ऑनलाइन शाळेची फि भरण्याबद्दल

Submitted by mrunali.samad on 12 September, 2020 - 13:10

सरकारने पाचव्या ईयत्तेपर्यंत ऑनलाइन क्लासेस घेऊ नयेत, असे सांगितले असतानाही, खाजगी शाळांचे
ऑनलाइन क्लासेस सर्रास सुरू आहेत. अगदी नर्सरी चे सुध्दा.
माझा मुलगा तिसरीत आहे.
पाल्य शाळेचे इन्फ्रास्ट्रक्चर वापरत नसतानाही शाळा पुर्ण फि भरा असं म्हणत आहे.
ऑनलाइन क्लासेस लहान मुलांसाठी वेळेचा अपव्यय आहे.इतकी लहान मुले ऑनलाइन शाळेतून खरच काही शिकताएत का?
इतकी फि भरणे गरजेचे आहे का?शाळा फि मधे कनसेशन द्यायलाही तयार नाहीए.
तुमच्या inputs आणि मतांचा आदर आहे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

माझी मुलगी ही नर्सरीला आहे, तिच्या शाळेचा रोज msg येतो, गुगल मिटिंग ची लिंक share करतात कलाससेस ची. ती अटेंड नाही करत. एकदा try केले मी सोबत बसून पण नाही बसली. मग मीही नाद सोडून दिला..

पण त्यांच्या फोन msg येतो फी भरा म्हणून, आणि आता 15sep last date दिली आहे, नाही भरली तर ते आता लिंक share करणार नाहीत online classes ची.

मला असं वाटत आहे, कि जे पालक फी भरतील त्यांच्या पाल्यना पुढच्या इयत्ता मध्ये ढकलतील. जे नाही भरणार त्यांना नाही.. माझा आपलं अंदाज Proud

तसंही काही शिकणा होतं नाही, आणि पुढच्या वर्षी नर्सरी तर नर्सरी.. पण पुढच्या इयत्ताच्या मुलांचा विचार करायला हवा.

मला असं वाटतयं वार्षिक परिक्षा नसणार आणि वर्षाच्या शेवटी गव्हर्नमेंट अनाऊन्स करेल, सगळ्या मुलांना वरच्या वर्गात घाला.
मीही जूनपासून मुलाचे क्लासेस अटेन्ड करत नाहिए.
मी विचार केला कि पुस्तके घेऊन घरीच शिकवेन तर फि भरल्याशिवाय शाळा पुस्तके नाही देणार म्हणते.
मुलीलाही एडमिशन घेतले होते नर्सरीला.ती तर अडीच वर्षेचीच आहे,काय कळणार तीला ऑनलाइन?

तुम्ही घरून ऑनलाईन काम करत असाल तर कमी पगार घेता का?

माझा जॉब गेला आणि नवरा औटो सेक्टरमध्ये आहे, WFH is not applicable आणि तरीही पगार कमी झाला आहे.
Entire auto sector employee's sallery cut by min 10% to max 50% till March 21.
Don't know about aviation,hotel and travel industry.

Same here..
पण मुलगी attend नाही करत class.. मग कसं फी भरायची?

खाजगी शाळांचा आणि दवाखान्यांचा मनमानी कारभार वाढतच चालला आहे.
सरकारचा त्यांच्यावर अंकुश नाही आणि सामान्य माणसाला
त्यांच्याशिवाय पर्यायच दिसत नाही.

(तुम्ही घरून ऑनलाईन काम करत असाल तर कमी पगार घेता का?)
मनमानी सहन करून आपणच मूर्ख आहोत असे समजून सामान्य माणूस आपसात भांडून त्यांचे मात्र भले करत आहे.

अगदी लहान मूल असेल तर एखादं वर्षं गेलं तरी चालेल.
शाळा पूर्ण चार्ज करतात.फक्त टीचर्स चे पगार पूर्ण देतात का हे तपासायला हवे जमेल त्या स्रोतांकडून.
शाळा बंद असली तर सफाई, गार्डन, मैदान असल्यास मैदान,ऍडमिन, सिक्युरिटी हे खर्च असतातच.
सरकार चा नियम फी साठी तगादा करू नका असा आहे.आमच्या इथे हे क्लास मधून फी हफ्ता मिळेपर्यंत बाहेर काढण्याचे प्रकार झाले.मग एका स्थानिक व्यक्तीकडून शाळेला तंबी दिल्यावर 'तुमची काही अडचण असेल तर व्यक्तिगत संपर्क करा, आम्ही नक्की विचार करू' असं केस टू केस ठरवण्यात आलं.
शिक्षक मन लावून शिकवत आहेत.त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी पूर्ण फी भरली.
न्याय्य नाहीत असं वाटणाऱ्या बऱ्याच गोष्टी या काळात घडतात.आपण वैतागून काही काळाने समजून घेतो.त्यातली ही एक.
स्कुलबस, स्टाफ,ड्रायव्हर,बस मावशी या सगळ्यांचा धंदा पूर्ण बंद आहे.

