श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - मनीमोहोर

Submitted by मनीमोहोर on 27 August, 2020 - 00:42

ह्या वर्षीची ही स्पर्धा खूप आवडलीय. त्यासाठी संयोजकांचे मनापासून कौतुक आणि आभार.

आज ह्या निमित्ताने मला आमचे शाई पेनाचे दिवस आठवले. आमचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत बोलपेन आली नव्हती बाजारात. ती नंतर नोकरी मिळाल्यावर आली. आणि रिटायर होईपर्यंत कॉम्पुटर च्या वापरामुळे बाद ही झाली . असो.

तर तेव्हाची ती पॉप्युलर असलेली सव्वा रुपयाला मिळणारी म्हात्रे शाई पेन, शाई गळल्याने निळे झालेले हात. सुट्टीच्या दिवशी पेन धुण्याचा कार्यक्रम, मनासारखी निब, जीभ बसली कीच शाईचा फ्लो नीट येत असे. मला थोड ठळक आणि जाड अक्षर आवडत असे.
अस सगळं जुळून आलं की मान तिरपी करून ( तेव्हा नकळतपणे जिभेच टोक तोंडाबाहेर येत )मन लावून कोरून कोरून अक्षर काढून केलेला गृहपाठ , स्वतःच्या वहीवर टाकलेली कौतुक भरली नजर हे सगळं आठवल आणि खूप मजा आली.

IMG_20200827_095734.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या वर्षीची ही स्पर्धा खूप आवडलीय. त्यासाठी संयोजकांचे मनापासून कौतुक आणि आभार.>>>> +१

अगदी मनातील भावना लिहिल्यात.
आमच्या हिंदीच्या बाई बॉलपेन कुणाकडे दिसला तरी मोडून टाकायच्या. Happy

छान अक्षर.

देवरूप, आसा आणि जाई धन्यवाद प्रतिसादासाठी.

आमच्या हिंदीच्या बाई बॉलपेन कुणाकडे दिसला तरी मोडून टाकायच्या. >> आमच्या कडे शाळेत तरी कोणाकडे नव्हती बॉलपेन पण पदव्युत्तर शिक्षण काळात काही श्रीमंत मुलांकडे असे बॉलपेन. तेव्हा बॉलपेन चार आण्याला मिळत असे. ते आम्हाला परवडण्यासारखे नव्हतं आणि बॉलपेन ने अक्षर बिघडत , सुबकपणा जाऊन नुसतं गोळ्यासारखं बनतं हे आमच्या वडिलांचं मत असल्याने त्यांनी आम्हाला बॉलपेन वापरू नाही दिलं कधी. आमच्या आईचं अक्षर खूप छान होतं नि तिने आमच्या अक्षरावर लहानपणी मेहनत घेतली आहे. असो.

आज फारच समरणरंजन होतंय त्याबद्दल सॉरी.

छान अक्षर मनीमोहोर. माझ्या एका आत्याच्या अक्षराची आठवण झाली Happy पूर्वी पत्रं यायची तेव्हा पत्त्यावरच्या अक्षरावरून कळायचं कुणाचं पत्र आहे ते.

छान आहे अक्षर आवडलं. आमच्या शाळेत पण बाई शाई पेन वापरायला सांगायच्या पण वापरलाच पाहिजे असं काही न्हवतं. शाई पेन वापरल्याने अक्षर चांगलं यायचं पण लिहिण्याचा वेग कमी व्हायचा हेमावैम.

वा ममो, तुमच्या पदार्थांसारखंच अक्षर आहे.सुबक, सुंदर आणि नीट नेटकं.

वा ममो, तुमच्या पदार्थांसारखंच अक्षर आहे.सुबक, सुंदर आणि नीट नेटकं.>>>>> अगदी अगदी

छान अक्षर आहे.
शाई पेन वापरल्याने अक्षर चांगलं यायचं पण लिहिण्याचा वेग कमी व्हायचा हेमावैम.>>+१

आम्हाला ४थी पर्यंत पेन्सिल वापरणे बंधनकारक होते. फक्त निबंधाच्या वहीत शाईपेनने लिहायची मुभा होती.
रोज पाढे(११ ते३०), ५ ओळी शुद्धलेखन आणि आठवड्यातून एकदा कित्तालेखन करावे लागायचे.
मराठीतल्या धड्यातले कमीत कमी शब्द असलेल्या ५ वाक्यांचा परिच्छेद खुणा करून ठेवले होते. घरी वेळ (वाया Proud ) जायला नको म्हणून तासांच्या मधल्या वेळेत पाढे लिहून काढायचे. ७वी नंतर शाळा बदलली आणि नव्या शाळेत असे काहीच नियम नव्हते.

छान! Happy

छान!

ममो, अक्षर खूप सुंदर आहे गं.. न खोडता इतका मजकूर एकसंध लिहिणाऱ्यांचे कौतुक आहे Happy

तुझे स्मरणरंजन वाचून मलाही जुने आठवले. लोक बोअर होणार पण जाऊ देत, लिहितेच.

मीही बोरू, पाटीवरची पेन्सिल, दगडी पेन्सिल, शिसपेन्सिल असा प्रवास केलाय. बोरू कमी वापरले, फक्त पुस्तिका गिरवण्यापूरते पण फायदा शून्य, कोंबडीचे पाय असलेले माझे अक्षर सुधारणे अशक्य. (आज सक्काळी पुलंचे 'माझे शालेय जीवन' वाचत होते, चांगले अक्षर व चांगला गळा उपजतच असतो हे त्यांचे म्हणणे मला चांगलेच पटले)

शाळेत 7 वीपर्यंत पेन्सिल वापरली जात होती. दाबून लिहिल्यामुळे वहीची तेवढी पाने फुगलेली असायची. नंतर शाईचे पेन आले. कॉलेजात गेल्यावर बॉल पेन. तेव्हा रिफिल्स असायच्या, त्या खऱ्या अर्थाने रिफिल होत्या, संपलेल्या रिफिल्स शाई भरून मिळायच्या. नोकरी करायची वेळ येईपर्यंत ऑफिसात कॉम्प्युटरयुग सुरू झाले आणि माझा लेखणीशी संबंध तुटला. आता अक्षर इतके खराब झालेय की मला स्वतःला वाचायचा कंटाळा येतो, लिहिताना कित्येकदा अमुक अक्षर कसे काढायचे हेही आठवत नाही व लेखणी तिथेच अडकून पडते.

आमचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत बोलपेन आली नव्हती बाजारात. ती नंतर नोकरी मिळाल्यावर आली. आणि रिटायर होईपर्यंत कॉम्पुटर च्या वापरामुळे बाद ही झाली>>>>>

हेहे... किती मोठे स्थित्यंतर...

Pages