प्रचलित हिंदी शब्द व रचना आणि त्यांना मराठी उपलब्ध पर्यायी मराठी शब्द व रचना.

Submitted by मिरिंडा on 5 November, 2020 - 09:03

हिंदी. मराठी
--------. -----------
१). सतर्क १) जागरुक
२). हट्टी जिद्दी दाग. २) चिवट डाग
(न जाणारे )
३) सुरक्षा. ३) सुरक्षितता
४). गरम. ४) कढत,ऊष्ण ऊन
५). थंड. ५) गार,
६). थंड होते. ६) निवणे
७). बिनधास. ७) निर्धास्त
८). खूप सार. ८) खूप, बरंच
९). उलगडवून. ९) उलगडून
१०) परतवून (तेलावर). १०) परतून
(तेलावर)
११). पलटल्याने. ११)उलटल्याने
( मूळ शब्द:पलटना). मूळशब्द: उलटणे
बाजी पलटना बाजू उलटणे
------. ---------

१२) मिटवणे (मूळ हिंदी १२) खोडणे,हरताळ
शब्द: मिटाना त्याचे फासणे ( पूर्वीलिहीलेले
मराठीकरण ). खोडण्यासाठी हरताळ
नावाच्या वनस्पतीचा
वापर करीत) नाहीसं
करणे,

१३) सर्वदूर (मूळ हिंदी. १३) सगळीकडे
शब्द: सबदूर त्यांचे
मराठीकरण)

१४)तसंही (मूळ हिंदी. १४) नाहीतरी
शब्द: (वैसेभी चे
मराठीकरण)

१५) दाग सोडत नाही १५) डाग राहातं नाही
(मूळ हिंदी रचना :
दाग छोडता नही चे
मराठीकरण)

१६) आत्मसम्मान. १६) स्वभिमान

१७) बाबा कुठे राहिले १७) "बाबा कुठे गेले ( " बाबा कहॉं किंवा बाबा कुठे
गये ?". आहेत "
(मूळ हिंदी रचनेचे भाषांतर).

१८) "तू तिथे जाणार नाहीस ". १८) " तू तिथे जाऊ नकोस
( इथे विकल्प ऑप्शन इथे थेट आज्ञा आहे.
विकल्प
आहे, म्हणजे कदाचित. म्हणजे ऑप्शन नाही.
जाशीलही.

ही यादी पूर्ण करण्याचं काम चालू आहे. किती शब्द व रचना मिळतील , माहित नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खोडण्यासाठी हरताळ
नावाच्या वनस्पतीचा
वापर करीत>>>

हरताळ एक पिवळ्या रंगाची पावडर मिळायची. ती फासली तरी लिहिलेलं दिसायचं पण तरी ते खोडले आहे असा मानायची पद्धत होती. हि पावडर एक प्रकारची माती होती. वनस्पती पासून बनावत नव्हते.

नताशाजी
गरम गर्मचा अपभ्रंश किंवा मराठीकरण. तसंच थंड हे ठंड, अथवा ठंडाचे मराठीकरण आहे. निर्धास्त हा शब्द मागे टाकून बिनधास्त हा शब्द घुसवला आहे .

चिडकू
आपलं म्हणणं बरोबर आहे. सदर टंकलेखन नीट झालं नाही किंवा मला करता आलं नाही त्याबद्दल दिलगीर आहे.

आशुचॅंप
"रुसवे फुगवे" अगदी बरोबर. मला एक नवीन शब्द मिळाला आभारी आहे.

नमकीन ( salty) ला मराठी शब्द काय... खारट म्हणजे खूप जास्त मिठ..पण हा अमुक पदार्थ नमकीन आहे..हे कस म्हणणार?

मेरी मदद करो... माझी मदत करा... ऐवजी मला मदत करा अशात टिव्हीवर वापरतात.

मैने हां बोला ... मी हो बोल्लो , हे मी हो म्हणालो हवं.
बोललोचा सुळसुळाट झालायं. हे विचारले, सांगितले, म्हणाले/म्हटले/संबोधले या सगळ्याची जागा घेते आहे.
'बोल्लो/बोलले' चूक की बरोबर माहिती नाही पण ऐकायला 'म्हणालो/म्हणाले' चांगले वाटते.

एखादी वस्तू दुकानात नाही मिळाली तर
नही मिली वो , तर मराठीत नाही भेटली ...
वस्तू मिळते व्यक्ती भेटते... पण बरेचदा लोक दोन्हीलाही नाही भेटली असंच म्हणतात. कारण हिंदीत दोन्हीलाही 'मिलना' हेच क्रियापद वापरतात.
हे माझे अंदाज आहेत. Happy

3. सुरक्षा - सुरक्षितता बरोबर वाटत नाही. संरक्षण पाहिजे.

