पोळीला/चपातीला पर्याय काय?

Submitted by केशव तुलसी on 9 August, 2020 - 12:33

पोळी भाजी हा आपला मुख्य आहार आहे.तर मुद्दा असा की रोज पोळीभाजी खाऊन कंटाळा आला आहे.गव्हातल्या ग्लुटेनमुळे चिकटपणामुळे बरेचदा पोट जड होणे हा प्रकार वाढत आहे.ग्लुटेनची ॲलर्जीपण असावी कदाचीत.
तर पोळीला पर्याय हवा आहे जो की सशक्त असावा.सध्या भात खात आहे.भात व भाताबरोबर भाजी व आमटी. भात आवडतो पण काही तासात परत भूक लागते.त्याचबरोबर भात स्टार्चयुक्त असल्याने शुगर वाढून डायबेटीस २ होण्याची भीती .पोळीला सशक्त पर्याय काय असावा ? भाकरी आहे पण आजकालच्या ज्वारी बाजरीला कस कमी असल्याने भाकरी रोज खाणं होणार नाही.मला वेगळं काही सूचत नाहीए.रोजच्या पोळीभाजीला रिप्लेस करेल असा आहार कोणता आहे? पोळी एक्दम कटाप करण्यापेक्षा गहू,ज्वारी,बाजरी,तांदुळ,ओट्स असं रोज एक धान्य घेणं योग्य आहे का? नवीन काही सूचवले तर बरे होईल.
बायदवे प्रश्न .चवीला चांगला असा कोणता तांदुळ तुम्ही खाता?मी दावत ४०,७० ,इंद्रायणी व जिरेसाळ खातो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आंबेमोहोर किंवा बासमती , आणि इडली साठी इडली राइस.
वेगवेगळ्या धान्याचा वापर चांगलाच आहे की , आम्ही कीन्वा पण आणतो अधूनमधून.
धिरडे पर्याय आवडेल का ...मगं बरेच काही करता येईल.
भाताऐवजी खिचडी, पुलाव भरपूर भाज्या घालून, उसळ आणि भात, माडगं, बिशिब्याळी , भाकरी, बेसनाचे धिरडे, मूगाचे धिरडे/ दोसे, इतर धिरडे दोसे.

अधूनमधून नाचणीची भाकरी / थालीपीठ.
हातसडीचा सोनामसुरी तांदुळ.
कोडो मिलेट - भाता ऐवजी भाताप्रमाणेच शिजवून.
पुलाव पण करता येतो.
याची इडलीपण चांगली होते.
ब्राऊनटॉप मिलेट - वरील प्रमाणेच.
-
तांदळाच्या पिठाचे घावन.
अप्पम

चव निर्माण करावी लागते
सलग 3 महिने सवय जमली तर आपोआप जमेल

खरे तर पोळी भाकरी हे ऑप्शन अति कृत्रिम व अनारोगी आहेत , पण सवय लागली आहे

कोणतेही धान्य शिजवून खाऊन पोट भरले हवे ,
म्हणजे कडधान्ये , डाळी - वरण , आमटी , पुरण
ज्वारी - कण्या
गहू , तांदूळ - शिजवून भात , खिचडी , दलिया, खीर , गव्हाची उसळ
बाजरी , नाचणी - शिजवून खाणे
मका - शिजवून

धान्य लवकर शिजणारे नसेल तर थोडे भरडले तर चालेल , पण एकदम पीठ अन पोळ्या नको

पण हे नाटक 4 दिवस टिकते

मीही सद्ध्या चपातीला पर्याय शोधते आहे.
अगदीच नाही पण दिवसातले एक वेळचे जेवण चभाजी नकोय.
सूपमधे अर्धा भाग भाज्या आणि अर्धा भाग धान्य/कडधान्य असेल तर ते पुरेसे होते. अथवा क्लियर सूप + सॅलड हवे.
अजून पर्याय सुचवलेले करून बघायला आवडेल.

बरेच पर्याय आहेत.. भातालाही अधेमधे किन्वाने रिप्लेस करू शकता. मिक्स पिठांचं थालीपीठ, धिरडं, राजगिरा पिठाच्या पोळ्या, न आंबवता केले जाणारे मिक्स डाळींचे डोसे, रवा डोसा, किन्वा-बाजरीचे डोसे
अजून काही आठवलं तर ॲड करेन.

सुचवलेले पर्याय चांगले आहेत. धन्यवाद.
पण हे नाटक 4 दिवस टिकते>>> Lol हो म्हणूनच आठवड्यातले २ दिवस अशी सुरूवात करून पुढे वाढवायचा विचार आहे.

कीन्वा + राइस उत्तप्पा अप्रतिम होतो. पण कीन्वा जरा महागडे आहे... कधीतरी करू शकतो.
https://en.m.wikipedia.org/wiki/Quinoa
इथे बघू शकता मृणाल. प्रोटीन आणि फायबर यांचे प्रमाण चांगले असते.

आजकालच्या ज्वारी बाजरीला कस कमी आहे हा नियम सरसकट सगळ्या अन्नधान्यांना लागू होऊ शकतो. भाज्यांसह. पुणे-मुंबईत भाज्या कुठून येतात हे पाहिलं तर भाज्याही सोडाव्या लागतील. खरं तर जे मिळतं आहे ते तसं घेऊन खाणे याला पर्याय नाही. नाईलाज आहे. खात्रीशीर सेंद्रिय उत्पादन मिळत असेल तर पहा.
भाकरी बाजरी, ज्वारी किंवा मक्याचीही छान लागते.
तांदूळ नेमका सांगणं कठीण. पण आम्ही 'बायकोनं वाण्याच्या चिठ्ठीत लिहून दिलेला' आणतो. छान लागतो. Lol

मी सालासकट मूग आणि कधी कधी इतर कडधान्ये भिजवून बारीक वाटून त्यात मिरची आणि कोथिंबीर आणि कांदा इ. इ. घालुन डोसे करते ... चपाती किंवा भाकरीला पर्याय.