फक्त टीचर्स चे पगार पूर्ण देतात का हे तपासायला हवे जमेल त्या स्रोतांकडून.........

माझ्या मुलांच्या शाळेतील शिक्षिकाचेच 50% पेक्षा कमी पगार हातात येतो आणि तेही वेळेवर नाही.
Teacher's are good only we are talking about school management behaviour towards below 5th std kids online classes .

माझा मुलगा सिनीयर केजी मध्ये आहे. वर्षाची फी 55500आहे. त्यातील 25000 एप्रिलमध्ये भरले होते. जून 15पासून ऑनलाईन शाळा सुरू झाली. आता शाळेने स्वतः 10500फी कमी केली. उरलेले 20000 चार हप्त्यात भरायचे आहेत डिसेंबर पर्यंत. शिक्षिका चांगले शिकवत आहेत. काही लोकांनी फी भरलेली नाही त्यामुळे मुलांचे नाव काढून टाकले शाळेने.

च्रप्स, माझ्या मुलीची नर्सरीची फि 80,000 आहे.
हि मिडल लेवल स्कूल ची फि आहे.
बीग स्कूल लाईकड DPS, 1.5 lakh for nursary excluding donation.

च्प्रस,
या आकड्यापेक्षाही आश्चर्यचकीत करणारे आकडे बघायला मिळतात. अगदी मोजक्या चांगल्या शाळा, त्याही पुणे शहरातच(पी सी एम सी मध्ये नाही) आहेत ज्या कमी चार्ज करतात.
एरवी लॉटरी ६०००० पासून चालु होते. पोर चिमुकलं नर्सरी ला जाणार असलं तरी.

सिनियर केजी ची फी 55500???
काय आयआयटी कोचिंग देतात का आतापासूनच?
>>>>>
पैसे शिक्षणाचे नाही एसी क्लासरूम आणि एकूणच चकाचक ईन्फ्रास्ट्रक्चरचे द्यावे लागतात.
५५ हा ईथला लोएस्ट आकडा आहे.
मुलीचे यापेक्षा जास्त भरत आहे.
मुलाचे कसे भरायचे हे टेंशन आहे.
यामुळे आणि यामुळेच ईच्छा असूनही तिसरया अपत्याचा विचार कॅन्सल करत आहे.
(किती क्रूर आहे हे. आपण मुलांना जन्म देत नाही कारण त्याच्या शाळेची फी आपल्याला परवडणार नसते)

एकूणच हा शिक्षणाचा खर्च भरमसाठ वाटत असला तरी दुसरा पर्याय नसल्याने हतब्ल वाटत आहे.
काही वेगळा पर्याय जोखायचे म्हटले तरी घरून याला परवानगी मिळणार नाही. पैश्यासाठी पोरांच्या भविष्याशी का खेळतोस वगैरे ऐकावे लागेल.

तरी नशीब हा लॉकडाऊन लागला नाहीतर अडीच वर्षाच्या मुलाच्या प्ले ग्रूपसाठी ४८ हजारांचा फटका बसणार होता. ते वाचले समजायचे.
आता नर्सरीत जाईल पुढच्यावर्षी तेव्हा काय परिस्थिती असेल त्यानुसार निर्णय घेऊ... पण आमच्या घरचे मला ५०-६० हजारांसाठी मुलाच्या भविष्याशी खेळू देणार नाहीत

या लॉकडाऊन काळात शाळा फी फारशी कमी करण्यास उत्सुक नाही. पण नवनवीन उपक्रम राबवत ती फी जस्टीफाय करायचा प्रयत्न करतेय. पण त्याला काही अर्थ नाही. हजार रुपये थाळी ठेवायची आणि ताट भरायला उगाच वीस प्रकारच्या चटण्या ठेवायच्या असे झालेय.

सर्व लबाडी आहे.

