कोविड-१९ चा उद्रेक झालेला असताना पॅनिकनेस कसा कमी करावा

Submitted by DJ.. on 3 September, 2020 - 07:57

काल, माझा मित्र अमितचा फोन आला. बर्‍याच दिवसांनी कामाव्यतिरिक्त बोलायला त्याने फोन केलेला. या आधी आम्ही सगळे मित्र कुणाच्या वढदिवसाला म्हणा, कुणी गाडी घेतली म्हणुन म्हणा किंवा इतर कसल्याही सुख-दुखाच्या क्षणी एकत्र भेटायचो, खुप हसी-मजाक करुन वेळ सत्कारणी लावायचो पण गेल्या ५ महिन्यात सर्वकाही बदललं आहे. कुणाची साधी चौकशी करायलाही वेळ मिळत नाही कारण वर्क फ्रॉम होम मुळे तेवढा वेळ मिळतच नाही.

तर अमितने फोन केल्यावर दोघांनीही इतर सर्व चौकशा, ख्याली खुशाली झाल्यावर असं लक्षात आलं की तो खूप टेंशन मधे आहे. कारण काय तर त्याच्या आजुबाजुला सोसायटी मधे खुप जण कोरोना बाधीत झाले आहेत. हा घराबाहेर जायलाही घाबरत आहे आणि जिवनावश्यक वस्तु जसे की दूध, भाज्या, किराणा आणायलाही तो स्वतः जात नाही किंवा घरातील कोणालाही जाऊ देत नाही. भयंकर पॅनिकनेस आल्यामुळे स्वारी बर्‍यापैकी दुर्मुखलेली आहे. त्याला मी थोडा रिलॅक्स रहा, मुवीज बघ, आवडतं म्युझीक ऐक असं सांगितलं खरं पण त्याचं काही समाधान झालेलं वाटलं नाही एवढा तो डाऊन वाटत होता. आता या अमितला कसं समजवावं Uhoh

त्याचा फोन झाल्यावर मनात विचार येऊ लागले की भारतात कदाचित समुह संसर्ग सुरु झालेला आहे असं म्हणतात. मोठ्या शहरात जॉब करणारे आता वर्क फ्रॉम होम मिळाल्यामुळे आपापल्या मूळ गावी जाऊन वर्क फ्रॉम होम करत आहेत. मार्च पासुन लॉकडाऊन होता त्यामुळे गावाकडे कोरोनाच्या केसेस दुर्मिळपणे सापडत होत्या परंतु आता या क्षणी इतक्या केसेस समोर येत आहेत की काही विचारता सोय राहिली नाही.

अगदी ओळखितले, मित्रांच्या घरचेही पॉझिटीव सापडत आहेत आणि दुर्दैवाने बेड उपलब्ध न झाल्यामुळे दगावत आहेत असं भयाण वास्तव असताना अनलॉक प्रोसेस सुरु झालेली आहे. ह्या सर्वांमुळे पेशंट वाढत आहेत आणि बेड उपलब्ध न झालेल्या पेशंटला प्राणाला मुकावे लागत आहे. या सर्वांचा अति विचार करुन अमितला उगिचंच टेंशन आलं आहे असं त्याच्याशी बोलल्यावर जाणवलं.

अमितसारखी अवस्था बर्‍याच जणांची झाली असण्याची शक्यता आहे. अशावेळी पॅनिकनेस कमी करण्यासाठी काय काय उपाय योजना केल्या पाहिजेत...?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेड नाहीत कसे ?

आमचा एक सिक्युरिटी बोलला , दुसऱ्या सिक्युरितीला एडमित केले
आणि तो घाबरतोय कारण तो वोर्डात एकटाच पेशन्ट आहे

मी म्हटले , म्हणजे बरे झाले , पेशन्ट कमी होत आहेत

आमचा एक सिक्युरिटी बोलला , दुसऱ्या सिक्युरितीला एडमित केले
आणि तो घाबरतोय कारण तो वोर्डात एकटाच पेशन्ट आहे>> ब्लॅककॅट, तुमच्या या पोस्ट मुळे आजवर कोरोनाने पॅनिक झालेले बरेच जण खुप रिलॅक्स होऊ शकतात Proud

