काल, माझा मित्र अमितचा फोन आला. बर्याच दिवसांनी कामाव्यतिरिक्त बोलायला त्याने फोन केलेला. या आधी आम्ही सगळे मित्र कुणाच्या वढदिवसाला म्हणा, कुणी गाडी घेतली म्हणुन म्हणा किंवा इतर कसल्याही सुख-दुखाच्या क्षणी एकत्र भेटायचो, खुप हसी-मजाक करुन वेळ सत्कारणी लावायचो पण गेल्या ५ महिन्यात सर्वकाही बदललं आहे. कुणाची साधी चौकशी करायलाही वेळ मिळत नाही कारण वर्क फ्रॉम होम मुळे तेवढा वेळ मिळतच नाही.
तर अमितने फोन केल्यावर दोघांनीही इतर सर्व चौकशा, ख्याली खुशाली झाल्यावर असं लक्षात आलं की तो खूप टेंशन मधे आहे. कारण काय तर त्याच्या आजुबाजुला सोसायटी मधे खुप जण कोरोना बाधीत झाले आहेत. हा घराबाहेर जायलाही घाबरत आहे आणि जिवनावश्यक वस्तु जसे की दूध, भाज्या, किराणा आणायलाही तो स्वतः जात नाही किंवा घरातील कोणालाही जाऊ देत नाही. भयंकर पॅनिकनेस आल्यामुळे स्वारी बर्यापैकी दुर्मुखलेली आहे. त्याला मी थोडा रिलॅक्स रहा, मुवीज बघ, आवडतं म्युझीक ऐक असं सांगितलं खरं पण त्याचं काही समाधान झालेलं वाटलं नाही एवढा तो डाऊन वाटत होता. आता या अमितला कसं समजवावं
त्याचा फोन झाल्यावर मनात विचार येऊ लागले की भारतात कदाचित समुह संसर्ग सुरु झालेला आहे असं म्हणतात. मोठ्या शहरात जॉब करणारे आता वर्क फ्रॉम होम मिळाल्यामुळे आपापल्या मूळ गावी जाऊन वर्क फ्रॉम होम करत आहेत. मार्च पासुन लॉकडाऊन होता त्यामुळे गावाकडे कोरोनाच्या केसेस दुर्मिळपणे सापडत होत्या परंतु आता या क्षणी इतक्या केसेस समोर येत आहेत की काही विचारता सोय राहिली नाही.
अगदी ओळखितले, मित्रांच्या घरचेही पॉझिटीव सापडत आहेत आणि दुर्दैवाने बेड उपलब्ध न झाल्यामुळे दगावत आहेत असं भयाण वास्तव असताना अनलॉक प्रोसेस सुरु झालेली आहे. ह्या सर्वांमुळे पेशंट वाढत आहेत आणि बेड उपलब्ध न झालेल्या पेशंटला प्राणाला मुकावे लागत आहे. या सर्वांचा अति विचार करुन अमितला उगिचंच टेंशन आलं आहे असं त्याच्याशी बोलल्यावर जाणवलं.
अमितसारखी अवस्था बर्याच जणांची झाली असण्याची शक्यता आहे. अशावेळी पॅनिकनेस कमी करण्यासाठी काय काय उपाय योजना केल्या पाहिजेत...?
मिरजेत 107 वर्षांचे आजोबा बरे
मिरजेत 107 वर्षांचे आजोबा बरे होऊन घरी गेले. त्यांनी 1920 ची साथ पण पाहीले.
हेमंत ३३ : तुम्ही म्हणता ते
हेमंत ३३ : तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. ज्यांचं हातावरचं पोट आहे किंवा घराबाहेर पडाल्याशिवाय पगार मिळणार नाही अशा नोकरीवर आहेत त्यांना कोरोना कम्युनिटी स्प्रेड मुळे पॅनिकनेस येणं कदाचित परवडणारे सुद्धा नसेल. खूप वाईट वाटतं.
परीक्षित राजा व साप शाप
परीक्षित राजा व साप शाप कथेसारखे झाले आहे
कितीही काळजी घ्या, साप पोचायचा तिथे पोचणार,
बचचनलापण झाला
अमित शहाला झाला
मलापण झाला होता
एकदा झाले ( आणि मेला नाही ) की अँटीबॉडीज तयार होतात , ते किती काळ संरक्षण देतात , कुणास ठाऊक
नुकतीच मुंबईत री इन्फेक्शन ची एक केस सापडली
पण मला ती एकसेप्शनल केस वाटते , आणि एकसेप्शन प्रुवज द रुल
नुकतीच मुंबईत री इन्फेक्शन ची
नुकतीच मुंबईत री इन्फेक्शन ची एक केस सापडली.
सापडली आहे असे म्हणता येणार नाही माहीत झाली आहे असे म्हणणे योग्य आहे.
किती तरी reinfection च्या केस असतील पण त्या सापडल्या नाहीत.
जेनेलिया देशमुख ला झाला.
