ऑरगॅनिक, केमिकल फ्री उत्पादने आणी अनुभव

Submitted by दिव्या१७ on 4 October, 2020 - 12:33

मी काही दिवसा पासून ऑरगॅनिक, केमिकल फ्री उत्पादने वापरणे चालू केले आहे. २ महिन्या पासून टाटा रॉक सॉल्ट, सल्फर फ्री साखर आणी ब्राउन शुगर, कच्ची घाणी राई चे तेल वापरते आहे. आता ऑरगॅनिक डाळी शोधणे चालू आहे, टाटा संपन्न वापरले.

माझा प्रश्न असा आहे की चहा ला काही डिकॅफ प्रकार आहे का? आणी राई ऐवजी कोल्ड प्रेस्ज्ड कोणते तेल वापरू शकतो? मी, नवरा आणी मुलगा आम्ही तिघेही कफेटिक आहोत शेंगदाणा आणी खोबरे तेलाने कफ वाढतो का? ऑरगॅनिक मसाले ऑनलाईन कुठे मिळतील का? घरगुती लोणचे कमी मीठ असलेले कुठे मिळेल, ऍमेझॉन वर खूप सारे ब्रॅण्ड्स आहेत पण कुणाचा अनुभव असेल तर प्लीज ब्रँड शेअर करा. स्प्राउटेड आटा कुणी वापरला आहे का तर ब्रँड सांगा.

यावर अजून काही माहिती आणी प्रॉडक्ट्स माहिती असतील जे केमिकल फ्री आहेत तर सुचवा

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

या एका कंपनीचे कोल्ड प्रेस तेल माझा भाऊ वापरतो.त्याला फायदा झाला असं म्हणालाय.
पण छोट्या प्रमाणात एका वेळी खरेदी करणे चांगले.कोल्ड प्रेस आणि प्रक्रिया नसलेले असल्याने ठराविक वेळात वापरले नाही तर ऑक्सिडेशन होते म्हणे.
(हे विक्रेते माझ्या ओळखीचे नाहीत.ही जाहिरात नाही.)
IMG_20200926_152617.jpg

नैसर्गिक पद्धतीने, नैसर्गिक खते वापरून, कृत्रिम रसायनांचा वापर न करता केलेली शेती आणि उत्पादने.

नौटंकी खोबरेलरेल खाण्याने की केसांना लावल्याने? >> आठवडाभर केसांना मुळाशी मालिश केली अंघोळीच्या आधी तासभर. लगेच फरक पडला. कोल्ड प्रेस्ड तेल असल्यामुळे असेल. जवस किंवा जवस तेल खाणे पण फायदेशीर आहे केस आणि त्वचेसाठी.

नैसर्गिक बीज आता अस्तित्वात असेल तर ते खूप कमी प्रमाणात असेल.
भाज्या,कड धान्य, तृण धान्य ,तेल बिया ह्यांचा आता ज्या जाती बाजारात आहेत त्या हायब्रीड जाती आहेत.
त्या मध्ये बदल केला गेला आहे.
कमी वेळात पीक यावे
रोगाला बळी पडू नये.
आकर्षक रंग असावा वैगरे .....
मुळात बीज च नैसर्गिक नाहीत तर भाज्या कशा नैसर्गिक असतील.
शुद्ध बिजा पोटी फळ रसाळ गोमटी.
मुळात बीज च शुद्ध नाही तर कसले ऑरगॅनिक घेवून बसलाय.

मान्य आहे बीज शुद्ध नाही पण मग ‘नैसर्गिक पद्धतीने, नैसर्गिक खते वापरून, कृत्रिम रसायनांचा वापर न करता केलेली शेती आणि उत्पादने’ खाउच नयेत का?

