हॅपी हेलोवीन डे - कसा साजरा करतात?

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 October, 2020 - 13:10

वॅलेण्टाईन डे पाठोपाठ आता हॅलोवीन डे ने भारतातील मुंबई पुणे अश्या प्रमुख शहरात शिरकाव केला आहे.
आजवर फक्त अमेरीकेतल्या वा तिथून रिटर्न आलेल्या फेसबूक मित्रांच्याच वॉलवर हेलोवीन साजरा केल्याचे फोटो बघत होतो. पण आता त्याने मुलीच्या शाळेद्वारे आमच्या घरातही प्रवेश केला आहे. कालच मुलीच्या शाळेत ऑनलाईन हॅलोवीन डे साजरा झाला. म्हणजे फार काही नाही तर भूताच्या वेशभूषेची स्पर्धा झाली. आता तिला जेव्हा समजले की खरा हॅलोवीन डे तर ३१ ऑक्टोबरला आहे तर तिला ख्रिसमस प्रमाणेच आता हे देखील सेलिब्रेट करायचे आहे.

हल्ली तर शिवसेनेनेही वॅलेंटाईन डे ला विरोध करणे सोडले आहे. तर हॅलोवीन डे सुद्धा भारतात भरभर रुजायला हरकत नाही. त्यामुळे आपण आपल्या घरी जमेल तसे सुरुवात करायला हरकत नाही असे वाटते. पण नेमके करायचे काय हे माहीत नाही. फोटोतून सारे कळत नाही. तर हा काय काय करत साजरा करता येतो याची माहिती मिळाल्यास आवडेल. धागा आयत्यावेळी काढला आहे याची कल्पना आहे. कारण गरजही तशीच आयत्यावेळी निर्माण झालीय. मात्र जितकी माहिती मिळेल, जितके अनुभव येतील तितके चांगलेच. माहितीचा फायदा येत्या वर्षांमध्येही होईल.

धन्यवाद ऋन्मेष Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>खायचे भोपळे वेगळे.>>> हे माहीत नव्हते. आम्ही एकदाच भोपळ्याचे कार्व्हिंग केलेले पूर्वी. तेव्हा गर टाकून दिला होता. सासूबाई व मुलगी, तीन एक वर्षापूर्वी.
.
https://lh3.googleusercontent.com/pw/ACtC-3e2R1oVZuVvH3RQIYjjmQ5dblbA3YSBwfttaVlji_-_yhVS6P5XxuhRK4HG4v8sn_4MxVMTPoHvNBwqgCLu4hMcf4RrY8Ocz-YCCSSXj5K-ykxzX1LKCMLf84qux5MFSKWpv_uVBcjxOv_Uy21B7k4heg=w830-h467-no?authuser=0
.
https://lh3.googleusercontent.com/pw/ACtC-3ezVZpxognFTxqgyUDHROaqEQUM83XpW3QgKZ9sdPAmMBYN6ftXjtvAD929B980NDY1hODO5NjJKLCutggtFJ3d7fEGzjPw95GoNcY_PutsdYmsD2UDYqK-HaTe89UrRZmOZF4i9zsdbR55qDxt48k4nA=w464-h824-no?authuser=0

एक शंका
किती पश्चिमात्य देशातील नागरिक होळी,दिवाळी,दसरा,दही हंडी ,गणेश उत्सव साजरा करतात.
साजरे करायचे सोडा हे उत्सव काय आहेत ते तरी त्यांना माहीत आहेत का.
आणि भारतीय लोक व्हॅलेंटाईन,केक कापून वाढ दिवस ,हा कसला भोपळ्या च सन.
Mother day,father day असले त्यांचे उत्सव साजरे करण्यात मोठेपणा गाजवत असतात...ही मानसिकता स्वतः ला कमी लेखून गोरे लोकांची मानसिक गुलामगिरी जी
सवय रक्तात च आहे त्याचे प्रतीक आहे का?

