प्रचलित हिंदी शब्द व रचना आणि त्यांना मराठी उपलब्ध पर्यायी मराठी शब्द व रचना.

Submitted by मिरिंडा on 5 November, 2020 - 09:03

हिंदी. मराठी
--------. -----------
१). सतर्क १) जागरुक
२). हट्टी जिद्दी दाग. २) चिवट डाग
(न जाणारे )
३) सुरक्षा. ३) सुरक्षितता
४). गरम. ४) कढत,ऊष्ण ऊन
५). थंड. ५) गार,
६). थंड होते. ६) निवणे
७). बिनधास. ७) निर्धास्त
८). खूप सार. ८) खूप, बरंच
९). उलगडवून. ९) उलगडून
१०) परतवून (तेलावर). १०) परतून
(तेलावर)
११). पलटल्याने. ११)उलटल्याने
( मूळ शब्द:पलटना). मूळशब्द: उलटणे
बाजी पलटना बाजू उलटणे
------. ---------

१२) मिटवणे (मूळ हिंदी १२) खोडणे,हरताळ
शब्द: मिटाना त्याचे फासणे ( पूर्वीलिहीलेले
मराठीकरण ). खोडण्यासाठी हरताळ
नावाच्या वनस्पतीचा
वापर करीत) नाहीसं
करणे,

१३) सर्वदूर (मूळ हिंदी. १३) सगळीकडे
शब्द: सबदूर त्यांचे
मराठीकरण)

१४)तसंही (मूळ हिंदी. १४) नाहीतरी
शब्द: (वैसेभी चे
मराठीकरण)

१५) दाग सोडत नाही १५) डाग राहातं नाही
(मूळ हिंदी रचना :
दाग छोडता नही चे
मराठीकरण)

१६) आत्मसम्मान. १६) स्वभिमान

१७) बाबा कुठे राहिले १७) "बाबा कुठे गेले ( " बाबा कहॉं किंवा बाबा कुठे
गये ?". आहेत "
(मूळ हिंदी रचनेचे भाषांतर).

१८) "तू तिथे जाणार नाहीस ". १८) " तू तिथे जाऊ नकोस
( इथे विकल्प ऑप्शन इथे थेट आज्ञा आहे.
विकल्प
आहे, म्हणजे कदाचित. म्हणजे ऑप्शन नाही.
जाशीलही.

ही यादी पूर्ण करण्याचं काम चालू आहे. किती शब्द व रचना मिळतील , माहित नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ग्रामीण भाग सोडला तर बरीच लोक बोकड/बोकड्याऐवजी बकरा शब्द वापरतात . तसेच बोकड हा शब्द पण मराठी नसून बहुतेक यवनांकडून आला आहे. फारसी/उर्दू ?

Sparkle
मी चुकून उलटं लिहिले आहे. Happy
मला मदत करा बरोबर आहे , माझी मदत करा नाही.

जिद्दू , फारसी मधून अनेक शब्द मराठीत आले आहेत.
कोणी असे म्हणेल की फारसी आणि मराठी भाषेत जमीन अस्मानाचा फरक आहे. तर त्याला म्हणावे हो बरोबर पण ह्या वाक्यातले जमीन, अस्मान आणि फरक हे तिन्ही शब्द फारसी मधूनच आलेले आहेत. हे माझे आवडते वाक्य आहे म्हटले तरी चालेल Happy

मराठीत इतर भाषेसारखी शब्दरचना खटकू शकते हे ठीक पण इतर भाषेतले शब्द घेतले जातीलच / जातातच.

छान धागा. इतर कुणालाही असं हिंदकळलेलं मराठी खटकतंय हे बघून जीवात जीव आला. नाहीतर इथे मायबोलीवरही सर्रास वाचायला मिळतं.
अस्मिता, तुम्ही जे ‘मी बोल्लो/बोललो‘ पॉईंट आउट केलंत ते ही बोकाळलं आहे.
फा, ‘सोबत’ चं खरंच काहीतरी करायला हवं. प्रत्येक वेळेला सोबत वाचलं की माझ्या पोटात ढवळतं.
मराठीत नावापुढे ‘जी’ लावणं ही एक तसंच.

सायो , मी तर एक बाबा चिरंजीवांना गाणं बोल , गाणं बोल म्हणताना ऐकलयं.
गाणं म्हणं किंवा गाणं गा ..... नाही.

