी थोडीशी रिस्क असणारच आहे. आत्ता याक्षणी जी परिस्थिती आहे तीच बेस्ट परिस्थिती आहे असा विचार करा आणि प्रयोग करून बघा. कारण उद्या जर परिस्थिती बदलली आणि भारतात/पुण्यात येऊन राहणं अशक्य होऊन बसलं तर तुम्हाला खंत करणे हाच पर्याय उरेल. अर्थात हे तेव्हाच शक्य आहे जर तुमचे सध्याचे उत्पन्न dispensable असेल. नवरा आणि मुलगी अशा थोड्या काळासाठीच्या प्रयोगाला तयार होतील का?

सामो, मी तरी या बाबतीत काहीच मत देऊ शकत नाही.
प्रायोगिक तत्वावर इथे येऊन एकटे राहण्यापेक्षा आधी तिथेच आहे ती नोकरी सुरू ठेऊन एकट्या वेगळे राहून पहा तीन चार महिने. अथवा इथे एकट्या न रहाता बाबांंसोबत रहाणार असाल, तर तिथे बाबांना बोलावून (ते तयार असल्यास) त्यांच्या सोबत वेगळे राहून पहा. म्हणजे तुम्ही नवरा मुलगी शिवाय राहू शकाल का / बाबांसोबत राहू शकाल का याचा अंदाज येईल, मग इथे सुट्टी घेऊन महिना दोन महिना राहून पहा आणि पुढचा निर्णय घ्या.

मुख्य म्हणजे घाई करणार नाहीये. डाउन द लाईन, २ वर्षात वेगवेगळ्या टप्प्यावरती जे काही वाटतं त्याची डायरीत नोंद करुन ठेवेन. कारण मॅनिअ‍ॅक एपिसोडसमध्ये खूप वेगळं करायची, रिस्क घ्यायची उर्मी येते. गेल्या १३-१४ वर्षात स्वभान उत्तम आल्याने, मला कळते डिप्रेसिव्ह केव्हा वाटतय व मॅनिअ‍ॅक कधी ते.

@मानव,
>>>तुम्ही नवरा मुलगी शिवाय राहू शकाल का>>> फार उपयोगी सल्ला आहे. कारण मी हे गृहीतच धरलेले आहे की मी या जवळच्या नात्यांपासून दूर, खंबीरपणे राहू शकेन. हे गृहीतक चूकीचे असू शकते.

मी २०१२ मध्ये ८ वर्षांनंतर अमेरिकेमधून भारतात परतलो. आता जवळपास ८+ वर्षे झाली त्याला. माझ्या नशीबाने माझ्या हाती नोकरी होती जी २०१४ ला सोडून स्वःताचा व्यवसाय सुरू केला.
सुरूवातीची दोन एक वर्षे गर्दी, प्रदूषण, सरकारी खाबूगिरी, ऑफिस मधील कामाच्या वेळेत टाईमपास करून रात्री उशीरापर्यण्त थांबून मी कसा hardwork करतो असे दाखवणारी जनता याच्याशी जुळवून घेताना त्रास झाला. अगदी बर्‍याच वेळा अमेरिकाच बरी होती, परत जाऊया इतपत वाटण्याजोगा त्रास झाला.
पण आता सवय झालीय. वेळ घालवला कि तो त्रास कमी होतो हा स्वःनुभव आहे. जुने मित्रमैत्रिणी तुमच्यासाठी पूर्वीप्रमाणे वेळ काढू शकतील याची काही खात्री नाही.

तुमच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुमची इकडे येऊन नोकरी शोधण्यापासून सुरूवात आहे. थोडं स्प्ष्टच सांगायचं झालं तर manual testing ला आता फारसा स्कोप नाहीय. पण तुमचा अनुभव लक्षात घेता नोकरी मिळण्यासाठी फारशी अडचण येणार नाही.
२००३ पासून राहूनही तिकडे मन रमलं नाही आणि एकटे यायला मन तयार होतय म्हणजे तुमची इकडची ओढ खूपच जास्त असणार. मी जे फेस केलं त्यावर तुम्ही नक्की मात कराल.

