सध्या माझं मधल्या मध्ये मरण होतंय. वर्ष होत आलं मी एक पेईंग गेस्ट म्हणून राहतोय. लॉकडाउन सुरू व्हायच्या आधी सगळं व्यवस्थित सुरू होतं. म्हणजे आम्ही आठवड्यातून चार दिवस बहुतांशी नॉन व्हेज खातो. ज्यांच्याकडे राहतोय ते काका, काकी आणि आजी प्युअर व्हेज आहेत. त्यामुळे नेहमी व्हेज पदार्थांची देवाणघेवाण व्हायची. लॉकडाउन सुरू झालं आणि ज्यांच्याकडे राहतोय त्यांचा मुलगा त्याच्या फॅमिलीसोबत इथे राहायला आला.सून भांडखोर असून त्यांच्या घरच्यांसोबत सारखी भांडत असते. ते दोघे नॉनव्हेज खातात त्यामुळे आम्ही नॉनव्हेज काही केलं की त्यांना द्यायला सुरुवात केली. हळूहळू सून कंसिडर करू लागली की आठवड्यातून चार दिवस आम्ही त्यांना नॉनव्हेज देणारच. नॉनव्हेजचा वार असेल त्या दिवशी सारखी आमच्याकडे काही ना काही कारणास्तव येणे, स्वयंपाक रुमबाहेर फिरणे असल्या गोष्टी करायला लागली. नाही दिलं की मागून घ्यायला लागली. नॉनव्हेज केलं आणि दिलं नाही तर त्यांच्या घरच्यांसोबत भांडते आणि उपाशी राहते. एक दोनदा तर बायकोच्या मैत्रिणी आल्या होत्या त्यांच्यासमोर बायकोवर वैतागून तू नॉनव्हेज कधी देणार आहेस बोलली. तरीही आम्ही काही बोललो नाही. सहन करत राहिलो. आता ती बाई घरच्यांसोबत व्यवस्थित राहत नाही म्हणून आजी बोलतात की या बाईला नॉनव्हेज केलं की देत जाऊ नका. असं मधल्यामध्ये फसल्यासारखं झालंय.रूम सोडून दुसरीकडे जायचा विचार करतोय पण या कारणास्तव रूम सोडणे मनाला पटत नाही. काका, काकी, आजी यांच्यासोबत खूप छान नातेसंबंध जुळलेत. यातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी उपाय सुचवा.
काहीतरी उपाय सुचवा.
Submitted by आगबबूला on 20 September, 2020 - 05:17
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मला वाटते फक्त "नॉनव्हेजचा
मला वाटते फक्त "नॉनव्हेजचा वास येऊ न देणे" इतके केले कि तुमची समस्या मिटेल.
अधून मधून घरी घमघमाट वाली अगरबत्ती लावत जा. आणि मटण आणाल त्या दिवशी नक्की लावत जा
पेईंग गेस्ट म्हणुन नक्की कोण
पेईंग गेस्ट म्हणुन नक्की कोण रहात आहे?? बोकलत की आगबबुवा ते आधी सांगा पाहु.
बरोबर आहे..
बरोबर आहे..
आणलेले कळले नाही तर मागणार नाही...
सांगायचे, आम्ही नॉनव्हेज बंद केले.
जमालगोटा घालून द्या एकदा...
जमालगोटा घालून द्या एकदा...
(No subject)
मूळ त्या कुटुंबाने याबाबत
मूळ त्या कुटुंबाने याबाबत एकमेकांचे अंडर स्टँडिंग क्लिअर करणे गरजेचे आहे.सुनेला नॉन व्हेज इतके आवडत असेल तर बाहेरून मागवणे करता येईल.वास वगैरे वगैरे इश्यू रूम फ्रेशनर च्या जमान्यात येऊ नयेत.तसेही लसणाची चरचरीत फोडणी, उदबत्ती, कापूर,फिनेल यांचे वास अजिबात न आवडणारी आणि तरीहि कधी न कधी सहन करणारी मंडळी असतातच की.
शेजाऱ्या कडून नॉनव्हेज मिळवावे लागणे, ते न मिळाले तर ड्रग अडीक्ट सारखी तडफड,घरच्यानी शेजाऱ्याची अडवणूक करणे ही भानगडच कशाला?चांगले नॉन व्हेज पुरवणारे शोधून आठवड्यात एकदा खावे.
