La Flor del amor - Blossom of love (भाग ८) (शेवटचा भाग)

Submitted by कविन on 25 July, 2020 - 08:19

भाग ७
____________________________________
भाग ८ :-

पुढचे काही दिवस कमाल बिझी गेले. वाढदिवसाला जोडून पुढेही दोन दिवस मला सुट्टी हवी होती म्हणून मी पण जास्तवेळ थांबून काम पूर्ण करुन देत होते. प्रणवही नर्सरीच्या वेबसाईटच्या कामात बिझी होता. डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनसारखा मेसेंजर आणि फोनकॉलवर गप्पांचा डोस सुरु होता पण त्यात निवांतपणा असा नव्हता. प्रिया मॅटरला पूर्ण क्लोजर मिळालं नसलं तरी सध्या तो मॅटर मी काहीकाळ ऑप्शनला टाकला होता.

जाईबाईंच्या मते 'मॅटर' प्रिया कधीही नव्हता आणि नाहीच. ते ही बरोबर होतं. आम्हाला आमच्याबद्दल काय वाटतं, मॅटर फक्तं इतकाच होता आणि तो सोडवायचाही आम्हालाच होता. कसा? कधी? हा जरा ट्रिकी मुद्दा होता खरा.

पण काही नाही तरी वाढदिवस होऊन गेल्यावर मी माझ्यापुरते क्लोजर मिळवणार हे माझे ठरले होतेच. वाढदिवसाला आम्हाला दोघांसाठीच वेळ मिळावा आणि जर ती शेवटची भेट ठरणार असेल आमची तर किमान मला वाढदिवसाची भेट म्हणून तो अख्खा दिवस त्याचा सहवास मिळावा. नंतर तो नाही म्हणाला तर .. किंवा प्रियासारखीच मी ही त्याला फक्तं एक चांगली मैत्रिण इतकच वाटत असेल तर.. परत नाशिकला गेल्यावर गार्डेनिया, कॉफी, इकेबाना आणि प्रणव यांच्या आठवणी फिकट नाही झाल्या तर... या जर तरने झोप उडवली होती माझी. 'इमोशनल झोल आणि रोलर कोस्टर राईड' सुरु होती जाईच्या शब्दात.

पण इमोशनल झोल कितीही असोत प्रोफेशनल लाईफमधे त्याचं प्रतिबिंब चुकूनही पडू द्यायचे नसते. उलट दुप्पट मेहनत घेऊन स्वतःला त्यात झोकून द्यायचे असते हे आमच्या मा चे कायमचे मला आवडणारे तत्वज्ञान आता प्रॅक्टीसमधे आणताना खरतर जड जात होते.
पण 'हे ही दिवस जातील' 'दिवस काही घर बांधून रहायला येत नाहीत आपल्याकडे.' या आमच्या बहिणाबाईंच्या वाक्यावर मी तगून होते.

नेमकी यावेळी वाढदिवसाला जाई माझ्यासोबत नव्हती. ती नाशिकला गेली होती आणि तिथलं काम वाढल्यामुळे अजून दोन दिवस येणार नव्हती. बाबाने, "सुट्टी टाकल्येस तर, वाढदिवसाला नाशिकलाच ये" म्हंटलं असलं तरी प्रणवने आज अख्खा दिवस सोबत घालवायचं कबूल केलं होतं म्हणून जाईला खरं काय ते सांगून, बाबाला फक्त नाही जमणार कळवलं. कदाचित शेवटची भेट असेल ही आमची. ती मेमोरेबल व्हावी बस. मनात विचार आला.

सकाळी सगळ्यांचे व्हिडीओ कॉल येऊन गेले. बाबाला पुढल्या विकेंडला येऊन जाईन असं प्रॉमिस केलं. तो आणि मा थोडे खट्टू झाले पण मग माझा पडेल चेहरा बघून 'enjoy your day my princess, भेटल्यावर परत साजरा करु इथे' म्हणत माझीच समजूत काढून त्याने फोन ठेवला.

सगळे फोन आटोपते घेऊन मी प्रणवला भेटायला तयार झाले. आज काही अजेंडा ठरवून निघालो नव्हतो. वाटेतच ब्रेकफास्ट करुन आम्ही वसईचा किल्ला बघायला निघालो. किल्ला बघून परत बाईकपाशी येईपर्यंत एक वाजत आला होता आणि पोटात भूकेची जाणीव झाली होती. त्यातही मला 'केळवा बीच आणि त्याची ती खास जागा' बघायचीच आहे असं मी डिक्लेअर केलं. इथून ते अंतर दिड दोन तासाचं तरी होतं. इतक्या उन्हाचं बाईक दामटवून जायला तो तयार होईल असं वाटत नव्हतं. पण "आज सगळं तुझ्या मनासारख होऊदे", म्हणत त्याने पोटपुजा करुन झाल्यावर बीचवर न्यायचं कबूल केलं.