छान धागा. इतर कुणालाही असं हिंदकळलेलं मराठी खटकतंय हे बघून जीवात जीव आला. +1

मी ही ऐकलं आहे. खूप खटकतं कानाला.
कुणी महाराष्ट्राची हास्यजत्रा पहात असल्यास त्यांचे बरेचसे उच्चार कानाला खटकतात (निदान माझ्या). तसंच युट्युबवर त्यांच्या एपिसोड्सच्या लिंक्सवरही असंच चुकीचं मराठी लिहिलेलं असतं (विशाखाची समीरला मदत वगैरे)

हर्पेन, बरोबर Happy
उलटी हा शब्दही मराठी-हिंदीत दोन्हीकडे वापरला जातो. अस्सल मराठी शब्द काय असेल? वमन हा संस्कृत शब्द आहे. आमच्याकडे वांती हा शब्द वापरला जातो जो मी बऱ्याच दाक्षिणात्य लोकांकडून/सिनेमात ऐकला आहे.

मायबोलीवर एक समिती करून प्रत्येक शब्दाचे प्रमाणिकरण केले तर?
पहिला शब्द 'मदत'

नंतर आपण हेच शब्द लिहू.

बोलणे हा शब्द वद वरून आला असावा. जुन्या मराठीत तो खूपच प्रचलित आहे. उदा. हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला.
बोला अमृत बोला. ' बोला, काय घेतां? ' बोल बाई बोल ग, तुझ्या बोलांचे काय वानू मोल ग' ' बोलू ऐसे बोल ' ' बोलावा विठ्ठल' वगैरे.
त्या मानाने म्हण शब्द जुन्या मराठीत कमी सापडतो. मात्र लीळा चरित्रात ' भणितले ' हा शब्द अनेक वेळा येतो . तो अर्थात भण ह्या धातूवरून आला आहे. मुद्दा इतकाच की बोला, बोलली, बोललो हे अशुद्ध नाही. म्हणणे, बोलणे, सांगणे हे किंचित भिन्न अर्थ छटा असलेले शब्द आहेत. पण चालतंय की!

अनेक उदाहरणे आठवू लागली. ध्रुव बोले पाहीन पिता माझा, येरू बोले मारील राजभाजा.' ' कुणाची श्रद्धा भंगेल, ऐसे न बोलावे बोल' मात्र हे सर्व पद्यात आहे. गद्य लेखनाची प्रथा मराठीत तशी उशीराच सुरू झाली - लीळाचरित्र अपवाद. गद्यात मात्र म्हण जास्त दिसते.

<<मुद्दा इतकाच की बोला, बोलली, बोललो हे अशुद्ध नाही. म्हणणे, बोलणे, सांगणे हे किंचित भिन्न अर्थ छटा असलेले शब्द आहेत. पण चालतंय की!
Submitted by हीरा >>
+100

माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके

हे बोलला / बोलली.... म्हणला/ सांगितलं हे थोडं प्रांतानुसार होत असावं. म्हणजे घाटावर जास्त करून म्हणला,सांगितलं असं म्हणतात. हेच घाटाखालच्या प्रांतात तो बोलला / बोलली असं .

आजकाल तुम्ही प्रत्यवाय म्हणालात तर लोक विचारतील प्रत्यएक्स आणि प्रत्यझेड कुठे आहेत
बरोबर इथेच मायबोली म्हणजे माझी बोली वाचुन फेफरं आल होत.

तसेच वान मान प्रत्ययांबाबतही थोडा गोंधळ असतो. प्रत्यय लागणाऱ्या शब्दाच्या शेवटी जर अ किंवा आ हा स्वर असेल तर त्या शब्दाला वान, वंत हे प्रत्यय लागतात. जसे यशवंत, गुणवान गुणवंत, दयावान, धैर्यवान वगैरे. पण जर शब्दांती इ, ई, उ, ऊ, असेल तर मान, मंत प्रत्यय लागतात. शक्तिमान, बुद्धिमान, नीतिमान हनूमान श्रीमान, श्रीमंत वगैरे. " स यशोवान भवति, स मेधावान भवति " वगैरे.

इतर कुणालाही असं हिंदकळलेलं मराठी खटकतंय हे बघून जीवात जीव आला > +१
टीव्हीवर बातम्या किंवा इतर कार्यक्रमातले मराठी मराठी सारखे वाटतच नाही, वाक्यरचना काहीतरी चमत्कारिक असते. वर आणि वेगवेगळ्या accent चीही वाट लावतात.
हे ऐकून ऐकून माझे मराठीपण हल्ली त्या दिशेने जाऊ लागले आहे, क्चचित एखादेवेळी त्याची मदत कर असे स्वतःच बोलल्याने / म्हटल्याने भयंकर चिडचिड झाली.