'तुला पाहिजे तर अमुक पत्ता देतो, त्यांना फोन कर आणि विकत घेऊन घरच्यांना सांगून त्यांच्या समोर खा'
चांगले नॉन व्हेज पुरवणारे
चांगले नॉन व्हेज पुरवणारे शोधून आठवड्यात एकदा खावे.
'तुला पाहिजे तर अमुक पत्ता देतो, त्यांना फोन कर आणि विकत घेऊन घरच्यांना सांगून त्यांच्या समोर खा'>> @मी_अनु अगदी बरोबर बोललात. काही मंडळी खूपच निर्लज्ज असतात. माझे अनुभवाचे बोल.
दारा समोर पाटी लावा.......
दारा समोर पाटी लावा.......
मांसाहारी जेवण घरपोच मिळेल. थाळी फक्त. ...../-
रेग्युलर कस्टमरला ....% डिस्काउंट मिळेल.
All cards accepted.
Paytm/Google pay/ Amazon Pay/ BHIM/ deduction from rent Accepted.
काय फरक पडतो एवढा तिला नॉनवेज
काय फरक पडतो एवढा तिला नॉनवेज खाऊ घातल्यानं! उलट नॉनवेज बनवल्यानंतर तिच्या घरच्यांना आजिबात कळू न देता तिच्या वाट्याचं तिला देत जावं. अन्नदान हे मोठं पुण्याचं काम असतं. तिच्या आत्म्याचे आशिर्वाद भविष्यात तुम्हाला कामं येतील. शुभं भवतू!
मिरजेतले घरमालक कोण आहेत ते
मिरजेतले घरमालक कोण आहेत ते सांगा, मग बंदोबस्त कसा करायचा ते सांगू>>>>>
+१
पत्ता आणि घरमालकांचे नाव सांगितल्यास अजून व्यवस्थित पर्याय सुचवता येतील.
सर्व प्रतिसाद नाही वाचले
सर्व प्रतिसाद नाही वाचले
पण सूनेला नॉनवेज का खाऊ देत नाही?
हा सासुरवास नाही तर छळ आहे. आपल्या आवडीचे अन्न खायला नाही मिळाले तर कोणीही चीडचिड करेल.
मलाही घरी कोणी सणासुदीला नॉनवेज खाऊ नकोस अशी विनंती केली तर मी ऐकतो पण मी तसे करावे हे गृहीत पकडले तर मला राग येतो.
मला नॉनवेज आवडते आणि ते मला हवे तेव्हा खायला मिळालेच पाहिजे. याबाबत मी स्वत:च्या आईबाबांचे ऐकत नाही तिथे कोणी सासूसासरयांचे का ऐकावे?
मला नॉनवेज आवडते आणि ते मला
मला नॉनवेज आवडते आणि ते मला हवे तेव्हा खायला मिळालेच पाहिजे. याबाबत मी स्वत:च्या आईबाबांचे ऐकत नाही तिथे कोणी सासूसासरयांचे का ऐकावे?>>> याला म्हणतात विषयाला फाटे फोडणे.
नाही दिलं की मागून घ्यायला लागली. नॉनव्हेज केलं आणि दिलं नाही तर त्यांच्या घरच्यांसोबत भांडते आणि उपाशी राहते. एक दोनदा तर बायकोच्या मैत्रिणी आल्या होत्या त्यांच्यासमोर बायकोवर वैतागून तू नॉनव्हेज कधी देणार आहेस बोलली. >>> ही समस्या आहे.
जमालगोटा घालून द्या एकदा...>>
जमालगोटा घालून द्या एकदा मग्?
जमालगोटा घालून द्या एकदा मग्?
अगदी!
तुम्हाला त्या घरचे आवडतात म्हणून घर सोडायचं नाहिये ना? मग त्यांच्याशी संगनमत करुन त्या सुनेला कसं हाकलता येईल ते बघा. इतक्या सासू सुनेच्या शिरेली बघुन फायदा काय मग? मला तर इतक्या कल्पना सुचताहेत म्हणून सांगू!
@ सोनाली मला ती दुय्यम समस्या
@ सोनाली मला ती दुय्यम समस्या वाटत आहे.
एका सुनेला लग्नानंतर तिच्या मनाप्रमाणे नॉनवेज खाऊ दिले जात नाहीये. हा बेसिक व्यक्तीस्वातंत्र्यावरचा घाला मला मोठी समस्या वाटत आहे.