"You made my day. Thank you.", मी समुद्राच्या लाटेत पाय भिजवत म्हंटलं.

"अजून दिवस बाकी आहे आणि माझं सरप्राईझपण.", त्याने मी उडवलेलं पाणी चुकवत म्हंटलं.

"हे आहे तेच गिफ्ट आहे. अजून काय हवय?"

"पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त", माझ्या वाक्यावर त्याने फिल्मी उत्तर देत म्हंटलं

"कुठे आहे सरप्राईझ?"

"परत जाताना माझ्या हातची कॉफी पिऊन जायचं प्रॉमिस कर मग सांगेन" तो म्हणाला

"प्रॉमिस. आता सांग" त्याच्या हातात हात देत प्रॉमिस करत मी म्हंटलं

"घरी.", त्याने हेल्मेट घालत उत्तर दिलं.

परतीच्या रस्त्यावर किती मस्का मारला तरी तोंड उघडून काय ते सरप्राईझ फोडलंच नाही त्याने. कॉफी पिऊन झाल्यावर मी त्याचा हात धरुन "आता सांग हा बऱ्या बोलाने" म्हणत समोरच बसवलं तसं अस्वस्थ होत म्हणे, "सरप्राईझ नाही आवडलं तर नाही आवडलं सांगायचं, पण बोलणं बंद नाही करायचं माझ्याशी."

"गिफ्टवरुन कोणी बोलण बंद करत का येडपट" मी म्हंटलं

"आलोच.", असं म्हणत तो आत गेला. बाहेर आला तर एक सुंदर रेड कार्नेशियाचा बुके त्याच्या हातात होता.

""feliz cumpleaños..Happy birthday to a beautiful lady", त्याने बुके माझ्या हातात देत म्हंटलं

"Its so beautiful. gracias", मी उत्तर दिलं.

त्यासोबत एक कार्ड होतं. बहुतेक हॅन्डमेड असावं. मी ते उचलून बघायला गेले तसं त्याने माझा हात पकडत म्हंटलं, "आत्ता नको, नंतर बघ. अजून एक गिफ्ट बाकी आहे."

मी,"काय चालवलयस काय?" अशा अर्थाने त्याच्याकडे बघितलं तर नर्व्हस होत त्याने एक गिफ्ट एंव्हेलप समोर धरलं. उघडून पाहिलं तर आत एक सुंदर नेकलेस आणि इअर रिंग्ज सेट होता. Real red baby breath pressed flowers set.

"Wow! its so splendid. I am speechless", मी नेकलेस हातात घेत म्हंटलं

Red baby breath flowers symbolizes love & romance.. मला त्यानेच मागे 'फुलं आणि त्याची प्रतिके' यावर बोलणं झालं होतं तेव्हा सांगितलं होतं, ते आठवलं. इमोशनल होऊन डोळ्यातून पाणी आलं माझ्या.

"आता तरी कार्ड बघू का?, मी डोळे पुसत त्याला विचारलं

"ह्म्म बघ."

मी कार्ड हातात घेतलं. त्यावर मला आत्तापर्यंत त्याने भेट दिलेल्या सगळ्या फुलांचे ठसे होते. आत कार्नेशनच्या ठशात पांढऱ्या रंगाने मजकूर लिहीला होता.
मी वाचायला सुरुवात केली. Deep Red carnations represents…...

Deep love & passion. They are to be given to a person that captures your heart. I love you. त्याने वाक्य पूर्ण केलं आणि माझ्या रिॲक्षनची वाट बघत उभा राहीला.

मला एकदम हुंदकाच फुटला

माझा अवतार बघून पॅनिक होत तो म्हणे, "I am sorry. मी म्हंटलं होतं ना नाही आवडलं सरप्राईझ तर विसरुन जा. I don't want to ruin your birthday"

"डफ्फर", त्याच्या छातीवर हलके गुद्दा मारत मी त्याच्या मिठीत शिरले. मला वाटलं होतं तू कधीच नाही विचारणार मला.

"तू चिडली नाहीयेस?", त्याने माझे खांदे पकडून डोळ्यात बघत विचारलं

"च्चक! This is the best birthday gift ever. I love you too", मी त्याच्या मिठीत परत तोंड लपवत म्हंटलं

"Best day of my life", त्याने मिठी घट्ट करत म्हंटलं

"इस बात पे कुछ मिठा हो जाए..", त्याने माझ्याकडे अशा नजरेने बघत हे वाक्य म्हंटलं की गाल एकदम लाल झाले माझे.

"मी लावा केक बद्दल बोलतोय", त्याने मिश्किल हसत म्हंटल्यावर मी लाजून चूर झाले.

