हॅपी हेलोवीन डे - कसा साजरा करतात?

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 October, 2020 - 13:10

वॅलेण्टाईन डे पाठोपाठ आता हॅलोवीन डे ने भारतातील मुंबई पुणे अश्या प्रमुख शहरात शिरकाव केला आहे.
आजवर फक्त अमेरीकेतल्या वा तिथून रिटर्न आलेल्या फेसबूक मित्रांच्याच वॉलवर हेलोवीन साजरा केल्याचे फोटो बघत होतो. पण आता त्याने मुलीच्या शाळेद्वारे आमच्या घरातही प्रवेश केला आहे. कालच मुलीच्या शाळेत ऑनलाईन हॅलोवीन डे साजरा झाला. म्हणजे फार काही नाही तर भूताच्या वेशभूषेची स्पर्धा झाली. आता तिला जेव्हा समजले की खरा हॅलोवीन डे तर ३१ ऑक्टोबरला आहे तर तिला ख्रिसमस प्रमाणेच आता हे देखील सेलिब्रेट करायचे आहे.

हल्ली तर शिवसेनेनेही वॅलेंटाईन डे ला विरोध करणे सोडले आहे. तर हॅलोवीन डे सुद्धा भारतात भरभर रुजायला हरकत नाही. त्यामुळे आपण आपल्या घरी जमेल तसे सुरुवात करायला हरकत नाही असे वाटते. पण नेमके करायचे काय हे माहीत नाही. फोटोतून सारे कळत नाही. तर हा काय काय करत साजरा करता येतो याची माहिती मिळाल्यास आवडेल. धागा आयत्यावेळी काढला आहे याची कल्पना आहे. कारण गरजही तशीच आयत्यावेळी निर्माण झालीय. मात्र जितकी माहिती मिळेल, जितके अनुभव येतील तितके चांगलेच. माहितीचा फायदा येत्या वर्षांमध्येही होईल.

धन्यवाद ऋन्मेष Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भूते कबरी उखडुन बाहे र पडतात त्यांनी आपल्याला ओळखून काही त्रास देउ नये म्हणुन त्यांच्यासारखा वेश करुन फसवायचे असते. बाकी ट्रिक ऑर ट्रीट करत मुले फिरतात जर आपण त्यांना ट्रीट नाकारली तर दे प्ले ट्रिक ऑन अस जसे टॉयलेट पेपर आपल्या अंगणातल्या झाडांना गुंडाळणे वगैरे.
दुसर्‍या दिवशी म्हणजे १ नव्हेंबरला 'ऑल सेंटस डे' असतो. म्हणजे संतमहात्म्यांचा दिवस.

हिंदू धर्माच्या सणाना काहीतरी शास्त्रीय आधार असतो.
पण ख्रिस्त धर्मीय मध्ये अतिशय भोंगळ अंधश्रद्धा आहेत त्याच च उदाहरण म्हणजे त्यांचा हा सण.

जॅकोलँटेन करायचा. घराला घाबरवेल असं ... किंवा तुम्हाला आवडेल असं डेकोरेशन करायचं.
पोरांना फॅन्सी ड्रेस घालून शाळेत पाठवायचं. शाळेत ग्राऊंडला परेड करणार असतील तर त्यावेळात सकुसप शाळेत जाऊन मुलांचे फोटो काढायचे आणि मजा करायची. संध्याकाळी घरोघरची सजावट बघत क्यांड्या गोळा करत फिरायचं आणि आपल्या घरी येणार्‍या इतरांच्या पोरांना कँड्या द्यायच्या आणि कोण काय ड्रेसप झालंय ते ओळखायचं, त्यांच्याशी, त्यांच्या आई बापांशी काही तरी स्मॉल टॉक करायचा. जी अ‍ॅनिमेशन कॅरेक्टर ओळखता येणार नाहीत त्यांची नावं मनात नोंद करुन ठेवायची. म्हणजे टीव्ही पुढे बसलं आणि काय बघू? हा प्रश्न पडला की ते मूव्ही बघुन टाकायचे. त्यादिवशी मुलांना फारसं लिमिट न ठेवता हव्या तितक्या क्यांड्या खायला पर्मिशन द्यायची.
मग रात्री कार काढून ज्या नेबरहुडात छान डेकोरेशन केलं आहे तिकडे भटकून यायचं. वीकेंड असेल तर रात्री पोरांना झेपेल इतका डरावना पिक्चर बघायचा. थंडीचा जोर वाढलेला असतोच .. मग हॉट चॉकलेट/ अ‍ॅपल सायडर काय आवडत असेल त्याचे घुटके घेत गप्पा मारायच्या.