मनात विचार आलाच आहे तर कमीत कमी २ वर्षासाठी येऊन बघा. अमेरिकन नागरिकत्व लगेच surrender करू नका. २ वर्षात वा मध्ये कधी वाटलं तर परत जायला अमेरिकेचा एक दरवाजा उघडा ठेवा. लगेच घर विकत घेण्याची घाई करू नका. पुण्यात खूप लोकांनी घरं घेऊन ठेवली आहेत, त्यातल्या एका घरात भाड्याने रहा Happy तुम्ही एकट्या राहणार म्हणजे तुम्ही तुमच्या जुन्या मित्रमैत्रिणींवर सोशली अवलंबून राहणार असाल तर तिकडे कदाचित निराशा पदरी पडू शकते. अर्थात मी तुमच्या मित्रमैत्रिणीना ओळखत नाही आणि कदाचित हे स्टेट्मेंट पूर्ण चुकीचे देखील असू शकते Happy

मी तुमचा निर्णय समजू शकतो कारण ८ वर्षे राहून प्रोसेसिंग मधे असलेले हरित कार्ड सोडून मला परत यावसं वाटलं होतं. तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर मला विपू करून नक्की विचारू शकता Happy

वरच्या यादीत माझं नाव बघून गंमतच वाटली. Happy

१. फारच मोठा नकारात्मक मुद्दा म्हणजे मुलीला हवे तेव्हा न भेटता येणे. मला फारच कठीण वाटतंय ते कारण नवऱ्यापेक्षा मुलांवर प्रेम जास्त असतं आपलं अर्थात हे माझं मत आहे.
( नवरा एखादं वेळी वेळेवर जेवला नाही तर काही वाटतं नाही पण मूल जेवले नाही तर आपल्याला जेवण जात नाही)

२. सगळं तरूणपण कष्टात, तडजोड करण्यात (त्यात सांस्कृतिक, कौटुंबिक, वैयक्तिक अगदी भाषेच्या सुद्धा) गेलं , आता पुन्हा नव्या तडजोडी कराव्या लागतील, इच्छा/उत्साह आहे का...

३.काही आध्यात्मिक ओढ असेल तर वर्षाला दोन महिने येऊन
नोकरीशिवाय रहाणे जमेल/परवडेल का... (जन्मभर नोकरी केली आहे तर आता मनाला असुरक्षित वाटत नसेल तर. ) तिकडे मुलगी भावनिक/आर्थिक द्रुष्ट्या स्वावलंबी झाली की तो काळ वाढवता येईल. तू पण भावनिक द्रुष्ट्या स्वावलंबी व्हावं लागेल. यात तुझे व त्यांचे कुठलेही कष्ट येतील , शारीरिक मानसिक.

४. मुलगी/ नवरा आजारी पडले तर तुला तिकडे मन शांत ठेवता येईल का? किंवा मुलीचे काही करीयर किंवा इतर नात्यातले त्रास..... तिला समजा तुझी आठवण येणार नाही पण तुला "त्यावेळी" इथे नसणं बोचेल काय ?

५. तरूणपण आईवडिलांपासून दूर गेलं आता ते तिथे आहेत का , कारण मुलींची दुसरं कोणं वाट बघणार आहे.... तू तिथे आजारी (देव न करो) पडलीस तर भाचे/भाच्या येतील काय...
(त्यांनी तरी का म्हणून यावे , ते चांगले असतीलच पण हक्क वाटत नाही मला, मी याचा विचार केला होता)

६. लॉंग वर्किंग अवर / office politics सोसेल काय ? वयामुळे नाही नसलेल्या सवयीमुळे म्हणतेयं...

७. इथले तुला नवरा/मुलीशिवाय काय आवडते ? शुद्ध हवा, निसर्ग, कामाचे ठराविक तास.....

८.ड्रायव्हिंग इतका मोठा इश्यु नाहीयें कारण असे अपार्टमेंट बघता येईल जिथून सगळे जवळ आहे. शिवाय ओला/ उबर वगैरे आहे की....

