ऑनलाइन शाळेची फि भरण्याबद्दल

Submitted by mrunali.samad on 12 September, 2020 - 13:10

सरकारने पाचव्या ईयत्तेपर्यंत ऑनलाइन क्लासेस घेऊ नयेत, असे सांगितले असतानाही, खाजगी शाळांचे
ऑनलाइन क्लासेस सर्रास सुरू आहेत. अगदी नर्सरी चे सुध्दा.
माझा मुलगा तिसरीत आहे.
पाल्य शाळेचे इन्फ्रास्ट्रक्चर वापरत नसतानाही शाळा पुर्ण फि भरा असं म्हणत आहे.
ऑनलाइन क्लासेस लहान मुलांसाठी वेळेचा अपव्यय आहे.इतकी लहान मुले ऑनलाइन शाळेतून खरच काही शिकताएत का?
इतकी फि भरणे गरजेचे आहे का?शाळा फि मधे कनसेशन द्यायलाही तयार नाहीए.
तुमच्या inputs आणि मतांचा आदर आहे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हो.pcmc निगडी प्राधिकरण चिंचवड मध्ये आहेत.
ज्ञान प्रबोधिनी त्यावेळी काहीतरी बस इश्यू मुळे पाहिली नव्हती. बऱ्याच शाळा लहान मुलांना पण हायवेवर सोडतात.गल्लीत आत येऊन सोसायटीच्या गेटवर सोडत नाहीत.(मोठ्या बस वळायला व्यवस्थित जागा आहे तरी.)प्रत्येक वर्षी बस मॅनेजर ला समजवावं लागतं.मेड ठेवलया तर त्या बस चा वेळ मागेपुढे झाला की कटकट करतात.सिनियर सिटीझन्स कोपऱ्यावर चालत जात नाहीत.
त्यामुळे शाळा बघताना बाहेर बस सर्व्हिस च्या ड्रायव्हर्स ना विचारून ती बस गेटवर येते हे बघून मोजक्या 3 शाळात फॉर्म भरले.सध्याच्या शाळेत 5 वी पर्यंत गेटवर आणि मोठी मुले असलेली बस हायवेवर सोडतात.त्यामुळे आता सर्व ठीक आहे.तसेही हे वर्षं प्रश्न नाही.
(कोणे एके काळी प्ले ग्रुप मधल्या पाल्या साठी स्कुल बस हवी असणारी मी एकटीच होते.बाकी बायका किंवा आजी आजोबा वाहनाने सोडून तिथेच 2 तास बसायचे.वेळ 11 ते 1 अशी महान असल्याने उशिरा ऑफिस ला जाणे हाही पर्याय नव्हता.त्यावेळी गेटवर उभं राहून आयांना 'स्कुल बस चे फायदे' यावर मार्केटिंग करूनही झालं.शेवटी त्या शाळेच्या डायरेक्टर च्या केबिन मध्ये जाऊन ऍडमिशन रद्द करते म्हटल्याबरोबर त्यांनी बस चालू करायला सांगितली.बस चालू झाल्यावर आधी 'आम्ही सोडतो स्वतः' म्हणणार्या 10 आयांची मुलं पण यायला लागली.)

<<असो सध्या ही एक इंडस्ट्री झाली आहे. बरेचदा वाटते आपण शिशु गटासाठी एवढे पैसे काय लॉजीकने भरले ? काळाचा महिमा अजून काय Sad >> काय बोलायचं.. सगळेच करतायत कळणारे न कळणारे.
आपल्याला कळतं असलं तरी आपल्या मुलांना साध्या शाळेला टाकून त्यांना मागे पडायला नको असं वाटत, i mean environment, confidence. त्यांना पुढे जाऊन न्यूनगंड यायला नको कि.. विचार करू करून डोकं फिरतय. माझ्या मुलीला ही नेक्स्ट year ऍडमिशन घ्यायची काय करावे कळत नाही.
आणि एकदा ऍडमिशन घेतले कि 10th पर्यंत एकाच शाळेत ठेवावे असं माझं मत आहे. सारखा बदलायला नको.
निगडी मध्ये कोणती शाळा? तुम्ही कुठे राहता?

