हिंदीचे प्राबल्य असणारा विदर्भ ??

Submitted by केअशु on 14 September, 2020 - 03:38

भाषावार प्रांतरचना करताना जर एखाद्या गावातल्या लोकसंख्येपैकी ५०% हून अधिक लोक जी भाषा बोलतात ती भाषा ज्या राज्याची त्या राज्यामधे ते गाव सामील केलं गेलंय का? की काही वेगळी पद्धत होती?

समजा मी लिहिली तीच पद्धत होती तर मग महाराष्ट्रातल्या विदर्भात आज हिंदीचा इतका बोलबाला का? इतके हिंदीभाषिक विदर्भात कसे काय? गोंदियासारखा जिल्हा तर आज पक्का हिंदीभाषिक झालाय.

विदर्भातल्या जिल्हा न्यायालयांमधे आणि नागपूरच्या उच्च न्यायालयात इंग्रजीसोबतच हिंदीतही खटला चालवता येतो पण मराठीत चालवता नाही असे मला विदर्भातल्या एका व्यक्तीने सांगितले.हे खरे आहे का?

जर विदर्भात आज हिंदी इतकी पसरली असेल तर १९५३ साली फझल अली आणि त्यांच्या सहकार्‍यांनी विदर्भातल्या ८ मराठी भाषिक जिल्ह्यांचे 'विदर्भ नावाचे मराठी भाषिकांचे राज्य बनवावे' हा अहवाल दिला तो कशाच्या आधारे? त्यावेळी जर आयोगाच्या निरीक्षणानुसार/अभ्यासानुसार जर हे ८ जिल्हे मराठी भाषिक होते तर १९५३ नंतर विदर्भात इतक्या मोठ्या प्रमाणावर हिंदी भाषिक साधारण कोणत्या साली किंवा कोणत्या दशकात आले? ते इतक्या मोठ्या प्रमाणावर हिंदी पट्ट्यातून मराठी भाषिक विदर्भात येण्याची कारणे कोणती? की हे हिंदीभाषिक विदर्भात १९५३ च्या आधीपासूनच विदर्भात मोठ्या संख्येने होते?
नेमकं काय चुकलं? फजल अली आयोगाने चुकीचा अहवाल दिला होता असं म्हणण्याला काही पुरावे आहेत का? फजल अली आयोग चुकला नसेल तर मग विदर्भात चिंता करावी इतका हिंदीचा वापर का केला जातो? १९५३ पासून आज २०२० पर्यंत शाळांमधून मराठीतून शिक्षण देऊनही महाराष्ट्रातल्या विदर्भात हिंदीचा इतका प्रसार कोण करतंय?

हा व्हिडिओ बघा.

https://youtu.be/s5279_LEIxg

एका मराठी वृत्तवाहिनीचा वार्ताहर देवेंद्र फडणवीस यांच्या मुलीला हिंदीतून प्रश्न का विचारत असेल? याचाच अर्थ विदर्भात हिंदी भरपूर बोलली जाते असा अर्थ लावावा का?

Group content visibility: 
Use group defaults

विदर्भात हिंदी आणि मराठी दोन्ही भाषा चालतात.
उच्चन्यायालयात मराठी चालते की नाही या बाबत नक्की माहीत नाही, पण जिल्हा न्यायालयात तर चालते की.
जर उच्च न्यायालायत हिंदी किंवा इंग्रजीच चालावी असा नियम नसेल तर नागपुरातही नक्कीच चालत असेल.

माझ्या लहानपणापासून आमचे विदर्भात वास्तव्य होते. आमच्या संपर्कात आलेले तिथे बाहेरून स्थायिक झालेले हिंदी, गुजराती, मारवाडी, सिंधी भाषिक लोक काही अपवाद वगळता मराठी बोलतात. बरीच वर्षे आम्ही बाबांच्या कंपनीने दिलेल्या क्वार्टर मध्ये रहात असू. त्या कॉलनीत फक्त दोन मराठी घरे आणि इतर सर्व मारवाडी, हिंदी भाषिक. पण आमच्याशी ते मराठीत बोलायचे, अजूनही मराठीत बोलतात. आमच्या बालपणीच्या मित्र मंडळातील सर्व अमराठी मित्र आम्हा सर्व मराठी मित्रांशी मराठीत बोलतात, कधी हिंदीही चालते पण मुख्यतः मराठी.

