मायबोलीकर कसा ओळखावा??

Submitted by वीरु on 22 September, 2020 - 14:58

एका धाग्यावर मायबोलीकर पटकन ओळखता येतात अशा आशयाची चर्चा सुरु होती. तेव्हापासुन मनात एकच प्रश्न फेर धरुन नाचत आहे की 'मायबोलीकर कसा ओळखावा??'
आज प्रवासात, हापिसात कोणी माबोकर ओळखता येतो का ते शोधुन पाहिले पण काही जमलं नाही. प्रवासात शेजारच्याला मोबाईलमध्ये बघत खुदुखुदु हसतांना पाहिल्यावर 'सापडला एकदाचा मायबोलीकर' या आनंदात चपळाईने त्याच्या मोबाईलमध्ये डोकावलो तर त्याचं दुसऱ्याशी की दुसरीशी चॅटींग चाललं होतं. त्याला माझी घुसखोरी आवडली नाही हे त्याच्या कपाळावरच्या आठ्यांवरुन मला पटकन समजलं. असो..
तुम्हाला माबोकर चटकन ओळखता येतो का?
एखादी अनोळखी व्यक्ती माबोकर आहे की नाही हे तुम्ही एका झटक्यात सांगु शकाल का?
त्याचे काय निकष आहेत?
जत्रेत जसे हौशे,नवशे,गवशे असतात तसे माबोकरांचेही प्रकार आहेत का?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

ते टी शर्टस घालून हिंडतात आणि त्यावर मायबोलीचं चिन्ह मागच्या बाजूस असतं असा माझा समज होता. पुढून ओळखता येतात पण मागून ओळखता यावे म्हणून.
पण "टी शर्टाची ओर्डर बुक करा आणि वर्षाविहारला डिलिव्हरी घ्या" हा धागा पूर्वी दिसायचा तो आता दिसत नाही.
मापासाठी लार्ज, इक्स्ट्रा लार्ज, याशिवाय डोकं जाऊ शकेल हे मापही आवश्यक असावं.

हेहेहेहे, पूर्वी मी ट्रेन ने जाता येता हा विचार करायचे, कुणी असेल का माबोकर आपल्या बरोबर Happy पण जर कोणी सापडलं तर अस्सा आनंद होईल म्हणून सांगू

माबो शॉर्ट फॉर्म ऐकण्यासी कान टवकारावा, (उदा रच्याकने)
माबोकर तेथेची जाणावा. >> अगदी बरोबर Happy

असे शॉर्टकट माबोकरच वापरतात

अनेक उपाय आहेत.
१. ट्रेन मध्ये जात असताना आधीच्या दिवसांच्या तुलनेत आजकाल लोकांना कुठल्या विषयाची डेप्थ राहिली नाही बुवा, अभ्यासक वृत्तीच नाही असा विषय काढावा. हे ऐकून माबोकर नकळतपणे "हो ना! पूर्वीची मायबोली राहिली नाही खरंच!" असे म्हणणारच.

२. आपण पुढाकार घेऊन एक खेळ खेळूया म्हणुन सांगावे आणि कुठला खेळ हे सांगायला सुरुवात करावी. माबोकर आजूबाजूला असतील तर लगेच तुम्हाला "संयोजक" असे संबोधून सूचना द्यायला आणि खेळासाठी शुभेच्छा द्यायला सुरुवात करतील.

३. आपल्या डब्यातून एखादा छानसा खाद्यपदार्थ काढून दाखवावा. माबोकर लगेच "मस्त, तोंपासु! ", "भाहारीही!", "पटकन उचलून तोंडात टाकावसा वाटतोय!, "छान, करून बघण्यात येईल." अशा कॉमेंट्स देतील.

असं कुणी सापडलं नाहीये अजून!
पण त्या दुसऱ्या धाग्यावर मी लिहिल्याप्रमाणे तर कुणी WA ग्रुपवर +१ केलं तर मला नक्की शंका येईल.

ऋ, पाफा, मानवजी >> +१११

पण जर कोणी सापडलं तर अस्सा आनंद होईल म्हणून सांगू
Submitted by धनुडी
>> अगदी बरोबर Happy

मागे मायबोलीवर मायबोली शीर्षक गीत लेखनाची स्पर्धा झाली होती. सर्वोत्कृष्ट गीत संगीतबद्ध करून त्याचे जगभरातल्या मायबोलीकरांकडून गायन करून ते रेकॉर्डिंग इथे उपलब्ध केले गेले होते. त्याच वेळी त्या शीर्षकगीताचा रिंगटोनही उपलब्ध केला गेला होता. त्या रिंगटोनमुळे कोणालातरी गर्दीत मायबोलीकर सापडल्याचा अनुभव आला होता.