मला कोणाला जज करायचे नाही
पण नर्सरीलाच एक लाख रुपये फीज घेण्याऱ्या शाळांतून अस नक्की काय शिकवलं जातं की पालक ह्या फीज भरतात ? 2 + 2 = 4 हे सगळीकडेच शिकवले जाते . मग ह्या शाळांत असे नक्की काय असते की पालक एवढी इन्व्हेस्टमेंट करायला तयार होतात ? कुतूहल आहे.

@मीरा
सध्याच्या स्थितीत education institution आणि इंडस्ट्रीज are purely for buisness and they are working for profit.
If you compare other industries they can not charge customer's , if they are not giving same level of services.
Whereas in school's how they can charge same fees to customer's(fearfull customers-parents), when services are different.
मोठ्या शाळांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांकडून जर डोनेशन लाखाच्या घरात घेत असतील, एखादे वर्ष पालकांकडून पूर्ण फि न घेता मैनेज करू शकत नाहीत का?
शिक्षकांना पूर्ण पगार न देता, विद्यार्थ्याकडुन पूर्ण फि कशी घेऊ शकतात?
आणि तसंही प्रायमरी स्कूल साठी ऑनलाइन लर्निंग परिणामकारक नाहीए.

The school is operational and they have cost to keep it running........

For example. आपण ब्युटी पार्लरमधे जातो, समजा फेशियल चे 1000rs. चार्ज आकारतात. आता कोरोनाकळात पार्लरवाले म्हणताएत, आम्ही तुम्हाला ऑनलाइन फेशियल च्या स्टेप्स सांगतो, तुम्ही घरी त्या फोलो करा.
आणि त्याचे 1000रू.आम्हाला द्या कारण आमचा इन्फ्रास्ट्रक्चर चा खर्च निघाला पाहिजे.
तुम्हाला पैसे भरावेच लागतील नाहीतर पार्लरमध्ये पुन्हा येता येणार नाही. मग आपण भरू का पैसे?
मी फक्त उदाहरणादाखल पार्लर म्हणतीए, कारण त्यांना ही कमवायचे आहे.पण ते मागतील का जसे शाळा मागतीए पैसे.

निगडी मध्ये जर City Pride आणी उर्शला पण आहेत. ह्या. शाळेत बाकीच्या शाळापेक्षा फी कमी असल्याने मधल्या ईयत्तेत प्रवेश मिळत नाही. बेंगलोरची ऑर्चिड ईटरनॅशनल पण आहे पण ती सध्या १० वी पर्यंतच आहे.

सध्या PCMC मध्ये नर्सरी ते दहावी, बिना अनुदानित ईजिनियरिंग कॉलेज, नामवंत IIT क्लासेस ह्या सर्वाची फी जवळपास सारखीच आहे.
११-१२ वीची फी मात्र त्यामानाने खुपच कमी आहे. तसेच करोना मुळे ११ वी ला प्रवेश घेणारे खुप कमी जण आहेत त्यामुळे जे १०वी पास झाले आहेत त्याना कॉलेज मधुन न डोनेशन देता अ‍ॅडमिशन घ्या असे फोन पण येत आहेत. .

@शीतल .. शाळा सिटी प्राईड , निगडी. मी रहायला सेकटर 26 ला आहे शाळा घरापासून अर्धा किमी असेल. तुम्ही निगडीमध्ये राहत असाल तर सिटीप्राईड, कमलनयन, अर्सला, ज्ञानप्रबोधिनी , orchid जवळ आहेत, जी जी इ एस वल्लभनगर ला आहे आणि पोतदार आणि एलप्रो चिंचवडला. पैकी एलप्रो अजून महाग आहे आणि त्यांचं मागच्या वर्षी ऐफिलिएअशन काढून घेतलं होतं. Orchid ला माझ्या दोन मित्रांनी एडमिशन काढून घेतलं पहिलीतून , शाळा पण महाग आहे. जी जी इ एस ला दोन माबो सदस्यांची मुले आहेत आणि त्यांना ती शाळा खूप आवडली आहे. फिज पण ओके आहेत. तुम्ही पुढील शैक्षणिक वर्ष म्हणत असाल तर प्रवेश प्रक्रिया सुरू होतील आता ऑक्टोबर पासून.

