तुम्हास कुठल्या माबो आयडीधारकाचे वय किती आहे असे वाटते? गेस करा पाहू.
आपल्याला कल्पना येईल आपल्याला लोक किती तरुण किंवा किती वयस्क समजतात ते!
वय गेस करतान तेवढे वय का वाटते, हे लिहिणे ऑप्शनल आहे.
आणि हे सर्व खेळमेळीनेच घ्याल यात शंका नाही.
चला तर मग.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
धाग्यावर आलेल्या प्रतिसादांचा सखोल अभ्यास करुन त्यावर चिंतन करुन मी_अस्मिता यांनी हा "वय धोरण अहवाल" सादर केला:
दिवेलागणीचा अहवाल 
मायबोलीकर आयडींचा सही पकडे है का नक्कीच .... वय धोरण अहवाल
धोरणाचाच अहवाल कारण वयाबाबत अजूनही खात्री नाही ( काही प्रामाणिक लोकं सोडून)
कोणे ऐकेकाळी ( तीन दिवसांपूर्वी ) मानवकाका यांना स्वतःचे वय अवघे त्रेपण असूनही वय २२ ते ५२ मधले मायबोलीकर ताई दादा यांनी काका काका केल्याने मनाला अतिशय उद्विग्नता येऊन त्यांनी हा धागा काढून काय तो सोक्षमोक्ष करायचा ठरवला पण हे गुपित गुपितच राहू द्यायचे असल्याने वरवर ' विरंगुळा' नाव दिले. पण अंतस्थ हेतू मला कळलाच .... दिवे घ्या मानव दादा ..
१. सगळ्या मंडळींना सुशांत केस चा घोर कंटाळा व गणेशोत्सव नंतर आलेला रिकामपणा यामुळे आयते कोलीत मिळाले.
२. तायाबायांना तर हळदीकुंकू टाईप मजा आली तेही पार्लरचा खर्च वाचून म्हणून त्यांचा पाय निघता निघेना. ( मीही यातच
)
३. जेम्स बॉन्ड दादा केवळ आयडी प्रमाणे सत्यान्वेशी वाटले बाकी सगळ्यांना फक्त खेळून मजा घ्यायची होती.
घ्या आणि माझा राग राग करू नका.
४. मानव दादांनी सहजासहजी उत्तर सांगितले असते तर गुपित उघड झाले असते म्हणून आपणही खेळतच आहोत असेच दाखवत तिनशे प्रतिसादापर्यंत कळ काढली.
५. इथून पुढे वचपा म्हणून जे अध्यात्मिक लिहीत नाहीत त्यांच्या वयात मी +१० भर घालणारे.
६. बऱ्याच जणांनी मिळतंय तर पदरात पाडून घ्या या विचाराने त्यातल्या त्यात बरे वय माझे असे सांगितले.
७. उघड उघड भ्रष्टाचार झालेला म्या पाहिला यासाठी चोकलेट व पार्टी ट्रीट याची लालूच दाखवण्यात आली. व न जमल्यास चोकलेट परत घेतले, पार्टी आहे समजून आलेल्यांच्या तोंडावर दार बंद करण्यात आले.
८. काही तायाबायांना चिकणी चमेली ते 'दादी अम्मा दादी अम्मा मान जाओ' हा जीवनप्रवास क्षणात पहायला मिळाला.
९. काही दादालोकांना कुणीकडून पोटच्या गोळ्या कडून बुकमार्क करून घेतला असे झाले कारण क्षणात त्यांचाही रणबीर कपूर चा जन्माचा अलोक नाथ झाला.
माझेही तसेच पोराने एवढे घाण हस्तलेखन केले आहे तिकडे तर नंबर येणारच नाही पण इकडे ही स्वेच्छा निव्रुत्ती घ्यावी लागली. किती ती लुज लुज सिच्युएशन ....
१०. इथे च माझे आणि अमितव यांचे एकाच वेळेस मैत्री/शत्रुत्व झाले .
