पाककृती स्पर्धा 2 - नैवेद्यम स्पर्धा -- वर्णिता

Submitted by वर्णिता on 25 August, 2020 - 10:42

IMG_20200825_190038.jpg

१) पाककृती स्वत: तयार केलेली असावी. --आहे
२) नैवेद्याचे पदार्थ शाकाहारी असावेत.--आहेत
३) नैवेद्याच्या पानात किमान 2 भाज्या -- बटाटा मटार भाजी , मिश्र कडधान्य उसळ
चटणी -- कोथिंबीर , पुदिना, ओलं खोबरं
मेतकूट। -- नाही, घरात विकतचे होते.
2 कोशिंबीरी -- बीट, टोमॅटो आणि दुसरी काकडीची
भात -- वरणभात, दहीभात, मसालेभात
पोळी/ पुरी -- पुरणपोळी
तळणीचा पदार्थ -- बटाटा भजी,कुरडई , या मे महिन्यात पहिल्यांदा च माबोवरच्या सगळ्या उत्साही मेम्बर्सच्या कुरडया गप्पा वाचून केल्या आणि चक्क जमल्या ही .
एखादे गोड पक्वान्न असावे. -- पुरणाची खीर , शेवयाची खीर
उकडीचे वा कोणत्याही प्रकारचे स्वत: केलेले मोदक -- उकडीचे तांदळाचे मोदक
४) नैवेद्याच्या पानात बाहेरून विकत आणलेला गोड ,तिखट,चटपटीत इत्यादींपैकी कोणताच पदार्थ नैवेद्यम च्या पानात नसावा. --नाही पानात.
५) शक्यतो नैवेद्याचे पान हे केळीचे किंवा इतर पान असावे. --केळीचे आहे.

थोडक्यात रेसिपी-
१ ) भाजी -- बटाटे उकडून, मटार वाफवून , फोडणी करून मीठ साखर मिरची घालून .
2) मिश्र कडधान्ये उसळ -- चवळी, मूग, मटकी, छोले, हरभरे, वाटणे सगळे पाव वाटी - दिवसभर भिजवून मोड आणून खोबरं, कोथिंबीर, आलं याचं वाटण करून फोडणी करून.
20200825_125251.jpg
3) कोशिंबिरी - बीट खिसून , काकडी कोचवून दही ,मीठ, साखर, शेंगदाणे कूट घालून.
4) भात -- मसालेभात - फ्लॉवर, मटार, टोमॅटो, ही मिरची आणि खडे मसाले घालून.
20200825_125433.jpg
5) चटणी --कोथिंबीर, पुदिना ( मी कुंडीत लावलेला ) , ओलं खोबरं ,मीठ, चिमूटभर साखर, लिंबूरस
6) पुरणपोळी -- आता कृती काय लिहू ? पुरण शिजवून , वाटून, उंडा करून ,भाजून , फोटोत नेमकी पूर्ण गोल न झालेली आलीय.
20200825_154636.jpg
7) सुरळीच्या वड्या -- 1 वाटी डाळीचं पीठ, 2 वाट्या ताक ,आलं ही मिरची ठेचून, मीठ घोटून कुकरमध्ये मध्यम आचेवर 3 शिट्ट्या काढून परत घोटून ,पसरून, सुरळ्या करणे. सोप्पी पद्धत,
20200825_163733.jpg
8) अळूवड्या --अळूची पाने धुवून त्याला डाळीचं पिठ लावणे आणि वाफवून घेऊन , कापून शॅलो फ्राय करणे . पिठात मीठ, चिंच कोळ , तिखट, ओवा
20200825_144319.jpg
9) पुरणाची खीर-- शिजवलेले पण न वाटलेले पुरण दूध घालून, सुका मेवा घालून उकळणे, जायफळ, वेलदोडा पुरणातच होता.
10) उकडीचे मोदक -- तांदूळ पिठी - तूप, दूध, पाणी घालून मळून 10 मिनिटे वाफवून घेऊन, मळून , मोदक बनवून परत 15 मिनिटे वाफावणे
20200822_130204.jpg
11) कटाची आमटी -- हरभरा डाळ शिजल्यावर डाळ निथळून उरलेला कट घेऊन त्याला तमालपत्र, गरम मसाला, तिखट, गूळ, मीठ ,फोडणी त घालून उकळणे.
12 ) वाटली डाळ - - हरभरा डाळ 4 तास भिजवून मिक्सरमध्ये घेऊन त्यात आलं, ही मिरची , मीठ, साखर घालून अर्धबोबडं करून घेणे --कुकरमध्ये मध्यम आचेवर 2 शिट्ट्या काढून मग फोडणी देणे .
13) बटाटा भजी - बटाट्याचे काप काढून ते भजीच्या पिठात बुडवून तळणे
नेहमी यातले बरेचसे पदार्थ नैवेद्याला करते . या वेळी उपक्रमासाठी 4 जास्त केले.
गणपती बाप्पा मोरया.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद सर्वांना . श्रवू, अंजू, मोदकाचे स्टेप फोटो नाही काढले . आणि पिठी या वेळी घरात होते त्याच तांदळाची करून आणली त्यामुळे पांढरेशुभ्र नाही झाले.

काय मस्त भरगच्च पान आहे. एकदम सात्विक आणि प्रसन्न वाटतंय.

एकावेळी इतके पदार्थ करणार्‍या लोकांबद्दल मला फार आदर आहे. आमच्याकडे कोणाला इतके पदार्थ खावेसे वाटले तर मी अगत्यानं एखाद्या थाळी रेस्टॉरंटमध्ये घेऊन जाते.

अप्रतिम.

मला हि स्पर्धा खुप आवडली. दरवर्षी ठेवा.

Amazing
कौतुक वाटतं एकटीने हे सर्व केल.

मस्त दिसतय नैवेद्याचे पान. किती नीटस वाढलय! आणि बाकीची तयारी पण छान, केवढे पदार्थ केलेत..........+१.

Padkamal स्पर्श.

Pages