@साहिल .. प्रबोधिनी ला फी कमी आहे पण सिटीप्राईडला मी वर लिहिलं आहे किती भरली ते. Happy पण एक आहे इथे मध्ये अधे प्रवेश मिळत नाही.

@जाई. ..प्रश्न चांगला आहे पण ठोस उत्तर काही नाही. शाळा घराजवळ असावी हा एक मेन मुद्दा होता. आमच्या बाबतीत आम्ही प्रबोधिनी ला फॉर्म भरला होता पण तिथे इंग्रजी माध्यमाची 1 च तुकडी आहे 25 मुलांची त्यात सीबलिंग आणि मॅनेजमेंट कोटा सोडून फक्त 15/16 सीट उपलब्ध होत्या आणि त्यांना 500 अप्लिकेशन आली , लॉटरी मध्ये नंबर नाही लागला. अर्सलाची एडमिशन एप्रिल मे मध्ये असते ज्यावेळी सर्व शाळांची एडमिशन झालेली असते. प्लस तिथे मायनोरिटी कोटा आहे. तेंव्हा रिस्क घ्यायची नव्हती. सगळीकडे शिक्षण सारखेच असावे फक्त इतर गोष्टी , स्पर्धा कार्यक्रम कमी जास्त असतील.

@मीरा
सध्याच्या स्थितीत education institution आणि इंडस्ट्रीज are purely for buisness and they are working for profit. >>>
Completely agree

If you compare other industries they can not charge customer's , if they are not giving same level of services.
Whereas in school's how they can charge same fees to customer's(fearfull customers-parents), when services are different. >>>> Because you opted for their school.
In spite multiple choices, parents get desperate ( i use that word seeing the mental state of parents around admission period) for particular brand. When there is high demand, they are free to charge whatever they want.it is like buying leather purse from dhravi of 1000rs or buying Lana Marks or Louis Vuitton of a few million dollars. Purpose is the same, choice is yours.

मोठ्या शाळांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांकडून जर डोनेशन लाखाच्या घरात घेत असतील, एखादे वर्ष पालकांकडून पूर्ण फि न घेता मैनेज करू शकत नाहीत का? >>>> Ideally yes. पण मग हा फारच उच्च विचार झाला कारण शाळा हा बिझिनेस आहे हे आपण मान्य करतोच आहे.
शिक्षकांना पूर्ण पगार न देता, विद्यार्थ्याकडुन पूर्ण फि कशी घेऊ शकतात? >>>> मी आधीच्या प्रतिसादात लिहिलं आहे की ही फसवणुक आहे. जर फीज पूर्ण घेतल्या असतील तर लॉसेस नाहीत म्हणून पगार पूर्ण द्यायला हवा. या लॉजिकल मुद्द्यावर कोणी शिक्षक कोर्टात का जात नाहीत?

For example. आपण ब्युटी पार्लरमधे जातो, समजा फेशियल चे 1000rs. चार्ज आकारतात. आता कोरोनाकळात पार्लरवाले म्हणताएत, आम्ही तुम्हाला ऑनलाइन फेशियल च्या स्टेप्स सांगतो, तुम्ही घरी त्या फोलो करा.
आणि त्याचे 1000रू.आम्हाला द्या कारण आमचा इन्फ्रास्ट्रक्चर चा खर्च निघाला पाहिजे.
तुम्हाला पैसे भरावेच लागतील नाहीतर पार्लरमध्ये पुन्हा येता येणार नाही. मग आपण भरू का पैसे? >>>> उदाहरण चुकलं आहे कारण तुलना होऊ शकत नाही. पण तरीही मुद्दा कळला. माझं उत्तर परत तेच की शाळा विशिष्ट ब्रँडची हवीच तसंच तेवढंच desperation पार्लर बाबत असतं तर पार्लरने देखील मेंटेनन्स चार्ज घेतला असता. ब्रँडचा माज ! (आणि गल्लीतल्या पार्लरचे स्वस्त चार्जेस सोडून लोक जातात की बिग ब्रँडच्या पार्लरमध्ये 4 times चार्जेस देऊन)