त्यांना मी सदतीस वेळा अडतीस म्हणूनही माझ्या वयाबाबत ४५+ वर अडून बसले. वर घासाघीस करायला तयार होईनात दादा , मगं मी अन्जुताई आणि VB यांच्या रिक्षात बसले. त्यांनाही मंजुताई यांची सवारी मिळाली.
याचा बदला म्हणून मी त्यांना बावन केले तर 'पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा ' म्हणू लागले ...पण नाही भजन वदवून घेतले तर नावाची .... नाही.
११. संशोधक अतिशय लहान निघाले. इतक्या लहानपणी संशोधन केल्याबद्दल अभिनंदन , पाहिलं नं कसं आहे जग ....
१२. बऱ्याच जणांनी खरीखुरी उत्तरे दिली त्यांचे ही कौतुक.
१३. बऱ्याच जणांनी विपू खणून जुने संदर्भ आठवून उणे दुणे काढले. हा भोचकपणा आहे की उत्तम स्मरणशक्ती मलाही कळत नाही.. मीही त्यातलीच.
१४. एकुणच मला आम्ही जातो डिस्कोला तुम्ही जा काठी घ्यायला ही व्रुत्ती दिसल्याने अत्यंत खेद वगैरे काही झाला नाही. एवढ्या तेवढ्यात खेद होणारे सशाचे काळीज घेऊन मायबोलीवर इतकी वर्ष जिवंत रहाता तरी येईल का 
१५. मी खरोखरच तरुण असूनही मी ज्यांना साथ दिली त्यांनी मला वार्धक्य दिले , हे लक्षात ठेवू का ?

१६. काही लोकं आपल्या वयाचा अदांज इतरांना येतोय हे लक्षात यायला लागले की गायब होऊन इकडे तिकडे हिंडून परत येऊन कमी झाले आहे का याची वाट बघत , कळ सोसायचे मगं कमी झाले की आत्ताच तर आलो दाखवायचे. 
१७. बऱ्याच जणांनी आपले वय मूळ वयाच्या जितके वजा तितके खूष होऊन दाखवले. पण हा आनंद निखळ निर्मळ वगैरे नसून विकृतीची छटा
असलेला 'मोगँबो खूष हुवा' सारखा होता हे मला लगेच लक्षात आले , पण नव्या मित्र मैत्रीणींसाठी कुठे अँसिडमध्ये उडी घ्या म्हणून मी त्यांच्या कलाकलाने घेतले. एकिकडे पार्टी व दुसरीकडे अँसिड असताना कुणीही गरीब व्यक्ती काय निवडणार !! (मी यातच पण दोन्हीबाजूने)
१८. जेम्स बॉन्ड
यांनी वारंवार सत्याची आठवण करून दिली त्यासाठी त्यांनी sarcasm असणारे बरेच प्रतिसाद दिले पण सत्य हवं होतं कुणाला उलट सत्याचे बिंग/बिंगो फुटू नये म्हणून तर कसरत चालली होती. 
१९.
संशोधक आणि इतर तान्ह्या आयडींना बघून मला " ये किसका बच्चा है भई झाले " पण बाळ"कडू" घेण्यासाठी मायबोलीही योग्य जागा आहे हे आठवून मी शांत झाले. मी त्यांना तेहतीस म्हणाले तर त्यांनी काळानिळा इमोजी पाठवला , या तेहतीस आकड्यावर इथे किती लोक पार्टी देत आहेत हा सकारात्मक दृष्टिकोण ठेव , बाळ संशोधका

२०.
काही मित्र आयडींच्या अपेक्षेपेक्षा अधिक वयामुळे मला मानसिक धक्का पोचला आहे पण काही आयडी लहान निघाल्याने त्याही बाजूने धक्का बसल्याने मी कुठेही पडले नाही.
२१.
मानवदादा यांना 'काका काका' म्हणून ते खरंच कुणाचे काकबळी होते व त्यांना नक्की कुणी 'मामा' बनवले आहे हे कळले असेलच...