आपला समाज उत्सव प्रिय आहे मग काळ्या आफ्रिकन लोकांचे सण किती लोकांना भारतात माहीत आहेत.
पुर्व कडच्या जपान,चीन,कोरिया मध्ये कोणते सण साजरे होतात ह्याची किती माहिती भारतीय लोकांना आहे.
UAE मधील सन उत्सव किती लोकांना माहीत आहेत.
बाजूच्या नेपाळ ,श्रीलंका, मधील एक तरी सण उत्सव भारतीय लोकांना माहीत आहे का.

आदिवासी चे सण माहीत आहेत का ?
महाराष्ट्रात कर्नाटकचे सण माहीत आहेत का ?

जो पैसा देतो , त्याचे सण गोड वाटतात
दुबईतील भारतीय हिंदूंनी कधी बकरी ईद विरोधी पोस्ट टाकल्याचे ऐकिवात नाही

अर्थात साजरे होतात परदेशात. आमचा पंतप्रधान होळी, बैसाखी, दिवाळी, गुरुनानक जयंती, संक्रांत सगळ्या सणांना भरभरून शुभेच्छा देतो. ऑफिशिअल रेसिडेन्स मध्ये सण साजरे होतात. मूर्खासारखे भारतीय कपडे घालून फिरतो आणि स्वतःचं हस करूनही घेतो.
दिवाळीच्या पणत्या, फराळ, रांगोळ्या, ग्रीटिंग कार्ड्स, अभारतीय दुकानातही सहज मिळतात. नवरात्राला झेंडूची फुलं, गरब्याच्या दांडीया सहज मिळतात.
आता तुम्ही भोपळा घेणार का आणखी बकर बकर करत बसणार?

तुमचा पंतप्रधान एकदम हॅण्डसम आहे, ड्रेसिंग सेन्स पण चांगला आहे (जर मी योग्य समजत असेन तर.) शिवाय भारतीय लोकांशी नातं चांगलं जपून आहे.

Hemant33 यांचा मुद्दा मला valid वाटला. अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांनी आपण राहतो तिथल्या संस्कृतीशी समरस होऊन halloween साजरा करणे वेगळे आणि देशात भारतीयांनी त्याची कॉपी मारणे वेगळे.
काही दिवसांनी हे टर्की कापून Thanksgiving सुद्धा सुरू करतील. दुसरीकडे बकऱ्या कापून इद साजरी करणाऱ्या बांधवांना पाहून नाके मुरडतील Happy

माझ्या जुन्या हापिसात किमान 100 एक नॉन भारतीय लोकं आहेत जे साड्या नेसतात, कुडते/ लुंग्या घालतात आणि दिवाळी , होळी साजरी करतात.

हे लोकं पूर्वी फक्त ऑफिसात साजरे करायचे पण आता त्यांच्या घरात पण भारतीय कपडे घालून , दिवे लावून 'बसायला' लागलेत. आवर्जून आम्हाला तुमच्याकडे बोलवा दिवाळीला हे देखील सांगतात आणि गंमत म्हणजे त्यांना आपली चकली, लाडू, शंकरपाळी आणि चिवडा प्रा चं ड आवडतो.

एका अभारतीय ex कलीगने कंपनी सोडली 3 वर्षांपूर्वी. तिच्या फेसबुक प्रोफाईल मध्ये जरा खोदकाम करत होते तर मागच्या दिवाळीतले त्यांचे सकुसप भारतीय ड्रेस मधले दिवा हातात घेऊन घरात काढलेले फोटो पाहिले आणि भारी वाटलं.

तिथे बरेच लोकं असे ही आहेत ज्यांना आपले सण साजरे करायला आवडत नाहीत. तसेच आपल्याकडे ही आहेतच की. उडदामाजी काळे गोरे असतातच

कधी असतो हा हैप्पी होलोवीन डे?
मला मुलांंच्या राईम्स मधे बघूनच माहित आहे..कुणी साजरे केले/करत असतील तर सजावटीचे/मुलांचे फोटो बघायला आवडले असते...कांड्या म्हणजे लॉलीपॉप असते का?