बाहेर बोलण्याची औपचारिक भाषा म्हणुन हिंदी वापरल्या जाते. जसे की घरा बाहेर पडल्यावर अनोळखी व्यक्ती दिसल्यास सुरवात हिंदीतून होते. मग त्या व्यक्तीला मराठी येत असेल तर मराठीतुनही बोलले जाते तर कधी हिंदीतूनही.

तर लोकांनी अशा दोन्ही भाषा अवलंबल्या आहेत.
दोन मराठी भाषिक एकमेकांकडे गेले तरी कधी हिंदीत आगत स्वागत करून मग मराठीकडे वळू शकतात. मी नागपूरला बहिणीकडे गेलो की असे बहुतेक वेळा होते. बहीण नाही हिंदीतुन बोलत पण जावई, त्यांचे भाऊ कधी मराठीत तर कधी हिंदीत स्वागत करून मग मराठीकडे वळतात.

तर दुसरीकडे ग्रामीण भागात अनेकांना हिंदी येतही नाही.

तसेच तिथल्या मराठीवरही हिंदीचा प्रभाव आहे हे सर्वांना माहीत आहेच.

जाऊन राहिलो, येऊन राहिलो हे सुद्धा हिंदी प्रभावामुळे आहे.

तू क्या कर रहा? चे मराठीत तू काय करून राहिला?
मै जा रहा हूँ = मी जाऊन राहिलो. वगैरे .

ग्रामीण भागात जिथे हिंदी येत नाही तिथे सुद्धा मराठीवर वरील प्रमाणे हिंदीचा प्रभाव आहे.

ऐतिहासिक दृष्ट्या हे का व कसे झाले हे मला माहित नाही.

मुस्लिम बहुल भाग पाकिस्तान मध्ये जाणार आणि हिंदू बहुसंख्य असलेला भाग भारतात राहील असे ठरले होते.
तसे घडले का?
बहु भाषिक असलेल्या भारताला एक ठेवायचे असेल तर राज्यकारभार लोकांच्या भाषेत चालला पाहिजे तेव्हाच लोकांना हा देश आपला वाटेल नाही तर सरकार परके वाटेल देश परका वाटेल म्हणून भाषे वर आधारित प्रांत रचना करणे गरजेचे होते म्हणून तशी ती केली गेली.
तेव्हा विदर्भ मध्ये मराठी बहु भाषिक असतील .किंवा एकसंघ संस्कृती असेल.
.म्हणून ते महाराष्ट्र मध्ये जोडले गेले असेल.
बेळगाव मध्ये मराठी भाषिक बहुसंख्य असून सुद्धा कर्नाटक मध्ये गेले ना.

विदर्भ आधी मध्य प्रांताचा भाग होता.
From 1853 to 1861, the Nagpur Province (which consisted of the present Nagpur region, Chhindwara, and Chhatisgarh) became part of the Central Provinces and Berar and came under the administration of a commissioner under the British central government, with Nagpur as its capital. B
After Indian Independence in 1947, Central Provinces and Berar became a province of India, and in 1950 became the Indian state of Madhya Pradesh, again with Nagpur as its capital. However, when the Indian states were reorganised along the linguistic lines in 1956, Nagpur and Berar regions were transferred to Bombay state, which in 1960 was split between the states of Maharashtra and Gujarat.

@मानव पृथ्वीकर
<<बाहेर बोलण्याची औपचारिक भाषा म्हणुन ..........
....तर कधी हिंदीत स्वागत करून मग मराठीकडे वळतात.>>

हे असं मराठवाडा, प.महाराष्ट्रात किंवा कोकणात का होत नसावं? मराठवाडा, प.महाराष्ट्रात किंवा कोकणात दोन मराठी लोक भेटले की पूर्ण बोलणे फक्त मराठीतच का होत असावे? हिंदी विदर्भात आलीच कशी? ती सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात?