एकुणच 'काका मला वाचवा' नंतर 'काका (शब्दापासून) मला वाचवा ' याने इतिहासाची पुनरावृत्ती होते हे पुन्हा एकदा अधोरेखित केले.
धन्यवाद मानव , it was a killer !! 

Submitted by मी_अस्मिता on 16 September, 2020 - 20:40
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रतिसाद संख्या असे लिहा. इथे
प्रतिसाद संख्या असे लिहा. इथे पशुपत यांच्या वयाचे अंदाज सुरु आहेत
(No subject)
मी चक्रावून गेलो ना !
मी चक्रावून गेलो ना !
टाइपो म्हणावे तर 9 , 90 हेही जुळेना !
पशुपत 58
पशुपत 58
बापरे काय ही चर्चा
बापरे काय ही चर्चा
कुणी तरी , आतापर्यंत अंदाज
कुणी तरी , आतापर्यंत अंदाज करून ओळखलेली आणि बरोबर निघालेली वयांची यादी द्या ना !
एवढं कोण लक्षात ठेवणार?
एवढं कोण लक्षात ठेवणार?
ओळखण्या पेक्षा कुणाला आपलं वय किती वाटते याच्या गमतीसाठी धागा आहे हा.
हो तेच ना, मी तर सगळ्यांची
हो तेच ना, मी तर सगळ्यांची वयं विसरून पण गेले
( including me
)
तेही खरंच्...
तेही खरंच्...
मी तर सगळ्यांची वयं विसरून पण
मी तर सगळ्यांची वयं विसरून पण गेले
मी पण
मागे WhatsApp वर एक
मागे WhatsApp वर एक प्रश्नावली फोफावली होती , ज्याच्या उत्तरांवरून मानसिक वय वर्तवले जाते...
त्याने मला २४ वर्षाचे ठरविले होते..जे की मी पक्कं लक्षात ठेवले आहे..
मग मनाचं तारुण्यच महत्वाचं.
मग मनाचं तारुण्यच महत्वाचं. जे तुमच्याकडे आहे.
इथे पण ऋन्मेषचा एक तसा धागा आहे बघा.
तरुण वयात प्रौढ दिसावं अशी
कशी गंमत आहे ना !
तरुण वयात प्रौढ दिसावं अशी धडपड असायची, विशेषत: नोकरीच्या ठिकाणी (अनुभवी आहोत असं ठसवण्यासाठी) ,
आणि प्रौढ वयात तरुण दिसण्यासाठी प्रयत्न !
तरुण वयात प्रौढ दिसावं अशी
तरुण वयात प्रौढ दिसावं अशी धडपड असायची, विशेषत: नोकरीच्या ठिकाणी
>>> आयटी नसावे बहुतेक.. आयटी मध्ये यंग दिसण्यावर जास्त भर देतात... crowd तसा असतो ना
हा तर एक वेगळ्या धाग्याचा
हा तर एक वेगळ्या धाग्याचा विषय आहे...
आजकाल अनुभवी असणं हे अवगुण असल्यात जमा झालंय...
पण एक गोष्ट तितकीच महत्त्वाची आहे...AI चा डोलारा ज्या database च्या खांद्यावर उभा आहे तो इतर काही नसून "जगाचा एकत्रित अनुभव" च् आहे .
<<< आयटी नसावे बहुतेक.. आयटी
<<< आयटी नसावे बहुतेक.. आयटी मध्ये यंग दिसण्यावर जास्त भर देतात... crowd तसा असतो ना >>> फक्त आयटी नाही, हल्ली सगळीकडे तरुण अन स्मार्ट दिसण्याला महत्व आहे.
९०० म्हणजे काहीच नाही.
९०० म्हणजे काहीच नाही. सगळ्यात मोठा आकडा तर मीच लावलाय.
