दिवाळीचा किल्ला- तुमचा आमचा प्रत्येकाचा

Submitted by मनिम्याऊ on 12 November, 2020 - 07:03

माबो आयडी Athavanitle kahi यांच्या या https://www.maayboli.com/node/77182
धाग्यावरून एक कल्पना सुचली.
लहानपणी आपण घरी/ आवारात/ सोसायटीमधे/ शाळेत किंवा जिथे सोयीचे असेल तिथे दिवाळीत किल्ले बनवले आहे. आता आपल्या मुलां भाचरांसाठी तितक्याच उत्साहात परत एकदा ती मजा घेतली असेल तर इथे शेअर करुया.

यंदाच्या वर्षी केलेल्या किंवा मागील वर्षांच्या दिवाळी किल्ल्याचा फोटो इथे दाखवा. तसेच किल्ले बनवतानाच्या काही खास आठवणी असतील तर त्या पण सांगा.

लेकीला जरा समज आल्या नंतरची हि पहिलीच दिवाळी. म्हणून यावर्षी तिला सोबत घेऊन किल्ला बनवला. मग किल्लेबांधणी सुरु असताना शिवाजी महाराजांच्या, मावळ्यांच्या गोष्टी सांगितल्या. किल्ला पूर्ण झाल्यावर
गडाखाली पायथ्याशी गाव वसवलं, शेती केली. मोहरी, मेथी, गहू पेरले. एकन्दरीत मज्जा केली.
हा आमचा किल्ला
IMG_20201112_140321.JPG
.
IMG_20201112_140153.JPG

आता दिवेलागण झाली की परत फोटो काढणार आहे. आणि जुने लहानपणी केलेल्या किल्ल्यांचे फोटो मिळाले तर ते पण इथे अपलोड करते.

तुमचे पण गड किल्ले येऊ द्यात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वच किल्ले मस्त!
वर्णिता, हिरवळवाला किल्ला खासच!
मंदार, नॉर्वेच्या थंडीत उत्साहाने किल्ला केला हे सहीच!
नौटंकी, तुमच्या सासर्‍यांचे कौतुक !

धन्यवाद Happy
सगळे किल्ले मस्त आहेत.

वाह, किल्ला आणि गोडुली दोन्ही मस्त.

पंचमी म्हणजे पांडव पंचमी का. काय करतात त्या दिवशी. इथे आमच्याकडे नाही करत. गुजराथमधे आज लाभपंचमी असते.

मानिमाऊ तुमचा किल्ला फोर्ट टाइप वाटत नसून castle स्टाईल वाटतोय. एकदमच भारी!
डिटेलिंग तर अगदी मस्त!
बाकीचे किल्लेही भारी.

सगळ्यांचे किल्ले सुरेख!

यावर्षी आमच्या बंगळूरच्या महाराष्ट्र मंडळाने 'ऐतिहासिक किल्ले बनवा' अशी स्पर्धा ठेवली होती. या स्पर्धेत आम्ही भाग घेतला होता. राजगडाची प्रतिकृती बनवली होती. मुख्य बांधकाम नवऱ्यानेच केलं. मी आणि मुलांनी जमेल तशी मदत केली. स्पर्धेत बक्षीस वगैरे नाही मिळालं. पण किल्ला बनवताना मिळालेला आनंद हेच बक्षीस!
पुण्याचे प्रसिद्ध इतिहासप्रेमी आणि दुर्गप्रेमी श्री. महेश तेंडुलकर आणि श्री. अनुराग वैद्य हे दोघे स्पर्धेचे परीक्षक होते.

स्पर्धेत पाठवण्यासाठी एक दहा मिनिटांचा व्हिडिओ बनवला होता. तो आता महाराष्ट्र मंडळाने त्यांच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलाय. ही त्याची लिंक.

https://youtu.be/2qAnnb9jfmg

व्हिडिओतल्या मजकुराचं लेखन, वाचन वगैरे आम्हीच केलं आहे.
या चॅनलवर अजून काही किल्ल्यांचे व्हिडिओही आहेत. बाकीचे ते हळूहळू अपलोड करत आहेतच. खूप छान छान किल्ले तयार केले होते सर्वांनी. एकंदरीत मजा आली. अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. ऐतिहासिक किल्ला बनवायचा असल्यामुळे नीट नकाशा वगैरे आखून किल्ला बांधला. शक्य तितका खऱ्या किल्ल्यासारखा बनवण्याचा प्रयत्न केला.

IMG-20201109-WA0007.jpg

धन्यवाद अन्जूताई आणि मनीम्याऊ.. व्हिडिओही नक्की पहा. तिथले बाकीचे व्हिडिओही सुंदर आहेत. विशेषतः प्रथम क्रमांक मिळालेला चितोडगडाचा व्हिडिओ फारच छान आहे. खूप बारकाईने अभ्यास करून किल्ला केलाय त्यांनी. कलाकार मंडळी आहेत.

Pages