मी ऐकेल/करेल/बोलेल वगैरे चुकीचं आहे हे अनेकांना पटत नाही. सांगितलं तर "ही काय येडी आहे" असं बघतात.
मी करेन (करीन). ती/तो करेल. कर्त्याप्रमाणे क्रियापद चालतं.

इथे मला अपरिहार्यपणे "खरं सांगू का तुम्हाला? आमच्या घरात कर्त्याप्रमाणे काहीच चालत नाही, मग आमच्या मुलांनी क्रियापदं तरी का चालवावीत!" हे आठवलं.

ते व्यस्त सुद्धा इतके बोकाळले आहे, की मराठीत आजकाल कोणी व्यस्त च्या ऐवजी व्यग्र वापरले तर माझा आदर द्विगुणित होतो त्या लेखका/लेखिकेबद्दल Happy संख्या व्यस्त असतात, माणसे नव्हेत.

तसेच ती "व्यंजने" व्याकरणातून स्वयंपाकात कधी शिरली? ते ही हिंदीमुळेच असावे.

या सर्वांना "शिक्षे"ची गरज आहे Wink

म्हणजे “मी कामात व्यस्त आहे“ हे म्हणणे चूकीचे आहे तर ..व्यग्र हा शब्द फार क्वचितच वाचल्याचं आठवतंय.. अज्ञान दूर होतंय माझं Happy

मराठीत फारसीमधून आलेले खालचे शब्द बघा. मावशीच ती मराठीची. प्रोटो इंडो इराणीयन लँग्वेजच्या इंडो आर्यन (संस्कृत आणि संस्कृतोदभव भाषा) आणि इरानीयन ह्या पोट शाखा. त्यामुळे संस्कृत, मराठी, हिंदी आणि फारसी मध्ये बरेच साम्य आहे. संस्कृतातला 'स' अवेस्ता (मदर) फार्सीमध्ये 'ह' असतो बरेचदा जसे की हप्ताह =सप्ताह, हासुर = असुर.

उस्ताद/ओस्ताद = वस्ताद
फकत= फक्त
दुकान= दुकान
गुलदस्ते= गुलदस्ता
येक= एक
दू= दोन
चहार= चार
केरमीज= किरमिजी
निमा= निम्मा/ अर्धा
बारान/बारोन= वरुण
मन= मण (माप भिन्न) पर्शियन मध्ये 3 किलो मराठीत 40 किलो बहुदा
पुरशिस= पुरशिस ( वकिलांना माहीत आहे हा शब्द)
तसविर= तसबीर
रंग= रंग
बाजूबंद=बाजूबंद
पाबंदी= पाबंदी
तफावत= तफावत
फर्क= फरक
बॅर्फ= बर्फ
बाकी= बाकी
करारदार= करार
रुजनामे (न्यूजपेपर) = रोजनामा
बाकचा= बगीचा
कानून= कानू
शएर= शहर
खुचाक= खुजा/ (small)
महम/मोहम= अहम (important)
हमसोबात= सोबत
खानदान= खानदान
दारू =(दवा) दारू
ऍत्र= अत्तर
हौज= हौद
नो= नऊ
दाह= दहा
पांज- पाच , पंजाब - पाच (नद्यांचे) आब (पाणी)
तिषने = तृष्णा

अजून बरेच आहेत , देईन इथे थोडे थोडे.

जे रोजच्या वापरातले इंग्रजी शब्द तोंडात बसले आहेत त्याला पर्यायी मराठी शब्द वापरायचा आटापिटा करावासा वाटत नाही. मागच्या पानावर आलेला ‘टॉवेल’ हा एक शब्द. तसंच वर फा म्हणाला तो व्यग्र शब्द. सहजपणे तोंडात बिझी हा शब्दच येतो.
हल्ली खूप जणं रेसिपी लिहिताना वगैरे ‘खूप सारं/सारी’ (कोथिंबीर, मिरची वगैरे) वापरतात. हा ही हिंदीतूनच आलेला शब्द असावा.

लंपन - बारान इण्टरेस्टिंग आहे. माजिद माजिदीचा 'बरान' हा इराणी चित्रपट पाहिल्यावर अर्थ शोधला होता तर तो "पाऊस" निघाला होता. वरूण शब्द मूळ असावा आणि इथे उलट्या दिशेने प्रवास झाला असेल.

