पौष्टिक केक

Submitted by नादिशा on 17 September, 2020 - 11:02
घरातील गोष्टी वापरून केक

माझ्या मुलाला केक खूप आवडतो . पण सारखा मैदा पोटात जाणे चांगले नाही , त्यामुळे मी गव्हाचे पीठ वापरून त्याला जेव्हा हवा तेव्हा केक बनवून देते . माझी आई या पद्धतीने आम्ही लहान असताना रव्याचा केक बनवायची . मी तसा बनवला , तो त्याला आवडला नाही . "वेगळेच लागतेय ", ही त्याची प्रतिक्रिया होती . मग मी रव्याऐवजी गव्हाचे पीठ वापरले , तो केक आवडला त्याला . आता मी नेहमीच तसाच केक बनवते . त्याची साहित्य -कृती शेअर करते आहे :-

साहित्य - 1 वाटी गव्हाचे पीठ.
1/2 वाटी साखर
1/2 वाटी दूध
1/4 वाटी तेल
1 चमचा इनो
आवडीनुसार खायचा रंग
आवडीनुसार इसेन्स

कृती - 1)कुकर ची शिटी काढून त्यात एक भांडे ठेवावे आणि
झाकण लावून तो pre -heat करायला ठेवणे .
2) अल्युमिनिअम च्या पातेल्याला आतून तेल लावून
घेणे, त्यावर गव्हाचे पीठ भुरभुरून सगळ्या बाजूंनी
नीट कोटिंग करून घेणे .
3) एका मोठ्या बाउल मध्ये दूध आणि साखर नीट
mix करून घेणे .
4) त्यात तेल घालून पुन्हा नीट mix करणे .
5) आवडीप्रमाणे खायचा रंग आणि इसेन्स घालणे .
पुन्हा mix करून घेणे .
6) त्यात बारीक चाळणीने चालून घेतलेले गव्हाचे पीठ
टाकून छान mix करणे .
7) 1 चमचा इनो टाकणे, त्याचा फेस व्हावा , यासाठी
त्यावर 1 चमचा पाणी /दूध घालणे . फसफसले, की
पटकन एकजीव करून लगेच ग्रीसिंग करून तयार
ठेवलेल्या पातेल्यात ओतणे .
8) पातेले हळूच आपटणे , म्हणजे एअर निघून जाते
आणि केक छान फुगतो .
9) वेळ न घालवता कुकर मधील भांड्यावर हे पातेले
ठेवणे . झाकण बंद करणे .
10) 5 मिनिट मोठ्या आचेवर ठेवून मग 25 मिनिट मंद
आचेवर केक भाजणे.
11) अर्ध्या तासामध्ये केक तय्यार !

एरव्ही मी असाच नुसता बेस बनवून देते त्याला . आज सजवून हवा होता त्याला . घरात काहीच नव्हते . शेवटी थोडा तुपाचा हात लावला वरून . आणि शिल्लक असलेली चॉकोलेट
शेव (स्वयमच्या भाषेत ) भुरभूरली. चेरीचे फूल बनवले . आणि बाळराजेंची फर्माईश पूर्ण केली.

20200912_193053.jpg

मागच्या आठवड्यात बनवलेला केक

20200819_092946_0.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाककृती लिहण्यासाठी कृपया "पाककृती" हा लेखन प्रकार वापरा. तुम्ही "लेखनाचा धागा" वापरला आहे. "पाककृती" लिहण्याचा मोठा फायदा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारामधे त्याचे आपोआप वर्गीकरण होते. उदा. "शाकाहारी का मासाहारी" , भारतीय का इतर देशीय. आणि इतराना शोधायला सोपे जाते. लेखनाचा धागे त्यात दिसणार नाही.
हे पहा. https://www.maayboli.com/node/2548/by-subject

20200908_091858.jpg

मागच्या महिन्यात बनवला होता, तेव्हा चॉकलेट सिरप शिल्लक होता घरात. त्याचे coating करून दिले वरच्या side ला. मग स्वतः ला हवे तसे सजवले स्वयमने स्वतः च्या हाताने .

केक छान दिसत आहेत सगळे पण तुम्ही बेकिन्ग पावडर वापरली नाही का?

Ok. मला माहिती नव्हते. आता change करू शकते का मी असा>>> अस कस? (स्पर्धेसाठी नसलेले )२-३ मोदक पाकक्रुती टाकल्या होत्या की तुम्ही, असो नविन असल्यावर होत अस

प्रतिसादाबद्दल थँक्स प्राजक्ता, अस्मिता, किशोर.
प्राजक्ता, एरव्ही सोडा -बेकिंग पावडर दोन्ही वापरावे लागते ना, त्या ऐवजी फक्त इनो घातला आहे.
मागे मी मोदक पाककृती दिल्या होत्या ना, तेव्हा माझे ललितलेखन चे सदस्यत्व होते फक्त, त्यामुळे त्या ललितलेखन मध्ये दिल्या होत्या. इतरांच्या सूचनेनुसार मग त्या पाककला विभागात हलवल्या. मग सदस्यत्व घेतले त्या विभागाचे. पण तेव्हाही "लेखनाचा धागा "मध्येच लिहिले होते. त्याबद्दल काही सूचना नव्हती मिळाली, त्यामुळे लक्षात नाही आले आणि काल ही त्यातच लिहिले. आता इथून पुढे "पाककृती "मध्येच लिहीन.

काही फरक नाही पडणार DJ. वापरू शकता तुम्ही तेला ऐवजी तूप सुद्धा. फक्त तूप वितळवलेले घ्यावे लागेल. घट्ट घेतले तर प्रमाण चुकेल आणि केक बिघडू शकतो.

मस्त दिसतोय केक.
मैद्या पेक्षा चांगला, पण हा पौष्टिक कसा?

मैदा काढला की जरा “बरा” म्हणू शकतो, पण अजुन “साखर हि वाईट” हा कन्सेप्ट लोकांना स्विकारायला वेळ आहे. असो. प्रत्येकाचा चॉंस आहे.
खायचा रंग सुद्धा वाईटच लहान मुलांना.. पण परत दिसणे महत्वाचे आहे फूड ईडंस्ट्री मध्ये सुद्धा.
—-
नादिशा हे तुम्हाला उद्देशून नाही आहे, एक निरिक्षण लिहिलेय.

>>परत दिसणे महत्वाचे आहे फूड ईडंस्ट्री मध्ये सुद्धा
Rofl

मला फोटो आवडले. केक मी स्वतः खाऊ (च) शकत नाही सो.......... Sad

रेसिपी म्हणुन ही रेसिपी चांगली च आहे. पण मैदा, रवा आणि चाळुन घेतलेली कणिक ह्या तिन्ही गोष्टींच्या गुणवत्तेत (nutrition value) फारसा फरक नाही. तुम्ही कणिक चाळुन घेता म्हणजे त्यातिल कोंडा वेगळा काढता ज्यात फायबर आणि जीवनसत्त्वे असतात.

झम्पी, साखरे ऐवजी गूळ पण वापरू शकतो आपण. तसाही बनवते मी. पण त्या दिवशी साखरेचा बनवला होता, म्हणून साखरेच्या केकचेच फोटो टाकले. खाण्याचा रंग तब्येतीला वाईट, हेही बरोबर आहे. पण लहान मुलांसाठी खाण्याच्या गोष्टी बनवताना त्यांना तो दिसायला आकर्षक वाटला पाहिजे, हा पाहिला criteria असतो आजकाल, काय करणार?
आणि ही रोजरोज खाण्याची गोष्ट नाही, महिन्यातून एखादेवेळी चालू शकतो तो चिमूटभर रंग. घरच्याघरी स्वच्छतेची काळजी घेऊन बनवला केक. बनवताना साखर घातली, रंग घातला, तो आकर्षक आणि चविष्ट बनवला. पण त्यामुळे बाहेरचा केक आणण्याचा हट्ट वाचला ना त्याचा.
पर्णीका, चाळल्यामुळे कोंडा जातो, परिणामी जीवनसत्वे -फायबर वाया जाते, हे 100% खरे आहे. त्यामुळे रोजचा स्वयंपाक, अगदी पुरणपोळी करतानाही मी कधीच पीठ चाळत नाही. पण केक मात्र मैद्याचा बनवू दे, किंवा गव्हाच्या पिठाचा, ते चाळून घेते. सोडा, बेकिंग पावडर घातले, तर तेही चाळून घेते. कारण त्यामुळे केक छान फुगतो आणि छान spongy होतो, असा माझा तरी अनुभव आहे. एखादेवेळी न चाळता घातले, तरी लगेच केक च्या फुगण्यामध्ये मला फरक जाणवला आहे. अर्थात हा माझा वैयक्तिक अनुभव आहे.