मला आनंदी मुलं/लोकं पहायला आवडते कुणाचा सण, धर्म वगैरे काही फरक पडत नाही>>>>>>>>+111

आजच आहे Halloween Happy
Candy includes pops , chocolate, snickers, smarties, popcorn , chips (small pack ) सगळं जंक फन फुड

नॉन भारतीय म्हणजे अमेरिकन (गोऱ्या कातडीचे) ,ब्रिटिश,फ्रेंच किंवा यूरोप मधील प्रगत देशातील गोरे लोक
भारतीय सण साजरे करतात का.

आमच्याकडे यंदा डेकोरेशन वगैरे तर नाही केले पण केक कटींग जिंदाबाद
काल मात्र शाळेच्या ऑनलाईना सेलिब्रेशनला मुलीला छान सजवले होते. यासाठी खास तिच्या मावश्याही घरी आल्या होत्या. आणि मग त्यानंतर नाचगाणी दंगा वगैरे तेवढीच थोडीफार धमाल मस्ती Happy

ऑफिसातल्या एका मित्राचे आताच व्हीटसप स्टेट्स पाहिले. त्यांच्या सोसायटीतील सारी मुले रंगली होती भूताच्या वेषात. आमच्याही सोसायटीत सर्व मुलांनी एकत्र येत असे काही केले पुढच्या वर्षी तर आवडेल Happy

बाकी या साजरे करण्याच्या मूळ पद्धतीत काही आचरट प्रकार असतील तर ते अर्थातच टाळणे आपल्या हातात आहेच.
जसे की आमच्याकडे नाताळ आणि ख्रिस्ती नववर्ष आम्ही साजरा करतो, पण मद्यपान करणे टाळतो.

यंदा कोरोनामुळे शालेतला हॅलोवीन ऑनलाईन साजरा झाला. पुढच्या वर्षी होपफुली शाळा सुरू असताना झाला तर मुले नक्कीच जास्त एंजॉय करतील Happy

मला आनंदी मुलं/लोकं पहायला आवडते कुणाचा सण, धर्म वगैरे काही फरक पडत नाही>>....+1. अस्मितेची पूर्ण पोस्ट आवडली.

हेमन्त३३ संकुचित दृष्टीने पाहिले तर हा आमचा सण तो तुमचा सण असंच डोक्यात येईल पण कल्पना करा तुम्ही परदेशात स्थायिक आहात, तुमची मुले तिथल्या शाळेत जातायत, त्यांचे मित्र मैत्रिणी तिथलेच आहेत, मग तिथे मेजॉरिटीने धूमधडाक्यात जे उत्सव साजरे होतात ते तुमच्या मुलांनाही साजरे करावेसे वाटणार. त्यांनाच काय पण तुम्हालाही आजू बाजू च्या उत्सवी वातावरणात सामील व्हावेसे वाटणे हेच साहजिक आहे. इथे उत्सव साजरा करण्याचा आणि देवा धर्माचा संबंध नाही. "गोर्‍यांचा" मान जास्त असेही नाही. हॅलोविन अन ख्रिसमस हे स्थानिक रित्या मोठ्या प्रमाणावर साजरे होणारे उत्सव असल्याने जुइश, मेक्सिकन, इंडियन सगळे हौशीने ते साजरे करतात.
अर्थात तेवढ्याच दणक्यात दिवाळी, गरबा, होळी हेही आमच्याकडे साजरे होतात. तेव्हा मुलांचे नॉन देसी मित्र मैत्रिणी पण येतात सामील व्हायला.