दुसर्‍या दिवशी न संपलेल्या क्यांड्या पोरांच्या नकळत गायब करुन हापिसात किचन मध्ये नेऊन ठेवायच्या आणि इतरांनी आणलेल्या खायला सारखी किचनची चक्कर मारायची. दहाहजार पावलांचं टार्गेट सर होतं त्यात थोड्या क्यांड्या गेल्या पोटात तर तितकं कोलॅटरल डॅमेज तर होणारच!

ऑल सेंट्स डे चा आदला दिवस आणि ३१ ऑक्टोबरला साजरा करतात. एक महिना आधीपासूनच घरोघरी यार्ड सजवायला सुरवात होते. भुतांचे पुतळे, तुटके हातपाय, मेंदू वगैरे अवयव , कबरी, मोठे spidar, उंदीर, आणि जे जे काही भीतीदायक वाटेल ते सर्व. सर्व शॉप्स ह्या वस्तूनी आणि of coarse कँडीनी सजतात. सर्व सणांसारखा हा पण प्रचंड commercialize झाला आहे.

पण तरीही लहान मुले व मोठेही एन्जॉय करतात यात काही वाद नाही. स्कूल्स मध्ये ही फॅन्सी ड्रेस असते. पण त्यानं फक्त भूत नाही तर प्रिन्सेस आणि सुपरहिरोज खूप पॉप्युलर आहेत. १० तल्या ६ मुली तरी फ्रोझन किंवा disneyच्या त्या त्या वर्षीच्या पॉप्युलर सिनेमातले character बनून येतात. मी पूर्वी स्कूल मध्ये काम करायचे. टीचर्स हि थोडेसे सजून येतात. पण overdo करत नाहीत.

भोपळे कार्विंग करून त्यात दिवा लावायचा. जिथे असेल तिथेच मुले ट्रिकऑर ट्रीट ला येतात. तसेच आता कँडी पण देताना खूप जपून द्यावी लागते. ओपन कँडी नाही, wrapped च द्यायची, नटस वाली नाही वगैरे. यावर्षी तर कोवीड मुले खूप कमी येणारसे वाटते.
महत्वाचे म्हणजे दुसऱ्या दिवसापासून डे लाईट सेविंग स्टार्ट होते. लवकर दिवस मावळण्याची सुरवात.

खरे तर वेगवेगळ्या भोपळ्यानी घरे सजवणे हे खूप सुंदर दिसते, किंवा pumpkin patch ला मुलांना नेणे म्हणजे एखाद्या जत्रेला नेण्यासारखे असते. लहानपणी आईवडिलांबरोबर केलेल्या ह्या activities आयुष्यभर मुलांच्या लक्षात राहतात.
पण आपल्याकडे हॅलोवीन म्हणजे फक्त भुते हा एकच aspect ठेवलाय, ते बरोबर नाही.

अमितव आणि आरती, छान प्रतिसाद आणि धन्यवाद... एक हॅलीवीन डे आणि नाईट डोळ्यासमोर उभी राहिली.
..

पण आपल्याकडे हॅलोवीन म्हणजे फक्त भुते हा एकच aspect ठेवलाय, ते बरोबर नाही.
>>>>>
एक्झॅक्टली ईतकेच माहीत असल्याने हा धागा...

@ सामो,
कबरीतना बाहेर येणारया भूतांना फसवायला हा गेट अप.. ईंटरेस्टींग आणि नवीन माहीती..