चाळून परत कोंडा त्यातच घातला तरी चालतो. चाळल्यामुळे हवा मिसळली जाते, बेकिंग पावडर घालून चाळल्यामुळे ती चांगली मिक्स होते आणि त्यामुळे केक हलका होतो. दोनतीन वेळा चाळायचं. (संदर्भ - कांचन बापट यांचं पाककृतींंचं पुस्तक)

केक. छान दिसतोय...
# असाच गहू पीठ आणि गूळ हे मिश्रण वापरून पण छान केक ,घरच्या घरी तयार केलेला मी...
## दही वाटीभर + तेवढंच गूळ + थोडेसे तेल, असे एकदम स्मूथ मिश्रण करून घ्यावे....गूळ किसलेला घ्यावा...त्यात वाटीभर कणीक, ( गहू पीठ ) घालावे...ढवळत रहावे...एकजीव मिश्रण झाले की ईनो / बेकिंग पावडर अर्धा चमचा घालायचं...१/२ मिनिटे फेटून लगेच कूकर / केक पॉट मध्ये, नेहमीप्रमाणे ,बेक करावे...
## flavour साठी मी वेलचीपूड, जायफळ पूड आणि सजावटीसाठी ड्राय फ्रूट चे काप घातले होते...
## मिश्रण ड्राय वाटल्यास, १/२ चमचे दूध घालायचे...
# पोष्टिक केक तयार...

केक. छान दिसतोय...
# असाच गहू पीठ आणि गूळ हे मिश्रण वापरून पण छान केक ,घरच्या घरी तयार केलेला मी...
## दही वाटीभर + तेवढंच गूळ + थोडेसे तेल, असे एकदम स्मूथ मिश्रण करून घ्यावे....गूळ किसलेला घ्यावा...त्यात वाटीभर कणीक, ( गहू पीठ ) घालावे...ढवळत रहावे...एकजीव मिश्रण झाले की ईनो / बेकिंग पावडर अर्धा चमचा घालायचं...१/२ मिनिटे फेटून लगेच कूकर / केक पॉट मध्ये, नेहमीप्रमाणे ,बेक करावे...
## flavour साठी मी वेलचीपूड, जायफळ पूड आणि सजावटीसाठी ड्राय फ्रूट चे काप घातले होते...
## मिश्रण ड्राय वाटल्यास, १/२ चमचे दूध घालायचे...
# पोष्टिक केक तयार...

कणिक गूळ वगैरे वापरून जो केक होतो तो दिसतो ठीक पण त्याला चव नसते केकची. त्यापेक्षा गुळ घालून कणकेचा शिरा करावा सरळ. केक करायचा तर केकसारखा करावा. तो कशाला पौष्टिक करायचा? रोज कुठे करतात केक? हेमावैम.

थँक्स मृणालिनी आणि मुक्ता.
Same pinch मुक्ता. मी पण गुळाचा करताना तुमच्या सारखाच करते. फक्त फ्लेवर साठी इसेन्स घालते. कधी गुळाचा, कधी साखरेचा. पण वेगवेगळे खायचे रंग आणि इसेन्स घालते. साधेसेच पण काहीतरी डेकोरेशन करते साहित्य वापरून. त्यामुळे वेगवेगळी variety होते दरवेळी. चव छान, रंग छान आणि डेकोरेशन.. त्यामुळे बच्चा कंपनी खुश असते अगदी !