हेमंत, हायब्रिड आणि genetically modified यामध्ये गोंधळ होतोय का तुमचा? दहा हजार वर्षांपासून माणूस जी शेती करतोय तिच्यातून निर्माण झालेलं बियाणं हे नेहमीच हायब्रिड होतं. त्यामुळे हळूहळू गहू, तांदूळ आणि इतर धान्याच्या माणसाला खाण्यायोग्य अशा प्रजाती तयार झाल्या ज्या त्या हवामानाला योग्य होत्या. अगदी कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या जाती देखील निसर्गातली permutations and combinations आपल्याला हवी तशी सिलेक्ट करून निर्माण करतात.
तुम्हाला बहुदा मोन्सॅन्टो सारख्या कंपन्या ज्या झाडांमध्ये जनुकीय बदल घडवून जे बियाणे बाजारात आणतात त्याविषयी बोलायचे आहे. कारण तसे बियाणे हे दरवर्षी विकत घ्यावे लागते आणि त्याला अधिक खतं आणि किटकनाशकं लागतात. बरेचसे अॉरगॅनिक शेतकरी हे स्थानिक बियाणं वापरतात कारण रासायनिक खतं आणि किटकनाशकं वापरायची नसतील तर हीच बियाणी तग धरू शकतात. तरीही जेव्हा तुम्ही शेतकऱ्याकडून अॉरगॅनिक भाजीपाला घेता तेव्हा त्याला बियाणांविषयी विचारू शकता.

थँक्स ऑल, सध्या मी रिफाईंड साखरेला पर्याय म्हणून खालील ब्राउन अँड सुलफर लेस साखर वापरली, सुनेहरा ब्राउन शुगर मी चहा साठी वापरते आहे, आधी गूळ वापरून पहिला पन चहा फाटतो मग ही साखर पर्याय म्हणून मागवून पहिली, खूप छान आहे गुळाच्या जागी. मवाना अजून स्टार्ट नाही केली वापरली की सांगते. धमपुरे साखर अगदी आपल्या नेहमीच्या सारखीच आहे फक्त दाणे थोडे मोठे आहेत आणी केमिकल फ्री आहे, टेस्ट अगदी साखरे सारखीच आहे. सध्या सगळे प्रॉडक्ट्स १ किलो मागवून वापरून पाहणे चालू आहे Happy

https://www.amazon.in/MAWANA-Mawana-Brown-Sugar-1kg/dp/B07P4H5BZB/ref=sr...

https://www.amazon.in/Trust-Sunehra-Mineral-Sugar-1kg/dp/B071LDMC7F/ref=...

https://www.amazon.in/Dhampure-White-Crystal-Sugar-5kg/dp/B07TXFVC2K/ref...

(हे विक्रेते माझ्या ओळखीचे नाहीत.ही जाहिरात नाही.)

मान्य आहे बीज शुद्ध नाही पण मग ‘नैसर्गिक पद्धतीने, नैसर्गिक खते वापरून, कृत्रिम रसायनांचा वापर न करता केलेली शेती आणि उत्पादने’ खाउच नयेत का? >> ++१११११

आपण आपल्या परीने प्रयन्त करून ५०% जरी केमिकल्स रोजच्या वापरातून कमी करू शकलो तरी थोडा तरी फायदा होईल. जसे हार्श केमिकल ऐवजी व्हाईट व्हिनेगर सफाई साठी, biotique चे केमिकल फ्री कॉस्मेटिकस आणी साबण इ.

(हे विक्रेते माझ्या ओळखीचे नाहीत.ही जाहिरात नाही.)

