Submitted by माउ on 7 August, 2020 - 16:31
अमेरिकेत लोणी कसे मिळवावे?
यावर आधी धागा निघाला आहे का? मी शोधण्याचा प्रयत्न केला पण मिळाला नाही...इथे Whole Milk पासून लोणी बनते का?
मी heavy cream चे दहि लावून पाहिले पण लोणी नीट आले नाही..
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मी KITCHENAID वापरून बनवलंय
मी KITCHENAID वापरून बनवलंय लोणी
Heavy whipping Cream + culture = sour cream = butter( + buttermilk) = ghee
इंस्टापॉट वापरा...
इंस्टापॉट वापरा...
Heat the heavy whipping cream
Heat the heavy whipping cream.. I am lazy so I do 30 sec microwave..
Let it cool down add 1tbsp yoghurt (culture ).. leave it overnight in a warm place as we do for yoghurt? Takes lil more than normal yoghurt
(I used IP yoghurt)
Micro wave cream for 30 sec add culture/ yoghurt. Cover it with cling wrap and keep it in a warm place ( I kept mine in my patio) for 5-6 hrs then keep it in a cooler place overnight (kitchen counter).
Using hand blender or balloons whisk whip it to separate butter.
Add cold water or ice cube and collect all the butter. Keep it in ur ref( 2-3 days ) or in freezer until u r ready to make ghee.
Again for ghee butter has to at room temp or it will take longer.
इंस्टंट पॉटमधे मी पॉट इन पॉट
इंस्टंट पॉटमधे मी पॉट इन पॉट मेथडने हेवी विपिंग क्रिम आधी हाय प्रेशरवर दोन मिनिटे तापवून घेते आणि ते कोमट झाले की त्याला विरजण लावून नेहमी प्रमाणे योगर्ट मोडवर ठेवते. ( मॅन्युअलमधे पॉट इन पॉट वापरुन लहान लहान जारमधे योगर्ट कसे करायचे ते दिले आहे तिच पद्धत वापरायची) . विरजण लागलेले क्रिम गार होवू द्यायचे. मी रात्रभर फ्रीजमधे ठेवते. दुसर्या दिवशी मोठ्या गंजात (उभ्या भांड्यात) दोन बॅचमधे हँड मिक्सरने (वायर व्हिस्क ) घुसळते. स्टिफ पिक्स आली तरी घुसळत रहायचे. हळू हळू लोणी आणि बटरमिल्क वेगळे व्हायला लागते आणि छान देशी चवीचे लोणी निघते. पहिल्यांदा केले तेव्हा या फेजला बटरमिल्क बाहेर उडून जरा पसारा झाला म्हणून आता दोन बॅचेसमधे घुसळते. २ मिनीटे हाय स्पीड, ३० सेकंद मिक्सरला विश्रांती असे करत एका बॅचला साधारण १५-२० मिनीटे लागतात. उभे भांडे नसल्यास मोठा बोल वापरा. तुमच्याकडे स्टँड मिक्सर असेल तर त्यात घुसळा, तो सलग जास्तवेळ चालतो. घुसळताना पाणी अजिबात घालायचे नाही. घट्ट लोणी दुसर्या बोलमधे काढून फ्रिजमधे ठेवा. गार झालेले लोणी एकदा गार पाणी घालून धुवून घ्या आणि मंद आचेवर कढवा.
पॉट इन पॉट एकदम सोपे आणि सेफ आहे. आयपीच्या भांड्यात त्यांनी दिलेल्या कपाने २ कप पाणी घालायचे आणि ज्या भांड्यात दही लावायचे आहे त्यात क्रिम घालून ते भांडे पाण्यात ठेवायचे. आपण नॉर्मल कुकरला करतो तसेच. झाकण लावून सील करायचे आणि हाय प्रेशर , स्टीम ऑप्शन दोन मिनीटांसाठी लावायचा. ऑफ करुन नॉर्मल रिलीझ होवू द्यायचे. मग बाहेर काढून कोमट झाले की विरजण लावून पुन्हा भांडे आयपीत ठेव योगर्ट सेटिंगला.
हे मला मायबोलीकर स्वाती२ यांनी सांगितले होते.
विरजण कुठले वापरतेस म्हाळसा ?
विरजण कुठले वापरतेस म्हाळसा ? तुझी पद्धत सोपी वाटतेय.
मी विरजण माझ्या एका साऊथ
मी विरजण माझ्या एका साऊथ इंडियन मैत्रिणिकडून घेते.
मलाही आहे एक मैत्रीण ..
मलाही आहे एक मैत्रीण ...धन्यवाद
मी heavy cream ला विरजण लाऊन
मी heavy cream ला विरजण लाऊन लोणी काढून पाहिले..पण खूप फेसाळ आणि हलके लोणी निघाले.... लोण्याचा गोळा अजिबात आला नाही....काय चुकले?
तूप मात्र मस्त झाले!
हा धागा दवणीय अंड्यावर पोचला
हा धागा दवणीय अंड्यावर पोचला आहे..
https://www.facebook.com/1498801983696562/posts/2722232888020126/?substo...
पण खूप फेसाळ आणि हलके लोणी
पण खूप फेसाळ आणि हलके लोणी निघाले.... लोण्याचा गोळा अजिबात आला नाही>> तुम्ही हाताने व्हिप केलेलं का ?
टिप - Sour cream व्हिप करताना रूम टेंम्परेचरला असणं गरजेचं .. Sour cream हॅंड ब्लेंडरने ब्लेंड करायचं असेल तर लोअर सेटिंगवर करा.. तरीही हलकं लोणी निघालं तर झाकण असलेल्या डब्यात ट्रांस्फर करून डबा २-३ मिनिटांसाठी जोरजोरात हलवा. त्यातलं बटर मिल्क वेगळं होईल आणि गोळा सहज निघेल.
मी अमेरिकन्सना लोणी कसे
मी अमेरिकन्सना लोणी कसे लावावे वाचले.
हा धागा दवणीय अंड्यावर पोचला
हा धागा दवणीय अंड्यावर पोचला आहे..>> काहींच्या पोटात फार दुखतं त्याला काय करणार
दवणीय अंडे या पेज बद्दल माहीत
दवणीय अंडे या पेज बद्दल माहीत नव्हते.
पण मला हे जाणून घ्यायला आवडेल की अमेरिकेत लोणी लावणे आणि भारतात लोणी लावणे यात काय फरक आहे?
विरजण कुठून मिळवावे या व्यतिरिक्त.
मानव+१
मानव+१
धागा वाचून मला अमेरिकेत दह्यावर बंदी आहे का असा प्रश्न पडला.
अमेरिकन दुधा चे दही लागत नाही की त्यापासून लोणी होत नाही?
तसंच भारतात दुधाला विरजण लावतात. मग त्याचं दही होतं. याला दही लावणे म्हणता येईल.
भारतात लोणी काढावं लागतं. तयार लोणी कशाकशाला लावता येतं. पण दही लावतात तसं लोणी लावल्याचे ऐकले नाही.
फर्स्ट वर्ल्डवाल्यांचे वेगळेच प्रॉब्लेम्स!
अमेरिका हा भारतापेक्षा चौपट
अमेरिका हा भारतापेक्षा चौपट क्षेत्रफळाचा देश असल्याने हवामान भिन्न भिन्न आहे. त्यामुळे अमेरिकेत दूधाचे दही लागत नाही का ह्या प्रश्नाचे उत्तर स्थळानुसार बदलेल. भारतातही काश्मीर मध्ये दह्यासाठी लागणारा काळ व कन्याकुमारीत दह्यासाठी लागणारा काळ ह्यात फरक असणार.
घुसळणे ही प्रक्रिया समान असली तरी लोणी काढण्यासाठी असणारे गॅजेटस हे देशोदेशी वेगवेगळे असू शकतात/ असतात . जरा वेळात व्हिडीयोज टाकते.
माऊ आणि लोणी वाचून गंमत वाटली
माऊ आणि लोणी वाचून गंमत वाटली

दवणीय अंडे ची काळजी करू नका.तिथे नॉर्मल धागे आले तर वाचक सांगतातच.
दवणीय अंडे ची खरी पोटेनशियल प्रेमाबद्दलचे व्हॉटसप संदेश असतात
https://youtu.be/EQ4dEF2nijY
https://youtu.be/EQ4dEF2nijY - १०० वर्षापूर्वी अमेरिकन पद्धत
https://youtu.be/DV7hop4m0YQ - १०० वर्षापूर्वी ब्रिटीश पद्धत
https://youtu.be/e5ebze7Gof4- सध्याची अमेरिकन पद्धत
https://youtu.be/aFFQrVdQm2k - फ्रेंच पद्धत
धागा वाचून मला अमेरिकेत
धागा वाचून मला अमेरिकेत दह्यावर बंदी आहे का असा प्रश्न पडला. >>
इथल्या बऱयाच ब्रॅंडच्या दह्यात /sour cream मधे मोठ्या प्रमाणात gelatine सारखे stabilizers असतात ज्यामुळे लोकं घरीच दही लावणे पसंत करतात.