@हेमंत 33
बेळगाव महाराष्ट्रात जाणे हा महाराष्ट्रावर अन्यायच आहे. बेळगाव नि विदर्भ एकाच पारड्यात नको.

विदर्भात १९५३ साली मराठीभाषिक बहुसंख्येने असतील तर आज इतके हिंदीभाषिक कुठून आले? इतके की हिंदीभाषिक राज्याचा भाग वाटावे?

@भरत
मध्यभारताचा भाग असल्याने काय घडलं? १९५३ साली विदर्भ मराठीबहुल होता. फजल अली आयोगाने अहवाल तरी तसाच दिलाय.

विदर्भ सा़ंस्कृतिक दृष्ट्या महाराष्ट्रापेक्षा मध्य प्रदेशला जवळचा असेल.
मराठवाडा हैद्राबादच्या अधिक जवळ आहे का?

असतील तर आज इतके हिंदीभाषिक कुठून आले>> आधीपासून तिथेच होते. तुम्हाला माहीत नसेल इतकेच. छत्तीसगढ आणि मध्य प्रदेश शी संपर्क जास्त येतो पुर्व विदर्भाचा.
नागपुर राजधानी होती मध्य प्रांताची मग तिथे हिंदी भाषा असणारच ना.

जेव्हा विदर्भ हा मध्य प्रांतात (Central Province) होता, तेव्हा विदर्भाच्या तुलनेत मध्य प्रदेश (आताच्या वेगळ्या छत्तीसगड सकट) आकाराने आणि लोकसंख्येने बराच मोठा. तेव्हा नागपूर राजधानी असली तरी औपचारिक (कार्यालयीन) भाषा ही हिंदीच असणार. सहाजिकच लोकांना हिंदी शिकणे गरजेचे वाटले, जिल्हा - तालुक्यात पर्यन्त लोक हिंदी बोलू लागले असावेत आणि औपचारिक भाषा म्हणुन हिंदीचा वापर करू लागले असावेत. मराठी येणाऱ्यांना हिंदी शिकणं सोपं जातं आणि व्हाईस अ व्हर्सा. (विदर्भातील परप्रांतीय मराठी बोलतात.)

पण ग्राम पंचायतीत मात्र याची गरज भासली नसावी, त्यामुळे ग्रामीण भागातील लोक हिंदी शिकले नाहीत.

मराठीवर हिंदीचा प्रभाव (अनेक शब्द व थोडे व्याकरण हिंदी सारखे) हे प्रांतानुसार भाषेत फरक असतो त्या नुसार त्याही पूर्वी पासूनच / सुरवाती पासूनच असावे.

भाषा हा विवाद चे कारण असू नये असे मनापासून वाटते.
पण आपल्या देशातील राजकीय स्थिती बघितली की कट्टर मराठी अभिमानी मी होतो.
देशात काय चालले आहे ,काय घडामोडी होत आहेत ह्याच्या कडे केंद्राचे लक्ष च नाही .
ब्रिटन,चीन ला पण भारताच्या समस्या विषयी जास्त माहिती असेल.
भाषिक balance बिघडेल,सांस्कृतिक balance बिघडेल एवढे स्थलांतर देश साठी अत्यंत धोकादायक आहे हे केंद्र सरकार ला समजणे गरजेचे आहे..
देशातील मागास राज्य मध्ये जलद गती नी विकास काम स्वतः केंद्र सरकार च्या अधिकारात चालू करणे,लोकसंख्या नियंत्रण सक्ती नी करणे,
अशी काम करून सरकार जिवंत आहे ह्याची जाणीव करून दिली पाहिजे केंद्र सरकार नी.
हिंदी भाषिक राज्य अनेक समस्या नी ग्रस्त आहेत त्यांच्या समस्या सोडवा..
मग भाषा हा विवाद चा विषय राहणारच नाही.
आणि त्या दिशेने निरंतर प्रयत्न केले तर भाषा नुसार राज्यांची गरज पण राहणार नाही