वसुधैव कुटुम्बकम् सनातन धर्म का मूल संस्कार तथा विचारधारा है जो महा उपनिषद सहित कई ग्रन्थों में लिपिबद्ध है। इसका अर्थ है- धरती ही परिवार है (वसुधा एव कुटुम्बकम्)। ... अर्थ - यह अपना बन्धु है और यह अपना बन्धु नहीं है, इस तरह की गणना छोटे चित्त वाले लोग करते हैं। उदार हृदय वाले लोगों की तो (सम्पूर्ण) धरती ही परिवार है।

सणांची ओळख झाली की, आजूबाजूला लोक साजरे करताना दिसले की बाकीचेही करतात. बे एरियातील ऑफिसेस मधे दिवाळीला गोरे, काळे, एशियन्स (चायनीज, व्हिएटनामीज) बरेच लोक साड्या, झब्बे घालतात भारतीय लोकांकडून घेउन. भारतीय पदार्थ खातात. मैत्रेयीने लिहीले तसे गरब्यातही सामील होतात. आमच्या घरी गणपतीच्या मोठ्या आरतीला अभारतीय शेजारी कुतुहलाने येउन बसतात.

ज्यांना "आमच्या धर्मात नाही" म्हणून सामील व्ह्यायचे नसेल ते वेगळे पडतात/पडतील. त्यामुळे हिंदू सण ख्रिश्चन सण करत उगाच कडवट चेहरे करत बसण्यापेक्षा आजूबाजूच्या उत्सवांत सामील व्हा. तो पुण्यातील गणेशोत्सव व दिवाळी असो, की इथला थँक्सगिव्हिंग, ख्रिसमस. दोन्हीकडे त्या त्या वेळेस वातावरणात एक मॅजिक असते, ते सामील झाल्याशिवाय दिसत नाही.

डिस्नेलॅण्डमधे डिसेंबरचे काही दिवस ख्रिसमस परेड असते. सांता क्लॉज व इतर बरीच मंडळी असतात, डिस्ने कॅरेक्टरसकट. तेथे बाजूला बसून ती पाहात असताना जेव्हा सांताचा रथ समोर आला तेव्हा आजूबाजूच्या पब्लिक मधून जी प्रतिक्रिया येते त्याला तोड नाही. तेथे बसलो होतो तेव्हा तेच ते वातावरणातले मॅजिक दिसले व थेट पूर्वीच्या गणपतीच्या मिरवणुकीतील दिवसांत घेउन गेले. पहाटेचे चार वाजलेत. दगडूशेठ चा लवाजमा जेमतेम अलका टॉकीज चौकात पोहोचला आहे, शाळेच्या दिंड्या नाचत आहेत. दणदणीत ढोल वगैंरेच्या ठेक्यातूनही मधेच कोठे लताचे "आधी वंदू तुज मोरया" ऐकू येत आहे - त्यावेळचे वातावरण अनेकदा अनुभवलेले आहे. त्या दिवशी डिस्नेमधून थेट तेथे जाउन पोहोचलो!

गोड आहेत ड्रॅकुला ताई
पण बघतायत कुठे? आमच्याकडे रोखून पाहिलं तर अजून जास्त भीती वाटेल

उगाच कडवट चेहरे करत बसण्यापेक्षा आजूबाजूच्या उत्सवांत सामील व्हा >> बेंबट्या, चार लोक वागतात तसे वागावे. होळी पेटल्यावर बोंबलावयास लाजणे हा पुरुषार्थ नव्हे!

मृणाली, अनू धन्यवाद

ती समोर ऑनलाईन क्लासमधील टीचर कडे बघत होती. त्या फोटो काढत होत्या.

नंतर मात्र वळली आपल्याकडे आणि असे रोखून पाहिले Happy

1604220212755.jpg

अभिषेक,
मी पण घाबरलो, पोझ बघून.
बर झाले हा फोटो दिवसा टाकला आहेस. मी रात्री बघितला असता तर झोप उडाली असती.

छान गोड द्रकुला Happy
(हे छकुला सारखं काहीतरी)

Pages