नरेंद्र मोदी आणि बीथोवन सिंफनी

Submitted by बिथोवन on 10 September, 2020 - 08:39

पाश्चात्य संगीताच्या इतिहासात बिथोवन सिंफनी नववी ही किती वेळा आणि किती ठिकाणी वाजवली गेली याची मोजदाद करणे केवळ अशक्य. पाश्चात्य देशात त्यांचेच संगीत आणि त्याचा आस्वाद घेणारी मंडळी असतील यात नवल काही नाही पण आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील बिथोवनची सिंफनी ऐकण्यात गुंग झाले हे नवलच. ही सिंफनी म्हणजे दांडिया संगीत नव्हे की ज्यासाठी त्यांनी ताल धरावे. जुलै २०१७ च्या पहिल्या आठवड्यात हॅम्बर्ग येथे झालेल्या १२ व्या जी -२० शिखर परिषदेदरम्यान, होस्टेस अँजेला मर्केल यांनी शहरातील नव्या कोऱ्या कोंसर्ट हॉलमध्ये बीथोवन सिंफनी क्रमांक नऊ ऐकण्यासाठी जागतिक नेत्यांची व्यवस्था केली होती. डोनाल्ड ट्रम्प (यूएसए), शी जिनपिंग (चीन) आणि व्लादिमीर पुतीन (रशिया) यांना या संपूर्ण कार्यक्रमात रस दिसून येत नव्हता. परंतु नरेंद्रभाईंनीं हाताच्या बोटांनी ताल धरला होता हे स्पष्ट दिसत होते. त्यांना साथ केली ती फ्रान्सचे युवा अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, पण ते एक एक्स्पर्ट शास्त्रीय पियानो वादक आहेत, मोदी नाहीत.

तुम्हा श्रोत्याना जर पाश्चात्त्य शास्त्रीय संगीताशी दोस्ती जमवावी असे वाटत असेल तर त्यातील काही प्रसिद्ध संगीतरचना ऐकणं ही पहिली पायरी असेल. यूटय़ूबवर सहज उपलब्ध होतील अशा काहीं प्रसिद्ध रचना:

(१) बीथोवनची अत्यंत लोकप्रिय अशी ए मायनरमधली Für Elise (एलीससाठी) ही पियानोसाठी लिहिलेली हलकीफुलकी रचना. तुम्ही ती ऐकलीच आहे, नकळत. तिला एक खिन्नतेची झालर आहे. ही रचना फक्त पियानोसाठी असून तिच्याबरोबर कोणत्याच प्रकारचा ऑर्केस्ट्रा नाही. तिच्यातील मेलडी सुस्पष्ट आहे. लय धीमी आहे आणि हार्मनी तितकीशी गुंतागुंतीची नाही. यामुळे ती ऐकायला सोपी तर आहेच, पण तिच्या संगीताचा आस्वाद घ्यायला रसिकाला कसलाही जाणीवपूर्वक प्रयत्न करावा लागत नाही.

(२) मोझार्टची सर्वाधिक लोकप्रिय Eine Klein Nacht Musik (A Little Night Music) ही सेरेनाड या संगीतप्रकारातील एक रचना.

(३) इटालियन रचनाकार व्हिवाल्डीची Four Seasons (चार ऋतू) ही रचना. ही त्याची सर्वात लोकप्रिय रचना आहे. स्प्रिंग (वसंत ऋतू), समर (उन्हाळा), ऑटम (शरद ऋतू) आणि विंटर (हिवाळा) या वर्षांतल्या चार ऋ तूंशी निगडित पाश्चात्त्य रसिकांच्या भावना या रचनेत अतिशय प्रभावीपणे व्यक्त होताना दिसतात.

