Submitted by Santosh zond on 2 November, 2020 - 21:09
खरं म्हणायचे बाबा मला
दीवस असाही एक येईल
आवडतं घरटं सोडुन माझं
पाखरू दुसर्या गावी जाईल
शांत जळणारा दिवा तेव्हा
तेल असुन जळणार नाही
पाखराचा निशब्द बाप जेव्हा
पंख असुन उडणार नाही
हात तुझा हातातुन माझ्या
लहानपणी कधी सुटला नाही
जायचं तुला ठरलेल ऐकलं
आवाज गोड वाटला नाही
असलीस कीतीही दुर तु
भासते मला नेहमी जवळ
शब्द तुझे ते लडखडणारे
मी कधीही विसरणार नाही
हळुच शांत नकळत येणारी
बाब बाबा म्हणत हात धरणारी
सावली माझ्या लाडक्या परीची
जाऊन सुद्धा ह्रदयातुन जाणार नाही
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा