श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - मनीमोहोर

Submitted by मनीमोहोर on 27 August, 2020 - 00:42

ह्या वर्षीची ही स्पर्धा खूप आवडलीय. त्यासाठी संयोजकांचे मनापासून कौतुक आणि आभार.

आज ह्या निमित्ताने मला आमचे शाई पेनाचे दिवस आठवले. आमचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत बोलपेन आली नव्हती बाजारात. ती नंतर नोकरी मिळाल्यावर आली. आणि रिटायर होईपर्यंत कॉम्पुटर च्या वापरामुळे बाद ही झाली . असो.

तर तेव्हाची ती पॉप्युलर असलेली सव्वा रुपयाला मिळणारी म्हात्रे शाई पेन, शाई गळल्याने निळे झालेले हात. सुट्टीच्या दिवशी पेन धुण्याचा कार्यक्रम, मनासारखी निब, जीभ बसली कीच शाईचा फ्लो नीट येत असे. मला थोड ठळक आणि जाड अक्षर आवडत असे.
अस सगळं जुळून आलं की मान तिरपी करून ( तेव्हा नकळतपणे जिभेच टोक तोंडाबाहेर येत )मन लावून कोरून कोरून अक्षर काढून केलेला गृहपाठ , स्वतःच्या वहीवर टाकलेली कौतुक भरली नजर हे सगळं आठवल आणि खूप मजा आली.

IMG_20200827_095734.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अक्षर सुंदर आहे तुमचे!!

शाळेत 9 वी 10वी एक सर होते , त्यांचा फाउंटन पेन वापरण्यावर कटाक्ष होता, तोपर्यंत सर्वांना बॉल पेन ची सवय चांगलीच झाली होती
मग फक्त त्यांच्या विषयाला शाई पेन आणि बाकी बॉल पेन असे वापरायचो.
तेव्हा पासून शाई पेन म्हंटले की दडपशाही केल्याचे फीलिंग येते आणि माझे अक्षर वाईट येते (आधीच वाईट आहे पण अजून वाईट येते)

Pages