एका मराठी वृत्तवाहिनीचा वार्ताहर देवेंद्र फडणवीस यांच्या मुलीला हिंदीतून प्रश्न का विचारत असेल? >>>
सर्व काही मराठीतून सुरू असताना तिच्या कडे वळल्यावर अचानक हिंदी का बोलू लागला हे मात्र खरंच कळलं नाही.
(कदाचित ते त्या वृत्तवाहिनीला त्यांच्या इतर हिंदी चॅनलवर पण प्रसारीत करायचे असेल? )

हिंदी काय रोग आहे का त्याने ग्रस्त व्हायला?
हिंदी सुद्धा एक भारतीय भाषाच आहे ना? मग एवढा आकस का?
राज्यनिर्मीतीचा इतिहास वाचा राज्यशास्त्र अभ्यासले नसले तरी आपल्या राज्याची निर्मिती कशी व कोणत्या परिस्थितीत झाली हे किमान माहिती असायला पाहिजे.

श्रद्धा
हिंदिग्रस्त हा सध्या रोगाचं आहे.
हिंदी भाषा लोकांमुळे सांस्कृतिक आक्रमण होत आहे अनेक राज्यांवर त्या मुळे हिंदी भाषा ही भारतीय असून सुद्धा रोगच वाटते.

भरत यांनी अगदी बरोबर मुद्देसूद लिहिले आहे. सेंट्रल प्रॉविनसेस् अँड बेरार (वऱ्हाड) असा प्रांत होता. त्यात सेंट्रल प्रॉविंसेस हा मोठा टापू होता. जबलपूर, रायपुर, राजनांदगाव, रतलाम ही सर्व शहरे राजधानी म्हणून नागपूरशी सतत संपर्कात असत. ( मला तर लहानपणी ही सर्व शहरे मराठीभाषिकच वाटायची. कारण कित्येकांच्या मुलीबाळी इकडे दिलेल्या असायच्या आणि वायसे वर्सा)
शिवाय जुन्या पुस्तकात ' ग्वाल्हेरास/ रीस गेलो होतो', निमाडी शिरलो, अशी वाक्ये वाचायला मिळत. ' वऱ्हाडी गंधर्व कंपनीस फारसे उत्पन्न झाले नाही ' वगैरे वाक्ये एखाद्या पुस्तकात येत तेव्हा हा भाग सगळा एकच आहे असे वाटे. ( पुस्तक लेखनाच्या काळात विदर्भ हा महाराष्ट्रात नव्हता; तेव्हा खरे तर महाराष्ट्र हे राज्यच नव्हते.)त्या काळी ह्या प्रांतात बऱ्यापैकी सांस्कृतिक दळणवळण राहिले होते. शिवाय इंदौर , देवास, धार, ग्वाल्हेर येथे मराठी राज्यकर्ते अशी मराठी सरमिसळ होती. अमुकच भाषा पाहिजे असा आग्रह नव्हता.
जुनी प्रवासवर्णने वाचताना मजा येते.

केअशु
तुमच्या पूर्वीच्या धाग्यांचा इतिहास बघता एक सल्ला द्यावासा वाटतो की आपण ज्या विषयावर लिहीणार आहोत, त्यावर पुरेसा अभ्यास करावा. तुमचे जे मराठी भाषेशी संबंधित धागे काढत असता, ते बरेचदा अर्धवट माहितीच्या आधारे असतात. तुमचे मराठी भाषेविषयी प्रेम बघता (मीही मराठीप्रेमी आहे किंबहुना ती माझी मातृभाषा आहे) मला नम्रपणे एक सल्ला द्यावासा वाटतो की तुम्हीच धाग्याशी संबंधित पुरेसा अभ्यास करून ती माहिती मांडा म्हणजे तुमचेही अज्ञान दूर होईल आणि इतरांनाही माहिती होईल. शिवाय त्यावर साधक-बाधक चर्चा होईल.