(४) मोझार्टची सिम्फनी क्रमांक ४०. ही ‘द ग्रेट जी मायनर सिम्फनी’ म्हणूनही प्रसिद्ध आहे. ही त्याची सर्वोत्तम सिम्फनी समजली जाते. ओपनिंग मूव्हमेंट चुकवू नये आणि ती ऐकल्या वर लता मंगेशकर/ तलत मेहमूद यांनी गायलेल्या कुठल्या गाण्याची आठवण येते ते बघा.

(५) ‘किंग ऑफ वॉल्ट्झ’ म्हणून ओळखल्या गेलेल्या योहान स्ट्रॉऊसची ‘Blue Danube’ ही वॉल्ट्झ संगीताची एक अतिशय प्रसिद्ध रचना. ही रचना हॉलीवूडच्या ज्या अनेक सिनेमांत वापरली गेली आहे त्यात १९९७ सालचा ‘टायटॅनिक’ हा एक आहे.

(६) चायकोव्हस्की या प्रसिद्ध रशियन रचनाकाराची Coronation March लोकप्रिय रचना आहे.

(७) बिझे (Bizet) या फ्रेंच रचनाकाराने त्याच्या Carmen या जगप्रसिद्ध ऑपेरामधील Habenara. स्पॅनिश नृत्यप्रकाराशी निगडित असलेली संगीतशैली.

(८) Schumann (शूमान) या जर्मन रचनाकाराची Traumere. ‘रेमंड सूटिंग्स’च्या टीव्हीवर आतापर्यंत आलेल्या असंख्य जाहिरातींमध्ये या रचनेचा उपयोग केला गेला आहे.

(९) रिचर्ड वाग्नरचा जी मायनरमधील ‘Bridal Chorus’ ही पारंपरिक रचना ख्रिश्चन चर्चमध्ये लग्नप्रसंगी वाजवली जाते ती स्वतंत्र रचना म्हणून ही लोकप्रिय आहे.

आणि लेखाच्या सुरुवातीला सांगितलेली:
१०) बीथोवनची सिम्फनी क्रमांक ९. ही Choral (कोरल) सिम्फनी. ही पाश्चात्त्य शास्त्रीय संगीतविश्वातील एक अतिशय महान आणि सर्वपरिचित अशी रचना समजली जाते. १८ मिनिटांचा Finale अप्रतिम.

.....

Group content visibility: 
Use group defaults

मस्त
ही सर्व म्युझिके मी जाहिरातीत ऐकली आहेत, पिक्चर्स मध्ये ऐकली आहेत
आता नावासहीत ओळखता येतील.

मस्स्त... छान संकलन केले आणि त्याबरोबरचे लेखनही माहितीत भर घालणारे . काही सिंफनीजनी नॉस्टॅल्जिया दिला.

मागे यूट्यूब वर फेमस चित्रपटांतल्या पार्श्वसंगीताच्या सिंफनी ऑर्कॅस्ट्रा पर्फॉमन्सेस सापडले होते ते शेअर करतो.
'द गॉडफादरच्या' पहिल्याच ट्रंपेट ट्यून ने अंगावर रोमांच आले.

द गॉडफादर
https://www.youtube.com/watch?v=X-jdl9hcCeg

द गूड, द बॅड, द अग्ली
https://www.youtube.com/watch?v=enuOArEfqGo

लॉर्ड ऑफ द रिंग्ज
https://www.youtube.com/watch?v=EvZM0jAeeRE

पायरेट्स ऑफ कॅरेबिअन
https://www.youtube.com/watch?v=6zTc2hD2npA

हॅरी पॉटर (सगळ्या वादकांनी हॅरी सारखा चष्मा घताला आहे)
https://www.youtube.com/watch?v=LtavcAJrQdo

मिशन ईंपॉसिबल, जेम्स बाँड असे अनेको सापडतील.

ब्लु डॅन्युबशी नामसाधर्म्य असलेली वेव्ज ऑफ डॅन्युब ही इओन इवानोविचि यांची एक सिंफनी आहे. त्यातला एक तुकडा 'जीना यहा मरना यहा' या मेरा नाम जोकरमधल्या गाण्यात पीस म्युझिक म्हणून वापरलेला.