इतर क्षेत्रातल्या लोकांच्या नोकऱ्या गेल्या,पगार नाही तरी शिक्षकांचे पगार झालेच पाहिजेत?

महागड्या शाळेत पाठवणे हीच चूक आहे. शिक्षणाव्यतिरिक्त काही सुखसोयी द्यायच्या असतील तर त्या दुसरीकडे ठेवा. त्या माथी मारू नका.

आता बाह्यशिक्षण / दूरस्थ शिक्षण शालेय वर्गालाही लागू करा. ओनलाईन पुस्तके डाउनलोड करा बालभारतीची ( एकेक पुस्तक pdf 8 MB/ txt file ४०० - ८०० kB आहे.) आणि शेवटी परीक्षा. आणि त्याची परीक्षाफी फारतर दोन हजार.

शाळांनी ओवरहेड्स लाइएबिलिटीज वाढवून ठेवल्या आहेत. सोसायटीतल्या स्विमिंग पूल सारखे)

बाप रे. कसले आकडे आहेत. अर्थात त्या तुलनेत ते शिकवत पण असतील. खाजगी क्लासेस लावावे ही लागत नसतील मग . आमच्या इथे शाळा निवांत आहे. पण खाजगी क्लासेस नी त्यांचं चालूच ठेवलंय. फी वेळेत नाही भरली तर रिमुव्ह करणे वगैरे.

आदर्श जगात पगार कोणाचेच कमी व्हायला नको.पण असं होत नाही.आणि पगार अर्धे/डिले झाले तरी महिन्याचे खर्च, किराणा,बिलं हे त्या मानाने कमी करता येत नाहीत.
डे केअर अधिक स्कुल होती ती कशीबशी ऑनलाईन चालू आहेत.तेही आता आता पालक घरी असल्याने लहान मुलांना ऑनलाईन शिकवायला पैसे भरणार नाहीत(ज्यांनी वर्षाचे भरले आहेत ते डे केअर्स बहुतेक परत करणार नाहीत.ते जस्टीफाय करायला काही न काही ऑनलाईन उद्योग, किंवा शाळेच्या बॅग, किट असे देत राहतील.) डे केअर्स चा धंदा पूर्ण बंद झालाय. डे केअर्स चे टीचर मावशी यांच्यावर भाज्या विकायची आणि डबे बनवायची वेळ आलीय.आमच्या एरियात अर्धा किलोमीटरवर एक या दराने डे केअर होती.

सामान्यपणे शाळेची फी दोन मुलांची मिळून पालकांच्या पगाराच्या/उत्पन्नाच्या ८-१०% असते/असावी. शाळाही सहसा ते बघूनच प्रवेश देतात. त्यामुळे फी भरपूर असली तरी पालकही आर्थिक दृष्ट्या सक्षम होते. आता कोव्हीड काळात सगळीच गणितं बदलली. होईल सगळं सुरळीत पण तोवर धीर ठेवणे अवघड आहे.

फी भरपूर असली तरी पालकही आर्थिक दृष्ट्या सक्षम होते. आता कोव्हीड काळात सगळीच गणितं बदलली. >> सहमत.

If you think education is expensive, try ignorance. —Robert Orben

School is saying that pay full fees whether your child is attending the online class or not then only your child will allow in next class...They are not bothered whether the kid is learning or not.
(For primary school)

I am not defending the school. I have no reason for it. But I still feel, there is nothing wrong in charging the fees, irrespective to your child attend the school or not. It is your choice to not to attend the classes. The school is operational and they have cost to keep it running.

2-5 मुलांनी ऑनलाइन शाळा अटेंड नाही केली तरी operational cost तर चालूच रहाणार. विजेची बिल्स, टॅक्सेस, *शिक्षक, स्टाफ यांचे पगार, काही शाळांच्या बिल्डिंगज लीजवर असतील तर त्याची रक्कम, स्कुल बसेस रेंटवर असतील तर ती कॉस्ट, ऑनलाइन शाळेसाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर, काही वेळा त्यासाठी दिल्या जाणाऱ्या ट्रेनिंगचा खर्च, त्या सेटअप साठी लागणारा सपोर्ट स्टाफ (may be one IT person to support hardware software issues). अजूनही काही खर्च असतील तर मला माहित नाही.
Whereas, प्रत्यक्षात शाळा चालू नसल्यामुळे काय खर्च कमी झाले असतील ते मला समजत नाही. AC आणि त्यामुळे इलेक्ट्रिसिटी बिल्स कमी होतील. अजून काय कोणी सांगेल का? आणि तसे काही असतील तर त्या प्रपोर्शनमध्ये फीज कमी करायला हवी याच्याशी मी सहमत आहे.

