तुला सांजवेळी दार सोडता न आले

Submitted by प्रगल्भ on 26 July, 2020 - 01:39

एक गझल लिहीण्याचा प्रयत्न केला... कविता होऊन गेली...
परत त्या कवितेला गझलेत बांंधायचा प्रयत्न करू की नको?

मला खर तर या कवितेची इमेज फाईल अपलोड करायची होती... कोणीतरी नंंतर मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती!

तुला सांजवेळी

तुला सांजवेळी दार, सोडता न आले
दारातून आत मला, बोलावता न आले

घुटमळलो कुंपणापाशी वाट शोधत
मजकडे एकदाही पाहता न आले

रातांधळी गवतफुले धुंडाळत राहीलो
फुलाचे कारण कुणा सांगता न आले

पाहिली वाट तुझी, तुडवत माती तुझी
मातीतल्या तुझ्या गंधास हुंगता न आले

दिसलो माझा मला मी लाचार लख्ख
निघालो तेंंव्हा तुला मज पाहता न आले

खिशात भरली तुझी मातकट चरणधूळ
खेद, तुला मज साधे आठवता न आले

नाही मी तुझ्या स्मरणांंत, ना आठवांत
तरी, राती सुखाने तुज निजता न आले

- प्रगल्भ कुलकर्णी
26 जुलै 2020 (रविवार)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

"खूप ओढाताण आहे." ----> @भरत काय करणार सर , सेनसिटीव्ह असण शाप आहे या जगात Happy

"खूप ओढाताण आहे." ----> @भरत काय करणार सर , सेनसिटीव्ह असण शाप आहे या जगात

>>>

भरत बहुतकरून कवितेच्या शाब्दिक कारागिरीबद्दल बोलत आहेत, शब्द जुळवण्यात खूप ओढाताण आहे या अर्थी

ओढाताण... अं
पण मी जसं सुचलं तस लिहिलं. कारण गझल लिहायला बसलो आणि कविताच झाली
ती गेले सात वर्ष पुण्यात आहे. लहानपणी माझ्या रिक्षेत होती ( ४-५ वर्ष ) तिच्या शेजारीच बसायचो पण मागच्या काही वर्षांपासून मला जरा जास्त attachment वाटत होती.
आणि मी असच एके दिवशी तिच्या सोलापुरातील घराच्या इथे जाऊन आलो ( सकाळी स्मृती वनात फिरायला जाताना तिचं घर लागत एका बोळात ) पण ते घर भकास आहे आता. गेल्या सात वर्षांत ते नाही आलेत परत सोलापुरात कधीच मग मला अजुन एक कविता सुचली ती लिहिली पण होती त्यातल्याच दोन ओळी लिहितो

" वाऱ्यावर विरल्या त्या आपल्यातील गोष्टी
तुझ्या जीर्ण घरासमोर उभा आठवत त्या गोष्टी "