@ मीरा .. एक महत्त्वाचा मुद्दा राहिला तो म्हणजे ऑनलाइन शाळेत शिक्षकांना मुलांना हँडल नाही करावं लागत जे एक मोठं काम कमी झालं आहे शाळेचं. मेंटेनन्स पण कमी. >>> लंपन, एखाद्या शिक्षिकेला हे म्हणून पहा. 6 तासाची शाळा परवडली पण ऑनलाइन 4 तास नको एवढे वैतागले आहेत. f2f केव्हाही सोपं. आपल्या ऑफिस कॉलला wfh सोयीस्कर पण 20 मुलं एकावेळी ऑनलाइन शिकवणं फार अवघड आहे. हे माझ्या शिक्षिका शेजारणी आणि मैत्रिणींकडून ऐकलं आहे.
मेंटेनन्स कमी हा मुद्दा मान्य.

ओके लंपन . शाळा जवळ असणे आणि तुम्ही लिहिलेले बाकीचे मुद्दे योग्य आहेत . ते पटले

हा प्रश्न का विचारावासा वाटलं ते लिहिते.
माझ्या शेजारची वय वर्ष 6 ची मुलगी घरापासून सुमारे 6.8 किलोमीटरवर असलेल्या शाळेत जाते . मी ते ऐकून हबकून गेले. इतक्या लाम्ब ती मुलगी सकाळी उठून जाते (शाळेची बस) . शाळेच नाव जमनादास स्कुल . इतक्या लहान मुलीला सकाळी उठून एवढ्या लाम्ब पाठवणे मला बरोबर वाटले नाही . पण शाळेचे नाव प्लस शाळेचे माध्यम ( आय बी बोर्ड) यामुळे पालकांनी तिथं प्रवेश घेतला अस कळलं . या शाळेची फी काही लाखांत आहे. प्राथमिक शिक्षण एवढं महाग असेल तर पुढच्या शिक्षणाचा काय करायचं ?

118?
18 म्हणायचंय का?
आमच्या इथून विद्या व्हॅली ला जातात मुलं.तितकीच असेल.
ताथवडे च्या शाळेला म्हामुरडी (क्रिकेट स्टेडियम एरिया)हुन येतात.
जर प्रवास ट्रॅफिक चा नसेल तर फार फरक पडणार नाही.

जाई, 118 किमी वन वे?? जरी येऊन जाऊन असेल तरी काहीच्या काहीच. बाप रे मग ही अभ्यास कधी करते आणि आयुष्य कधी जगते? शाळेने ऍडमिशन देताना शाळेचा अंतराचा क्रयटेरिया नव्हता का? की काही लोचा ऍडमिशन घेतली?

18 म्हणायचंय का? >>> हो 18 असेल तर ठीक.

अपडेट :- ११८ नाही . 6.8 किमी .
मगाशी प्रतिसाद लिहिताना दुसरे काही तरी ( म्हणजे पेपरचे बिल ) डोक्यात होते . म्हणून तो आकडा लिहिला गेला. चूक झाल्याबदल क्षमस्व .

ही तिची शाळा.
https://www.jns.ac.in/m/index.htm

55,000 फी महिन्याची आहे का वर्षाची? वर्षाची असेल तर महिन्याची ४५०० ठीक नाही वाटत का? अर्थात जॉब गेला असेल तुलना करू शकत नाही. तेव्हा गणित कोलमडेलच.
जाई, प्रि स्कूल टीचर चा जॉब अत्यंत जोखमीचा आहे. आणि प्रिस्कुल डे केअर ह्यात आपण काम करताना मुलांची कुठे तरी ठेवायची सोय आणि त्यात मुलाना सोशल सर्कल मिळालं तर सोपेसु इतकाच हेतू असतो ना? त्यातून त्यांनी गणित शिकावं असं expectation नसावं. मुलांना सांभाळायला लागलं तर जॉब करता येणार नाही त्या गणितात वरच ४५०० बसत असेल.
आपण रहातो त्या सोसायटीचा मेंटेनन्स इतकाच असेल ना?

हो , मंदार माझी चूक झाली असे लिहिले आहे मी वर. त्याबद्दल क्षमा देखील मागितली आहे Happy

मूळ मुद्द्यावर यायचं का आता ?