माहितीपूर्ण लेख.
पाश्चात्य शास्त्रीय संगीताची शून्य माहिती आहे, क्वचितच कधी ऐकले आहे.
आता गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न करतो.

मस्त माहिती. 40साव्या सिमफनीबद्दल माहित आहे Happy

अर्थात ती तशीही खूप प्रसिद्ध आहे. खूप खूप वर्षांपूर्वी म्हणजे जेव्हा 286 कॉम्पुटर वापरात होते तेव्हा माझ्या कॉम्प्युटरवर C language लर्निंग की असाच काहीतरी एक प्रोग्रॅम होता, त्यात ही चाळिसावी सिमफनी वाजवून दाखवलेली.. हे आता वाचताना आठवले.

मोदींचा संदर्भ वाचून गंमत वाटली. संगीतातले काही कळत असो नसो, चांगले संगीत माणसाला ताल धरायला लावते हे नक्कीच.

लेख नेहमीप्रमाणेच उत्तम. पाश्चात्य शास्त्रीय संगीताचे आपल्याकडे अजून खूप कमी जाणकार आहेत. तुमच्या लेखांमुळे मलातरी गोडी निर्माण होते आहे.
( पण शीर्षकात मोदीन्चा उल्लेख करण्याचे प्रयोजन समजले नाही. )

mi anu Thank you so much.

sulu Thank you so much

Hizenbarg. That's great to know. You must be knowing that Clint Eastwood is a great composer and has scored music for his many movies.

Tavne sir, Thank you. You are correct.

Manav Prithvikar. I have written about Mozart and Beethoven's life in another section here in Katha. Please go through it is interesting. Thanks.

Sadhna, Thank you so much. Music of course is a boundary less.

Manimyau, Thank you so much.

Manav Prithvikar. I have written about Mozart and Beethoven's life in another section here in Katha>>>

Waiting for its next episode...

( पण शीर्षकात मोदीन्चा उल्लेख करण्याचे प्रयोजन समजले नाही. )>>>

थोडे फुटफाल्स वाढले असतील कदाचित Lol

साधनाजी, तुमचं नाव मी लिहितोय and I am having goosebumps! या नावाशी फार गोड आठवणी निगडित आहेत फर्ग्युसन महाविद्यालयात ल्या!. शिवाय साधना ही माझी वीक पॉइंट! तिचा एकही सिनेमा मी चुकवला नाही. मी वारंवार तिची यू ट्यूब वर बघतो ती गाणी म्हणजे लग जा गले कि फिर ये हसीं रात हो आणि दुसरे, तेरा मेरा प्यार अमर.

शीर्षक असे का आहे तर नरेंद्र भाई आहेत गुज्जू आणि गुज्जू लोकं आणि पाश्चात्य संगीत हे समीकरण काही जुळत नाही. मग बिथोवन आणि मोझार्ट म्हणजे त्यांना एखादी जर्मन डिश असावी खमण ढोकळा सारखी असे वाटल्यास नवल ते काय. असे असताना नरेंद्र भाई या सिंफनीची मजा लुटत आहेत आणि ज्यांना हे संगीत कळत असेल असे वाटत होते ते कंटाळलेले दिसतायत. म्हणून असे शीर्षक. धन्यवाद!

बाय द वे म्युझिक मध्ये काडीचंही कळत नसलेल्यांना ही म्युझिक 'लिफ्ट मधलं मम्युझिक/ वॉटर फिल्टर चं म्युझिक म्हणून माहिती असू शकतात Happy
लोकांना 'केनी जी' कोण विचारा, माहिती नसेल. 'लिफ्ट मधली ट्यून' म्हणून ऐकवा, लगेच ओळखतील.

