मैत्रीण आणि प्रेम

Submitted by Happyanand on 11 November, 2020 - 13:17

आठवणींच्या कपाटात तुझी प्रत्येक आठवण
मी फार जपून ठेवलीय
तु नाहीस च रमली माझ्यात कधी पण माझी मात्र
प्रत्येक आठवण तुझ्यापासून च बनलीय..
आज ही डोळे मिटताच तुझी तस्वीर रुंजी घालू लागते
आवाज पडतात तुझे कानी नी आठवण च संवाद साधू लागते..
आठवत आहेत मला ती मोग्ऱ्याची फुले ज्याचा गंध तु श्वासात भरून घेतला होता
आयुष्यात पहिल्यांदा च माझ्या मनात खोल कुठतरी प्रेमाचा वणवा पेटला होता..
माझ्या या प्रेमाला तू किती छान पण मैत्री च नाव दिलेस
नाकारले नाहीच तू माझ्या प्रेमाला फक्त प्रियकरा ऐवजी मित्र केलेस ..
माझ्या या एकतर्फी प्रेमाला ही तू कधी ढासळू दिले नाही
हसवलं प्रत्येक क्षणाला तू कधी रडु दिलं नाही..
तुझ्या मुळे च सखे मैत्रीच्या कुंपणात राहुन ही मला प्रेम करता आलं
शब्दा शब्दांमध्ये कोरून तुझ्या प्रत्येक आठवणी ला
मला कवितेत सजवता आलं
आज ही कोणी प्रेम म्हणले की तुझी च तस्वीर डोळ्यांसमोर येते
माझ्या आठवणींच्या डायरी मध्ये तुझी मैत्री साद घालत राहते..
तुझे अव्यक्त राहणे ही खूप काही व्यक्त करून गेले
मैत्री ही प्रेमाची नवी व्याख्या मला सांगून गेले..
आज ही रात्री त्या आकाशात ती शुक्राची चांदणी एकटक पाहत राहतो
होईल कधी पुन्हा गाठभेट त्या गोड मैत्रिणी ची याची वाट पाहत राहतो..

...–Anand Anil Kamble

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users