6.8 काहीच नाहीये
कम्प्लिट ओके.माझी मुलगी 4 वर्षांची असल्यापासून 6 किमी जातेय.आणि तेव्हाही मजेत होती.

अमित हो , जॉब जोखमीचा आहे हे मान्य. पण घेतलेल्या पैशांपैकी सगळेच शिक्षकांना मिळतात का ?
तुला मुंबईतील रायन इंटरनॅशनल स्कुल माहीत असेलच . तिथे शिक्षकांना पगार खूपच कमी आहे. माझा मावसभाऊ तिथे शिकलाय . त्या शाळेत कोणीही शिक्षक सहा महिन्यावर टिकत नाही. मग नुसत्याच पदवीधर झालेल्या मुली /मुलं शिक्षक म्हणून येतात. मग क्लास वगैरे आहेतच.
मग अस असेल तर एवढी फीज का भरावी केवळ चकचकीतपणासाठी ?

मी अनु , वेळेवर पोचण्यासाठी तिला सकाळी 9 वाजता घर सोडावे लागते. कारण स्कुल बस सगळ्यानाच पिक अप करत जाते . सकाळी ११ ची शाळा आहे पण तिला 9 वाजता घर सोडावे लागते कारण मुंबईत ट्राफिक असत त्यावेळेस. आणि ती मुलगी ओके नसते हे मी तिला प्रत्यक्ष पाहिले म्हणून सांगू शकते. सगळी मुलं एक सारखी नसतात.

६.८ कि. मी प्रवास हा नॉर्म आहे.
PCMC वरुन केद्रिय विद्यालय , देहु रोड १० किमी आहे. PCMC मध्ये राहाणारे ज्याना स्थानिक शाळा परवडत नाही/ मिळत नाही ते ह्या शाळेत जातात.
मी देखिल मुंबई मध्ये ९ वर्षापासुन ७ किमी BEST ने जात होतो. त्याकाळी ट्रॅफीक न्हवते त्यामुळे जास्त वेळ लागत न्हवता.

म्हणजे किलोमीटर पेक्षा मोठा इश्यू इथे ट्रॅफिक हा आहे.मी शंका घेत नाहीये किंवा माझं मूल ग्रेट असंही म्हणत नाहीये.मुद्दा असा की चांगल्या शाळा 5-6 कीलोमीटर वर असू शकतात.प्रचंड ट्रॅफिक किंवा इतर काही समस्या(बस मध्ये बुलिंग) नसतील तर इतकी वाईट परिस्थिती नाही.माझ्या आजूबाजूला 80% मुलं 3 वर्षांची असल्यापासून 5.5 किलोमीटर प्रवास करतात.

साहिल शहा, वय वर्षे 6 असलेल्या मुलाना इतक्या लांब पाठवणं मला तरी पटलं नाही . मुलगी राहते गोरेगावात आणि शाळा अंधेरी . ट्रेनन तीन स्टेशन येतात .गोरेगावात इतर शाळा नाहीत अस नाही. आमच्याच आजू बाजूला 5 ते 7 मिनिटांवर उत्तम शाळा आहेत.

सकाळी 9 ला तयार राहायचं म्हणजे तिला कमीत कमी 7 ला उठवलं पाहिजे तिच्या कलाने तयारी करून घ्यायला. पण शाळेच नाव आहे प्लस आय बी बोर्ड म्हणून पालकांनी प्रिफर केलं असावं. त्यांचा जो काय निर्णय असेल तो. ती मुलगी हुशार आहे तिला त्रास होऊ नये असे वाटते इतकेच

