सर्दी पळवण्यासाठी खास झणझणीत...सणसणीत...चमचमीत.. कोकणी फुटी कढी...

Submitted by MSL on 27 September, 2020 - 11:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी ओले खोबरे, १- चमचा धने, १- मोठा कांदा ४-५ लसूण पाकळ्या, सुक्या लाल मिरच्या, मीठ, चिंच,गूळ, तिर्फळ रस,

क्रमवार पाककृती: 

१:ओले खोबरे+ धने+ कांदा + लसूण + सुक्या मिरची ,हे सगळे
मिक्सर वर वाटून घ्यावे...
२: नेहमीप्रमाणे फोडणी करून,त्यात हे मिश्रण ओतावे...एकदम पातळ नको..न घट्ट पण नको...मिडीयम consiatency असावी...
३: चवीपुरते, मीठ ,चिंच , गूळ घालायचं...जरा गरम झाले,ज
की तिर्फल चा रस घालून ,ढवळून, झकांगास बंद करून टाकावे...
४: गरम भात भाकरी सोबत खाऊ शकतो...

वाढणी/प्रमाण: 
३-४
अधिक टिपा: 

# लहान मुलांनी खाऊन बघावी,म्हणून मी बटाटा शिजवून , त्याच्या तुकडे घालते यात..तसेच टोमॅटो चे तुकडे पण चालतात...
# उकळवू नये...

माहितीचा स्रोत: 
माझी आई....
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"तीरफळ" नावची strong वास आलेली बारीक फळे कोकणात मिळतात...ती काही जण मसाला करताना पण वापरतात...उंच काटेरी झाड असते... घोसाने ही फळे लागतात...सुकवून ठेवली जातात...ताजी ओळी असतात हिरवी रंगाची, त्यांना जास्तच वास असतो...

फुटी कढी गोव्यात करतात. मी आमसुलाची फुटी कढी खाल्ली आहे. (फुटी म्हणजे बिन दुधाची. ) कोकम आगळ, मिठ साखर मिरची हिंग कोथिंबीर अशी होती. गार असते. जेवताना पाण्यासारखी पितात.

माझ्या साबा फुट्या कोकम सार करायच्या. खोबरे घालायचं नाही त्यात. भिजवलेल्या कोकमाचे पाणी, तूप जिरे हिंग फोडणी, मीठ, साखर घालून करायच्या. फोडणीत लाल तिखट किंवा लाल सुक्या मिरच्या. ते उकळल्यावर फुट्या सार तयार. मी त्यात आलं, लसूण तुकडे घालायचे फोडणीत.

हा वेगळा प्रकार ऐकला, करून बघायला हवा पण तिरफळे नाही आवडत. तो वगळून करून बघायला हवा.

ही कसली कढी? ना धड रस्सा ना धड कढी!! >>>>
कोकणात माशाच्या कालवणालाही "माशाची कढी" म्हणतात.
म्हणून ही कढी .
आपल्याला कढी म्हटल्यावर ताक आठवते.
आम्ही चिंच गूळ नाही घालत , टोमॅटो घालतो.
तिरफळ आणि धने दोन्ही उग्र आणि तिखट , त्यामुळे प्रमाण बरोबर घ्यावे.

आम्हीपण बनवतो पण गोड नाहि टाकत..आता तुंम्ही मुलांना देत असणार म्हणुन टाकत असणार.. अशीच बनवतो .. फुटा सार म्हणतत तेका Happy

आपल्याला कढी म्हटल्यावर ताक आठवते........ आम्हाला सोलकढी! ताकाची कधी म्हणून वेगळे संबोधले जाते.

वरची कढी, आमच्याकडे रसाची आमटी म्हणून ओळखली जाते.क्वचित तिरफळे घातली जातात.गूळ मात्र अजिबात नाही.