Eine Klein Nacht Musik (A Little Night Music) >> एखादा एकदम जुना ब्लॅक अँड व्हाईट इंग्रजी चित्रपट पहातोय असा वाटलं
ती ऐकल्या वर लता मंगेशकर/ तलत मेहमूद यांनी गायलेल्या कुठल्या गाण्याची आठवण येते ते बघा. >> अगदीच ओळखता आलं .. इतना ना मुझसे तु

Nice Information Happy

लेख नेहमीप्रमाणेच उत्तम. पाश्चात्य शास्त्रीय संगीताचे आपल्याकडे अजून खूप कमी जाणकार आहेत. तुमच्या लेखांमुळे मलातरी गोडी निर्माण होते आहे.
( पण शीर्षकात मोदीन्चा उल्लेख करण्याचे प्रयोजन समजले नाही. )
+१११

छान. या सिंफन्या कानात वाजवत काम करतो बर्‍याचदा.
या सिंफन्या वाजवुन थोड्याफार तरी जमताहेत का बघितलं पाहिजे. Happy

अमित, जर तू हार्मोनिअम वाजवत असशील तर फर एलिस वाजवून बघ. ती सोपी आणि केवळ पियानोसाठी बनवलेली सिंफनी आहे.

Hizenbarg. That's great to know. You must be knowing that Clint Eastwood is a great composer and has scored music for his many movies. >> हो ऐकून आहे असे.

ह्यात मोझार्ट च्या मॅजिक फ्लूट ऑपेरा मधल्या 'क्वीन ऑफ नाईट' ह्या आरिया चा ऊल्लेख पण करायला हवा का? ती ही खूपच फेमस कंपोझिशन आहे ज्यात गाणार्‍याचे सूर दोन वोकल रेंज फिरून येतात आणि सगळ्यात वरच्या पट्टीत हा मानवी आवाज नसून बासरीतून निघालेले स्वर आहेत असे वाटते... अर्थात हा वादनापेक्षा गायनाचा अविष्कार आहे.
सगळ्या ऑपेरा सिंगर्ससाठी ही रचना सादर करणे म्हणजे कौशल्याचा एक मानबिंदू समजतात.
हा ऑपेरा पर्फॉर्मन्स - https://www.youtube.com/watch?v=YuBeBjqKSGQ

आणि एवढ्यात वोल्वो च्या एका कमर्शिअल मध्ये ह्याचा थेट वापर करण्यात आला.
https://www.youtube.com/watch?v=0jdh5rIvx-M

अमित, फर एलिझ' या जर्मन शब्दाचा अर्थ. 'एलिसासाठी'.. फॉर एलिस! अभिजात संगीत आणि 'फर एलिझ' यांचं अगदी जवळचं नातं. ही रचना पियानोसाठी ए मायनर मध्ये लिहिली गेली. सुरुवातीला एक 'ए थीम' वाजते. या थीममध्ये उजव्या हातानं मेलडी वाजवताना डावा हात एक प्रकारची साथ देतो. या थीमनंतर दुसरी 'थीम बी' वेगळ्या पट्टीमध्ये वाजते. मग पहिली 'थीम ए' मूळच्या पट्टीमध्ये वाजते. यानंतर तिसरी 'थीम सी' तिसऱ्या पट्टीमध्ये वाजते आणि शेवटी पहिली 'थीम ए पुन्हा एकदा मूळच्या पट्टीमध्ये वाजते. या रचनेचा फॉर्म ए-बी-ए-सी-ए म्हणजे रॉन्डो फॉर्म' आहे.

गंमत म्हणजे बीथोवनची प्रेयसी थेरेसे हिच्यासाठी ही रचना लिहिली गेली. पण जग मात्र ही एलिसा कोण असेल याविषयी तर्कवितर्क करत राहिलं...!

पण ह्या रचनेत जो एक दर्द आहे त्याला तोड नाही.

तसं कॉपीराईट नसल्याने फर एलिझ कुणीही कुठेही वापरू शकतात. Inglourious basterds ते Django Unchained मध्ये सुद्धा tarantino ला फर एलिझ वापरताना बघून ऑ झालं होतं, पण त्याने ज्या सिनसाठी त्याचा वापर केला, तो बिथोवनचा गौरवच होता, आणि हे पुन्हा बघितल्यावर कळाल.