आम्ही दोघे सिनियर सिटिझन्स आहोत, मला बीपी आहे परंतु किमान औषधांनी ते उत्तम नियंत्रणात आहे... त्या मुळे मी तसा को-मॉर्बिड नाही इति फॅमिली डॉक्टर
आमचा दिनक्रम.... मूळ सिध्दांत-मार्गदर्शक तत्त्वे..... अनोळखी दुकाने, मॉल्स, बेकर्या अशा जागी जायचे नाही... मास्क प्रोटोकॉल पूर्ण पाळायचा, हात ७ वेळा मोजून धुवायचे, कामवाली पासून दूर रहायचे, तिला हात धुण्यास शिकवले आहे
मानसिक स्वास्थ्यासाठी... आकडेवारी , वैद्यकिय माहिती... उदा. कोविड पश्चात काही जणां च्या फुफ्फुसात छिद्रे पडतात इ.( ही पहिली व शेवटची बातमी आम्ही वाचलेली... या संदर्भात ) मुळीच वाचायची पहायची नाही, रोज ५० मिनिटे घाम येईपर्यंत व्यायाम, साधे जेवण, २ ते ३ दिवसात एखादा उत्तम ऑनलाइन चित्रपट-फील गुड वाटणारा किम्वा संगीताचा कार्यक्रम, परवा रविशंकर शताब्दीचे कार्यक्रमात विदुषी अश्विनीजी भिडेंचा खूप सुंदर कार्यक्रम पाहिला.
व्हिडियोवर मुलांशी, नातेवाईकांशी बोलणे, भेंड्या खेळणे, आम्ही दोघे रोज अर्धा तास रमी खेळतो.
अजून तरी सुरक्षित आहोत, आम्ही टेस्ट करून घेणार नाही कारण जरी पोझिटिव्ह आलो तरी आम्ही दोघेच घरी आहोत, लक्षणे नसली तर आयसोलेशन करणे सोपे आहे, असली तर मग अ‍ॅडमिट व्हायच... फॅमिली डोक्टरांना विश्वासात घेतलय
या शिवाय रोज झोपतांना प्रार्थना ... बाबा या जगाला वाचव.... आम्ही नास्तिक नाही... छान झोप लागते
ही जीवनशैली कदाचित चुकीची वाटेल आपल्या परिस्थिती नुसार पण आमच्या सारख्यांना नक्कीच काही तरी मार्ग दाखवो हीच इच्छा.
काहीदा काही जीवलगांच्या बाबतीत झालेली दु:खद घटना व्यथित करते पण नाईलाज आहे कारण अशा बातम्या सामान्य - अ-कोविद जीवनात सुध्दा व्यथित करतात.
अशा प्रकारे आम्ही पॅनिक न होण्याचा प्रयत्न करतो

रेव्ह्यू उत्तम पोस्ट! तुम्ही व तुमच्या सौ. खबरदारी घेवून रहाता आणि उगाच कशाचा बाऊ करत नाही हे खरंच प्रेरणादायी आहे.

देवकी ती नम्र विनंती जे मास्क वापरणे तोंडाला चिकटपट्टी लावल्यासारखे आहे असे समजून वागतात त्या लोकांसाठी होती Happy उदा: तुम्ही लिहीलेले मास्क न वापरणारे कुटूंब. अगदी प्रातिनिधीक लोकं आहेत ते. असली माणसे बहुतेकांच्या अवती-भोवती असतात. माझ्याही आहेत. आमच्या इथले दर वेळी दिसले की मी आवर्जून माझा मास्क अ‍ॅडजस्ट करते. Wink . फक्त शशी कपूर सारखं "मेरे पास मास्क है" त्यांना ऐकवायचं राहिलं आहे.

रेव्ह्यू उत्तम पोस्ट! तुम्ही व तुमच्या सौ. खबरदारी घेवून रहाता आणि उगाच कशाचा बाऊ करत नाही हे खरंच प्रेरणादायी आहे. +१. आणि या वयातही ५० मिनिटे घाम येईपर्यंत व्यायाम करता- Respect! Happy

कोविडचे मॅथेमॅटीकल मॉडेलनुसार फेब्रुवारी २०२१ ला साथ संपुष्टात येईल ,लसीशिवाय. १९१८चा स्पॅनिश फ्लू यापेक्षा भयंकर असूनही २ वर्षात संपला होता .आजच्या काळात संपर्कक्रातीमुळे कोविड काही महीन्यात संपेल असा अंदाज आहे. लसीची वाट बघत बसू नये कारण २०२१ च्या मध्यापर्यंत लस येणार नाही.

संपर्कक्रांतीचा आधी मी चुकीचा अर्थ घेतला होता.
संपर्क क्रांती मुळे सामूहिक रोगप्रतिकारशक्ती लौकर निर्माण व्हायला हवी आणि म्हणुन तुलनेत लौकर संपुष्टात यायला हवा.

कोविडचे मॅथेमॅटीकल मॉडेलनुसार फेब्रुवारी २०२१ ला साथ संपुष्टात येईल ,लसीशिवाय >> पाच महिन्यात??? झालंच तसं तर साखर पडो तुमच्या तोंडात आणि त्या मॅथेमॅटीकल मॉडेलरच्या ही.

