पोळीला/चपातीला पर्याय काय?

Submitted by केशव तुलसी on 9 August, 2020 - 12:33

पोळी भाजी हा आपला मुख्य आहार आहे.तर मुद्दा असा की रोज पोळीभाजी खाऊन कंटाळा आला आहे.गव्हातल्या ग्लुटेनमुळे चिकटपणामुळे बरेचदा पोट जड होणे हा प्रकार वाढत आहे.ग्लुटेनची ॲलर्जीपण असावी कदाचीत.
तर पोळीला पर्याय हवा आहे जो की सशक्त असावा.सध्या भात खात आहे.भात व भाताबरोबर भाजी व आमटी. भात आवडतो पण काही तासात परत भूक लागते.त्याचबरोबर भात स्टार्चयुक्त असल्याने शुगर वाढून डायबेटीस २ होण्याची भीती .पोळीला सशक्त पर्याय काय असावा ? भाकरी आहे पण आजकालच्या ज्वारी बाजरीला कस कमी असल्याने भाकरी रोज खाणं होणार नाही.मला वेगळं काही सूचत नाहीए.रोजच्या पोळीभाजीला रिप्लेस करेल असा आहार कोणता आहे? पोळी एक्दम कटाप करण्यापेक्षा गहू,ज्वारी,बाजरी,तांदुळ,ओट्स असं रोज एक धान्य घेणं योग्य आहे का? नवीन काही सूचवले तर बरे होईल.
बायदवे प्रश्न .चवीला चांगला असा कोणता तांदुळ तुम्ही खाता?मी दावत ४०,७० ,इंद्रायणी व जिरेसाळ खातो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पोळीला काहीतरी लावून खाल्ले म्हणजे जेवण बाकीचे अवांतर खाणे आहे हे आपल्या डोक्यात फिट बसवलेले आहे.

हे तुम्ही कसं ठरवलं.
अत्यंत महत्त्वाची व्हिटॅमिन,क्षार,फायबर असतात ज्वारी ,बाजरी नाचणी मध्ये.
गहू सुध्धा विविध प्रकारची अवशक्या पोषक द्रव शरीराला पुरवतात.

पोळीला/चपातीला पर्याय काय?
पिझ्झा, बर्गर,ब्रेड,पाव अत्यंत पोषक पर्याय. आहेत
आणि सर्व बाजारात उपलब्ध असतात अगदी तयार.

आपण ज्या भागात राहतो त्या भागात पिकणाऱ्या भाज्या ,धान्य,कड धान्य हेच खाणे योग्य आहे.
विदेशी पदार्थ ज्यांची जाहिरात आणि भारतीय लोकांची स्व देशाबद्दल असलेला दुराग्रह.ह्या मुळे.
ब्रोकोली,,क्विनिओ, झुचणी,बदाम,पीच,चेरी ही विदेशी फळ आणि भाज्या खूप चांगल्या असतात असा भारतीय लोकांचा सर्वात मोठा गैर समज आहे.
अमेरिकन,चीन,जपान,आणि जगातील सर्व देश भारत सोडून ह्यांनी स्वतःचा पारंपरिक आहार बदलला नाही .
जगात फक्त भारतीय ही एकमेव जमात आहे त्यांना स्वतःच्या कोणत्याच गोष्टी चा अभिमान नाही.
घेवडया ला बीन्स म्हणत खाणार घेवडाच.

हेमंत ३३ यांना अनुमोदन. भारत ही वसाहत होती काही वर्ष इंग्रज, पोर्तूगीज,फ्रेंच लोकांची. बाकी अफगाणिस्तान, इराणी हे दुष्काळी लोक. पण इंग्रज, पोर्तूगीज यांनी अनेक पिके इकडं आणली आणि रुजवली. बटाटा, मिरची, कोबी, फ्लॉवर, भुईमूग पण वाटते अशी अनेक पिके इकडं आली. आज बटाटा दररोजच्या आहारात आवश्यक बनला आहे.
वाढत्या लोकसंख्येला अन्न पुरावे म्हणून संकरित जाती तयार केल्या गेल्या. कस कमी वगैरे नाही झालेला, पण औद्योगिक क्रांती नंतर जीवनशैलीत खूप बदल झाले आहे. वीजेमुळे पूर्वी जी कष्टाची कामे होती ती बरीच कमी झाली. पाणी शेंदणे, घरापर्यंत वाहून नेणे, जात्यावर धान्य दळणं, शेतीत राबणे ही श्रमाची कामे कमी झाली. परिणामतः शरीरातील स्नायूंची संख्या, ताकद कमी होतेय. इन्टेक जास्त आणि आऊटपुट कमी. भुक लागलेली असो की नसो , कधीही खाणे.

ब्रोकोली,,क्विनिओ, झुचणी,बदाम,पीच,चेरी ही विदेशी फळ आणि भाज्या खूप चांगल्या असतात असा भारतीय लोकांचा सर्वात मोठा गैर समज आहे.
>>>>>

+७८६
ते ॲप्पल ॲप्पल डॉक्टर अवे म्हणतात ते ऐकून मला फार हसायला येते.