झाले काय आहे की आपण धागा धागाकर्त्याच्या नजरेतून वाचत आहोत आणि त्या सूनेलाच फसाद की जड ठरवून मोकळे झालो आहोत.
पण एकदा तटस्थपणे वा तिच्या नजरेतून या समस्येकडे बघा. तिच्यावर अशी शेजारयाकडून वा भाडेकरूकडून नॉनवेज मागून खायची लाचार वेळ का आली असावी?
जर तिला तिच्या स्वातंत्र्यानुसार खाऊ दिले जात नसेल तर आणखीही बरीच बंधने लादली असण्याचीही शक्यता आहेच.
वर आमच्या सूनेला नॉनवेज खाऊ घालू नका असे सांगून तिचे बाहेरून सुख मिळवायचे मार्गही बंद करत आहेत.
जमालगोटा + झोपेचे औषध एका
जमालगोटा + झोपेचे औषध एका वेळीच घालून द्या हाकानाका.
ईथे जमालगोट्या वगैरे आयड्या
ईथे जमालगोट्या वगैरे आयड्या येत आहेत? सिरीअसली?
हा धागा मजामस्करी थट्टेचा आहे का?
तसे असेल तर प्लीज धागाकर्त्याने क्लीअर करावे...
कारण सिरीअस असेल तर खरेच क्रूर आणि ईनसेन्सिटीव्ह उपाय आहेत हे
एखाद्या भिकारयाने भीक मागताना आपल्या पायाशी लगट केली तरी त्याला लाथ मारून दूर सारायला जड जाते. कारण समोरच्या व्यक्तीवर ती वेळ का आली आहे हे आपल्याला नेमके माहीत नसते
मुझे काली मिरच के लड्डू और
मुझे काली मिरच के लड्डू और तुझे चिकन कबाब...
ये ले घोडे का जुलाब..
इसे खाके अच्छे अच्छे घोडे डाउन होते है साले...
खाने को तरसेगा डॉक्टर...
मला ती दुय्यम समस्या वाटत आहे
मला ती दुय्यम समस्या वाटत आहे.>>> कोणाची दुय्यम समस्या?
आगबबूला यांनी प्रश्न विचारला आहे ना .. तर त्यांनी काय करायला हवे यावर फोकस नको का?
झाले काय आहे की आपण धागा धागाकर्त्याच्या नजरेतून वाचत आहोत आणि त्या सूनेलाच फसाद की जड ठरवून मोकळे झालो आहोत.>>> हो मग? त्या सूनेने तिची समस्या इथे मांडू दे मग आपण तिलाही मदत करू, सल्ले देऊ.
एखाद्या भिकारयाने भीक मागताना आपल्या पायाशी लगट केली तरी त्याला लाथ मारून दूर सारायला जड जाते. कारण समोरच्या व्यक्तीवर ती वेळ का आली आहे हे आपल्याला नेमके माहीत नसते>> बरोबर आहे. मग त्याच्यावर दया करून त्याला भीक दिल्यावर तुम्ही त्याला रोज भीक द्यायलाच पाहीजे अशी तो मागणी करू लागला तर चालेल का? तेही करा. पण कधी भीक दिली नाही तर तो दारात येऊन शिव्या द्यायला लागेल तेव्हा काय करणार? तेव्हा तुमचे अंतःकरण जड होते का ते सांगा.
ती सून कशी आहे हे आपल्याला माहीत नाही. तिच्या घरच्यांशी ती कशी वागते माहीत नाही. तिला नॅानव्हेज खाऊ दिले जात नसले तरी तिने आगबबूला यांच्या (त्यांच्या(म्हणजे आगबबूला यांच्या) ईच्छेविरूद्ध) जेवणावर डल्ला मारणे चूकीचेच आहे.
आजी बोलतात की या बाईला
आजी बोलतात की या बाईला नॉनव्हेज केलं की देत जाऊ नका. >> तुम्हीपण "नाहीच देत आम्ही, तुम्हाला खाल्लं असं बोलली का ती? तुम्ही चिडता, म्हणून चिडवते ती. नायतर काकू इतका छान सैपाक करते तर आमच्याकडे कशाला खाईल? खा म्हणलं तरी खात नाही" म्हणा. सून तुमच्याकडे जेवत असताना थोडीच बघायला येतात आजी. संपला विषय....
