पडेल तो चढेल काय?

Submitted by सखा on 31 August, 2020 - 01:19

पडेल चेहऱ्याचे प्राध्यापक कोणालाच आवडत नाही मात्र पडेल ते काम करणारा माणूस कायम सगळ्यांना आवडतो. जो पडेल तो चढेल हे सूत्र मी नेहमीच लोकांना सांगतो. मी निवडणुकीत सपशेल पडेल पण पराभव मान्य करणार नाही अशी मस्तवाल वृत्ती काही राजकारण्यांमध्ये दिसून येते.
अशाच एका भ्रष्टाचारी नेता कम अभिनेत्या बद्दल
त्यांच्या अशाच स्वभावामुळे मुळे हा लवकरच उघडा अथवा तोंडघाशी पडेल असं मी भाकित केलं होतं. आश्चर्यकारकरीत्या माझी दोन्ही भाकीते खरी झाली. माझ्याकडे सल्ला मागायला येणाऱ्या अजून एका पडेल अभिनेत्याला मी वरील उदाहरण देऊन म्हणालो होतो की बाळा वेळ आहे आत्ताच सुधर नाहीतर बघ तुला हे सगळं काय भावात पडेल? याच अभिनेत्याची अजून एक एक गोष्ट तुम्हाला सांगतो त्याच्या गर्लफ्रेंडने दिवाळीला त्याच्यासाठी खास केलेले गोटे आपल हे लाडू पाहून मी त्याला सावध केलं की जरा जपूनच खा हा लाडू नसता तुझा दात हमखास प....!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रिय कटप्पा,
कसे आहात? अनेक लेखक एकच मराठी शब्द घेऊन मराठी भाषेची ताकद दाखवतात. मी पण असंच बऱ्याच लेखकांचं वाचून आणि मला पडेल लेखक, पडेल अभिनेते आणि पडेल नेते यांच्या एकंदरितच ग्रहाबद्दल सहानुभूती असल्यामुळे मी हे "पडेल" लेखन केले आहे. माझ्या वाचकांनाही समजायला इतके महाग "पडेल" असे वाटले नव्हते. परंतु आता असे प्रश्न वाचून माझ्या डोक्यात नक्कीच प्रकाश "पडेल"
बाहुबली कसा आहे?
आपलाच नंबर एक चाहता

इथल्या पडीक लोकांना ह्या धाग्याचं काहीच पडलेलं नाहीए हे बघून कटप्पांनी लोकांच्या डोळ्यांवरचा पडलेला पडदा दूर करण्यासाठीच इथे कमेंट पाडून धागा वर काढला असावा असं वाटतंय म्हणून कटप्पांचे आभारच मानायला हवेत.. पडत्या धाग्याला कटप्पांच्या कमेंटचा आधार Lol