आपल्या देशात दर दहा वर्षांनी जनगणना होते, त्यातून लोकसंख्येच्या कितीतरी घटकांची माहिती प्रकाशित केली जाते. जरा ती वाचा (अगदी १९४१ पासून २०११ पर्यंत (त्याआधीचीही उपलब्ध आहे, पण तुम्ही एवढी तरी वाचा )), मग समजेल विदर्भात कोणत्या भाषेचे प्राबल्य आहे.

विदर्भ हा मुळातच प्रचंड मोठा भौगोलिक भाग आहे, गोंदियापासून यवतमाळपर्यंत व बुलढाण्यापासून गडचिरोली पर्यंत एकूण ११ जिल्हे येतात. प्रत्येक जिल्ह्याची वेगळी संस्कृती आहे, विशिष्ट जात-समुदायांचे प्राबल्य आहे. विदर्भातील २-३ जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागांत थोडासा हिंदीचा प्रभाव असला तरी ती प्रामुख्याने विशिष्ट जातीं वा समुदायांमध्येच बोलली जाते आणि त्यांचे एकूणच प्रमाण कमी आहे. गोंदिया जिल्ह्याच्या उत्तर व पूर्व भागात हिंदी बोलली जाते कारण सीमेपलीकडे मध्य-प्रदेश व छत्तिसगढ आहे, त्यामुळे त्यांचे रोटी-बेटी व्यवहारही चालतात, शिवाय फाळणीनंतर आलेल्या गुजराती-सिंधी लोकांमुळेही हिंदीभाषिकांचे प्रमाण आहे. तथापि नागपूर, अमरावती, व अकोला ह्या जिल्ह्यांच्याही सीमा मध्यप्रदेशला खेटून असल्या तरी सीमावर्ती भागातही मराठीच बोलली जाते, कारण सातपुडा पर्वतरांगेमुळे लोकांचे तेवढे रोटी-बेटी व्यवहार नाहीत. तिकडे मध्य-प्रदेशातील नागपूर-छिंदवाडा महामार्गावरील पांढूर्णा ह्या शहरात तर मराठीच भाषा बोलली जाते (सीमावर्ती मध्य-प्रदेशातही अनेक शहरे-गावे आहेत जिथे प्रामुख्याने मराठी बोलीभाषा आहे).

जेव्हा विदर्भ C&P बेरार प्रांतात होता तेव्हाही इकडे मराठीच बोलीभाषा होती. पूर्वाश्रमीच्या C&P प्रांतात जन्म झालेल्या आणि आता साठी पार असलेल्या लाखो व्यक्तींना (विशेषतः ग्रामीण भागात) अजूनही हिंदी बोलता येत नाही, तुमच्या लेखाप्रमाणे त्यांना तर हिंदीच यायला हवी.

तसेच विदर्भ ह सांस्कृतिकदृष्ट्याही हिंदी भाषिक प्रदेशाशी जवळचा नाही. सण-आहार-विहार-लग्नपद्धती व इतर कार्यक्रमांतही विलक्षण फरक आहे (सीमावर्ती भागात थोडीफार समानता दिसून येईल).

मुंबईसारखेच नागपूरही (सध्या महाराष्ट्राची उपराजधानी असली तरी पूर्वीच्या C&P प्रांताची राजधानी असल्याने ) बहुभाषिक शहर आहे. विशेषतः शहराच्या मध्य भागात मुस्लीम बांधवांचे व भाषावार प्रांतरचनेपुर्वी स्थायिक झालेल्या हिंदी भाषिकांमुळे व पूर्व व उत्तर भागात मध्य-प्रदेश, छत्तिसगढ, व झारखंडमधील स्थलांतरितांमुळे हिंदी बोलली जाते. शहराच्या दक्षिण, पश्चिम भागात तर केवळ मराठीच भाषा आहे. ज्यांचे मराठी भाषिकांचे अगदी जवळचे नातेवाईक (जसे आजोळ, आत्या, मावशी, व काका) मध्य-प्रदेश वा छत्तिसगढमध्ये आहे त्या घरांत थोडीफार हिंदी बोलली जाते.