>> Paytm/Google pay/ Amazon
>> Paytm/Google pay/ Amazon Pay/ BHIM/ deduction from rent Accepted.
>> त्यांच्या घरचेच बोलताहेत
>> त्यांच्या घरचेच बोलताहेत देऊ नका कारण ते देवपूजा खूप कडक पाळतात, आणि ही बया मागायला येते. त्यामुळे सगळा तणाव निर्माण झालाय.
>> आधी खायचे, अलीकडे सोडलंय त्यांनी. आमची रूम तशी अलिप्त असल्याने चालतं त्यांना. कधीतरी क्वचित त्यांना पण द्यायचो. खातात ते
>> ती बाई घरच्यांसोबत व्यवस्थित राहत नाही म्हणून आजी बोलतात की या बाईला नॉनव्हेज केलं की देत जाऊ नका
या तीन विधानांवरून लक्षात येते कि "त्यांच्या घरी देवपूजा कडक पाळतात म्हणून चालत नाही" या मुद्द्यापेक्षा "तिला शिक्षा म्हणून खाऊ दिले जात नाही" हा वास्तविक मुद्दा आहे. हे खरेच गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर ऋन्मेऽऽष यांचे प्रतिसाद पटत आहेत. एखाद्या व्यक्तीचे अत्यंत आवडीचे खाणे शक्य असतानाही त्यांस केवळ शिक्षा म्हणून खाऊ न देणे हा अमानुषपणा आहे. पण हा त्यांचा कौटुंबिक मामला असल्याने दुर्दैवाने आपण (बोकलत) काही करू शकत नाही. कारण "अमानुष" म्हटले कि कायदा मदतीला यायला हवा. आणि आपल्या कायद्याच्या दृष्टीने हा इतका गंभीर मामला नाहीये.
१. एक तर सुनेने स्वत:च्या मनाची समजूत घालायला हवी कि त्या खाण्यावर आपला हक्क नाही. तिचा नवरा सुद्धा नॉनव्हेज खाणारा आहे, त्यालाही इच्छा होत असेल. पण तो असे करतो का, हे तिला कळायला हवे. खायचे असेल तर दोघे अधूनमधून बाहेर जाऊन खाऊ शकतात.
२. उगीच नाहक समस्या निर्माण होतात म्हणून बोकलत यांनी घरी नॉनव्हेज करून खाणे थोडे दिवस बंद करायला हवे. बाहेर खाणे उत्तम (घरच्यासारखी चव येणार नाही पण नाईलाज आहे). किंबहुना त्यांना देणे शक्य आहे अशा वेळीच क्वचित आणणे. आफ्टर ऑल हि इज अल्सो पार्ट ऑफ द फ्यामिली बीइंग पेइंग गेस्ट.
ऋन्मेष चे प्रतिसाद योग्य वाटत
ऋन्मेष चे प्रतिसाद योग्य वाटत आहेत.
बोकलत यांनी समस्या मांडली आहे म्हणून सुनेच्या विरुद्ध उपाय सांगणे आणि सून ने मायबोलीवर विचारू दे मग तिला सल्ले देऊ हे पटले नाही.
सासू खाष्ट आहे का हे बोकलत यांना कधीही कळणार नाही कारण लोक बाहेर जसे वागतात घरात तशा असतील असे नाही.
खाऊ दे की सुनेला. आणि सून एकटी नाही तिचा नवरा पण खातोय.
मी असतो सगळ्यांना एकत्र बसवले असते आणि चर्चा केली असती. काय तो सोक्षमोक्ष लावा.मला कशाला टेन्शन? तुम्ही ठरवून सांगा.
२. उगीच नाहक समस्या निर्माण
२. उगीच नाहक समस्या निर्माण होतात म्हणून बोकलत यांनी घरी नॉनव्हेज करून खाणे थोडे दिवस बंद करायला हवे. >>
मराठीत ह्याला एक म्हण आहे- कुणाची म्हैस कुणाला उठ-बैस... म्हणजे भलत्या लोकासाठी आपल्याला त्रास. घरभाडे कमी केले तर मात्र खाणे बंद करायला हरकत नाही
.
ऋन्मेश +१
ऋन्मेश +१
प्रौढ सुनेने काय खावे हे इतरांनी ठरवणे खरंच लाजिरवाणे आहे .