याचं कारण काय असावं? तिथल्या वातावरणामुळे तिथल्या लोकांची असलेली अधिक रोगप्रतिकारशक्ती? की दाट वस्तीमुळे संसर्ग झपाट्याने वाढून निमार्ण होत असलेली सामूहिक रोगप्रतिकारक शक्ती? की दोन्ही?

Act of God

जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे.

तुम्ही लिहिली ती कारणे असावीत
किंवा कदाचित जन्मल्यापासूनच विविध जंतूंशी सामना होत असल्याने पूर्वी सिमीलर जंतूंशी संपर्क होऊन गेला असेल,

( क्रिश सिनेमात जन्तु काल - विवेक ओबेरॉय तयार करतो , पण वॅक्सिंन रोहित मेहरा - रितिकच्या रक्तातून तयार होते , कारण जेनेटिकली दोघे सिमीलर असतात , असेच व्हायरस सुद्धा जेनेटिकली सिमीलर असू शकतील , एखादा माईल्ड करोना व्हायरस पूर्वीपासून काही ठिकाणी अस्तित्वात असेल )

A sero-surveillance study done in Mumbai has revealed that 57% of slum population and 16 per cent of non-slum residents in three civic wards had developed antibodies, indicating many people would already be affected by COVID-19 than the official tally suggests.

https://www.thehindu.com/news/national/coronavirus-57-of-mumbai-slum-pop...

कविन, चांगली पोस्ट. अगदी मनातले मुद्दे मांडलेत. काही सकारात्मक गोष्टी खूप क्षुल्लक दिसतात/वाटतात आणि म्हणून बर्‍याचदा नमूद केल्या जात नाहीत, दुर्लक्षित राहतात. पण त्यांच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले तर खरेच 'थेंबे थेंबे तळे साचे' याप्रमाणे त्या परिणामकारक ठरतात. अनामिक कोंडीत/ ताणात त्या फुगाला लागलेल्या टाचणीप्रमाणे काम करतात आणि सततच्या ताणात थोडा मोकळा श्वास घ्यायला पूरक ठरतात.

२००३ चा सार्स आला होता तेव्हा एखादे सेफ व इफेक्टीव व्हॅक्सीन तयार केले गेले असते तर आता त्याचा थोडा फायदा झाला असता असे वाटते.टेस्टेड व्हॅक्सीन मिळाले असते लगेच.

तेव्हा डेव्हलप करत असलेले व्हॅक्सीन ह्युमन ट्रायल पर्यन्त येण्यापूर्वीच सार्स नाहीसा झाला असे वाचनात आलेले.

करोना वर खूप धागे झाले आहेत

करोना कोविड हा एक स्वतंत्र विषय ग्रुप करून त्यात सगळेच धागे हलवले तर एकत्र रहातील

मुंबईत हर्ड इम्युनिटी तयार होतेय असे काल माझ्या दोन मैत्रीणी बोलत होत्या.
का माहीत नाही पण ती माझ्यातही डेव्हलप झालीय असा फिल मला येऊ लागलाय.
त्यामुळे जिथे फार रिस्क नसते अश्या कमी गर्दीच्या जागी मी आता मोकळा श्वास घेऊ लागलोय.

त्यामुळे जिथे फार रिस्क नसते अश्या कमी गर्दीच्या जागी मी आता मोकळा श्वास घेऊ लागलोय.>> ऋन्मेषा, भावा असला मोकळा श्वास घराबाहेर सद्ध्या तरी घेऊ नका.... काय माहीत मोकळ्या दिसणार्‍या ठिकाणी कुणीतरी मिनिटभरापुर्वीच शिंकुन गेलेले असण्याची शक्यता असु शकते.

श्वसन मार्गातून होणाऱ्या इन्फेक्शन पासून स्वतः ला दूर ठेवण्याचे फक्त प्रयत्न करू शकतो.
पण त्या मध्ये यश येईल ह्याची शास्वती नाही.
Covid19 च्या antigen टेस्ट रिपोर्ट मध्ये लिहलेले असते .
1) undetected result does not ruled out the possibility of infection.
Presence of inhibitor's , mutations and insufficient organisms RNA can influence the result.
Negrtive रिझल्ट आला म्हणजे बाधित नसेल असे पण काही नाही.
लक्षण महत्वाची आहेत.

लक्षण महत्वाची आहेत.>> अगदी बरोबर..! शहाण्या माणसाच्या म्हणीत थोडं अ‍ॅडिशन करावंसं वाटलं - शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये अन लक्षण नसताना कोरोना टेस्ट करु नये..!!

Pages