झटपट स्टफ्ड पालक पराठा

Submitted by Prajakta Y on 30 September, 2020 - 06:52
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मुठभर पालक, तिखट-मीठ, शेंगदाण्याचे कूट अथवा एखादी चटणी, भिजलेली कणीक व पराठा भाजायला तेल अथवा तूप, काळे अथवा पांढरे तीळ ऑप्शनल

क्रमवार पाककृती: 

सकाळच्या घाईच्या वेळेत झटपट होणारा पौष्टिक पराठा:
पालक धुवून अगदी कोरडा करायचा. मी शक्यतो आदल्या रात्रीच धूवून सुकवून ठेवते म्हणजे सकाळपर्यंत अगदी छान कोरडा होतो. मग पालक बारीक चिरायचा. थोडी मोठी व जाड पोळी लाटायची. लाटलेल्या पोळीवर पालक ठेवायचा. त्यावर मीठ तिखट आणि दाण्याचा कूट घालायचा. यात अनेक व्हेरीएशन्स करता येतील. जसे की चीज घालणे, शेंगदाण्याचा कूट नसल्यास जवसाची, कारळाची चटणी, खोबरे लसूण चटणी किंवा तत्सम कुठलीही चटणी अतिशय छान लागते. परंतु काहीतरी चटणी अथवा दाण्याचा कूट हवा त्याशिवाय बाइंडिंग नीट होत नाही. काळे अथवा पांढरे तीळ पण खूप छान लागतात परंतु ते ऑप्शनल आहेत.

मग मोदकासारखी ती पोळी बंद करून नॉर्मल पराठा लाटायचा व खरपूस भाजायचा. आणि मग गट्टम्! असाच मेथी -कोथिंबीर- शेपू कशाचाही मस्त लागतो.

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी एक कमीतकमी
अधिक टिपा: 

टीपा
1. पराठा अगदी हलक्या हाताने आणि कदाचित जास्त पीठ लावून लाटावा लागेल कारण पालक शिजलेला नसल्यामुळे फाटण्याचे भरपूर चान्सेस आहेत.
2. कणीक जरा घट्ट मळली तर पराठा फाटण्याचे प्रमाण कमी होते.
3. चटणी घातली असेल तर या पराठ्यासोबत वरून तूप अथवा लोणी घेतले की काम झाले. लोणचे -केचप काहीही नसले तरी चालते.
4. सोबत एक वाटी दही आणि थोडे सलाड घेतले तर एक वेळचे जेवण होऊ शकेल.

माहितीचा स्रोत: 
माझी वहिनी
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

स्टफिंग प्रकार किचकट असल्याने कधी करत नाही

सगळे मिसळून एकत्रच गोळा करून लाटणे किंवा थालीपीठ लावणे जमते

वाचायला छान वाटले
मला करायला कंटाळा येईल
चव भारी असणार ह्याची Happy

Blackcat, हा पराठा ट्राय करा पालक चिरणे एवढेच स्टफिंग आहे.
किल्ली, हो चव खूप छान येते -पालक अथवा आत घातलेली पालेभाजी- किंचीत वाफवलेली आणि चटणी अशी एकत्र चव आणि वरून घातलेले तूप छान लागते. एकदा ट्राय करा नो कटकट रेसिपी आहे.