पण मला हे जाणून घ्यायला आवडेल
पण मला हे जाणून घ्यायला आवडेल की अमेरिकेत लोणी लावणे आणि भारतात लोणी लावणे यात काय फरक आहे?>>>>
वर दिलेल्या रेसिपीज वाचून तिथल्या तापमानाचा फरक आहे असे वाटले. इथल्या हवेत विरजायची जी क्रिया होते ती तिथे होत नाही असे वाटतेय.
लोणी कसे लावावे यापेक्षा
लोणी कसे लावावे यापेक्षा लोण्यासाठी साय कशी विरजवावी हा प्रश्न माउला पडलेला आहे असे दिसतेय. शीर्षकात योग्य तो बदल केल्यास नंतर शोधणाऱ्यास सोपे जाईल.
माउ झोपली वाटतं.. आता
माउ झोपली वाटतं.. आता शीर्षकातले बदल बहुतेक उद्याच घडतील
मी तर दवणीयवर फक्त तिथल्या
मी तर दवणीयवर फक्त तिथल्या कमेंटसेक्शनसाठी जातो. इथल्या कबुतरकथेमुळे ते पेज माहिती पडले.
तपमानाने फरक पडतोच. इथेच
तपमानाने फरक पडतोच. इथेच एकाच ठिकाणी हिवाळा व उन्हाळ्यात फरक दिसून येतो, आमच्याकडे उन्हाळ्यात बूंदीभर विरजण टाकले की पुरते, हिवळ्यात दोन चमचे लागते. वेळही जास्त लागतो. तेव्हा हिवाळ्यात उबदार जागी लावलेले विरजण ठेवल्यास (फ्रिजच्या स्टॅबिलाइझरवर /इन्व्हर्टेरवर) लौकर आणि चांगले लागते.
विरजण लागल्यानंतरच्या कृतीतही फरक आहे का?
व्हिडीओ पाहिले नाहीत अजून, स्लो नेट.
माझा शिर्षकावर कसलाच आक्षेप नाही, शिर्षक वाचून प्रश्न पडला एवढेच.
मी तर दवणीयवर फक्त तिथल्या
मी तर दवणीयवर फक्त तिथल्या कमेंटसेक्शनसाठी जातो. इथल्या कबुतरकथेमुळे ते पेज माहिती पडले.>> तिथल्या कमेंट्स वाचून हसून हसून आता माझ्याच पोटात दुखू लागलंय
विरजण लागल्यानंतरच्या कृतीतही
विरजण लागल्यानंतरच्या कृतीतही फरक आहे का? >> घुसळणे ही प्रक्रिया समान आहे. पण कुठले दूध वापरले त्यावर स्निग्धांश किती नि पर्यायाने घुसळायचे किती वेळ हे बदलते. उदा: भारतात म्हशीचे व गायीचे दूध उपलब्ध असते. गवळ्याला जे सांगू ते तो देतो. म्हशीपेक्षा गायीच्या दूधात स्निग्धांश कमी असल्याने लोणी काढायला वेळ लागतो. अमेरिकेत म्हशीचे दूध सर्रास उपलब्ध नाही. (बकरीचे एक वेळ पटकन मिळते.). गायीच्या दूधाचे लोणी करायला वेळ लागतो. स्टँड मिक्सर बरा पडतो.
ओके. धन्यवाद.
ओके. धन्यवाद.
शिर्षक बुचकळ्यात पाडणारे आहे.
शिर्षक बुचकळ्यात पाडणारे आहे. भारतात लोणी लावणे (मस्का) सोपे आहे पण अमेकिकेत भारतीय पध्दत चालत नसावी काहीतरी वेगळ्या कृल्प्त्या हव्या आहेत.
अमेरिकेतला काही अनुभव नाही त्यामुळे पास ..
हा धागा दवणीय अंड्यावर पोचला
हा धागा दवणीय अंड्यावर पोचला आहे..
>>>>
हाहाहाहा
हे सध्याचे सर्वात हॉट मराठी पेज आहे
फुल धमाल निखळ मज्जा चालते
कमेंट्स लेखांपेक्षा सॉलिड असतात
हा अंड्या मायबोली वर कोण आहे
हा अंड्या मायबोली वर कोण आहे हे शोधलं पाहिजे
तोच असणार एमपीडी (multiple
तोच असणार एमपीडी (multiple personality disorder) असलेला कार्यकर्ता
सीमंतिनी,चारही व्हिडिओज मस्त
सीमंतिनी,चारही व्हिडिओज मस्त होते.
