फ्रुट मोदक

Submitted by नादिशा on 1 September, 2020 - 07:05

फ्रुट मोदक -
1)पारीसाठी 2वाटी मैद्यात चवीनुसार मीठ, 2टेबलस्पून तेलाचे मोहन घालून, गरजेनुसार पाणी घालून घट्ट मळून घेणे. झाकून 1/2 तास बाजूला ठेवून देणे.
2) सारणासाठी प्रत्येकी 50ग्रॅम चेरी,सुकी किवी, सुके अंजीर, खजूर बारीक चिरून घेणे. एकत्र करून घेणे.
3)मैद्याची पोळी लाटून वाटीने एकसारख्या आकाराच्या पुऱ्या कापून घेणे.
4)सारण भरून हळुवार हाताने मोदक बनवणे. (सारण जाडसर असल्याने मोदक फुटू शकतात. )
5)सगळे बनवून झाल्यावर मंद आचेवर तळून घेणे.
6)एवढ्या साहित्यात 25मोदक बनतात.

मी दरवर्षी फ्रेश फळे वापरते. सफरचंद, अननस, चिकू ही फळे घेऊन, बारीक चिरून तुपावर परतून मग थंड झाल्यावर त्यांचे सारण पारीमध्ये भरते. यावर्षी कोरोना मुळे घरातून बाहेर पडणे झाले नाही. त्यामुळे यावर्षी सुकी फळे वापरून फ्रुट मोदक बनवले.

b71752af-974f-44a8-a19e-649d85a2461b.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy