Submitted by मंजूताई on 28 August, 2020 - 11:47
केशरीमिश्रण : आंबा मावा,साखर,दूध प्रत्येकी १ वाटी घेऊन सैलसर गोळा होईपर्यंत शिजवून घ्या.
पांढरंमिश्रण: चव २वाट्या, १वाटी साखर व एक वाटी दूध घेऊन सैलसर गोळा होईपर्यंत शिजवून घ्या.
हिरवंमिश्रण: पिस्ता पावडर,दूध व साखर प्रत्येकी १ वाटी घेऊन सैलसर गोळा होईपर्यंत शिजवून घ्या.
थंड झाल्यावर आवश्यकता वाटल्यास दूध पावडर व मखाणा पावडर घाला पारी करता येईल इतपत.
पांढऱ्यात हिरवा गोळा भरून ध्या व तो गोळा केशरी रंगाच्या पारीत भरून मोदक वळून घ्या.
केशरीत हिरव्या रंगाचं मिश्रण भरून घ्या व ते पांढऱ्या पारीत भरून मोदक वळून घ्या. मी दोन प्रकार केले. ह्या तीन रंगाचं मिश्रण वापरुन वेगवेगळे काॅम्बिनेशन करून मोदक करता येतील. 




विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अतिशय सुंदर दिसतायत मोदक.
अतिशय सुंदर दिसतायत मोदक. रेसिपी मस्त आहे.
सुबक दिसतायेत मोदक., रेसिपी
सुबक दिसतायेत मोदक., रेसिपी ही मस्त आहे ..
छान झालेत तिरंगी मोदक. असे
छान झालेत तिरंगी मोदक. असे एकात एक तीन मोदक, ही कल्पना मस्त आहे.
मी काय करते, काजू पावडर बेसिक वापरते. मग त्यात वेगवेगळे क्रश घालून वेगवेगळ्या रंगाचे मोदक बनवता येतात. उदा. Strawberry क्रश घालून strawberry मोदक, खस सिरप घालून ग्रीन मोदक,मँगो क्रश घालून आंबा मोदक, ऑरेंज क्रश /सिरप घालून केशरी मोदक, रुअफझा घालून रोझ मोदक .
पण मला ही तुमची दुतिरंगी मोदक खूप आवडले. मी पण प्रयोग करून पाहीन.
सुंदर दिसतायत मोदक!
सुंदर दिसतायत मोदक!
सुपर्ब!
सुपर्ब!
खूप सुंदर मोदक..
खूप सुंदर मोदक..
अतिशय सुंदर दिसतायत मोदक
अतिशय सुंदर दिसतायत मोदक
मस्त दिसतायत मोदक मंजू
मस्त दिसतायत मोदक मंजू
कल्पना खुप भारी आहे. फोटो फार
कल्पना खुप भारी आहे. फोटो फार सुंदर.
खूप छान मंजु ताई. फोटो पण
खूप छान मंजु ताई. फोटो पण सुंदर
फार छान दिसतायत मोदक. अशाच
फार छान दिसतायत मोदक. अशाच स्वर्ल असलेल्या बर्फ्या करता येतील.
Pages