फक्त आयटी नाही, हल्ली सगळीकडे
फक्त आयटी नाही, हल्ली सगळीकडे तरुण अन स्मार्ट दिसण्याला महत्व आहे.>>>>>
हल्ली नोकरीच्या जाहिरातीत 20 वर्षांचा अनुभव मागतात आणि वय तिशीत असावे ही अपेक्षा ठेवतात
हल्ली नोकरीच्या जाहिरातीत 20
हल्ली नोकरीच्या जाहिरातीत 20 वर्षांचा अनुभव मागतात आणि वय तिशीत असावे ही अपेक्षा ठेवतात >>>
यायाब्वरुन एक गंमत आठवली.
यायाब्वरुन एक गंमत आठवली. परवाच आमच्या फिल्ड मधली जाहीरात पाहिली. त्यात एका स्किल चा ७ वर्षाचा अनुभव पाहिजे होता आणि ते स्किलच ५ वर्षापूर्वी जगात जन्माला आलंय.
या कंपनी नोकर्या जाहीरातींचं नव्याने मुली बघायला लागलेल्या मुलांसारखं असतं. 'सुंदर, सुशील, शिकलेली,लांब केसांची, गृहकृत्यदक्ष, चांगली कूक, चांगले नृत्य कौशल्य येणारी, शिवणकाम येणारी,राजमाची ट्रेक करता येणारी, प्रसंगी मधुर आवाजात गाणे गाता येणारी बायको हवी'. आणि मग अश्या १०-१२ मुली पाहून पेशन्स संपत आल्यावर 'बायको हवी, धडधाकट, बोलता येणारी, कुकर लावता येणारी चालेल' असा क्रायटेरिया बदल आपोआप होतो
अनु
अनु
अनु
अनु
(No subject)
हे एकच क्षेत्र आहे जिथे
हे एकच क्षेत्र आहे जिथे 'अनुभव" नसणे हे महत्वाचे qualification असते...
पशुपत
पशुपत
अनु , आणि मुलांबद्दलच्या
अनु , आणि मुलांबद्दलच्या अपेक्षा ?
Tall-Dark-Handsome , 6-8 abs-pack, घरासाफठी वेळ देणारा, कोणतेही व्यसन नसलेला , हसरा , एकटा शहरात रहाणारा , 2 BHK चा मालक , कमीत कमी WRV बाळगून असलेला, शक्यतो बहीण नसलेला , परदेशी जाण्याची शक्यता नसलेला , पूर्वी चे अफेअर नसलेला, स्वयंपाकात निपुण , हॉटेलिंग आवडणारा , क्रिकेट मधे बिलकुल इंट्रेस्ट नलेला , शॉपिंग आवडणारा.......
हुश्श ....
हो हो.फेमिनिस्ट कोनातून
हो हो.फेमिनिस्ट कोनातून लिहिलेले नाहोय
मूळ उद्देश उपमा हा होता
Tall-Dark-Handsome , 6-8 abs
Tall-Dark-Handsome , 6-8 abs-pack, घरासाफठी वेळ देणारा, कोणतेही व्यसन नसलेला , हसरा , एकटा शहरात रहाणारा , 2 BHK चा मालक , कमीत कमी WRV बाळगून असलेला, शक्यतो बहीण नसलेला , परदेशी जाण्याची शक्यता नसलेला , पूर्वी चे अफेअर नसलेला, स्वयंपाकात निपुण , हॉटेलिंग आवडणारा , क्रिकेट मधे बिलकुल इंट्रेस्ट नलेला , शॉपिंग आवडणारा.......>>>>
गैरसमज नको..
अनु , गैरसमज नको..
मला इतकच सांगायचं होतं कि इतक्या साऱ्या गोष्टी एका , लग्नाच्या वयाच्या मुलात मिळणे कसे अशक्य असते ...
हुश्श ....
हुश्श ....
Submitted by पशुपत >> काय हुश्श..
शेती हवी पण शेतकरी नको.
नोकरी हवी पण मुंबै पुण्यातच पण गावाकडे नको पण गावी घर असेल तर उत्तम..
यादी वाढु शकते अभ्यासुंनी भर टाकावी.
Pages