सध्या माझं मधल्या मध्ये मरण होतंय. वर्ष होत आलं मी एक पेईंग गेस्ट म्हणून राहतोय. लॉकडाउन सुरू व्हायच्या आधी सगळं व्यवस्थित सुरू होतं. म्हणजे आम्ही आठवड्यातून चार दिवस बहुतांशी नॉन व्हेज खातो. ज्यांच्याकडे राहतोय ते काका, काकी आणि आजी प्युअर व्हेज आहेत. त्यामुळे नेहमी व्हेज पदार्थांची देवाणघेवाण व्हायची. लॉकडाउन सुरू झालं आणि ज्यांच्याकडे राहतोय त्यांचा मुलगा त्याच्या फॅमिलीसोबत इथे राहायला आला.सून भांडखोर असून त्यांच्या घरच्यांसोबत सारखी भांडत असते. ते दोघे नॉनव्हेज खातात त्यामुळे आम्ही नॉनव्हेज काही केलं की त्यांना द्यायला सुरुवात केली. हळूहळू सून कंसिडर करू लागली की आठवड्यातून चार दिवस आम्ही त्यांना नॉनव्हेज देणारच. नॉनव्हेजचा वार असेल त्या दिवशी सारखी आमच्याकडे काही ना काही कारणास्तव येणे, स्वयंपाक रुमबाहेर फिरणे असल्या गोष्टी करायला लागली. नाही दिलं की मागून घ्यायला लागली. नॉनव्हेज केलं आणि दिलं नाही तर त्यांच्या घरच्यांसोबत भांडते आणि उपाशी राहते. एक दोनदा तर बायकोच्या मैत्रिणी आल्या होत्या त्यांच्यासमोर बायकोवर वैतागून तू नॉनव्हेज कधी देणार आहेस बोलली. तरीही आम्ही काही बोललो नाही. सहन करत राहिलो. आता ती बाई घरच्यांसोबत व्यवस्थित राहत नाही म्हणून आजी बोलतात की या बाईला नॉनव्हेज केलं की देत जाऊ नका. असं मधल्यामध्ये फसल्यासारखं झालंय.रूम सोडून दुसरीकडे जायचा विचार करतोय पण या कारणास्तव रूम सोडणे मनाला पटत नाही. काका, काकी, आजी यांच्यासोबत खूप छान नातेसंबंध जुळलेत. यातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी उपाय सुचवा.
काहीतरी उपाय सुचवा.
Submitted by आगबबूला on 20 September, 2020 - 05:17
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
माणूस बघितल्यावर लगेच लक्षात
माणूस बघितल्यावर लगेच लक्षात येत हा मायबोलीवर असेल की नाही
>>>>>
हे कसे?
स्वतंत्र धागा काढू शकतो आपण यावर. हे विधान ईंटरेस्टींग वाटले.
काय आहे जे माबोकरांना ईतरांपासून वेगळे ठरवते?
माणूस बघितल्यावर लगेच लक्षात
माणूस बघितल्यावर लगेच लक्षात येत हा मायबोलीवर असेल की नाही ते. म्हणजे कुठल्या सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहे याचा अंदाज आपल्याला लगेच येतो. >> बोकलतसाहेब हे जरा समजावुन सांगाल का.
मला उपाय सापडला...
मला उपाय सापडला...
ती बाई मायबोलीवर नाहीय ना..
मग तिला मायबोलीचे अकाउंट उघडून द्या...
मायबोलीवर बिझी होईल.. भांडायला आणि जेवण मागायला वेळ मिळणार नाही...
काय आहे जे माबोकरांना
काय आहे जे माबोकरांना ईतरांपासून वेगळे ठरवते?>>>
एक पद्धत असते, माणुस दिसल्याक्षणी सांगू शकतो असे म्हणण्याची. पण प्रत्यक्षात थोडेसे बोलावे लागते.
अमानवीय विषय काढायचा, आणि आता बंदोबस्त करायला बोकलतनाच बोलावलं पाहिजे असे म्हणायचे. समोरची व्यक्ती हसू लागली की मायबोलीकर, कोण बोकलत? असे विचारले की अमायबोलीकर.
किंवा मानव पृथ्वीकर हे नाव
किंवा मानव पृथ्वीकर हे नाव ऐकलंय का, इतकं विचारलं तरी पुरेसे आहे.
एकदा एका WhatsApp ग्रुपवर
एकदा एका WhatsApp ग्रुपवर एकाने +१ केलं तेव्हा मला तो मायबोलीवर आहे की काय अशी शंका आली.
नंतर दुसऱ्या एकीने त्याला +२ असा रिप्लाय केला तेव्हा ती मायबोलीवर असणं शक्य नाही अशी खात्रीही झाली
म्हणजे एखाद्या माणसासोबत आपण
म्हणजे एखाद्या माणसासोबत आपण बोललो की त्याच्या आवडीनिवडी आपल्याला समजतात. आजकाल सगळेच सोशल मीडियावर असतात. त्यांच्या आवडीनुसार तो कुठल्या सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहे याचा अंदाज आपण बांधू शकतो, बहुतेक वेळी समोरचा माणूसच हिंट देतो. सोशल मीडियावर वावरणारे लोक्स दोन प्रकारचे असतात एक म्हणजे जे फेसबुक, यूट्यूब, इन्स्टाग्राम यांच्या प्रभावाखाली असणारे आणि दुसरे म्हणजे साहित्य, वाचनाची आवड असणारे. पहिल्या प्रभावाखाली असणारे लोक्स शक्यतो दुसऱ्या प्रभावाखाली येत नाहीत पण दुसऱ्या प्रभावाखाली असणारे लोक्स काही प्रमाणात पहिल्या प्रभावाखाली असू शकतात.
काहीही हं बोकलत
काहीही हं बोकलत
शेजारी हे भुतांपेक्षा भारी
शेजारी हे भुतांपेक्षा भारी पडतात तर...
एका व्हाट्सएपच्या ग्रुप मध्ये
एका व्हाट्सएपच्या ग्रुप मध्ये एकाने काय रोज रोज तेच दळण दळता असे लिहिले होते..
मला शंका आहे ती मायबोलीकर आहे...
शेजारी दोन चार बारकी भुते
शेजारी दोन चार बारकी भुते सोडून बघा
दिवसभर सॉरी रात्रभर धिंगाणा घालतील
बाकी सगळी भांडणे राहतील बाजूला
नॉनव्हेज सोडा नुसते काही सुद्धा मागायला येणार नाहीत
(No subject)
रुम सोडणे हाच उपाय आहे.
.
बाकी सगळी भांडणे राहतील
बाकी सगळी भांडणे राहतील बाजूला
नॉनव्हेज सोडा नुसते काही सुद्धा मागायला येणार नाहीत>>>काहीसुद्धा म्हणजे भाडे सुद्धा मागायला येणार नाहीत,असे सुचवायचे आहे का तुम्हाला आशूचॅम्प
ऋन्मेष यांच्या सगळ्या
ऋन्मेष यांच्या सगळ्या प्रतिसादांना +१२३
काहीसुद्धा म्हणजे भाडे सुद्धा
काहीसुद्धा म्हणजे भाडे सुद्धा मागायला येणार नाहीत,असे सुचवायचे आहे का तुम्हाला आशूचॅम्प>>>
अरे हा, हे मी विसरलेलोच
ऋन्मेष यांच्या सगळ्या
ऋन्मेष यांच्या सगळ्या प्रतिसादांना +१२३
>>>>>>
धन्यवाद, असे कोणी म्हटले की मला आपलेच प्रतिसाद पुन्हा वाचायला फार आवडते
Pages