ऑरगॅनिक, केमिकल फ्री उत्पादने आणी अनुभव

Submitted by दिव्या१७ on 4 October, 2020 - 12:33

मी काही दिवसा पासून ऑरगॅनिक, केमिकल फ्री उत्पादने वापरणे चालू केले आहे. २ महिन्या पासून टाटा रॉक सॉल्ट, सल्फर फ्री साखर आणी ब्राउन शुगर, कच्ची घाणी राई चे तेल वापरते आहे. आता ऑरगॅनिक डाळी शोधणे चालू आहे, टाटा संपन्न वापरले.

माझा प्रश्न असा आहे की चहा ला काही डिकॅफ प्रकार आहे का? आणी राई ऐवजी कोल्ड प्रेस्ज्ड कोणते तेल वापरू शकतो? मी, नवरा आणी मुलगा आम्ही तिघेही कफेटिक आहोत शेंगदाणा आणी खोबरे तेलाने कफ वाढतो का? ऑरगॅनिक मसाले ऑनलाईन कुठे मिळतील का? घरगुती लोणचे कमी मीठ असलेले कुठे मिळेल, ऍमेझॉन वर खूप सारे ब्रॅण्ड्स आहेत पण कुणाचा अनुभव असेल तर प्लीज ब्रँड शेअर करा. स्प्राउटेड आटा कुणी वापरला आहे का तर ब्रँड सांगा.

यावर अजून काही माहिती आणी प्रॉडक्ट्स माहिती असतील जे केमिकल फ्री आहेत तर सुचवा

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

चांगली माहिती.
मी खालील साईट वरून खोबरेल तेल/ शेंगदाणा तेल घेते . ते घरपोच पाठवतात. क्वॉलिटी उत्तम आहे. मी तीन वर्षे वापरतेय.
https://indicwisdom.com/store/

तसेच आपल्या मायबोली वरच्या स्वप्नाली मठकर ( 'सावली' )कडून खोबरेल तेल घेतले आहे . ते हि चांगले आहे. (NatureZest - https://www.naturzest.com/ )

सध्या ऑरगॅनिक भाज्या / फळे ' Friends of Farmers ' या ग्रुप कडून घेतेय . मुबंईत सगळ्या ठिकाणी डिलिव्हरी देतात. दोनच आठवडे झाले. भाज्या चांगल्या आहेत.

पुण्यात बायो बास्केट म्हणून एक कंपनी ऑरगॅनिक भाजीपाला आणि फळे विकत आहेत, किंमत थोडी जास्त आहे पण वस्तू खात्रीलायक आहेत.

तसेच मायबोलीवरील विराग रोकडे कोल्डप्रेस तेले विकतो पुण्यात, सूस गावात रहायला आहे तो.

हा एक चांगला विडिओ. ज्यांना घरीच शेती करणे शक्य आहे त्यांच्यासाठी.

श्री. सुधाकर पाटील यांनी घर बांधतानाच छतावर शेती करायची हे ठरवून तसे घर बांधले. पाटील spnf चे धडाडीचे कार्यकर्ते आहेत.

https://youtu.be/7YKfOPkK8RU

सामी,
नेचरझेस्ट आणि व्हर्जिन कोकोनट ऑईल च्या उल्लेखाबद्दल धन्यवाद Happy

मी पुण्यात मेरा फार्मर (merafarmer.com)ची उत्पादने वापरून बघितली आहेत .छान आहेत. स्वतः जाऊन शेत वगैरे बघितले नाही पण ऑरगॅनिक असावीत असे वाटते. वरील काही मेसेजेस मध्ये जसे म्हटले आहे तसे ओबडधोबड आणि दिसायला फार छान नसणाऱ्या भाज्या असतात. शिवाय शेंगदाणा व करडई तेल वापरून बघितले आहे ते छानच आहे. टोमॅटो केचप ची चव लहानपणी आई घरी करायची अगदी तशी आहे. आठवड्यातील एकेका वारी पुण्यातील एकेक भागात त्यांची घरपोच सेवा आहे.
12-15 वर्षांपासून पूर्णपणे नैसर्गिक शेती करणारे एक शेतकरी गाडी भरून भाजी घेऊन आठवड्यातून दोन दिवस सोसायटीजवळ यायचे परंतु जसा लॉक डाऊन सुरू झाला ते सर्व बंद पडले.

गच्चीवर शेती करताना लागणार्‍या निविष्ठा उदा: शेणखत, घनजीवामृत, कोंबडीखत तसेच गोमूत्रआधारित कीडनाशक या महिन्याच्या शेवटापासून उपलब्ध होतील. कोणाला हवे असल्यास विपुमध्ये संपर्क साधावा.

केमिकल फ्री उत्पादने म्हणजे नक्की काय? साखर, तेल, इतकंच काय, पाणी सुद्धा एक केमिकलच आहे. तुम्हाला मानवाने (पृथ्वीकर नाही) कमीत कमी प्रक्रिया केलेलं, असं काही म्हणायचंय का? मग साखरेपेक्षा गूळ चांगला आणि त्याहीपेक्षा सरळ ऊसच खावा. स्वयंपाकात साठवलेले पदार्थ खाण्यापेक्षा ताजे खाणे चांगले, पण त्याहीपेक्षा कच्चे, मसाले/तिखट/मीठ न घातलेले खाणे चांगले - असं काही आहे का?

Pages