तापमानाचे लॉजिक गंडलेले आहे..
तापमानाचे लॉजिक गंडलेले आहे... अमेरिका म्हणजे थंडच असे नाहीय... प्रचंड गरम स्टेटस देखील आहेत... माऊ ने त्यांची सिटी सांगावी... म्हणजे लोकांना नीट उत्तर देता येईल...
तोच असणार एमपीडी (multiple
तोच असणार एमपीडी (multiple personality disorder) असलेला कार्यकर्ता >> its not runmesh. Andya is someone read only mode member probably.
पण हे असे स्क्रीनशॉट घेऊन
पण हे असे स्क्रीनशॉट घेऊन टाकणे कॉपीराईट उल्लंघन होत नाही का?
लेख, कथा वगैरे असेल तर होईलच
लेख, कथा वगैरे असेल तर होईलच प्रताधिकार उल्लंघन.
Imho the davaniya ande person
Imho the davaniya ande person is the one who wrote original Luna wale brahme post . Very witty person .
मिपावरचे लोक्स आहेत ते.
मिपावरचे लोक्स आहेत ते.
राग करण्यासारखे काही वाटत
राग करण्यासारखे काही वाटत नाही पण तिथे, सगळे मिपा -मायबोली मिक्स लोके आहेत.
अरे देवा...सगळ्यांनी मिळून
अरे देवा...सगळ्यांनी मिळून मलाच लोणी लावलेले आहे ...हाहा
अमेरिकेतले दूध भारताइतके fatty नसते...भारतात ११-१२% fats असतात आणि अमेरिकेतल्या दुधात ३.५-५% fats असतात..त्यामुळे साय नीट येत नाही...
मला वाटले अमेरिकेत (पावाला)
मला वाटले अमेरिकेत (पावाला) लोणी कसे लावावे ?
बाकी सगळ्याच कमेंट्स भारी
बाकी सगळ्याच कमेंट्स भारी आवडल्या..:)
वि.सू. : अमेरिकन लोकांना लोणी लावण्यात मला फारसा रस नाही....इथे थालीपीठ आंबोळीसाठी लोणी मिळाले तरी फार झाले....
अमेरिकेतले दूध भारताइतके
अमेरिकेतले दूध भारताइतके fatty नसते...भारतात ११-१२% fats असतात आणि अमेरिकेतल्या दुधात ३.५-५% fats असतात..त्यामुळे साय नीट येत नाही...
Submitted by माउ on 8 Augus
>> भारतात म्हशीच्या दुधात ७.५ ते९ टक्के व गायीच्या दुधात ३.५ ते ४.५ टक्के फॅट्स् असतात. गायीच्या दुधापासून छान पण कमी लोणी मिळते. दुध तापवून थंड झाल्यावर रात्रभर फ्रिजमध्ये ठेवले की वर घट्ट साय येते. ही साय काढून फ्रिजमध्येच ठेवायची. पाच-सहा दिवसांची साठली की तिला विरजण लावायचं, विरजण लावलेले भांडं फ्रिज मध्ये ठेवायचं नाही. दुसऱ्या दिवशी हॅण्ड मिक्सीने घुसळून घ्यावे. थोडं फ्रिजचं थंड पाणी टाकलं की लोणी लवकर तयार होते. ही माझी पध्दत आहे लोणी - तूप बनवायची.
भारतात पाच दिवसाच्या सायीत
भारतात पाच दिवसाच्या सायीत बर्यापैकी तूप निघत असेल तर दंडवतच गवळ्याला. बहुतेक गवळी थेट अगदी "अब के सावन" मधून आल्यासारखे दूधाचे रतीब घालतात.

https://youtu.be/1rE12Vbyw6s?t=31
मग म्हशीचं दुध घ्या सिमंतिनी
मग म्हशीचं दुध घ्या सिमंतिनी ताई. कितीही पाणी टाकलं तरी म्हशीच्या दुधापासून जास्त तूप निघते. पण गाईच्या तुपात जीवनसत्त्व अ कच्च्या रुपात भरपूर असते ते म्हशीच्या दुधात नसतं. मी सांगितलेल्या पध्दतीने तूप करून अनुभव तर घ्या अगोदर. जास्त दिवस साय साठवली तर ती खवट होईल, खराब होईल म्हणून पाच-सहा दिवस सांगितले आहे.
