दुधी भोपळा आणि त्यापासून बनलेले चविष्ट पदार्थ

Submitted by MSL on 11 September, 2020 - 13:36
विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला लेखच दिसत नाही आहे कि दुधी भोपळा आणि त्यापासून बनलेल्या चविष्ट पदार्थांची नावे आपण द्यायची आहेत?
मी तर दुधी भोपळा थालीपीठ, सांबार, सूप, पराठ्यात ढकलून संपवते.

लाल भोपळ्याची खीर करतो तशी दुधीची खीर छान लागते.
दुधी मुठीया, दुधी थेपला यासारख्या गुजराती रेसिपीज करू शकता.
सिंधी सेल भाजी, दुधी कोफ्ते पण चवीला छान लागतात.

दुधीची चणाडाळ घालून केलेली तिखट भाजी, आले,लसूण, मिरची घालून केलेली गाळ भाजी मस्त लागते.
मी एकदा दुधी कोफ्ते केले होते, चव अप्रतिम होती पण खूप वेळ खाऊ काम आहे ते.

एकही शब्द न लिहिलेला पण छान प्रतिसाद असलेला, धागा शिर्षकाशी सम्बधित असा हा पहिलाच धागा बघितला. भारी आहे. माझ्यासारखे न लिहिता येणार्यांना पण धागा विणायचे चान्सेस दिसतायत.

धाग्याच्या हेडर मध्ये किमान किती शब्द असावेत असा काहीतरी नियम आहे ना माबोवर?
बाकी दुधीभोपळ्याची भाजी प्रचंड आवडीची आहे. छान कोवळा भोपळा असेल तर साध्या फोडणीवर अप्रतिम भाजी होते. अशी भाजी मी वाटीत घेऊन खाऊ शकते.

दुधीचं पन्हं

कोवळा दुधी फोडी करून, उकडून गार झाल्यावर मिक्सरम्ध्ये घालून त्यात चवीनुसार साखर, मीठ घालून त्या दाट रसात मग लिंबू पिळायचं. वेलची पूड आणि केशर घालायचं की अगदी पन्ह्यासारखं लागतं.

दुधीचे कोफ्ते बनवून केलेली ग्रेव्ही वाली भाजी.
जे अगदीच दूधीला नाक मुरडतात त्यांच्यासाठी बेस्ट वे टू hav it.

दुधीचे भरीत::
- दुधी किसून घेऊन, तसच, पाणी न काढता, काढईत, तूप न जिरे हिंग घालून ५-८ मिनिटे नुसता परतून घ्यायचा...
- नेहमीप्राणेच भरीत चे दही तयार करून,वर तयार किस त्यात घालायचं...
- हे भरीत , भोपळा न शिजवता सुंदर होते चवीला....

सूप :: कोवळा दुधी चे तुकडे+ कांदा चे तुकडे + लसूण + आले + मिरची हे सर्व कूकर ल लावून, नंतर मिक्सरवर फिरवून घ्यावे...तिखट िचवीनुसार मिरची घ्यावी...
## तूप जिरे हिंग मिरी लवंग दालचिनी हे तुपावर परतून,त्यात ग्रेव्ही घालायची...गरज वाटल्यास गरम पाणी थोडेसे..
## बटर / लोणी घालून गरमागरम प्यावे...

IMG_20200912_100411.JPGIMG_20200912_100359.JPG
लौकी के कोफ्ते ग्रेव्ही.
मागच्या आठवड्यात केलेले. फोटो छान नाही आला पण चवीला छान झाले होते. आवडतात सगळ्यांना घरात.

हे अमानवीय आहे. माबोवर अमानवीय नावे नवा ग्रुप हवा. बोकळत आणि कंपनी अडमिन ठेवली तर अजून बहर येईल. असे धागे तिथे आपोआप विणले जातील. Wink

बादवे, दुधी आवडीची भाजी. छान किसून, थोडी हिरवी मिरची, कांदा, लसूण पाकली, फोडणी, वाफवून घ्यायची. चपाती सोबत खाताना दही थोडे मिक्स करून घ्यावं. Happy

Pages