हॅपी हेलोवीन डे - कसा साजरा करतात?

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 October, 2020 - 13:10

वॅलेण्टाईन डे पाठोपाठ आता हॅलोवीन डे ने भारतातील मुंबई पुणे अश्या प्रमुख शहरात शिरकाव केला आहे.
आजवर फक्त अमेरीकेतल्या वा तिथून रिटर्न आलेल्या फेसबूक मित्रांच्याच वॉलवर हेलोवीन साजरा केल्याचे फोटो बघत होतो. पण आता त्याने मुलीच्या शाळेद्वारे आमच्या घरातही प्रवेश केला आहे. कालच मुलीच्या शाळेत ऑनलाईन हॅलोवीन डे साजरा झाला. म्हणजे फार काही नाही तर भूताच्या वेशभूषेची स्पर्धा झाली. आता तिला जेव्हा समजले की खरा हॅलोवीन डे तर ३१ ऑक्टोबरला आहे तर तिला ख्रिसमस प्रमाणेच आता हे देखील सेलिब्रेट करायचे आहे.

हल्ली तर शिवसेनेनेही वॅलेंटाईन डे ला विरोध करणे सोडले आहे. तर हॅलोवीन डे सुद्धा भारतात भरभर रुजायला हरकत नाही. त्यामुळे आपण आपल्या घरी जमेल तसे सुरुवात करायला हरकत नाही असे वाटते. पण नेमके करायचे काय हे माहीत नाही. फोटोतून सारे कळत नाही. तर हा काय काय करत साजरा करता येतो याची माहिती मिळाल्यास आवडेल. धागा आयत्यावेळी काढला आहे याची कल्पना आहे. कारण गरजही तशीच आयत्यावेळी निर्माण झालीय. मात्र जितकी माहिती मिळेल, जितके अनुभव येतील तितके चांगलेच. माहितीचा फायदा येत्या वर्षांमध्येही होईल.

धन्यवाद ऋन्मेष Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हॅलोविन हा सण म्हणण्यापेक्षा परंपरा म्हणता येईल. हा अगदी पूर्णपणे ख्रिस्ती सण नाही. इस्टर किंवा क्रिसमस हे पूर्णपणे ख्रिस्ती म्हणता येतील.. हा आता इथल्या संस्कृतीत हॅलोवीन अगदी मिसळून गेले आहे. लहान मुलांना कँडी गोळा करणे, ड्रेस अप होऊन जाणे ह्या लहानपणच्या आठवणी कायम लक्षात राहतात. आपल्यालासुद्धा लहानपणी दिवाळीत केलेला किल्ला, वाजवलेले फटाके, खाल्लेला फराळ किंवा खेळलेली होळी या आठवणी कायम येतात ना.तसेच हे पण.

तसेच भोपळे वगरे या सीझन मध्ये खूप येतात म्हणून त्यात दिवे लावणे वगैरे झाले असावे असा माझा अंदाज आहे, तसेच इथल्या शेतकऱ्यांना पण जरा encouragement. नाहीतर खायचे भोपळे तर वर्षभर असतातच.

तसे भारतीय संस्कृतीत ऑलरेडी कंदील लावणे, घरोघरी जाऊन तिळगुळ घेणे आहेत त्यामुळे हॅलोवीनची ही बाजू भारतात पॉप्युलर होणार नाही असे वाटते. पण भुते मात्र झाली !

आणि अवेअरनेस म्हणायचा तर अमेरिकन सोडा, middle ईस्टर्नस पर्शीयन्स, एशिअन्स यांना पण दिवाळी, होळी माहित असते व दिवाळी पार्टी ला तेही येतात. होळी ची रंग खेळण्याची बेसिक आयडिया हि आता इथे कॉलेजेस मध्ये पॉप्युलर आहे. मॅजिक कलर रन सारख्या मॅरेथॉन हि होतात ज्यात होळी सारखे रंग उधळतात. कॅलिफोर्नियासारख्या विविध culture चे लोक असणाऱ्या राज्यात चिनी नवं वर्ष, ईराणी लोकांचे नवरोझ, मेक्सिकन चे सिंको द मेयो ही उत्साहाने साजरे होतात. इथले गोरे तेव्हा इतका संकुचित विचार करत नाहीत.