पण आर्टिसानल पांढरे बटर मीठ
पण आर्टिसानल पांढरे बटर मीठ घातलेले किंवा न घातलेले रेडी मिळते की. टेस्को, टार्गेट होल फूड किंवा ऑनलाइन नक्की मिळून जाईल. इथे बिग बास्केट वर व्हाइट बटर मीठ घातलेले मिळते. फ्रेंच बटर म्हणून सर्च करून बघा. फ्रेंच बटर खरेच फार लै भारी लागते टेस्ट ला.
अमूल यलो बटर किंवा घी मिळ्ते का तुमच्यात? माझ्याकडे यलो व्हाइट अशी दोन बटर ठेवते मी. मूड असेल तसे घ्यायचे. कधी तूप.
मेंढीचे दूध वापरा... भरपूर
मेंढीचे दूध वापरा... भरपूर फॅट असते...
हा धागा दवणीय अंड्यावर पोचला
हा धागा दवणीय अंड्यावर पोचला आहे..
>
हे अजिबात आवडलेले नाही...आत्ता तिथे जाऊन पाहिले...असे पेज आहे हे मला माहित नव्हते...उगीच काहीच्या काही कमेंट्स केलेल्या आहेत..आणि असे screenshots टाकणे हे कॉपीराईट उल्लंघनच आहे...
मी खरंच शंका विचारली होती.. युक्त्या सुचवल्याबद्दल धन्यवाद सर्वांना!
IP मधे करून बघते आहे... उद्या कळेल कसे झाले ते!
पण आर्टिसानल पांढरे बटर मीठ
पण आर्टिसानल पांढरे बटर मीठ घातलेले किंवा न घातलेले रेडी मिळते की. टेस्को, टार्गेट होल फूड किंवा ऑनलाइन नक्की मिळून जाईल. इथे बिग बास्केट वर व्हाइट बटर मीठ घातलेले मिळते. फ्रेंच बटर म्हणून सर्च करून बघा. फ्रेंच बटर खरेच फार लै भारी लागते टेस्ट ला.>>>>>
ह्या बटरमध्ये व साय विरजवुन, घुसळून काढलेल्या लोण्यामध्ये जमीनअस्मानचा फरक आहे. बटर दुधातील फॅट एकत्र करून बनवलेले असते. त्यावर विरजणाची प्रक्रिया झालेली नसते.
भारतात मिळणाऱ्या ब्रँडेड पिशवीतल्या गायीच्या दुधापासून साय मिळणे कर्मकठीण. एखाददोन ब्रँडच्या दुधापासून मिळते. कोणी गवळी घरी दूध घालत असेल तर मिळू शकते. पण तेही कठीण आहे व मिळणारी साय थोडीच मिळते. मी देशी गायीचे अनब्रॅण्डेड दूध घेत होते तेव्हा दोन आठवड्यानी तीन चार चमचे तूप मिळायचे, ते अस्सल पिवळेजर्द, सुवासिक तूप असायचे. अर्थात मी दूध दिवसाला अर्धा लिटर घेत होते.
पिशवीतल्या म्हशीच्या ब्रँडेड दुधापासून मात्र व्यवस्थित साय मिळते. दिवसाला 1 लिटर दुध घरात खपत असेल तर पोपटलाड यांनी लिहिल्याप्रमाणे दूध तापवून थंड करून फ्रिजात ठेवून चांगली जाड साय मिळवता येते. इथेही ब्रँडप्रमाणे फरक पडतो. मुलगी लहान होती तेव्हा दिवसाला दिड लिटर दुध लागायचे, घरात कायम तुपाने भरलेल्या बरण्या असायच्या, तेव्हा कधीही तूप विकत घेतले नव्हते, उलट जास्तीचे मैत्रिणींना दिले जायचे

हे अजिबात आवडलेले नाही..
हे अजिबात आवडलेले नाही...आत्ता तिथे जाऊन पाहिले..>>>>>
सहमत. इथे धागा काढल्यावर तो लगोलग तिकडे गेला, तेही वाईट कमेंटसकट. दवणीय अंड्याच्या मालकाला ती कमेंट इथेही करता आली असती. मला हा प्रकार दयनीय वाटला.
ऑनलाईन छापलेलं काय कुठे जाईल
ऑनलाईन छापलेलं काय कुठे जाईल यावर आपला कंट्रोल नसतो.
फार तर तिथे कमेंट करून कॉपीराईट चा मुद्दा उपस्थित करता येईल.
दवणीय अंडे वाले कधीकधी लिमिट ओलांडतात.
Pages