या तीन विधानांवरून लक्षात
या तीन विधानांवरून लक्षात येते कि "त्यांच्या घरी देवपूजा कडक पाळतात म्हणून चालत नाही" या मुद्द्यापेक्षा "तिला शिक्षा म्हणून खाऊ दिले जात नाही" हा वास्तविक मुद्दा आहे.>>>> सहमत. त्यांच्या घरी पुर्णतः बंदी आहे असं नाही तेसुद्धा महिन्या दिडमहिन्यातून एकदा करतात. याव्यतिरिक्त बाहेर जाऊन खायची मुभा आहे त्यांना आणि खतातही. घरी कुठल्याही कामाला मदत करत नाही आणि विनाकारण वाद घालते त्यामुळे सगळे वैतागलेत तिच्यावर अगदी नवरापण. आठवड्यातून एकदा फालतू कारणावरून भांडण असतं.
ऋन्मेष यांची बाजू बघितली तर
ऋन्मेष यांची बाजू बघितली तर खरी चूक सूनेची नसून तिच्या नवर्याची आहे. आपल्या बायकोला दुसर्याकडून जेवण मागून आणावे लागते यात गैर वाटतच नाही. वरुन तोही फुकट मिळत आहे म्हणून खातोय. एखादा असता तर बायकोला बाहेर नेवून हॉटेलमध्ये खाल्ले असते त्याच्या आईवडिलांना कळू न देता. तोच फुकटा असेल आणि भीक मागायला बायकोला पुढे करत असेल. सासूबाई फक्त सूनेचेच कसे नाव सांगते आपला लेकपण फुकट मिळत आहे म्हणून खातोय हे एका घरात राहून माहित नाही का. पूर्वी खात होते म्हणजे त्यांना नाॅनव्हेज चा खर्च माहिती असावा. अशी कंजूस लोक निर्लज्ज असतात. सूनेची बदनामी हा अजेंडा दिसतो आहे.
तुम्हीपण "नाहीच देत आम्ही,
तुम्हीपण "नाहीच देत आम्ही, तुम्हाला खाल्लं असं बोलली का ती? तुम्ही चिडता, म्हणून चिडवते ती.>>>> कालचीच गोष्ट. आजी बोलल्या नॉनव्हेज देऊ नको, मग आम्ही देत नाही म्हणून हिने त्यांच्या घरी वाद घातला आणि आमच्याकडे मागायला आली. आम्ही दिल्यावर ही त्यांच्या घरी जेवता जेवताच बायकोला जोरात बोलली छान झालंय नॉनव्हेज. हा त्यांच्या घरातल्याना टोमणा होता. विनाकारण आम्ही वाईट होतोय.
एक तर सुनेने स्वत:च्या मनाची
एक तर सुनेने स्वत:च्या मनाची समजूत घालायला हवी कि त्या खाण्यावर आपला हक्क नाही. तिचा नवरा सुद्धा नॉनव्हेज खाणारा आहे, त्यालाही इच्छा होत असेल. पण तो असे करतो का, हे तिला कळायला हवे. खायचे असेल तर दोघे अधूनमधून बाहेर जाऊन खाऊ शकतात.>>+१
त्यांच्या घरी पुर्णतः बंदी आहे असं नाही तेसुद्धा महिन्या दिडमहिन्यातून एकदा करतात. याव्यतिरिक्त बाहेर जाऊन खायची मुभा आहे त्यांना आणि खतातही.>>याचा अर्थ तिने खाऊच नये असे नाही.
मग तुम्हाला तिला नॅानव्हेज द्यायचे आहे कि नाही? कि तुम्हालाही तिचा राग येतो त्यामुळे द्यावेसे वाटत नाही.
त्यांच्या घरी पुर्णतः बंदी
त्यांच्या घरी पुर्णतः बंदी आहे असं नाही तेसुद्धा महिन्या दिडमहिन्यातून एकदा करतात... हे प्रतिसादाला वाक्य
आणि
ज्यांच्याकडे राहतोय ते काका, काकी आणि आजी प्युअर व्हेज आहेत. .........हे धाग्यातले वाक्य.नेमके काय खरं य ते आधी ठरवा.
आधी तुम्ही कोण आहात ते क्लीअर
आधी तुम्ही कोण आहात ते ठरवा
आगबबूला कि बोकलत ??
Pages