मी नागपूरचा असून विदर्भातील अनेक जिल्ह्यांत फिरलो आहे, अमरावती, अकोला, बुलढाणा, गडचिरोली, वर्धा, नागपूर, भंडारा, व चंद्रपूर आदी जिल्ह्यांत मराठीच बोलीभाषा आहे (चंदपूर व गडचिरोली जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागांत तेलुगु भाषेचा प्रभाव दिसून येतो).

नागपुरात व विदर्भात कार्यालयीन भाषा मराठीच आहे. अगदी हिंदी भाषिक असला तरी मराठीमध्येच सगळी प्रमाणपत्रे मिळतात. तसेच उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात इंग्रजी सह मराठी भाषाही चालते.

आणि मुळात हिंदीविषयी एवढा आकस का? भाषा ही संवादाचे माध्यम आहे, मग ती कोणतीही असू देत. आपल्या मूळ राज्याबाहेर गेल्यावर हिंदी व इंग्रजीचे महत्व पटते.

माझा एक नागपुरी टीम मेट होता.. कैयोक वर्षांपुर्वी मी त्याला हाच प्रश्न विचारला होता की बाबारे नागपुर महाराष्ट्रात आहे तरी तिथले लोक हिंदी का बोलतात. तर तो म्हणाला की खुद्द नागपुर मधे सगळे मराठीच बोलतात म्हणे पण त्यांना मुंबई-पुण्यात वा उर्वरीत ठिकाणी आल्यावर आपण नागपुरहुन आलोय हे कुणाला कळु नये म्हणुन हिंदीचं पांघरुण घेऊन भाव खावासा वाटतो आणि दुसरं कारण असंही सांगितलं की त्यांना असं वाटतं की त्यांच्या मराठीला बाकी ठिकाणाचे लोक हसतील म्हणुन ते हिंदीत बोलतात. Uhoh

तो माझ्याशी हिंदीत बोलला तरी मी त्याच्याशी मराठीतच बोलायचो.. इतरांशी हिंदीत बोलत असला तरी शेवटी तो मझ्याशी मराठीतच बोलु लागला.. Proud
बाकी कुणाला काय पडलंय बोलीभाषेवरुन नावं ठेवायला एवढा वेळ असतो का तरी. उलट कौतुकाने विचारलं जातं की तुम्ही अमुक-तमुक ठिकाणाचे का.. काही स्थळ वैशिष्ठ्ये, खाद्यसंस्कृती, पर्यटन स्थळे यांविषयी विचारलं जातं मग.. समजा विचारलंच कुणी की बाबा नागपुरचे का तर त्यात अभिमान वाटण्यासारखंच आहे ना. आता मी नाही का कुठेही गेलो अन बोलण्यासाठी एक वाक्य जरी उच्चारलं की "सातारा-सांगली का...?" म्हणत कोणीतरी विचारतंच.. ते ऐकुन मलाही मग बरं वाटतं की जागतिकीकरणाच्या रेट्यात आपली आयडेंटी अजुनही शिल्लक आहे बरं का..!! Proud

@भरत
अधिकृत आकडेवारी मिळाल्यास नक्की देतो.शोधतो आहे.आपल्याला मिळाल्यास कृपया द्यावी. _/\_

इतका मराठीचा अट्टाहास कशासाठी? मराठी मिश्रित हिंदी किंवा इंग्रजी मिश्रित मराठी बोलणे हे खूप कॉमन आहे आणि आपण याला सपोर्ट केला पाहिजे. निदान यातून आपण मराठी लोक काही इंग्रजी हिंदी शब्द शिकू तरी.

@shraddha
आम्ही विदर्भातील लोक उगाच भाषेचा बाऊ करत नाही. मग बाकीच्यांना त्रास व्हायचे कारण काय?