खरोखरचं zbnf फार्मिंग करणाऱ्या ओळखीच्या शेतकऱ्याकडून उत्पादने घ्या.( जत्रेत ऑरगॅनिक लेबल लावलेली उत्पादने ऑरगॅनिक असतीलच असे नाही.) अगदी जेन्यूईन ऑरगॅनिक उत्पादनाचा ईल्ड फार कमी असतो.प्रत्येक शेतकऱ्यांना हे परवडत नाही.
शिवाय नर्सरी वाले बिनधास्त 'ऑरगॅनिक आहे' म्हणून सरळ सरळ केमिकल चा वास येणारी आणि फक्त बहर गोंडस फुलांची चित्र असलेली खतं खपवत असतात.ऑरगॅनिक म्हणून मिळणारी उत्पादनं अशी ऑरगॅनिक आहे का तेही बघावं लागतं.
याउप्पर खूप टेन्शन घेऊ नका.
ज्या भाज्यांना पब्लिक डिमांड कमी त्या भाज्या त्यातल्या त्यात कमी पेस्टीसाईड वाल्या मिळू शकतात.ग्रीन टोकरी व्हिजिट मध्ये त्यांनी सांगितलं होतं की ज्याला बारीक छिद्र आहे ते पालक घ्या(म्हणजे किडे ते खाण्याच्या लायकीचं, बिन विषारी समजतात म्हणून)
आता भारतीय पब्लिक इतकी चालू आहे की हे कळलं तर मुद्दाम पेस्टीसाईड वाल्या पालकाला पंच ने छिद्र पाडून विकतील Happy
अगदीच खरं खुरं ऑरगॅनिक पाहिजे असेल तर स्वतःच्या घरी गोमूत्र तंबाखू चे पेस्टीसाईड मारून पिकवलेल्या भाज्या हा उत्तम उपाय.
(पेस्टीसाईड वाली उत्पादनं पण आपण लहान पणीपासून पचवत आलो आहे.चांगली ऑरगॅनिक मिळाल्यास उत्तमच.पण एरवी काही उत्पादनं तशी न मिळाल्यास फार लोड नको.)

मी_अनु बरोबर. आमच्याकडे एका चांगल्या ऑरगॅनिक ब्रँडच्या हळदीत रंग मिसळलेला होता. जीभ रंगायची, आणि लौकर रंग जायचा नाही.

समजा आपण रासायनिक खते वापरली नाहीत आणि शेणखत,किंवा गांडूळ खत पिकांचे वाढ होण्यासाठी आणि माती सुपीक होण्यासाठी साठी वापरली तर उत्पादन खर्च वाढतो.
शेणखत ,तत्सम खते आज वापरली की लगेच उद्या त्याचा परणीम होत नाही.
दोन तीन वर्ष continuie वापरल्या नंतर माती चा पोत सुधारतो आणि त्याचा पिकांना फायदा होण्यास suravat होते.
रासायनिक खते लगेच इफेक्ट करतात आणि पिकांची वाढ तत्काळ होते.
ह्या फरक आहेच.
जसे जर्सी गाय 25 ते 30 ltr दुध रोज देते पण quantity वाढली की दर्जा कमी होतो साधी गाय 4 ltr मुश्किल नी दूध देते पण त्या दुधाचा दर्जा उत्तम असतो.

हेमंत ३३, बरोबर आहे, रासायनिक शेती आज सुरू केली की त्याच वर्षीच्या पिकाला ऑरगॅनिक सर्टिफिकेशन मिळत नाही. तीन वर्षांनी मिळते. तुम्ही म्हणताय ते आणि त्याव्यतिरिक्त अन्य मुद्दे विचारात घेतले जातात.

जिज्ञासा सहमत.

आपली कृषी विद्यापीठेही अतिशय चांगल्या जाती निर्माण करताहेत. नव्या जाती निर्माण करताना त्यांच्यात रासायनिक बदल करून नवी जात तयार होत नाही तर असलेल्या जातीतील विशिष्ट वैशिष्टये असलेली रोपे मार्क करून त्या बियाणापासून परत पीक घेऊन त्यातले हव्या त्या वैशिष्ट्यांचे बी परत वेगळे करून असे एलिमीनेशन करून हवी ती वैशिष्टेय असलेली जात बनते.. हे अतिशय वेळखाऊ, किचकट काम आहे. स्थानिक जातींपासूनच या नव्या जाती तयार केल्या जातात.