* शिक्षक आणि स्टाफचे पगार कमी झाले आहेत का? असतील तर तसं करण्यामागे काय लॉजिक हे मात्र कळलं नाही. रादर ती फसवणुक आहे. इतर क्षेत्रातील एम्प्लॉईजचे पगार कमी झाले कारण बिझिनेस कमी झाला, लॉक डाउनमुळे कस्टमर व्हिजिट्स, साईट implementation अशा गोष्टीवर परिणाम झाला, नवीन ऑर्डर्स नाहीत. पण शाळांना जर विद्यार्थ्यांकडून फीज मिळत असेल आणि इन्कम कमी झाला नसेल तर शिक्षकांना का कमी पगार देणार?

प्रि स्कुल टीचर्स हा अत्यंत जोखमीचा आणि त्या मामाने टिकल्या पगार मिळणारा जॉब आहे.सतत चेहऱ्यावर हास्य, अत्यंत हट्टी, टॅनट्रम वाली 25 मुलं हाताळणं, कोणी पडत झडत नाही, दुसऱ्या ला मारत नाही यावर लक्ष ठेवणं(मावशी पण एकच असतात.त्या सगळीकडे पुऱ्या पडत नाहीत.)
माझी एक मैत्रीण सिव्हिल इंजिनिअरिंग सोडून प्रि स्कुल टीचर बनली बेबी सिटिंग चा प्रश्न आणि मुलांबरोबर राहता यावे म्हणून.
यांच्या ट्रेनिंग मध्ये असंख्य लठ्ठ क्राफ्ट जर्नल्स(बांगड्यांचा हत्ती कापसाचा ससा पानांचा मोर चिंध्याचे बदक लोकरीचे घुबड पेन्सिल शेव्हिंग चा केक भेंडी ठष्याचे मधमाशी पोळे),ट्रेनिंग्स, शाळेनंतर फॉर्म भरणे, असेसमेंट वगैरे काम, शनिवारी 25 पालकांना भेटून 'मेरा बेटा खाते समय उलटी तो नही करता ना' वगैरे प्रश्नांची हसऱ्या चेहऱ्याने उत्तरे देणे, वर्षाच्या शेवटी पूर्ण वर्षात 1000 पगारवाढ वगैरे हे बघून 'यापेक्षा कन्स्ट्रक्शन साईट वर मी खुश होते' म्हणाली.
मोठ्या शाळा यापेक्षा खूप प्रो असतात.टीचर्स ना पगार, भरपूर ट्रेनिंग, सतत मोटिव्हेशन हे सर्व चालू असते.यात जरा चूक झाली तर शेजारची नवी उघडलेली मोठी शाळा टीचर पळवायला बसलेली असते.

My son's school (DPS, GURGAON) charge only tution fee. Also there is option to pay monthly. Other fees like annual fee, transport, lab changes etc not charged till date. They are taking online classes 9 to 1, weekly assessment eyc. My son is 10th CBSE. I think it is reasonable.

The RTE Act under section 12 (2) makes provision for reimbursement of expenditure to schools providing free and compulsory elementary education as specified in Section 12(1)(c),

@हेल्गा हपलपफ हे मला माहिती आहे. या वर्षी कोरोनामध्ये सरकारने आधार कार्ड नंबर देणे कंपलसरी केले. माझ्या मुलीच्या शाळेत मुख्याध्यापकांनी ऑनलाईन मिटींगमध्ये त्या शाळेचे। 16लाख रुपये शासनाने दिले नाही कारण 25%RTE मुलांचे आधार कार्ड नंबर दिलेले नाहीत असे सांगितले. बाकी मुलांकडून टयूशन फी घेतली आहे . ऑनलाईन शाळा सुरू आहे. परीक्षा पण झाल्या. यात 25% RTE मुले पण आहेत त्यांना शाळेने वार्यावर सोडले नाही. RTE लागू होण्यापूर्वी आणि आताच्या फी मध्ये खूप फरक आहे. यात कुणाला दुखावण्याचा हेतू नाही माझा. शासनाच्या कारभाराची किंमत आपण मोजतो इतकेच म्हणायचे आहे. बाकी गैरसमज नसावा.