दुकान दोन्हीकडे सेम आहे, पण हिंदीत "दूकान" असे लिहीतात बहुधा, आणि स्त्रीलिंगी आहे.

बाकी संख्या फारसीतूनच आल्या याला काही आधार आहे का? संस्कृतातूनही आलेल्या असू शकतात.

फारएन्ड, आमचा इराणी मास्तर संस्कृत ही मदर पर्शियन (अ वेस्ता) नन्तरची भाषा आहे असे सांगतो. जी आजची पर्शियन आहे तिची आई पेहलवी भाषा आणि पेहलवी आणि संस्कृत ह्या दोघी बहिणी बहिणी. पण अवेस्ता पर्शियन ही पेहलवीची आजी त्यामुळे मदर पर्शियन ही संस्कृतहून जुनी असू शकते. गुगल बाबा पण हेच सांगतो.

पर्शियनची लिपी अरेबिक आहे त्यामुळे दीर्घ र्हस्व नाही.

अजून एक आपल्या जिव्हाळ्याचा शब्द पेशवा. पिशवा = लीडर , वन हु लीड्स.

पिशचा अजून एक अर्थ फ्रंट / पुढचा असाही आहे जसे की पिशाब = पिश + आब (पाणी) = पेशाब [यहा पेशाब करना मना है | तो वाला पेशाब Happy ]

पेहलवी आणि संस्कृत ह्या दोघी बहिणी बहिणी. पण अवेस्ता पर्शियन ही पेहलवीची आजी त्यामुळे मदर पर्शियन ही संस्कृतहून जुनी असू शकते. >>> इण्टरेस्टिंग. थॅन्क्स Happy

पाजी शब्द नक्की उत्तरेतून आला का आणि त्याचा अर्थ मराठीत इतका बदलायचे कारण काय होते हा ही एक संशोधनाचा विषय आहे Wink

"आजकाल तुम्ही प्रत्यवाय म्हणालात तर लोक विचारतील प्रत्यएक्स आणि प्रत्यझेड कुठे आहेत?" - Rofl

"संख्या व्यस्त असतात, माणसे नव्हेत." - बरोबर फा! गणितात होतं व्यस्त प्रमाण (inversely proportional), सम प्रमाण (directly proportional).

फेरफटका
आपलं म्हणणं खरं आहे. परंतू अशा शब्दांनी आता मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यामुळे आपल्या भाषेतले मूळ शब्द वापरण्याची गरज भासते. अन्यथा 75 %0हिंदी आणि 25%मराठी अशी अवस्था होईल. म्हणून हा छोटासा प्रयत्न. यामुळे एकदम हिंदी शब्द काढून टाकले जातील असं होणार नाही. पण आपले शब्द लुप्त होऊ नयेत याची काळजी सगळ्यांनीच घ्यायला हवी असं वाटतं. माझं मत पटलंच पाहिजे असं नाही.

प्रज्ञा 9
तांदुळ वयरणे/वैरणे म्हणतात. वयरणे हा शब्द तर लुप्तच झाला. कदाचित खेडोपाडी वापरला जात असेल. "आधण "माझ्या लहानपणी हा शब्द होता. म्हणजे उकळी नाही. तर द्रवपदार्थाला उकळी येण्याआधी थोडी वाफ आणि बरेचसे बुडबुडे येतात त्या अवस्थेला "आधण" म्हणतात. स्पष्ट करायचा प्रयत्न केला आहे. चूक झाल्यास क्षमस्व.

एक विनंती,
कृपया विषयाच्या अनुषंगाने लिहावे. सध्यातरी मी असे शब्द व रचना शोधतोय की ज्या मूळ हिंदी आहेत आणि त्याला मराठीत शब्द व रचना उपलब्ध (अस्तित्त्वात) आहेत. ते लुप्त होऊ नयेत ही इच्छा. तसे " लंपन , प्रज्ञा ९ " इत्यादींनी लिहीलेलं ज्ञानात भर टाकणारे आहे. तो विषय " मराठीत बाहेरुन आलेले शब्द " असा वेगळा लेख लिहिता येईल. कृपया राग मानू नये ही विनंती. ही यादी जेवढी मोठी होईल तेवढी चांगली. ंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंं

. ंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंं

वर कोणीतरी लिहिलंय तस मला बोलले ,करेल वगैरे प्रकरण खटकतं. आक्षेप घेतला की बोलीभाषा आहे असं सांगून गप्प बसवतात. चालायचंच

Pages