९. तरीही तीव्र इच्छा असेल तर तू प्रायोगिक तत्वावर करावेस असे वाटते.

१०. अजून पाच/दहा वर्षांनी हाच निर्णय घेता येत असेल तर चित्र अधिक स्पष्ट असेल का, निर्णय सोपा /गोंधळ कमी होईल काय ?

११. हे एका उद्विग्न क्षणातले विचार आहेत का की महिनोंमहिने मनात घोळत असलेले विचार आहेत ?

मला स्वतःला सुद्धा परत जायचे आहे पण फक्त आध्यात्मिक कारणांसाठीच त्यामुळे मी तिथे सुद्धा नातलगांमध्ये(शहरात) रहाणारच नाही ... कुठेही आश्रमात स्वयंसेवक म्हणून रहाणार आहे. त्यासाठी धडधाकट व मिनिमलिस्ट रहाणे आवश्यक , (स्वप्नच आहे)... पुढचे पुढे..... कशाचाच बाबतीत मी फार आग्रही नसतेच त्यामुळे फार त्रास होतं नाही.

जॉब हा खूपच कळीचा मुद्दा आहे असं तुम्ही म्हणत आहात तर इतर विचार करताना एकीकडे इथल्या जॉब मार्केट कडे आणि संधींकडे पण लक्ष ठेवा आणि काय शक्यता आहेत त्याचा अंदाज घ्या असं सुचवेन. तुम्ही agile मध्ये काम केलं आहे तर scrum master वगैरे रोलच्या पण requirements पाहू शकता, आवड असेल तर training च्या पर्यायाचा विचार करू शकता पण तिथे आता manual testing ला थोडे saturation आहे. Scriptless automation tools शिकू शकता जर कोडींग आवडत नसेल तर.

अध्यात्मिक कारण असेल तर काही अडचण नसावी.
अशी तळमळ असलेल्या माणसाला आवडी निवडी कमी असतात. गरजा कमी असतात. मनाविरूध्द अथवा मनासारखे झाले नाही तरीही त्यामुळे साधनेत व्यत्यय येत नसेल तर त्याचे फारसे काही बिघडत नाही. एकंदरीत असा माणूस परिस्थितीशी झटकन जुळवून घेतो.
पण या बाबत तुम्हीच तुमचे परिक्षण करणे योग्य ठरेल.

खर तर अध्यात्मिक उन्नती कुठेही होऊ शकते.
पण सत्संग व सत्गुरू मार्गदर्शन हा प्रकारच वेगळा.
असो.
_/\_

कळत नकळत तुम्ही बरीच वैयक्तिक माहिती (कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, मानसिक स्थिती) त्रयस्थ लोकांसमोर उघड लिहीत आहात. There are better and more discreet ways to brainstorm such personal dilemmas.
I would caution you against revealing any personal information on a public forum where you may not be completely anonymous.

अमेरिकेत जाणे हे सध्या तरी उच्च शिक्षित लोकांचे स्वप्न असते आणि नागरिकत्व मिळवणे हे ध्येय असते.
ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला मिळाल्या आयुष्यात जे हवं होते ते तुम्ही मिळवले असेलच.
म्हणून तुम्हाला तिथे राहण्यात आता काही चार्म वाटत नाही का?
की तेथील वातावरणात तुम्ही कधी मिसळून च गेला नाहीत.
तेथील सामाजिक आणि बाकी वातावरणात तुम्हाला comfortable वाटत नाही आणि भारताची ओढ पहिल्या पासूनच आहे पण कर्तव्य आणि करियर ह्या साठी इच्छा नसताना तिथे 18 वर्ष घालवली पण अमेरिकन झाला नाहीत.
ही सर्व कारण तुम्ही भारतात येण्या मागे आहेत का?.
कारण हे प्रश्न महत्वाचे आहेत आणि त्याच्या उत्तरात तुमचे भारतात येण्याची इच्छा किती तीव्र आहे हे माहीत पडेल.

