पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे - मंजूताई दुतिरंगी मोदक

Submitted by मंजूताई on 28 August, 2020 - 11:47

केशरीमिश्रण : आंबा मावा,साखर,दूध प्रत्येकी १ वाटी घेऊन सैलसर गोळा होईपर्यंत शिजवून घ्या.
पांढरंमिश्रण: चव २वाट्या, १वाटी साखर व एक वाटी दूध घेऊन सैलसर गोळा होईपर्यंत शिजवून घ्या.
हिरवंमिश्रण: पिस्ता पावडर,दूध व साखर प्रत्येकी १ वाटी घेऊन सैलसर गोळा होईपर्यंत शिजवून घ्या.
थंड झाल्यावर आवश्यकता वाटल्यास दूध पावडर व मखाणा पावडर घाला पारी करता येईल इतपत.
पांढऱ्यात हिरवा गोळा भरून ध्या व तो गोळा केशरी रंगाच्या पारीत भरून मोदक वळून घ्या.
केशरीत हिरव्या रंगाचं मिश्रण भरून घ्या व ते पांढऱ्या पारीत भरून मोदक वळून घ्या. मी दोन प्रकार केले. ह्या तीन रंगाचं मिश्रण वापरुन वेगवेगळे काॅम्बिनेशन करून मोदक करता येतील. image_1.jpegimage_4.jpegimage_2.jpegimage_3.jpegIMG-20200827-WA0040.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान झालेत तिरंगी मोदक. असे एकात एक तीन मोदक, ही कल्पना मस्त आहे.
मी काय करते, काजू पावडर बेसिक वापरते. मग त्यात वेगवेगळे क्रश घालून वेगवेगळ्या रंगाचे मोदक बनवता येतात. उदा. Strawberry क्रश घालून strawberry मोदक, खस सिरप घालून ग्रीन मोदक,मँगो क्रश घालून आंबा मोदक, ऑरेंज क्रश /सिरप घालून केशरी मोदक, रुअफझा घालून रोझ मोदक .
पण मला ही तुमची दुतिरंगी मोदक खूप आवडले. मी पण प्रयोग करून पाहीन.

Pages