छान! एकतर ज्या महाराष्ट्रात विदर्भ आहे त्या महाराष्ट्राची राज्यभाषा असणार्‍या मराठी बद्दल बांधिलकी तर नाहीच वर त्याचे समर्थनही. महाराष्ट्रात अनेक वर्षे राहूनसुद्धा मराठी न शिकता हिंदीतच बोलत राहणारे भय्ये आणि तुमच्यात फरक तो काय राहिला मग? महाराष्ट्राच्या भाषिक नुकसानीला हातभार लावणेच झाले हे!

आधीपासून तिथेच होते. तुम्हाला माहीत नसेल इतकेच. छत्तीसगढ आणि मध्य प्रदेश शी संपर्क जास्त येतो पुर्व विदर्भाचा.
नागपुर राजधानी होती मध्य प्रांताची मग तिथे हिंदी भाषा असणारच ना.

आधीपासूनच होते तर मराठीभाषिक महाराष्ट्रात का सामील झाले? की महाराष्ट्रात सामील होऊन हिंदीत बोलून महाराष्ट्राचे सांस्कृतिक नुकसान करणे हीच कुटील योजना होती?

याचाच अर्थ विदर्भात हिंदी भरपूर बोलली जाते असा अर्थ लावावा का?>> हो खुशाल लावा.

हो.आता तो लावलाच आहे. : )

याचाच अर्थ विदर्भात हिंदी भरपूर बोलली जाते असा अर्थ लावावा का?
>>>> मला वाटते विदर्भात हिंदी बोलतातच... आणि बाजूला हिंदी भाषिक प्रदेश आहेत ... तिथून भरपूर लोक विदर्भात येत असणार...
आता मुंबईचे उदाहरण घ्या.. मुंबईत बाहेरून किती लोक आले आहेत.. मुंबई मध्ये हिंदीनेच बोलणे सुरू करावे लागते.. समोरचा मराठी असो, सिंधी असो वा सौठेंडियन...

Submitted by राहुल बावणकुळे on 14 September, 2020 - 08:17 >> ++ १ उत्तम प्रतिसाद. मी महाराष्ट्र - आंध्रप्रदेश सीमेवर च्या एका छोट्याश्या गावात लहानाची मोठी झाले. गावात मराठी / हिंदी / तेलगू / गोंड अश्या कित्येक भाषा बोलल्या जात, पण फक्त हिंदी असे कधीच नाही झाले. जगातले सगळे प्रश्ण संपलेत अश्या आविर्भावात येऊन अश्या चर्चा करण्याचा उद्देश मला तरी समजत नाही.

@मानव पृथ्वीकर

जेव्हा विदर्भ हा मध्य प्रांतात (Central Province) होता, तेव्हा विदर्भाच्या तुलनेत मध्य प्रदेश (आताच्या वेगळ्या छत्तीसगड सकट) आकाराने आणि लोकसंख्येने बराच मोठा. तेव्हा नागपूर राजधानी असली तरी औपचारिक (कार्यालयीन) भाषा ही हिंदीच असणार. सहाजिकच लोकांना हिंदी शिकणे गरजेचे वाटले, जिल्हा - तालुक्यात पर्यन्त लोक हिंदी बोलू लागले असावेत आणि औपचारिक भाषा म्हणुन हिंदीचा वापर करू लागले असावेत.

१९५३ साली फजल अली आयोगाने दिलेल्या अहवालात नागपूर हा मराठी भाषिक जिल्हा असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे.मग असताना १९५६ पूर्वीपासून नागपूरला हिंदीभाषिक प्रदेशाची राजधानी का बनवलं?

की हे असं आहे म्हणजे नागपूर भलदांडगं शहर आहे या एकाच निकषावर त्याला राजधानी म्हणून निवडलं आणि नागपूर हे मराठीबहूल आहे की नाही याला महत्व/किंमत न देताच जबरदस्तीने हिंदीभाषिक राज्याची राजधानी बनवलं? आणि नागपूरच्या मराठीबहूल जनतेने याला विरोध न करता जी जबरदस्ती होईल ती सोसत बसले.असं आहे का?

Pages