जेनेटिकली मोडीफाईडमध्ये बियाणांच्या जनुकामध्ये म्हणजे डीएनएमध्ये बदल केला जातो. त्यायोगे रोपांची उत्पादकता, प्रतिकारशक्ती वगैरे वाढते. पण याची काळजीही तशीच घ्यावी लागते, तुम्ही विक्रेत्या कंपनीला आयुष्यभर बांधले जाता. शास्त्रज्ञांनी जरी हे अन्न अपायकारक नाही असे सांगितले असले तरीही कित्येक युरोपियन देशांनी जीएम बियाणांवर बंदी घातलेली आहे.

भारतात हल्ली हल्ली स्थानिक किंवा गावठी/मूळ बी संवर्धनाचे प्रयत्न होताहेत. त्यामुळे बहुतेक शेतकरी हायब्रीडच वापरतात. यात वाईट काहीही नाही.

आणि ऑरगॅनिक व नैसर्गिक हे शेतीचे दोन वेगळे प्रकार आहेत. नैसर्गिकवाले कृत्रिम रसायने वापरत नाहीत असा दावा करतात. बाकी दोन मूलद्रव्ये एकत्र केली की जे बनते त्याला रसायन म्हणता येते Happy Happy ती मूलद्रव्ये नैसर्गिकरित्या मिळवली की फॅक्टरीत बनवली यावर रसायन नैसर्गिक की कृत्रिम हे ठरेल Happy Happy सध्या दोन्ही प्रकारची उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत.

सरकारी यंत्रणेकडून ऑरगॅनिक शेतीचे प्रमाणपत्र घेता येते. किंबहुना ऑरगॅनिक असे नाव लावून विकणार्याना ते घेणे बंधनकारक आहे. याचीही प्रोसेस लाम्ब व किचकट आहे कारण तुमच्या शेतात तुम्ही रसायने वापरली नाहीत याची चाचणी एका दिवसात शक्य नाही. नैसर्गिक शेतीसाठी असे प्रमाणपत्र दिले जाते का याची कल्पना नाही.

तेव्हा विकत घेताना नक्की काय विकत घेतो याची खातरजमा करून घ्या. कित्येकजण नैसर्गिकच्या नावाखाली रसायनयुक्त मालच विकतात, नावाला काहीतरी नैसर्गिक केलेले असते. ऑर्गनिकवाले किंमत खूपच जास्त ठेवतात हा माझा अनुभव आहे, इतरांचे अनुभव वेगळे असू शकतील.

मी लाकडी घाण्यावर काढलेले तेल सैपाकात वापरते. हे तेल काढताना व नंतर त्याचे शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी कृत्रिम रसायने वापरली जात नाहीत एवढेच नैसर्गिक तत्व यात असते. बाकी ज्याचे तेल काढले जाते ते तीळ, शेंगदाणा, मोहरी कृत्रिम रसायने वापरूनच पिकवलेली असतात. एवढया मोठया प्रमाणात ऑरगॅनिक किंवा नैसर्गिक मिळत नाही व मिळाले तरी त्या तेलाची किंमत खूप जास्त होते हे उत्तर बहुतेक वेळी मिळते.

आम्ही आमच्या शेतात सध्या रासायनिक खते, कीडनाशके न वापरता शेतीचे प्रयोग करतो आहे. जवळपासचे शेतकरी आनंदाने युरिया, डि.ए.पी. वापरतात. त्यांची पिके मस्तपैकी तरारलेली दिसतात. आमची सुरुवात असल्यामुळे काही चुका आमच्याकडून होतात आणि किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो आहे. ते लोकं 'हे कोण शिकलेले येडे आहेत' असे लुक्स देतात.
पुन्हा ह्या भाज्या दिसायला तितक्या आकर्षक नसतात. विकत घेणारा जरा बिचकतोच. तरी आम्ही थेट ग्राहकांना विकतो त्यामुळे बाजारभावाच्या जवळपासचा तरी दर मिळतो.

