ताकाची कढी ...ओले खोबरे मोहरी लावून...

Submitted by MSL on 27 September, 2020 - 10:49
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२-३ वाट्या ताक, ( जास्त आंबट नको), तूप,
साखर,मीठ, अर्धी वाटी ओले खोबरे,१- चमचा मोहरी, हिरवी मिरची,कढीपत्ता,आले,लसूण,कोथिंबीर...

क्रमवार पाककृती: 

१- पातेलीत १-२ चमचे तूप घालून गरम करायला ठेवायचं...
जिरे हिंग मोहरी हळद मिरची कढीपत्ता लसूण सगळं फोडणीत टाकून घ्याच... ताकात साखर + मीठ ,चवीनुसार ,मिक्स करून ,हे ताक फोडणीत घालायचं...ढवळत रहा...
त्याचवेळी ओले खोबरे + मोहरी मिकरवर फिरवून घ्यावे...न हे वाटप कढीत घालावे...जरासे गरम करावे..उकळी नको...कोथिंबीर घालावी.....गरमगरम भात कढी खायला घ्या....

वाढणी/प्रमाण: 
३-४
अधिक टिपा: 

# फोडणीत ओवा चिमूटभर घातला तरी उत्तम...

माहितीचा स्रोत: 
माझी आई....
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान
पाक कृती फोटो नसल्यास इथले लोक नापास करतात

कुणाला तरी व्हॅटसप पाठवा

मग तो व्हॅटसप फोटो तुमच्या गेलरीतून घेऊन तो इथे अपलोड करा

ओरिजिनल फोटो पेक्षा त्याची साईझ कमी असते

मेथी मोहरी तुपात किंवा कोरडीच भाजून नंतर खोबरे वाटताना शेवटी घालून मिक्सर थोडा फिरवावा. आणि हिंग मोहरी जिरे तीन चार मेथी दाणे इतकीच तुपात फोडणी . खोबऱ्याचे वाटप ताकात कालवून फोडणीत ओतायचे, तिखट पूड साखर मीठ घालून अगदी मंद उकळायचे.लगेच विस्तव बंद करायचा. ह्याला आमच्याकडे कडू आमटी म्हणतात.
धणे जिरे पूड , ओली मिरची, कढीलिंब क्वचित लसूण हा एक आणखी वेगळा प्रकार.

Size larger than specified ...can't upload >>>> फोटो क्रॉप करा मग थोडा किंवा त्याची साईझ 1200x1200 (जास्तीत जास्त) आहे का बघा.
फोटोचा आकार 1200 x1200 पेक्षा कमी असायला हवा

फोटो क्रॉप करा मग थोडा किंवा त्याची साईझ 1200x1200 (जास्तीत जास्त) आहे का बघा.
फोटोचा आकार 1200 x1200 पेक्षा कमी असायला हवा
.-------### हे मोबाईल वर करता येते का...मी मोबाईल युजर आहे...

येतं की करता
फोटोच्या डिटेल्स मध्ये जाऊन त्याची साईज किती आहे ते बघा
IMG_20200927_220116.jpg
वरच्या फोटोत जिथे 4000x2250 px आहे, तिथं 1200x1200 एवढं किंवा कमी असायला हवे

ते आकारावर नाही तर किती डाटा आहे यावर आहे. फाईल साईझ जास्तीत जास्त 2 MB (किंवा त्यापेक्षा कमी) हवा. आकार जर 900x900 पेक्षा जास्त असेल तर हरकत नाही तो आपोआप 900x900 मधे क्रॉप होईल.

छान रेसिपी, नवीन प्रकार.

हिरा तुमच्या रेसिपीजही छान, नवीन वाटतायेत पण खूप कडू लागतात का.

अच्छा डाळीचं पिठ न लावता खोबरं घालायचं! करून बघायला पाहिजे. आणि लसूण कशी लागेल? मी कधी लसूण कढीला घातली नाही. पण उकडीत चांगली लागते तर ताकाच्या कढीत चांगली लागेल असं वाटतय

एवढ तीन वेळा.... असं तीन वे़ळा घातलं तर कढी ऐवजी पिठलंच होईल Wink Happy

मी कधी कधी लसूण घालते. ओलं खोबरं नाही घालत कधी.

एवढ तीन वेळा.... असं तीन वे़ळा घातलं तर कढी ऐवजी पिठलंच होईल Wink >> Biggrin

रेंज व्यवस्थित नसली कि अशी होते कढी >> Rofl

एवढ तीन वेळा.... असं तीन वे़ळा घातलं तर कढी ऐवजी पिठलंच होईल >>> Lol

रेंज व्यवस्थित नसली कि अशी होते कढी >>> Lol

धनुडी ताकाच्या बेसन लावलेल्या कढीत, लसूण फोडणीत मस्त लागते. मी आलं लसूण मिरची तुकडे किंवा त्यांचा ठेचा करून घालते त्या कढीत. ओलं खोबरं कधी घातलं नाही.

आमच्याकडे खोबर्यासोबत थोडे धणे घालून वाटले जाते. सकाळची कढी संध्याकाळी अजून दाट होते.

कढीत लसूण नसेल तर मी खाणारच नाही Lol

एवढ तीन वेळा.... असं तीन वे़ळा घातलं तर कढी ऐवजी पिठलंच होईल >>> Lol :
रेंज व्यवस्थित नसली कि अशी होते कढी >>> Lol :
लसूण घालून कढी कधी केली नाही. करून बघायला पाहिजे.

मी कढी करताना आलं, लसूण, धने, थोडासा कांदा, हिरव्या मिरच्या, ओलं खोबरं मिक्सर ला वाटून टाकते.. छान झणझणीत होते कढी.. फोडणीला मोहरी आणि कढीपत्ता बारीक चिरून घालायचा आणि टाकला थोडे बेसन लावायचे..