पोळीला/चपातीला पर्याय काय?
भारतात फक्त विदेशी अन्न स्वीकारले .
चीन मध्ये कोण खातात का खिचडी भात,भाकरी,तुरी ची डाळ.
अमेरिकेत अमेरिकन लोक खातात का इडली , सांभर.
जगातील कोणत्याच देशांनी त्यांचे पारंपरिक आहार सोडला नाही
भारताने पण सोडला नाही फक्त भारतात जे स्वतःला वेगळे समजतात त्यांनी फक्त सोडला

रोज चार आवळे खाय, वैद्यांना म्हण बाय बाय.
>>>>

ॲक्चुअली!
मी तर आवळा कोकम यांना फळांचा देव मानतो.
माझे पित्त वगैरे हेच सांभाळतात.

अवांतर - आवळा कोकम हि फळेच आहेत ना? की प्राण्यांमध्ये जसे किटक असतात तसे फळांमध्ये आवळा कोकमला काही वेगळे म्हणतात

चपाती आणि पोळी मध्ये काय फरक असतो
ह्यांना पर्याय म्हणजे चपाती ची जागा घेणारे का?
भाजी बरोबर वापरता येणारे का?

काश्मिरी सफरचंद अती उत्तम
पण येथील स्वतःला वेगळे समजणारे विदेशी सफरचंद चांगले म्हणतात ते बिलकुल गोड नसणारे सफरचंद ह्यांना आवडत नाहीत पण फक्त आम्ही वेगळे म्हणून घेणार..
फुल कोबी आणि ब्रोकोली मध्ये काही फरक नाही.
पण आपले स्वतः ला वेगळे समजणारे ब्रोकोली चे गुण गाणार.
ज्वारी ,आणि क्विनो काही फरक नाही.
पण स्वतः ला वेगळे समजणारे ज्वारी ला नाक मुरडत बसतात.
चपाती /भाकरी कमी पणाचे वाटते म्हणून सँडविच,बर्गर ,पिझ्झा खाणार(शरीराचे सर्वात जास्त नुकसान करणारे पदार्थ)

हजारो वर्ष लोक गहू आहारात घेत आहेत.
ग्लूटेन वाईट ,gluten free healthy ase vibhajan करता येईल का.
आहार हा चौरस असावा सर्व प्रकारचे धान्य,कड धान्य,भाज्या,मासे, आहारात असावेत.
गव्हावर बहिष्कार takayachi गरज नाही
फक्त प्रमाणात आहारात असावेत

राजगिर्याच्या पोळ्या उत्तम होतात ट्राय करा
>>>>

आईचा उपवास असला की तिचा हा ठरलेला मेनू
सोबत बटाट्याची पांढरी भाजी
मलाही हे बरेपैकी आवडते.

दक्षिण भारत आणि पश्चिम किनारपटटीवरील प्रदेशात गहू हे मुख्य खाणे कधीच नव्हते. मात्र अलिकडच्या पन्नास साठ वर्षांत गव्हाचा वापर इकडे वाढला आहे.

भारतीय पदार्थ, भारतीय धान्य याला अग्रक्रम असावाच.पण काही चांगल्या गोष्टी त्यांच्या आहारातूनही उचलायला हरकत नाही.ब्रोकोली सूप मध्ये फ्लॉवर पेक्षा चांगली लागते.ओट्स फिलर म्हणून डोसे वगैरेंत चांगले लागते.हॅझलनट फरेरो रोशर आणि नटेला मध्ये छान लागतो.चिआ सीड्स, ब्लूबेरी भारतात विकत घेणे हा महाग आणि आचरट प्रकार असला तरी भारताबाहेर राहणाऱ्याना कदाचित जवसापेक्षा ते खाणं स्वस्त पडत असेल.भारतात राहणाऱ्या काहींना ते परवडत आणि पचत असेल.खाण्यात 'हा स्वदेशी, तो परदेशी, हा दाक्षिणात्य, तो उत्तरेचा' असा प्रांतीय भेदभाव न होता आपल्या कॅलरी नीड आणि पोषक तत्वांनुसार भेदभाव व्हावा. Happy

पोळी वा भाकरी एकदम बंद करण्यापेक्षा कमी पण खाता येईल. मी एकच छोटी पोळी वा छोटी भाकरी खाते. बाकी मग भाजी, कोशिम्बीर, उसळ, पनीर, बदाम-अक्रोड वगैरेनी उरलेले पोट भरते.
भात खावासा वाटतो तेव्हा थोड्या तांदळात भरमसाठ भाज्या घालून, मोडाचे धान्य घालून खिचडी केली तरी पोट भरते व भात खायची मानसिक इच्छा पुर्ण होते. बरोबर उकडलेले अंडे खाल्ले की काम झाले पोट भरायचे.

ज्वारी/ बाजरी / तांदूळ / वरी / राळं/ शिंगाडा / बेसन/ राजगिरा / कोट्टु पीठं ह्यापासून भाकरी, पोळा, डोसा, धपाटे, थालीपीठं , अप्पे, घावनं.

नानबा पाकृ आहे का? >>. राजगिऱ्याचे पीठ दळून आणायचे. विकतही मिळत.
आणि चक्क कणीक मळून पोळ्या करायच्या.
सोपे आहे

Pages