खरोखरचं zbnf फार्मिंग करणाऱ्या ओळखीच्या शेतकऱ्याकडून उत्पादने घ्या.( जत्रेत ऑरगॅनिक लेबल लावलेली उत्पादने ऑरगॅनिक असतीलच असे नाही.) अगदी जेन्यूईन ऑरगॅनिक उत्पादनाचा ईल्ड फार कमी असतो.प्रत्येक शेतकऱ्यांना हे परवडत नाही.>>>

ऑरगॅनिकचे माहीत नाही पण zbnf /spnf चा ईल्ड कमी हा गैरसमज आहे. मी गेली दोन-तीन वर्षे या पद्धतीने केली जाणारी नैसएगिक शेती पाहते आहे, कित्येक शेतकऱ्यांना भेटलेय, या रविवारी एका बेळगावजवळच्या शेतकऱ्याला भेटलेय जो 2011 पासून ही शेती करतोय. यापैकी प्रत्येकाने ईल्ड वाढत गेल्याचे सांगितले आहे.

हे शेतकरी त्यांची उत्पादने चढ्या भावाने विकतात हे खरे आहे. कारण त्यांच्या मते त्यांची उत्पादने विषमुक्त आहेत. तुम्हाला चांगले खायला हवे तर किंमत द्यायला हवी असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनाही शेतीतून पैसा कमवायचा आहे, शेती हा धंदा म्हणून ते बघतात आणि पारंपरिक बाजारपेठांवर अवलंबून न राहता स्वतः प्रयत्न करून कस्टमरबेस वाढवायचे प्रयत्न करतात. यातले बरेच जण ऑनलाईन विक्री करतात. मी पर्वा ज्याला भेटले तो एकरी 35 टन ऊस उत्पादन घेतो, त्याच्या शेतावर गूळ करायची यंत्रणा आहे, तो कारखान्याला एकही किलो ऊस न देता सगळ्या उसाचा स्वतःच गूळ बनवून तो ऑनलाईन विकतो.

https://youtu.be/lFWmBv312Z4

निवेदिका जरी ऑरगॅनिक म्हणत असली तरी शेतकरी स्वतःला नैसर्गिक शेतकरी म्हणवतो.

अनया, मी पर्वा हीच चर्चा करत होते. भाजीपाला लावायचा असेल तर खूप कष्ट आहेत कारण भाजीचे आयुष्यमान कमी आहे, आपल्याला फटाफट हालचाल करावी लागते.

मला पर्वा सांगण्यात आले की भाजी करायची तर शेतात कीटकांना पकडण्यासाठी ट्रॅप असायलाच हवा.

https://www.amazon.in/Chipku-Insect-Feeding-Insects-whiteflies/dp/B086S7...

हा सोलरबेस्ड आहे . मी पर्वा शेतात पाहिला तेव्हा खालच्या त्या भांड्यात शेकडो बारीक पतंग पडले होते, जे एरवी भाजीवर पडले असते Happy Happy

Zbnf ची उत्पादनं आम्ही पण विकत घेतो.
आमच्या सोसायटीत एक जण करतात.त्यांच्याकडून लाल (आत लाल) ड्रॅगन फ्रुट घेतली होती.छान होती चवीला.
कदाचित जास्त यिल्ड वाले zbnf/organic सगळ्यांना सुरुवातीला जमत नसेल.

कदाचित जास्त यिल्ड वाले zbnf/organic सगळ्यांना सुरुवातीला जमत नसेल>

हो, शक्य आहे. सुरवातिला खूप मेहनत आहे. तीचा कंटाळा केल्यास आलेली भाजी किडी खाऊन संपवण्याची शक्यता जास्त आहे व तुम्ही त्यांना कीटकनाशके वापरून संपवूही शकत नाही. Happy Happy

पुण्याच्या आसपास spnf पद्धतीने नैसर्गिक शेती करणारे बरेच शेतकरी आहेत. त्यांना खूप चांगली बाजारपेठ मिळालेली आहे.

