दिवाळीचा किल्ला- तुमचा आमचा प्रत्येकाचा

Submitted by मनिम्याऊ on 12 November, 2020 - 07:03

माबो आयडी Athavanitle kahi यांच्या या https://www.maayboli.com/node/77182
धाग्यावरून एक कल्पना सुचली.
लहानपणी आपण घरी/ आवारात/ सोसायटीमधे/ शाळेत किंवा जिथे सोयीचे असेल तिथे दिवाळीत किल्ले बनवले आहे. आता आपल्या मुलां भाचरांसाठी तितक्याच उत्साहात परत एकदा ती मजा घेतली असेल तर इथे शेअर करुया.

यंदाच्या वर्षी केलेल्या किंवा मागील वर्षांच्या दिवाळी किल्ल्याचा फोटो इथे दाखवा. तसेच किल्ले बनवतानाच्या काही खास आठवणी असतील तर त्या पण सांगा.

लेकीला जरा समज आल्या नंतरची हि पहिलीच दिवाळी. म्हणून यावर्षी तिला सोबत घेऊन किल्ला बनवला. मग किल्लेबांधणी सुरु असताना शिवाजी महाराजांच्या, मावळ्यांच्या गोष्टी सांगितल्या. किल्ला पूर्ण झाल्यावर
गडाखाली पायथ्याशी गाव वसवलं, शेती केली. मोहरी, मेथी, गहू पेरले. एकन्दरीत मज्जा केली.
हा आमचा किल्ला
IMG_20201112_140321.JPG
.
IMG_20201112_140153.JPG

आता दिवेलागण झाली की परत फोटो काढणार आहे. आणि जुने लहानपणी केलेल्या किल्ल्यांचे फोटो मिळाले तर ते पण इथे अपलोड करते.

तुमचे पण गड किल्ले येऊ द्यात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर धागा.
खूपच छान छान किल्ले बांधले आहेत.

ममो, स्वाती.. मस्त किल्ला.
यावर्षी आम्हीही छोटासा किल्ला बनवला.. वय वर्ष 3 आधी किल्ला करू सैनिक आणू एवढ्या थेअरी वर नाचत होते .. मी अन नवऱ्याने मिळून दगड विटा उभा केला.. जेव्हा चिखल केला तेव्हा हातच लावत नव्हता .. मग दोन चार बोटं त्याच्या गालाला पुसली , नाही केलास तर चक्क लोळवीन अस सांगितल्यावर तयार झाला ! Proud मग त्याने उरलेलं लिंपन काम केलं
IMG_20231115_111255__01.jpg

Screenshot_2024-10-23-13-05-00-16_4949498873baccbde9dc7a221b759985.jpg
तयारी चालू आहे.. जागा नसल्याने घरातच बनवला.. पायथ्याला कोणते धान्य पेरले तर आठवड्यात उगवेल??

Screenshot_2024-10-25-20-17-18-83_4949498873baccbde9dc7a221b759985.jpg
किल्ल्याचा अपडेट..
वरी आणि हळीव पेरले आहे..
माती सुकली की तडे जात आहेत मात्र..

मस्तच.... सगळ्यांची किल्ले बांधणी जोरात सुरू दिसते आहे.

यंदा माऊची तब्बेत ठीक नाही म्हणून मोठ्या किल्ल्याचा घाट नाही घातला. पण तिला करायचा तर आहेच. मग जमलं तर छोटासा पिटूकला करू.

धन्यवाद सर्वांना Happy
फारच छोटा वाटला म्हणून पायथा अजून वाढवला Proud
Screenshot_2024-10-27-10-58-11-59_4949498873baccbde9dc7a221b759985.jpg
मावळे खूप ठिकाणी शोधल्यावर मिळाले..

ऋन्मेऽऽष थॅन्क्स
हौस प्रचंड आहे म्हणून बाहेर जागा नाही मिळाली तरी घरात कोपऱ्यात बनवला... Happy

Pages