शिवाय खालील हिंदी-मराठी जोड्या पहाव्या:
- क्रूरता - क्रौर्य
- शक्तिमान - शक्तिवान
- सुंदरता - सौंदर्य
- महानता - महत्त्व
- गर्व - अभिमान

हेमंत
हिंदी आणि हिंदी माणसं डोक्यावर बसल्याने हा विचार करावा लागतोय. नाहीतर काही वर्षांनी हेच हिंदी लोक आपल्याला मराठी शिकतील. अभिप्रायाबद्दल आभार.

श्री हरचंद पालव
आपण दिलेले मराठी प्रतिशब्द बरोबर आहेत. आपण यादीत भर टाकल्याबद्दल आभारी आहे.

अस्मिता
आपण लिहिलेले बरोबर ंंआहे. बोलणे हे क्रियापद म्हणणे या अर्थाने वापरता येत नाही. मिलना या अर्थी भेटणे वापरणं चूक नाही. पण मराठीत व्यक्ति आणि वस्तू यात फरक केला जातो. आपण यादीत भर टाकल्याबद्दल आभारी आहे.

मला मानसिकता शब्दही हिंदी वाटतो. मनोवृत्ती बरोबर वाटतो. पहिल्यांदा मायबोलीवरच पाहिला , त्या आधी कधीही वापरला/पाहिला नव्हता. आता सगळीकडे दिसतो. पण शंका आहे.
कुणी खात्री करून सांगता का ?

हरचंद पालव यांच्या 'ता'कारान्त शब्दांमुळे आठवले.
गोडचे पण काही तरी
गोंडस , गोजिरवाणे कुणीही फारसं वापरत नाही.
मिठाई पण गोड , मुलं पण गोड.... गोडवा वागण्यासाठी वापरावा , दिसण्यासाठी गोंडस , गोजिरे आहे की....

जाड , बारीकचं पण लठ्ठ/रोड/सडपातळ कुणीही वापरतं नाही...निदान सगळे शब्द वापरा विसरणार तरी नाही. एक मराठी मैत्रिण 'रोड' म्हणजे काय म्हणाली Sad , रवा जाड /बारीक तसं वाटतं मला , Happy
भारी शब्द ? सुरेख , उत्तम , छान
भारीची वस्तू म्हणजे महाग एवढेच माहिती होते.
कसलं भारीये हे.... कंटाळा आला याचा.

अजून एक 'वाला' हा शब्द नको तिथे येतो. "तो लालवाला दाखवा" - इथे "तो लाल रंगाचा दाखवा" पाहिजे.
"ह्या दोन रंगांच्या साड्या आहेत? कुठली आवडली?" "निळीवाली" - इथे नुसतं "निळी" म्हणायला पाहिजे. तो सुग्रीवचा भाऊ कशाला मध्येच?

शिवाय "जसं की .." ने सुरू होणार्‍या वाक्यात 'की' नको. नुसतं 'जसं' पुरेसं आहे.

चांगला धागा आहे.

कोणीतरी त्या "सोबत" चे काहीतरी करा. ती माझ्यासोबत असे का वागते छाप भीषण मराठी आजकाल ऐकू येते. इथे एवढा चांगला "शी" असताना "मेरे साथ" चे "माझ्यासोबत" असे करायची काय गरज आहे माहीत नाही Happy

मला तर अनेकदा वाटते की असला वापर कोठे स्थानिक भाषा वगैरे नसून बरेच लोक ते "कूल" वाटते म्हणून करतात.

याचा हिंदीशी संबंध नसावा, पण "घट्ट मैत्रीण"चेही काही करायला हवे.
पिठले घट्ट, कपडे घट्ट, कडी घट्ट, मैत्रीण पण?
खूप जवळची, जिवलग, जिवश्च-कंठश्च, जिवाभावाची हे पुरेसे नाहीत का...