ज्याने एकदा पूर्ण नैसर्गिक भाजी/फळे खाल्लीत त्याला नंतर रासायनिक खतांवरची भाजी/फळे खाताना फरक लक्षात येतो. चवीतला फरक आपण किती रसायने खातो याची जाणीव करून देतो व हादरायला होते.. Happy

पुण्याच्या आसपास spnf पद्धतीने नैसर्गिक शेती करणारे बरेच शेतकरी आहेत. त्यांना खूप चांगली बाजारपेठ मिळालेली आहे. >>>> हो, आमच्या इथे येतात शेतकरी.
ज्याने एकदा पूर्ण नैसर्गिक भाजी/फळे खाल्लीत त्याला नंतर रासायनिक खतांवरची भाजी/फळे खाताना फरक लक्षात येतो. चवीतला फरक आपण किती रसायने खातो याची जाणीव करून देतो व हादरायला होते.. Happy >>>>> + १

शेती करायचा विचार सुरु आहे. घरातल्यांपुरते तरी पिकवावे.>>>

नेकीं और पुछ पुछ!!! शुभस्य शीघ्रम....आता मस्त भाजी सिझन सुरू होतोय. भाज्या लावा, स्ट्रॉबेरी लावा..

आम्ही नर्सरि लाईव्ह वरुन ६ कुंड्या, ६ स्ट्रॉबेरी रोपे, माती आणि खत वगैरे मागवले होते.
त्याला एकदाच स्ट्रॉबेरी आल्या. नंतर काही नाही.
आता कांद्याचे पाणी प्रयोग करुन बघणार आहे.

मी सालं जमा केली आहेत Happy
प्रयोग झाला तर सांगते
माझ्याकडॅ गच्चीवरची बाग चा व्हिडीओ आहे ते कसं बनवायचं याचा.
आमच्याकडे नुसतीच झाडं आहेत. त्याला फार फुलं फळं येत नाहीयेत.
ऊन कमी पडतंय बहुतेक.

कांद्याच्या पाण्याचा प्रयोग करून माझी 3 झाडं गेली. बहुतेक कांद्याचे पाणी जास्त झालं. आता वाचलं की आठवड्यात दोनदा च घालावं. मी एक दिवसाआड घातलं. सोन्याच्या अंड्यासारखं झालं माझं Sad :
एका कुंडीतून महिन्यातून एकदा भाजी मिळाली मला. मी पहिल्यांदाच प्रयत्न केला. बहुतेक कुंड्या वाढवाव्या लागतील.

बहुतेक कुंड्या वाढवाव्या लागतील.>>>

एका कुंडीतून कितीशी भाजी मिळणार? गोल मातीच्या कुंड्या नका घेऊ, पसरट प्लास्टिक घ्या. आणि कुंड्याच हव्यात असे नका करू. तेलाचे 15 किलो रिकामे डब्बे वगैरे आणा रद्दीवाल्याकडून किंवा शेजारपाजारातून आणि त्याचे उभे दोन भाग करा म्हणजे आडवे पसरट 2 भाग मिळतील. त्याला भोके पाडा. एकतर गॅसवर काहीतरी टोकवाले हत्यार तापवून भोक पाडा किंवा सोल्डेरिंग आयर्न वापरा किंवा सरळ कैचीने पंक्चर करा. खूप भोके करा व कुंडीसारखे वापरा. अजून काही घरात असेल, पिशव्या वगैरे, त्याही वापरू शकता.

एका आठवड्यात एक कुंडी भरा, पुढच्या आठवड्यात दुसरी. म्हणजे लागोपाठ दिवस भाजी मिळेल. पालेभाजी असेल तर जास्त मिळेल. फळभाजीसाठी खूप कुंड्या लागतील.

ऊन कमी पडतंय बहुतेक.>>

झाड वाढतेय म्हणजे त्याला ऊन मिळतेय. पण तरीही दिवसभर हवे. सावलीत असेल तर फळे वगैरे धरायचे वांधे आहेत. माझ्या सीताफळाला यंदा 1 सीताफळ लागले. ते कण्हेरीसोबत छोटी कुंडी शेअर करते आणि ऊन दुपारी 2 ते 4-5 मिळते.