अय्यो सामो माझे नाव लिहिलेस म्हनून माझे दोन पैसे Happy खरंतर सर्वांनी मूद्दे छान कवर केलेत त्यामुळे माझ्याकडून नवीन सांगण्यासारखे काही नाही.
मी उलटा प्रवास केलाय. मी ५ व नवरा १० वर्षे अमेरिकेत राहून भारतात परतलो आणि आता मी परत आलेय अमेरिकेत होपफुली नवरा, मुलगा जॉईन होतील इन निअर फ्यूचर.
तुझी सध्याची नोकरी सोडून अचानक उठून तिथे रहायला जाणे मला तरी अतिशय अविचार वाटतोय.
तिथे जुळवून राहणे कठीण आहे ऑलमोस्ट बाबतीत. दोन्ही ठिकाणी राहिल्यामुळे माझ्या अनुभवावर बेस्ड हे मत आहे.
मानव यांनी लिहिल्याप्रमाणे नवरा व मुलगी यांच्याशिवाय राहू शकू का हा प्रयोग इथेच करता येईल. त्यातच तुझे उत्तर दडले आहे असे मला वाटते.

तो प्रयोग सक्सेसफुल झाला तर तुझ्या कंपनीला विनंती करुन २ महिने सबॅटिकल किंवा तिथून काम करण्याची परवानगी मिळत असली तरच पुण्यात भाड्याने जागा घेऊन राहून बघ. तिथे जागा विकत घेण्याचा आत्ता विचारही करु नकोस.
असं मला वाटतं Happy

हायझेनबर्ग + १११....
धाग्याचा हेतू चांगला असला तरी इतकी वैयक्तिक माहिती public forum वर देऊ नये असे मलाही वाटले.

@हाब - धन्यवाद. नक्कीच. खूप वेगळा अँगल तुम्ही नेहमी दाखवता. आभारी आहे.
@अस्मिता - खूप मस्त मुद्दे मांडलेले आहेस. विशेषतः मुलगी /नवरा आजारी पडला तर??? तिच्याशिवाय रहाणे शक्य आहे का? हे मुद्दे ठळक आहेत.
@हेमंत
>>>>ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला मिळाल्या .......आता काही चार्म वाटत नाही का?>>>> तसे नाही, चार्म कधीच नव्हता. पाण्यात पडल्यावर पोहता आल्यासारखी अमेरीकन आयुष्यात आले व मिसळून गेले. पण ओढ भारताचीच राहीली.
@वर्षा - अपण तर नेहमी बोलत असतो. तुझे माझे विचार एकमेकींना नीट माहीत आहेतच. तुझा सल्ला लक्षात ठेवेन.
@ भागवत -
>>>पण सत्संग व सत्गुरू मार्गदर्शन हा प्रकारच वेगळा.>>>> यु सेड इट. गेल्या वर्षी गोंदवल्यास जाउन आले. किती शांत , प्रसन्न वाटलं. इथे सर्वात सुंदर बागेत, जागेत ही जो गोडवा नाही तो त्या आश्रमात लाभला. माझी एक मैत्रीण जी की रामाचे/ गोंदवलेकर महाराजांचे करते ती भेटली. अतिशय बरे वाटले.

खरं तर आता विचार करता, निष्फळ धागा वाटतो आहे इन अ सेन्स यातून कन्स्ट्रक्टिव्ह काही निष्पन्न होइलसे वाटत नाही फक्त मनाचा तळ ढवळून निघणार. कारण घरुन टिका. व स्वतःच्या मनाची कचखाऊ वृत्ती. यामुळे कोणताही ठाम निर्णय घेणे म्हणजे उंबराचे फूल आहे, माझ्या बाबतीत. 'जैसा है वैसा आसान है...चलने दो' हेच होणार आहे. पण एकदा तरी या विचारांना क्लोजर मिळायला हवे.

@अस्मिता - तुझे स्वप्न पूर्णत्वास जावो. रामाच्या कृपेने नक्की सुफळ होइल Happy

धन्यवाद वेका. ब्रेनस्टॉर्म म्हणजे म्हाळसा यांनी दिलेला कंपायलेशन धागा का? मी वाचते आहे. खूप मस्त कंपायलेशन आहे ते.

Pages