किन्वा दक्षिण अमेरिकन धान्य जे भातासारखे कुकर मध्ये शिजवता येते. >> टाटा च्या स्टार बझार मध्ये बर्याच वेळा ५०% सवलतीत मिळते.
कुसकुस >> उपमा /दलिया सारखा mediterranean (अरब /अफ्रिकन) पदार्थ
दलिया
पास्ता
मिलेट

पोळीला/चपातीला पर्याय काय? >> टू बी ऑनेस्ट, काहीही नाही.
आपला पिंड याच गोष्टींवर पोसला गेलाय. भात, वरण, भाजी, पोळी, भाकरी. याव्यतिरिक्तचे प्रकार (थालीपीठं, पोळें, धीरडी इ.) अधूनमधूनच बरे वाटतात आणि किन्वा, कुसकुस, सॅलडं, पास्ते, पिझ्झे इ. आणि बाकी फ्याडं, नाटकं ४ दिवसच चालतात.
आय मीन पर्याय बरेच आहेत पोळी/भाकरी ला पण ते कधीकधी बरे वाटतात आणि यू जस्ट कांट इलिमिनेट पोळ/ भात टोटली फ्रॉम डाएट.

अर्थात हे नेहेमीप्रमाणे माझं मत

नाही हो,आमच्या कडे नाही बनत रोजच चपाती,पोळी, मागच्या 11 वर्षांपासून.
विविध प्रकारचे डोसे, ईडली, ईडीआप्पम,आप्पे,variety rice.
कधीतरी फुलके,चपाती, पराठा असले पदार्थ बनतात,आठवड्यातून एकदा.

खरे तर पोळी भाकरी हे ऑप्शन अति कृत्रिम व अनारोगी आहेत , पण सवय लागली आहे

Black cat
वरील तुमचे वाक्य समजले नाही.
भाकरी,चपाती आरोग्यास हानिकारक आहे.

दाणे काढणे
पाखडणे
पीठ करणे
ते चार दिवसांनी वापरणे
तेही भाजून वापरणे

ह्यातून अनेक सत्वांचा नाश होतो,
त्यामुळे धान्य कमीत कमीत प्रोसेस करून खावे , म्हणजे डायरेक्त शिजवून , तिखट पदार्थ किंवा खीर

पण आजकाल हे शक्य नाही , आपण पिठावर अवलंबी झालो आहोत

प्राचीन काळी धान्य बारीक होते , म्हणून ते शिजवत होते

वाढत्या लोकसंख्यसाठी धान्य जाड , मोठे वगैरे बनवले , शेल्फ लाईफ वाढावे म्हणून त्याचे आवरण जाड केले
त्यामुळे दळून पीठ केल्याशिवाय ते खाता येत नाहीत , एस्पेशली गहू, ज्वारी

>> आजकालच्या ज्वारी बाजरीला कस कमी असल्याने <<
हे पटले नाही.
बरेच लोक ज्वारी साठी प्रसिद्ध अश्या बार्शी / सोलापूर या ठिकाणांहून ज्वारी मागवतात, आमचे गिरणीवाले सुद्धा तिथून पोती मागवतात, हवी असेल तर ज्वारी देतात, किंवा डायटेकट पीठ दळून देतात, दर्जा चांगला असतो. आम्ही बऱ्याच वेळा भाकरी करतो. आम्हीतुम्ही सुद्धा आजूबाजूस थोडा शोध घेतला तर मिळेल.
भाकरी / थालीपीठ / धिरडे / डोसे असं कॉम्बिनेशन करून आहारातून गहू कमी करता येईल.

पोळी भात अजिबात खाल्ले नाही तर काही फरक पडत नाही. उलट कमी मसाले किंवा नगण्य मसाले टाकून केलेली सूप्स, सॅलड, भाज्या हे सर्व पोळी शिवाय मस्त लागतात. भाज्यांची ओरिजिनल टेस्ट.
शिवाय कमी मसाले टाकून केलेली चिकन, अंडी.
वरील सर्व प्रकार वन डिश मिल म्हणून मला आवडतात.
आपल्या कडच्या ६ कोर्स मिल (पोळी, भाजी, भात, आमटी, कोशिंबीर व एक गोड पदार्थ) हा प्रकारसुद्धा मला आवडत असला तरी तो आचरट पणा आहे असे मला वाटते.

मी तर रोज भात खातं होते दुपारी आणि रात्री सुद्धा . पण मी भात वाळून करते ( म्हणजे बिर्याणी ला करतो तसा भात पाणी काढून घायचा) आता सध्या रात्री ज्वारीची भाकरी खायला सुरवात केली डाएटसाठी.

ज्वारी,बाजरी,नाचणी, ही धान्य आहारात असलीच पाहिजेत.
आपला पारंपरिक आहार हाच सर्वात उत्तम आहार असतो..
हजारो वर्ष शरीराला त्याची सवय असते.
क्विनोवा हे अमेरिकन धान्य आहे ज्वारी,बाजरी,आणि नाचणी सारखं च पोश्टिक तत्व असलेलं .

Pages