आपल्याकडे हमखास हे संगीत गाडी रिव्हर्स गिअरमध्ये घेताना असतेच पण खूप कर्कश... तैवान मध्ये कचरा उचलणाऱ्या गाड्यांना असला हॉर्न बसवलाय! रिवर्स गियर आणि कचऱ्याच्या गाडीसाठी याचा वापर करणाऱ्यांनो, लक्षात ठेवा, इथली पापे इथेच फेडावी लागतात.

हो हो टॅरंटिनोने अनेक ठिकाणी फर एलिझ वापरली आहे...कधी पूर्ण तर कधी तुकड्यात
ईनग्लोरिअस बास्टर्ड्स मधली तर चटकन आठवली.
https://www.youtube.com/watch?v=Nx0JnPGQuHY

छान माहिती.
Für चा उच्चार फ्युअर असा काहीसा होतो जर्मनीत.

Hizenbarg, the links you have provided are marvellous. I agree with you about Mozart Magic Flute. Consider it is included in the list. Thank you.

लोकांना 'केनी जी' कोण विचारा, माहिती नसेल. 'लिफ्ट मधली ट्यून' म्हणून ऐकवा, लगेच ओळखतील.

>>

तेरे प्यार ने
ये क्या कर दिया
बेहेकने लगा
दिवाना दिल

संभलता नही
संभालेसे भी
सनम हो गई
बडी मुश्कील

अशा अप्रतिम शब्द रचना असलेल्या गाण्याच्या ट्युन ची गणना 'लिफ्ट मधली ट्यून' अशी केल्याबद्दल जाहीर निषेध

बिथोवन धन्यवाद. आज प्रयत्न करतो.
हाबच्या क्विन ऑफ नाईटची सिंगर अमेझिंग आहे! धन्यवाद इथे शेअर केल्याबद्दल.

नाही हो.कसचं कसचं.
मी 'ओ मेरी जानेजाना, आजा तुझे प्यार दू' या अप्रतिम रचनेचा अपमान करतेय.त्या वाल्या नाही Happy

छान लेख.. एक एक सिम्फनी/ सुरावट घ्या एका लेखासाठी जसे की 40 , टॉय, आह, वू दिरेs ज मामा, 9 नंबर इत्यादी. वर गॉडफादर चा उल्लेख पण आलाय. त्याचा बॅकग्राउंड स्कोर हा सर्वोत्तम पैकी एक आहे. अतिशय उच्च दर्जाचा आणि एकदम हाँटिंग. आपल्या चुन्नू मलीकने त्यातली ढापाढापी करून ' राजा को रानीसे प्यार हो गया ' हे गाणं बनवलय Happy

शिंडलर्स लिस्ट ची सिग्नेचर ट्यून पण सुंदर आहे.
पहिल्यांदा ऐकणाऱ्याच्या डोळ्यातून पाणी आलंच पाहिजे.
यन्नी ची आरिया (ब्रिटिश एअर्वेज च्या जाहीरातीत वापरलीय ती) पण सुंदर आहे.

माझ्यासाठी फार फार पुसट ओळखीचे / अगदी अनोळखी म्हणता येईल असे आहे हे. इथे एका ठिकाणी दिलेत त्याबद्दल धन्यवाद. यामुळे कधीतरी निवांतपणे यात डोकावता येईल.

@mi anu, Thank you so much. Excellent background as you pointed out. Yanni is of course awesome guy!

@a shraddha, Thanks and you recognized that song rightly!

@Killi, Thanks a lot. I have explained about the title of this article in the comments elsewhere.

@ manav Prithvikar, Thanks a lot.

@ Lampan, Thank you so much. Yes I agree with you. Chuunu "Dhapu" Malik is right description!

@ Gajanan, Thank you.