शेंगदाणा किंवा खोबरेल तेल वापरल्याने कफ वाढत नाही , शेंगदाणा तेल थोडे पित्त वाढवणारे असते , खोबरेल तेलाने सुरवातीला थोडा घशाला खवखव होऊ शकते (अगदी एक दोन दिवस). माझा अनुभव असा कि refined वरून परत ह्या तेलावर यायला हळू हळू सवय करावी , सुरवातीला आठवड्यातून एकाच दिवस नंतर २ दिवस नंतर सर्व दिवस एक वेळेचं जेवण ह्या तेलात आणि नंतर complete switch
मी सध्या खोबरेल तेल वापरत आहे

केमिकल टाकलेल्या आयोडीन युक्त मीठ ऐवजी साधे समुद्री मीठ कुठे मिळेल (जे आपण सर्व पूर्वी वापराचो) ? कोणी वापरयलाचा अनुभव असेल तर कृपया सांगा ...

समुद्री मीठ हल्ली वाण्याच्या दुकानात मिळायला लागले परत. पॅकमध्ये मिळते.

मी गेले सात आठ वर्षे वापरतेय, लहानपणीची हेच वापरायचे.
मधली 20 वर्षे खडे मीठ बाजारातून हद्दपार करून कसलीकसली वेगवेगळी मिठे बाजारात आली.. मग वाणसामानाची दुकाने गडप झाली आणि खडेमिठ पूर्ण नाहीसे झाले.

नव्या मुंबईत माझ्या कॉलनीशेजारीच गाव असल्यामुळे तिथल्या वाणसामानाच्या दुकानातून मी मीठ आणते. इतकी वर्षे तो पोत्यातून काढून देत होता, हल्ली पॅक मिळतो. मागणी वाढली असावी त्यामुळे कोणीतरी सुपीक डोकेबाज पॅक करून विकताहेत.

मी खडेमिठ साफ करून मिक्सर ला फिरवून ठेवते. अगदी टाटा नमक सारखे सुळसुळीत हवे असेल तर बारीक केल्यावर तव्यावर गरम करून घ्या. आर्द्रता पूर्ण जाते (परत येते नंतर Happy Happy )

मी खडेमिठ साफ करून मिक्सर ला फिरवून ठेवते. अगदी टाटा नमक सारखे सुळसुळीत हवे असेल तर बारीक केल्यावर तव्यावर गरम करून घ्या. आर्द्रता पूर्ण जाते (परत येते नंतर Happy Happy )

पुर्वी मिळायच्या त्या चिनीमातीच्या लोणच्याच्या बरणीत ठेवा. आर्द्रता रोखायला मिळते.

धन्यवाद शोधक, मी टाटा रॉक सॉल्ट वापरते , ह्या लिंक वर अजून आहेत
https://www.amazon.in/s?k=sendaha+namak&ref=nb_sb_noss

ऱोहि, मी ममा नाटुरल्स चे onion ऑइल वापरून पहिले केस खूप गळत होते म्हणून इंटरनेट वर वाचून मागवले, महिनाभर वापरले पन मला काहीच फायदा नाही झाला. माझे केस केशकिंग ऑइल ने गळायचे थांबले अगदी आठवडा भरात, खालचा धागा बघा केस गळण्यावर आहे

https://www.maayboli.com/node/76713?page=1

zbnf चे ऑनलाईन शॉप नाशिक ला आहे का? माझे सासू सासरे नाशिक ला असतात सध्या आम्ही भाजीवाला ऑनलाइन वरून ऑर्डर करतो त्यांच्यासाठी, एखादे ऑनलाईन शॉप असेल तर सुचवा प्लीज

@दिव्या१७,
जिओमार्ट किराणा + भाजीपाला ऑनलाईन देते आहे नासिक मधे. मात्र एरिया वाईज चेक करा एकदा.

Pages