@ हेमंत
सणात मनोरंजन आणि निखळ आनंद शोधावे, जात धर्म मागाहून.. जर काही साजरे केल्याने पोरं एंजॉय करणार असतील, त्यांना काही अविस्मरणीय क्षण मिळणार असतील आणि ते कमीत कमी ध्वनी-जल-वायू प्रदूषणाने आणि पर्यावरणाची कमीत कमी हानी करून होणार असेल तर त्या सणाचे, सोहळ्याचे स्वागत आहे Happy

छान प्रतिसाद. यावेळेस जास्त उत्साह दिसत नाहिये. तरी आम्ही भरपूर चॉकोलेट्स आणून ठेवलीत. हा आमचा भोपळा कोरण्याचा पाहिलाच प्रयत्न. मुलाला खूप मजा आली. आम्ही थोड्या साध्या सोप्या हॅलोविन अ‍ॅक्टिव्हिटी केल्या, तेवढाच टाइमपास.
IMG-20201015-WA0165.jpg

हापिसात हॅलोवीन फोटो कॉन्टेस्ट आहे पेट्स, फॅमिलीबरोबर अर्थातच कोरलेल्या भोपळ्यांचे फोटो अपेक्षित आहेत.

अमित , आरती
कार्व्हिंग केलेल्या भोपळ्याच्य काय करतात पुढे ? कुठे उपयोगात आणला जातो की फेकून देणे/ कंपोस्ट करणे वगैरे करतात ?

कोरलेला भोपळा आठवडाभर कॅलिफोर्नियात बाहेर ठेवला तर गरम हवे मुळे उचलायला गेलं की तो पार सपाट होऊन जातो. खारी असतील तर त्यांनीही आपला वाटा उचललेला असतो. त्यामुळे कंपोस्ट.
कॅनडात दोन तीन दिवस बाहेर ठेवून मग पंपकिन पाय, घारगे, सूप करून फेकण्याचा गिल्ट कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. तरी इतका मोठा भोपळा संपणे केवळ अशक्य असते. ह्या भोपळ्याला चवही फारशी नसते.
आपल्या आणि मुलांच्या आनंदाची किंमत आहे ती.

काही लोक भोपळा वाया जाऊ नये म्हणून प्लास्टीकच्या भोपळ्याची आरास करतात. सुपर मार्केट मधे खूप छान मिळतात. भारतात मिळते की नाही माहित नाही.

खरा भोपळा आवडतो आणायला, तो ही शक्यतो जवळपासच्या शेतातून आणतो. पण ख्रिसमस ट्री अजून खरं आणलं नाहीये. ते प्लास्टिकचे वापरतो.
आवड/ सोय आपली आपली. बाकी काही नाही.

भोपळ्याची नासाडी, टोमॅटोची नासाडी, देवळांमधली दुधाची, तेलाची, हळदीची नासाडी.
तसेच food fight festival असे शोधल्यास सगळीकडेच अन्नाची किती नासाडी होते ते बघून वाईट वाटले.

कोरुन सजावट करण्यासाठी म्हणून जे भोपळे असतात ते वेगळ्या जातीचे असतात, जॅक ओ लँटर्न . पाय वगैरे खाण्याच्या पदार्थांसाठीचे भोपळे वेगळ्या जातीचे असतात, शुगर पाय. मुळातच त्यांचे गुण वेगवेगळे आणि उपयोगही.

हेच लिहिणार होते. हे भोपळे फक्त सजावटीसाठी असतात, त्यात मोठ्या मोठ्या बिया आणि इतकासा गर असतो. हे भोपळे स्टोअरमध्ये अगदी कुठेही ठेवलेले असतात. त्याला चव नसते. खायचे भोपळे वेगळे.

मला हा ऋतू Autumn/Fall , फारच आवडतो. ते भोपळे , Harvest season, pumpkin patch, घराबाहेरील सजावट करण्यात मला मुलांपेक्षा जास्त उत्साह असतो. यावर्षी बाहेर केली पण , trick or treaters ना कान्डक्या बाहेर ठेवून दुरून मजा बघणार . Take one please वाली note ठेवून.
मुलगा घूल होईल , मुलगी चेटकीण , मी चेटकीण टोपी व काळे कपडे घालून आलेल्या गोडूल्यांना कान्ड्या देते एरवी , यावेळी नाही. छोटी छोटी मुलं फारच गोड दिसतात, बाळं सुद्धा हिरवी मिरची, भोपळा, घोडा होऊन येतात. मस्त सोहळा आहे. मला आनंदी मुलं/लोकं पहायला आवडते कुणाचा सण , धर्म वगैरे काही फरक पडत नाही. आपल्याकडे तिळगुळ तसे इथे candy Happy ,बरेचदा दिवाळी आणि Halloween एकदाच येतात मगं एकीकडे दिवे एकीकडे Jack o lantern असे करतो. एकत्र धमाल एकत्र सजावट.

Pages