ऋन्मेष दा Lol
बस, ट्रेन , रिक्षा मध्ये शेजारी बसलेल्या माणसाला, 'तुमचा ड्यू आयडी आहे का ?' असं विचारायचं.
नाही असं उत्तर आलं तर माबोकर सापडला म्हणून समजा Rofl

बस, ट्रेन , रिक्षा मध्ये शेजारी बसलेल्या माणसाला, 'तुमचा ड्यू आयडी आहे का ?' असं विचारायचं.
नाही असं उत्तर आलं तर माबोकर सापडला म्हणून समजा
>>

आणि हो असं उत्तर आलं तर तो नक्की ऋन्मेषच असेल नाही !

हा धागा विरंगुळा असला तरी खरेतर मला नाही वाटत माबोकर ओळखू येतील. माझ्यावरूनच सांगतो.. दोन्ही मोबाईल, ऑफिस लॅपटॉप, घरचा डेस्कटॉप अश्या चारही ठिकाणी मायबोलीची विंडो कायम सुरू असते, पण बाह्य जगात मायबोलीबद्दल मी फारसा बोलत नाही, rather लोक वाचायला तयार नसतात. आपण मोठ्या उत्साहाने एखाद्याला एखाद्या धाग्याबद्दल सांगावं, लिंक पाठवावी तर अपेक्षित प्रतिसाद येत नाही. असं झाल्यावर मी लिंक वगैरे देणं बंद केलं.
मायबोलीवरचे स्पेसिफिक शब्द कुणी वापरत असेल असेही वाटत नाही. पुन्हा मला तरी virtual लाईफ वेगळी ठेवणं योग्य वाटतं (इथं मी फार उघडपणे व्यक्त होतो, जे खऱ्या आयुष्यात शक्य नाही!)

मायबोलीवरचे स्पेसिफिक शब्द कुणी वापरत असेल असेही वाटत नाही
>>>>

मी वापरू लागलोय माझे पर्सनल स्पेसिफिक शब्द जे मी मायबोलीवर वापरतो
जोक्स द अपार्ट, हुमायुन नेचर, येनीवेज, +७८६ वगैरे घरच्यांशी वा ईतर ओळखीपाळखीचे ऑफिस कलीग वगैरेंशी बोलतानाही सवयीने तोंडात येतात माझ्या.
कारण मी माबोवर पोस्ट टाईप करताना ती बोलल्यासारखी करतो. त्यामुळे तोंडात बसलेत आता हे शब्द.

त्यामुळे रच्याकने, तोपासू वगैरे शब्द प्रत्यक्ष बोलणारेही असतील ईथे.

तुमची गोष्ट वेगळी आहे, तुमच्यासारखे अपवाद असावेत कदाचित जे माबोच्या अती आहारी गेलेत ( हेमावैम, जर तुम्हाला तसे नसे वाटत तर सोडुन द्या)

हल्ली कोण वयावर चर्चा करत असेल तर हे मायबोलीकर म्हणून नक्कीच वाटेल..>> म्हंजे चाळीशीतल्या मानसाला तुम्ही पंचवीसचे दिसता म्हणुन सांगायचे.
"काय उपयोग, पोरांच्या स्पर्धांमुळे वय लपवायची चोरी झालीये" असं काहीसा पुटपुटला की तो मायबोलीकर समजावा.
Happy

सरळ बोलता न येणे, कमाल अपमान करण्याची हातोटी असणे, फार हसू आले तर फरशीवर झोपून लोळत हसणे, दोनहून अधिक माणसे उपस्थित असली तर त्यात एक स्वतःचा कंपू तयार करणे, कोणत्याही विषयावर अधिकारवाणीने बोलू शकणे, कोणताही विषय राजकारणावर नेऊ शकणे, वाट्टेल ते विषय व्यासपीठावर आणून वादावादी घडवून आणण्याची क्षमता असणे, अभ्यास वाढवा असे त्याच विषयातील तज्ञाला सर्वांसमोर सांगू शकणे हे व असे काही निकष आहेत जे दिसले तर तेथे मायबोलीकर आहे हे ओळखावे

फार हसू आले तर फरशीवर झोपून लोळत हसणे Rofl Rofl

अभ्यास वाढवा असे त्याच विषयातील तज्ञाला सर्वांसमोर सांगू शकणे हे.............हे पण भारीए Lol

तुमच्या घरात, आजूबाजूला वगैरे कोणाला माबो माहीत नसेल तर तुम्ही सगळ्यांशी फक्त स्पेसिफिक कामापुरते बोलताय. त्याच्या बाहेर तुम्ही संवाद साधत नाही. संवाद वाढवा. माझ्या सगळ्या नातलगात व ऑफिसात मायबोली माहीत आहे. भले ते बघत नाहीत मायबोली पण त्यांच्या कानावर पडत राहतो हा शब्द.

Pages