प्रत्येक पालक शाळेचा निर्णय बराच उहापोह करून घेत असतो.खास करून हल्ली जिथे अधे मध्ये शाळा बदलणे अवघड असते तेथे तरी.त्यांनीही काही विचार करून त्या शाळेचा निर्णय घेतला असावा.आय बी म्हणजे पुढे मागे ऑनसाईट जाऊन मुलांना परदेशी शाळेत घालणे असा काही दूरगामी विचारही असेल.काय माहीत.मुलीने 'मला त्रास होतोय' सांगितले तर बदलतीलही.बरेचदा मुलं शाळा बदलायला अजिबात उत्सुक नसतात.आमच्या घरामागे एक प्रसिद्ध(आणि वर्षाला 1 लाख फी वाली) शाळा आली तेव्हा आम्ही विचारले होते मुलीला.कडाडून नकार आला.(पण पैसे वाचले ही त्यातल्या त्यात चांगली गोष्ट.)
माझ्या मैत्रिणीने आयबी बोर्ड ला टाकलंय. थेट ऑक्सफोर्ड सारखा पोर्शन वगैरे वगैरे.फी जास्त आहे.
बऱ्याच जणांनी बाणेर हुन चांगली शाळा म्हणून मुलांना संस्कृती भुगाव ला टाकले आहे.प्रत्येकाकडे स्वतःच्या निर्णयासाठी काहीतरी सॉलिड (समोरच्याला गप्प बसवणारे) कारण असते.

किंवा अंधेरीला Wink मूव्ह व्हायचं असेल.
९ ला निघायला साडे आठला उठलं तरी झालं हा पहिला धडा पालकांना गिरावायची गरज आहे. Proud Light 1

काय माहित. आमच्या इथे लोकांनी मुलाला खराडीला शाळेत अ‍ॅडमिशन मिळाली म्हणून नोकरी बदलून स्वतःचं आईबाबांचं घर सोडून भाड्याने खराडीला राहणे असेही केलेय.
मलाही खूपदा इशा फूटप्रिंट मध्ये घर घ्यावं वाटतं. Happy पण पैसे पाहून गप बसते

अमित Lol

इशा फूट प्रिंट काय आहे?

आणि अजून एक : ज्यांचे पाल्य आय बी बोर्डात आहेत त्यांना प्रश्न ? अभ्यासक्रमात काही बदल जाणवतो का ? म्हणजे काही extra स्किल सेट वगैरे ?

वरच्या ६.८ किलोमीटर चर्चेवरून मी माझी बालवाडीपासूनची दादरची शाळा आमच्या माझगावच्या घरापासून किती किमी आहे हे चेक केले. तर त्या काळी मी ८ किलोमीटर जात होतो. त्या मार्गाला आजच्याईतके ब्रिजही नव्हते. त्यामुळे जस्स्त वेळ लागायचा.
अर्थात मुलाला एवढ्या लांब का टाकले यावरून तेव्हाही बोंबाबोंब व्हायची. त्यात चौथीपासून स्कॉलरशिपचे एक्स्ट्रा क्लास सुरू झाल्याने मी एकटा बसने किंवा ट्रेनने प्रवास करायचो. लोकांना पुन्हा ते फार धाडसी वगैरे वाटायचे. अर्थात त्या काळी आजच्याईतकी परिस्थिती घाणेरडी वा लहान मुलांसाठी असुरक्षित नव्हती. मला प्रवासखर्च म्हणून पॉकेटमनीही मिळायचा. त्यात मस्त वडापाव, भेळ, गोळा वगैरे चरत घरी यायचो.
परीस्थिती बेताचीच असूनही घरी कधी शाळेच्या फीजचे टेण्शन आलेले बघितले नाही ईतकी ती कमी होती. वा एकूणच वह्यापुस्तक. पेनपेन्सिल. बॅग गणवेश .. सगळाच खर्च कमी होता.
आता स्कूलबसच्या थोडक्या अंतरासाठीही मुलीचे महिन्याला २५०० मोजत होतो. वर्षाचे जवळपास २५००० स्कूलबसचा खर्च
आता हे त्या वरच्या ६०-७० हजार ते लाख दिडलाख फी मध्ये जोडा..
याऊपर ईतर खर्च वर्षभरातले जोडा जे शिक्षणाशी संबंधित असतात..

म्हणजे किमान दिड लाख एका मुलावर खर्च.. दोघांवर ३ लाख..
मग ते झेपायला मला सांगा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न किती असायला हवे?आणि ते किती जणांचे असेल? लाखावर पगार घेणारे लोकंही पोटाला चिमटे घेत मुलांना शिकवत आहेत

आजची मुले उद्याचे भविष्य आहेत. त्यांना चांगले शिक्षण जर माफक दरात मिळत नसेल तर अवघड आहे देशाच्या भविष्याचे?

Pages