पाककृती स्पर्धा 2 - नैवेद्यम स्पर्धा -- वर्णिता

Submitted by वर्णिता on 25 August, 2020 - 10:42

IMG_20200825_190038.jpg

१) पाककृती स्वत: तयार केलेली असावी. --आहे
२) नैवेद्याचे पदार्थ शाकाहारी असावेत.--आहेत
३) नैवेद्याच्या पानात किमान 2 भाज्या -- बटाटा मटार भाजी , मिश्र कडधान्य उसळ
चटणी -- कोथिंबीर , पुदिना, ओलं खोबरं
मेतकूट। -- नाही, घरात विकतचे होते.
2 कोशिंबीरी -- बीट, टोमॅटो आणि दुसरी काकडीची
भात -- वरणभात, दहीभात, मसालेभात
पोळी/ पुरी -- पुरणपोळी
तळणीचा पदार्थ -- बटाटा भजी,कुरडई , या मे महिन्यात पहिल्यांदा च माबोवरच्या सगळ्या उत्साही मेम्बर्सच्या कुरडया गप्पा वाचून केल्या आणि चक्क जमल्या ही .
एखादे गोड पक्वान्न असावे. -- पुरणाची खीर , शेवयाची खीर
उकडीचे वा कोणत्याही प्रकारचे स्वत: केलेले मोदक -- उकडीचे तांदळाचे मोदक
४) नैवेद्याच्या पानात बाहेरून विकत आणलेला गोड ,तिखट,चटपटीत इत्यादींपैकी कोणताच पदार्थ नैवेद्यम च्या पानात नसावा. --नाही पानात.
५) शक्यतो नैवेद्याचे पान हे केळीचे किंवा इतर पान असावे. --केळीचे आहे.

थोडक्यात रेसिपी-
१ ) भाजी -- बटाटे उकडून, मटार वाफवून , फोडणी करून मीठ साखर मिरची घालून .
2) मिश्र कडधान्ये उसळ -- चवळी, मूग, मटकी, छोले, हरभरे, वाटणे सगळे पाव वाटी - दिवसभर भिजवून मोड आणून खोबरं, कोथिंबीर, आलं याचं वाटण करून फोडणी करून.
20200825_125251.jpg
3) कोशिंबिरी - बीट खिसून , काकडी कोचवून दही ,मीठ, साखर, शेंगदाणे कूट घालून.
4) भात -- मसालेभात - फ्लॉवर, मटार, टोमॅटो, ही मिरची आणि खडे मसाले घालून.
20200825_125433.jpg
5) चटणी --कोथिंबीर, पुदिना ( मी कुंडीत लावलेला ) , ओलं खोबरं ,मीठ, चिमूटभर साखर, लिंबूरस
6) पुरणपोळी -- आता कृती काय लिहू ? पुरण शिजवून , वाटून, उंडा करून ,भाजून , फोटोत नेमकी पूर्ण गोल न झालेली आलीय.
20200825_154636.jpg
7) सुरळीच्या वड्या -- 1 वाटी डाळीचं पीठ, 2 वाट्या ताक ,आलं ही मिरची ठेचून, मीठ घोटून कुकरमध्ये मध्यम आचेवर 3 शिट्ट्या काढून परत घोटून ,पसरून, सुरळ्या करणे. सोप्पी पद्धत,
20200825_163733.jpg
8) अळूवड्या --अळूची पाने धुवून त्याला डाळीचं पिठ लावणे आणि वाफवून घेऊन , कापून शॅलो फ्राय करणे . पिठात मीठ, चिंच कोळ , तिखट, ओवा
20200825_144319.jpg
9) पुरणाची खीर-- शिजवलेले पण न वाटलेले पुरण दूध घालून, सुका मेवा घालून उकळणे, जायफळ, वेलदोडा पुरणातच होता.
10) उकडीचे मोदक -- तांदूळ पिठी - तूप, दूध, पाणी घालून मळून 10 मिनिटे वाफवून घेऊन, मळून , मोदक बनवून परत 15 मिनिटे वाफावणे
20200822_130204.jpg
11) कटाची आमटी -- हरभरा डाळ शिजल्यावर डाळ निथळून उरलेला कट घेऊन त्याला तमालपत्र, गरम मसाला, तिखट, गूळ, मीठ ,फोडणी त घालून उकळणे.
12 ) वाटली डाळ - - हरभरा डाळ 4 तास भिजवून मिक्सरमध्ये घेऊन त्यात आलं, ही मिरची , मीठ, साखर घालून अर्धबोबडं करून घेणे --कुकरमध्ये मध्यम आचेवर 2 शिट्ट्या काढून मग फोडणी देणे .
13) बटाटा भजी - बटाट्याचे काप काढून ते भजीच्या पिठात बुडवून तळणे
नेहमी यातले बरेचसे पदार्थ नैवेद्याला करते . या वेळी उपक्रमासाठी 4 जास्त केले.
गणपती बाप्पा मोरया.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

निलाक्षी, रुपाली, श्रवु, शीतल, म्रुणाली मनापासुन धन्यवाद. म्रुणाली केव्हाही ये ,वेलकम .
संयोजक मनःपुर्वक धन्यवाद. प्रमाणपत्र आवडलं. छान आहे.

Pages