जेनेलिया देशमुख ला झाला.
सुबोध भावे आणि फैमिलीला पण झाला.
कोरोना.
ज्यांचं हातावरचं पोट आहे
ज्यांचं हातावरचं पोट आहे किंवा घराबाहेर पडाल्याशिवाय पगार मिळणार नाही अशा नोकरीवर आहेत त्यांना कोरोना कम्युनिटी स्प्रेड मुळे पॅनिकनेस येणं कदाचित परवडणारे सुद्धा नसेल. >> आमच्या कंपनीने एप्रिलचा पूर्ण व मे चा अर्धा पगार दिला नाही. तुम्ही कुठे कामावर होतात? म्हणे. जितके दिवस आलात त्याचाच पगार मिळेल म्हणून साम्गितले. ह्यांनी पास दिला नाही ही काय आमची चूक का? आम्ही यायला तयार होतोच की.
मार्चचा पण कापला असता, पण मी बोलल्यामुळे तो तरी पूर्ण मिळाला.
हे दिवस काढायचे, पुढे बघू काय होते!
बहुतेकांना लक्षात आले नसेल तर
बहुतेकांना लक्षात आले नसेल तर सांगतो तज्ञांचे मत असे आहे की कोरोनाचा सोशल एन्ड होणार आहे,मेडिकल एन्ड होणं इतक्यात शक्य नाही.सोशल एन्ड म्हणजे लोक उपासमार,सततची बंधनं यांना कंटाळून कोविडची भीती सोडून कामाला लागतील नव्हे लागलेत. भूकेचा पॅन्डेमीक पृथ्वीवरच्या पहिल्या सजिवाच्या जन्मापासुन चालू आहे व त्यापुढे हे कोविडसारखे पॅन्डेमिक खिजगणितही नाहीत.
https://theprint.in/health
https://theprint.in/health/too-much-turmeric-methi-vitamin-d-doctors-fig...
डोळे झाकून इम्युनिटी बूस्टर्स घेतल्याचे परिणाम
कामात गुंतवून घ्या, रिकामे
कामात गुंतवून घ्या, रिकामे बसू नका. >>>+१.
रोज खाली गेला नाहीत तरी घरच्या घरी व्यायाम,३०-४० मिनिटे घरातल्या घराफिफेर्या मारणे हे कम्प्ल्सरी केले पाहिजे.बाकी काही नाही पण व्यायमामुळे शरीरात जी संप्रेरके स्त्रवू लागतात त्याने मरगळ कमी होते.करोना आहे त्याचे असणे एकदा मान्य केले की त्रास होत नाही.उद्या मला करोना होईल म्हणून मी आजचा दिवस का बरबाद करू? काळजी घ्या पण त्याचा अतिरेकही नको.
माझी आई ८७वर्षांची आहे.हाय बीपी+हार्टपेशंट आहे.सध्या एकटी रहात आहे.तिने मुंबईला यायचे नाकारले कारण डॉक्टर्स इथे नसतील.ती जिथे रहाते तिथे आमच्या नातेवाईकाचे हॉस्पिटल आहे.जर काही झालेच तर त्यांची मदत मिळेल म्हणून तिथेच रहतेय.नुकतेच तिच्या घरासमोरील घरात ३ करोना पेशंट सापडले आहेत.पण ती कूल आहे,निदान दाखवतेय.
घराच्या बाहेर न पडता आपण फक्त
घराच्या बाहेर न पडता आपण फक्त टीव्ही वर सांगणाऱ्या बातम्या आणि त्यांनी दाखवलेले बाहेरचे चित्र ह्याच दुनियेत राहिलो तर आपली मानसिकता नकारात्मक बनते.
कारण अतिशोकती करून न्यूज दाखवल्या जातात.
कधी बाहेर पडलं की आपल्यालाच धक्का बसतो जे टीव्ही वर दाखवतात त्या पेक्षा बाहेरची परिस्थिती किती तरी भिन्न आहे.
लोक आहेत रस्त्यावर,प्रवास करत आहेत,भाजी मार्केट मस्त चालू आहे.सर्व काळजी घेवून लोक बाहेर पडलेली दिसतील.
कोविड इंजेक्शन एकटे मरा !!
कोविड इंजेक्शन
एकटे मरा !!
एफीकसी ट्रायल्स नसतील केल्या
एफीकसी ट्रायल्स नसतील केल्या

(No subject)
(No subject)
सकाळी सकाळी खूप हसले
सकाळी सकाळी खूप हसले
ईंजेक्शन बघूनच पॅनिकनेसपणा
ईंजेक्शन बघूनच पॅनिकनेसपणा गेला लोकांचा
पॅनिकनेसपणा ??????
पॅनिकनेसपणा ??????
पॅनिकनेसपणा = पॅनिक नेसण्याची
पॅनिकनेसपणा = पॅनिक नेसण्याची वृत्ती.