@ मिरिंडा
भाषेप्रती कळकळ जाणवली. मलाही मराठी वाचताना , ऐकताना पदोपदी हिंदी भाषेच्या ठेचा लागतात. हिंदीशी काही वैर नाही पण अनाठायी वापर नकोसा वाटतो. माझी भर -
मनाच्या जवळ ( दिल के पास) ?!!
माझी फार आवडती व्यक्ती / आवडते गाणे / आवडता सण असं म्हणू शकतो आणि ते सहज सोपं वाटतं.
थोपवणे हाही शब्द चुकीच्या प्रकारे वापरला जातो. मराठीत थोपवणे म्हणजे थांबवणे / रोखणे. त्याऐवजी तो (एखादी गोष्ट बळजबरीने वा सक्तीने) लादणे या शब्दाला प्रतिशब्द म्हणून वापरलेला दिसतो.
सजग - सावध ( मराठी पर्याय)

आज/कालच्या लोकसत्तानं दिलीप वेंगसरकर हे ‘स्वतः चीफ सिलेक्टर राहिले’ असल्याची बातमी दिली होती. त्याच बातमीत पुढे रोहित शर्माला विश्रांती ‘करण्याचा’ सल्ला दिला असल्याचा पण उल्लेख होता.

लोकं कामात ‘व्यग्र’ असण्याऐवजी ‘व्यस्त’ (inverse) असतात. Happy

२.टॉवेल,तौलिया= मराठी शब्द? >> पंचा

हे वैतागवाणे शब्दप्रयोग जाहिराती, सूचना मराठीतून ऐकायला मिळतात तेव्हा सर्वात जास्त ऐकू येतात. बाकी चुकीची भाषा ही "कूल" भासवण्याच्या प्रयत्नातून तयार होत जाते बहुतेक.
असामी असामी मधली दोन्हीची उदाहरणे पटकन आठवली (शब्द जरा इकडे तिकडे झाले असतील)
१. आमच्यावेळी पालक ही फक्त एक भाजी होती. (आता पालक हा शब्द चांगलाच रूळलाय.)
२. कडक याचा अर्थ बदलत जाऊन चांगला असा झाला आहे हे माझ्या लक्षात आलं! (त्यावेळी कडक वापरणं कूल असेल आता त्यालाच भारी म्हणतात!)
छान धागा आहे! आवडला. सर्व प्रतिसाद पण छान आहेत. माझ्याकडून जमेल तशी भर घालेन.

बनवाबनवी. आजकाल काहीही 'बनवतात'. पोळ्या लाटून भाजतात किंवा नुसत्याच 'करतात'. कुकर लावतात किंवा आधणात तांदूळ वैरतात. भाजी करतात, चटणी वाटतात. अगदीच प्रत्येक वेळी वेगळं क्रियापद वापरलं नाही तरी 'स्वयंपाक करतात'. बनवाबनवी म्हणजे फक्त फसवणूक. "आज काय बनवलं आहे?" हा अगदीच चुकीचा प्रश्न आहे.

"भावणे" हे क्रियापद देखील मला हिंदी भाषेतून उचललेले वाटते. आणि मराठी साहित्यिक व कलाकारांनी याला अधिक वापरलेले पाहिले.
तसेच दुसरा शब्द म्हणजे 'योगदान'

छान धागा.. लवकरच माझं मराठी सुधारणार असं वाटतंय Happy
बाय द वे ‘साजण/साजणा‘ पण हिंदी भाषेतूनच उचललेले असावे.

सुरेख धागा!

बाय द वे ‘साजण/साजणा‘ पण हिंदी भाषेतूनच उचललेले असावे. >> राया म्हणा...हाकानाहा Lol

प्रज्ञा + 1111

मेरी मदद करो... माझी मदत करा... ऐवजी मला मदत करा अशात टिव्हीवर वापरतात.
अस्मिता, म्हणजे मला मदत करा चुकीचं आहे का?
याला/त्याला/त्यांना मदत कर असे बऱ्याचदा ऐकण्यात येते.
मदत देणे चा योग्य वापर कसा आहे?

जे शब्द हिंदी किंवा इतर कुठल्याही भाषेतून येऊन मराठीत रुजले आहेत, ते वापरायला हरकत नसावी. कारण मराठीसुद्धा कुठेतरी उगम पावलेली भाषा आहे. पण प्रश्न आहे तो भेसळीचा. जिथे हिंदी/इंग्रजी/अन्य कुठल्या भाषेतली वाक्य / शब्द संदर्भ सोडून भाषांतरित होतात. नाहीतर ह्या वाक्यात सुद्धा मला ‘हरकत’ ऐवजी ‘प्रत्यवाय’ शब्द वापरावा लागेल. Happy

फेफ, जबरी! आजकाल तुम्ही प्रत्यवाय म्हणालात तर लोक विचारतील प्रत्यएक्स आणि प्रत्यझेड कुठे आहेत?

Pages