झब्बू- तुझी माझी जोडी जमली रे- (सोनेरी-काळा)

Submitted by संयोजक on 28 August, 2020 - 02:08

झब्बू अतिशय सोपा आहे. संयोजक दर दिवशी रंगांची एक जोडी देतील. त्या जोडीमधले दोन्ही रंग असलेले कुठलेही प्रकाशचित्र टाकावे. रंगांची छटा थोडीफार बदलती असली तरी चालेल पण शक्यतो मूळ रंगाशी प्रामाणिक राहा.

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे. रंगांची जी जोडी दिली आहे त्या रंगाच्या सर्व छटा चालतील. उदा. लाल-हिरवा मध्ये लाल आणि हिरव्या रंगांच्या गडद- फिकट सर्व छटा चालतील.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा- https://www.maayboli.com/node/47635?page=4

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sri Dalada Maligawa or the Temple of the Sacred Tooth Relic, a Buddhist temple in the city of Kandy, Sri Lanka


सुरेख फोटो आहेत सगळे, स्पेशली निरू यांचे तर खुपच छान

यात माझी लुडबुड आहे खरंतर, फार खास फोटो नसताना Lol>>>>> असं काही नसतं अन्जू, बाकिच्यांचे फोटो छान, म्हणजे आपण कधी आपले फोटो द्यायचे नाहीत कि का ssss य - ( इति पुलंच्या असा मी असामी)

भोपळ्याच्या बिया आहेत , थोडासा केशरी रंग दिसतोय का?

IMG_20200706_182502.jpg

ह्यात दिसेल थोडा तरी
IMG_20200708_000848.jpg

बाकिच्यांचे फोटो छान, म्हणजे आपण कधी आपले फोटो द्यायचे नाहीत कि का ssss य - ..............+१.

मग काय, मी काल मुलीच्या तुटक्या गाडीचा फोटो टाकला , बघितलं ना.
Lol

Pages