आरती, सामो, किल्ली, पाफा, अनु धन्यवाद Happy

हॅलोविन हा सण म्हणण्यापेक्षा परंपरा म्हणता येईल. हा अगदी पूर्णपणे ख्रिस्ती सण नाही. इस्टर किंवा क्रिसमस हे पूर्णपणे ख्रिस्ती म्हणता येतील.
>>>>>
हो, मलाही शोधाशोध करता तसेच काहीसे सापडले. ख्रिस्ती धर्म, म्हणजेच येशू बायबल यांच्याशी काही थेट कनेक्शन नाही आढळले. तिथल्या लोकसंस्कृतीतून आलेला उत्सव वाटतो. आता ती लोकं ख्रिस्तीच म्हणून याला ख्रिस्ती उत्सव वा ख्रिस्ती परंपरा नक्कीच म्हणू शकतो. . पण म्हणा, काय फरक पडतो Happy

फारसे माहीत नव्हते, भूतांचे गेटअप म्हणजे हॅलोवीन एवढेच माहीत होते. प्रतिसाद छान आहेत .
ऋ, लेक गोड दिसतीय या गेट अपमध्ये. आणि मेकअप ही मस्त केलाय लेकीच्या आईने.

धन्यवाद अन्जू, वर्णिता, देवकी… मेक अप केलाय लेकीच्या आईने आणि मावशीने…. आणि डोक्यावर ती कसलीशी दोरी घ्यायची आयड्या लेकीची स्वतःची Happy

माझा गेल्यावर्षीही या हॅलोवीनवर डोळा होता. आमच्या घरचे कल्चर पाहता सेलिब्रेट करायला एक चांगला उत्सव आहे, पण काय करायचे नेमके माहीत नव्हते. या शाळेच्या फॅन्सी ड्रेस निमित्ताने हे घरात आले, आणि आता या धाग्यावरील छान प्रतिसादांमुळे माहीतीत भर पडली जी आता पुढच्या वेळी वापरून काही करता येईल Happy

भूत मुलगा चांगला दिसतोय.टपोरे सुंदर डोळे लहान मुलाचे आहेत.
हे पात्र आहे कोण? झोम्बी की आणि काही?

हाहा, वो मैइच हुं. लहान पोरांची सॉलिड तंतरवली होती.

>>हे पात्र आहे कोण?<<
मला हि माहित नाहि. डार्क वर्ल्ड मधलं कोणितरी असावं. मी टारगेट मधनं घरी आणलं... Happy

बापरे बापरे
(सुंदर टपोरे डोळे आता कॉम्प्लिमेंट म्हणून घ्या, वहिनींना म्हणावं मूल समजून दिली हां कॉम्प्लिमेंट Happy )

बर्‍याच म्हणजे ८-१० वर्षांपूर्वी स्पॅगेटी कॉश्चुम घातला होता. नवरा म्हणाला होता बाप रे एवढी हेल्दी स्पॅघेटी Wink
.
https://lh3.googleusercontent.com/pw/ACtC-3d5jgXphlP5ZGTdQmWrNLK_8C3_SRbiWlfTrzn0ZC4Yd37iO4kv4YHdF9yl_W9fnVo6Y_vi_OtFhiGKQGW6zfzT7APbHMErOsMsTF1Ygpunrinsugn5tKxKDh4VZEl64jF7P32ikR1jSQsBr-usJoRLgQ=w1272-h847-no?authuser=0

छानेत हां लालभडक टपोरे डोळे.
स्पगेटी कॉस्च्युम का असतो हॅलोविन ला?शिवाय त्यावर लाल चेक्स का?नुसती स्पगेटी पाहिजे ना?

बर्‍याच म्हणजे ८-१० वर्षांपूर्वी स्पॅगेटी कॉश्चुम घातला होता. नवरा म्हणाला होता बाप रे एवढी हेल्दी स्पॅघेटी >> सामो ..फारच क्युट आहे स्पॅगेटी आणि आजूबाजूचे झाॅंबीज् पण भारी

सगळी भुतं भारी
म्हाळसा देवी ह्या रुपात Proud ???????????????????काय हे Light 1

आई ग्ग!!! क्या बात है. म्हाळसा थांबा मलाही धीर आला. मी एक क्लोझ अप टाकते Wink
____________
https://lh3.googleusercontent.com/pw/ACtC-3cMMaKcXaMWYSbI0JAGAyvjuwoRp98kqX1DaatvGp58QIWiD2IEXLGEEAQQG9Qk33TqUbL6mbG_h-jx5f_Rd3cALU2L0OxPRE4gbeu-z-Budj1QT68aXMVkdEgajMeKQTqo-h2VwglNIB1-XJtHB41Yyg=s880-no?authuser=0
__________
गालावरती लाल चुटुक ओठांचा केशरी मासा काढला आहे Happy रंग नीट गडद पाहीजे होते मात्र.

भारीये .. याचीच कमी होती ईथे… अजून धीर चेपत येऊ द्या एकेक .. Happy
आणि हो, भूतांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांचे प्रमाण जास्त होतेय याकडेही लक्ष असू द्या Wink

सगळ्या भुताच्या गेटअप मध्ये छान दिसतायत .

म्हणजे नक्की काय म्हणायचय तुम्हाला??????? खिक्क...... (कृ. वर्णितातै नी संबंधीतांनी ह.घ्या.)

Pages