एक शक्यता ही पण आहे की काही शाळांमध्ये rte च्या जागा नैसर्गिक पणे/मुद्दाम भरल्या नाहीत आणि त्या जागा मॅनेजमेंट कोटा म्हणून डोनेशन घेऊन इतर गरजूना दिल्या.(मला एका मोठ्या शाळेचा 'बघा काही होऊ शकेल का आतून' रेट 2 लाख नर्सरी साठी आहे हे माहीत आहे.आम्ही त्या शाळेच्या वाटेला गेलो नाही.)

मी भरली आहे माझ्या मुलीची LKG ची फी डिसेंम्बर 2019 लाच कारण तेंव्हाच ह्या ऍडमिशन होतात. हल्ली काहीही फिज घेतात शाळा. मी सहा आकडी फी भरली आहे , ह्यात गणवेश , ब्रेकफास्ट आणि स्कुलबस नाही त्याचे अजून काही हजार एप्रिलमध्ये भरायचे होते. पण ऑनलाइन मुळे ते नाही भरायला लागले (वाचलो) , पुस्तकांचे पाच हजार वेगळेच. ही शाळा निगडी प्राधिकरण मध्ये आहे (शाळेला सी बी एस इ value for money च टॉप रँकिंग मिळालं आहे मागच्या वर्षी, त्याचा अर्थ काय ते माहीत नाही Happy ).140 सीट साठी शाळेला जवळ जवळ 2500 अर्ज आले होते. त्यामुळे नंबर लागून तुम्ही जर ऍडमिशन नाही घेतली तर शाळेला काही फरक पडत नाही. शाळेने मे पासूनच रोज एक दिवस काहीतरी ऍक्टिव्हिटी दयायला सुरुवात केली होती. जून पहिल्या आठवड्यात शाळा सुरू झाली. आधी दीड महिना सकाळी 9 ते 12 होती आता एक तास कमी झालाय पालकांनी आरडाओरड केल्यावर. एका पालकाला पाल्याबरोबर बसावेच लागते, पण काही मुले आहेत जी स्वतःच सगळं मॅनेज करतात. बऱ्याच मुलांना आवडत आहे (मुलीला आवडत नाहीए अजून पण बसते रोज न रडता). आणि लक्ष दिले नाही तरी ऐकत असतात मुलं. सारे सणवार साजरे करून झालेत ऑनलाइन, गुरुपौर्णिमा , एकादशी, ईद , गणपती, गोकुळाष्टमी इत्यादी (मुलांना काय नटायला मिळतं म्हणून आवडतं) . 5-6 वेबिनार पण झालेत पालकांसाठी. प्रत्येक महिन्याला पिटीए पण झाली आहे. दोन परीक्षा झाल्यात. दिवाकर नाट्यछटा आणि इतर स्पर्धा पण ऑनलाइन झाल्यात त्यात सुध्दा भाग घेतात मुलं. असाईनमेंट सारख्याच असतात त्या अपलोड करायच्या. पण तरीही एवढया लहान मुलांना ही अशी शाळा नको वाटते. LKG मुलांनी तर शाळा बघितलीच नाहीये. त्यांच्यासाठी खेळणी, शिक्षकांकडून लाड करून घेणे, पर्सनल टच , मित्र इ फार महत्वाचे आहे आणि त्यातली गम्मत समजायला हवी पण सध्यातरी इलाज नाही.

@अनु.. पी सी एम सी मध्ये (सौदागर मध्ये नाहीयेत..) कमी फी वाल्या पण उत्तम शाळा जसे की अर्सला, अँड्र्यूज, कमलनयन, ज्ञानप्रबोधिनी इ. आहेत. आणि ह्या खूप जुन्या शाळा आहेत.

@ मीरा .. एक महत्त्वाचा मुद्दा राहिला तो म्हणजे ऑनलाइन शाळेत शिक्षकांना मुलांना हँडल नाही करावं लागत जे एक मोठं काम कमी झालं आहे शाळेचं. मेंटेनन्स पण कमी.

असो सध्या ही एक इंडस्ट्री झाली आहे. बरेचदा वाटते आपण शिशु गटासाठी एवढे पैसे काय लॉजीकने भरले ? काळाचा महिमा अजून काय Sad

इथे पण नर्सरी ला 85000 फी आहे, काय including माहित नाही. पोतदार वगैरे तर बघायलाच नको. पोतदार मध्ये admission घेऊन ही सोसायटी मधील एक मुलगा इयत्ता दुसरी वाला private class ला जातो..

Pages