पॅनिकनेसपणा
पॅनिकनेसपणा
मी , करोना आणि आरोग्यसेतु
मी , करोना आणि आरोग्यसेतु
मी आरोग्यसेतु डाउनलोड केला होता.
मला करोना लक्षण आले , तर त्यांना फोन केला , ते बोलले तुम्हीच डॉकटर आहे , तर आम्हला कशाला फोन केला ?
म्हणून मी ऐप डिलीट केला
उपचार घेऊन बरा झालो , तर महिन्याने त्यांचा मोबाईलवर फोन आला , ते बोलले , लक्षण आहे , वगैरे फोन करून ज्यांनी ऐप डिलीट केलेत किंवा पुढे रिप्लाय नाही , ते जिवन्त आहेत की मेलेत हे बघायला ते फोन करत आहेत
मी म्हटले हम अभि गया नही , जिंदा है !
पण फोनवर चांगले बोलले, रिटायर्ड शिक्षिका होत्या, त्यांना सरकारने अशी यादी दिली होती
https://indianexpress.com
https://indianexpress.com/article/cities/pune/80-doctors-nurses-quit-coe...
पुण्यात(महाराष्ट्रात) ही अवस्था… कठीण आहे
https://indianexpress.com
https://indianexpress.com/article/cities/pune/80-doctors-nurses-quit-coe...
पुण्यात(महाराष्ट्रात) ही अवस्था… कठीण>> त्यांना पॅनिक मोड कमी करायचा आहे वाढवायचा नाहीये
खूप चांगली माहिती सिंबा. +11
खूप चांगली माहिती सिंबा.
+11
ब्लॅक कॅट,आता कसे आहात?
ब्लॅक कॅट,आता कसे आहात?
केव्हापासून विचारायचे म्हणतेय आमच्या सोसायटीतील डॉकटर जोडपे( वय 70-७५) मास्क लावत नाहीत.त्यातील एक कॅन्सर पेशंट आहे.त्यातील एकजण आवारात फिरतो.त्यांचा मुलगा सून आणि 7 वर्षांचा नातू हे पण ना मास्क लावता बाहेर जातात.किंवा व्यायाम करतात.हे बरोबर आहे का? की आम्हीच वेडे मास्क लावून firnare.
आता बरे आहे,
आता बरे आहे,
मास्क वापरा अशी गाईड लाईन आहे
Masks act like vaccine
Masks can act like vaccine
Masks can act like vaccine
Submitted by मानव पृथ्वीकर on 5 September, 2020 - 17:45
खूपच छान माहिती.
मास्क लावावा की नाही हा प्रश्न लोकांना अजून पडत आहे म्हणजे सरकार,प्रशासन आणि माध्यमे पुरेशी जनजागृती करण्यात अपयशी ठरले आहेत.
मास्क चा वापर का करावा याचा व्यवस्थित विचार कुणी केलेला दिसत नाही.
१) मास्क वापरल्याने आपल्याला दुसऱ्या व्यक्तीकडून संसर्ग होण्याची शक्यता कमी होईल.
२)आपण मास्क वापरल्याने आपल्याकडून इतर व्यक्तीला संसर्ग होण्याची शक्यता कमी होईल.
यातील दुसऱ्या शक्यतेचा विचार बहुतांश लोकांकडून केलाच जात नाही.
पुण्यात ३०% लोकांनी मास्क न घालण्याचा परिणाम आता आपण पाहतच आहोत.
संख्या प्रचंड वाढत आहे हे
संख्या प्रचंड वाढत आहे हे सत्य आहे.
ही दुसरी लाट सुरू झाली असावी हे पण सत्य आहे असे वाटत.
आणि नेमके ह्याच वेळी निर्बंध हटल्या मुळे विस्फोटाची भीती वाटत आहे.
ह्या आजाराची पसरण्याची क्षमता प्रचंड आहे.
हे पण खरे आहे.
पण ह्या दुसऱ्या लाटे मध्ये आजाराची तीव्रता कमी झालीय असे एक निरीक्षण आहे.
पण धोका तर आहेच
देवकी, तुमच्या-माझ्यासारखे
देवकी, तुमच्या-माझ्यासारखे "वेडे" मास्कवाले आहेत म्हणून ही महासाथ थोडीतरी आटोक्यात आहे.
काही लोक मास्क म्हणजे जसे काही तोंडाला चिकटपट्टी लागणार असे वागतात. मास्क वापरा ही गाईडलाईन आहे ती शक्यतो पाळावी. सर्व नियम पाळून ही करोना होवू शकतो हे खरे आहे. पण तो जितका उशीरा होणार तितके बरे. म्हणून नियम पाळावे ही नम्र विनंती.
सर्व नियम पाळून ही करोना होवू
सर्व नियम पाळून ही करोना होवू शकतो हे खरे आहे. पण तो जितका उशीरा होणार तितके बरे. > हो. आणि नियम पाळल्याने झाला तरी व्हायरल लोड बराच कमी राहील.
Pages