त्याने खरच लावा केकवर एक छोटी मेणबत्ती लावून मला केक कट करायला लावला.

केक कट करुन न सांडता भरवता यावा त्याला म्हणून मी रुमाल खाली धरत बरीच कसरत केली तरी मेल्टेड चॉकलेट ओठांना बाहेर लागलच. हातातल्या रुमालाने पुसायला गेले तर माझा हात पकडून त्याने असं अलाऊड नाही म्हणत मला जवळ ओढून त्यावर त्याचे ओठ टेकवले.

"असा केक जास्त गोड लागतो.", त्याने परत किस करत म्हंटलं.
मी स्वत:ला सोडवून घेत खाली बघत म्हंटल, "निघायला हवं आता."

त्याने परत जवळ घेत कानाची पाळी ओठात पकडत म्हंटलं, "त्यादिवशीचं रिटर्न गिफ्ट अजून बाकी आहे."

त्याच्या खळीचा किस घेत मी त्याच्याकडे पाहीलं तेव्हाच मला समजून चुकलं इथून मागे फिरणं आता दोघांनाही शक्य नाही. मी परत त्याच्या मिठीत स्वत:ला झोकून दिलं.

Sharry baby orchids चा दरवळ हवेत पसरला होता. रेड कार्नेशिया आता आमच्या आतच फुलला होता. खिडकी बाहेरुन येणारा रातराणी आणि अनंताचा सुगंध एकमेकांत मिसळून हवेत, श्वासात भिनला होता. La flor del amor चा अर्थ आज नव्याने कळला होता.

समाप्त

तळटीपः त्या दोघांचे गाणे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद कविन . खुप छान कहितरी वाचायला दिल्याबद्दल .
गेल्या काही दिवसांपासून उगाच उदास उदास वाटत होत . आज सगळे भाग एकदम वाचले आणि "दिल गार्डन गार्डन हो गया " असं फिलिंग आले एकदम . मस्त

धन्यवाद चैत्रगंधा, स्नेहल, नियती, चिन्मयी Happy

@एविता, Merci (गुगल ट्रान्सलेट कृपा Proud नाहीतर स्पॅनिश नावाला जागत gracias म्हंटलं असतं )

@जाई, तुझ्या गाण्याच्या पोस्टने मला हे पोस्ट करायचा मोहं आवरला नाही. आता हे गाणे या दोघांसाठी डेडीकेट करते Proud

लिन्क दिलेय कथेतही त्या दोघांचे गाणे

शेवटचा भाग आलेला बघून कथा वाचायला सुरू केली. एकदम टवटवीत ,फ्रेश कथा आहे. खूप आवडली. गूढकथा लिहायचं ही घ्या मनावर. वाचायला आवडेल. आणि एक तुमचे भाग ही पटापट येत होते. छान.

Cute...

मस्त कविन, खूपच फ्रेश वाटलं वाचून..
तुम्ही अगदी नियमितपणे भाग पोस्टले त्यामुळे छान connectivity राहिली.
फुलांबद्दलच्या ज्ञानात भर पडली.. सायु अगदीच जवळची वाटायला लागलीय.. छान काहीतरी संपल्याची हुरहूर..

धन्यवाद वर्णिता, प्रितम, आस्वाद, शब्दसखी, पराग Happy

बादवे, जरा नियमीतपणे लिहीत जा. Happy>>> Happy प्रयत्न राहील. लिहीत असते अधूनमधून माझ्यापुरतं, फक्तं पोस्ट करणं नियमीत होत नाही. जमवेन आता

हे फुलांचे फंडे खरच आहेत का असे?>>> खरं खोटं फुलांनाच माहिती. कथेत गार्डनिंगचे संदर्भ वापरायचे डोक्यात आल्यावर नेटवर माहिती काढत असताना असे अर्थ समोर आले. दोन फुलवेडे त्यांचा वापर कसा करु शकतील यावर विचार करत असताना या अर्थांचा वापर करत कथेत त्यांच्यातले प्रेम डेव्हलप होत असलेले दाखवता येईल असे वाटले. तसही पहिल्या भागात प्रणव म्हणतो तसं, "खरच असतं की नसतं ते ज्याच्या त्याच्या मानण्यावर आहे. पण मला ही सूचक पद्धत फार गोड वाटते. "

कविन, दम दिलाय बघ तुला .>> Proud

छान आहे गोष्ट कविन. आज वाचली पूर्ण.
त्या वयाच्या तो आणि ती ची गोष्ट. जाई जास्त आवडली.

वाढवता आली असती अजून --- अमोघ तिला जास्त योग्य आहे असे प्रणवला वाटणे, जाईचा कॅटॅलिस्ट इफेक्ट, प्रणवच्या मनातले द्वंद्व, काही बोलणे न होता जाणे मग दूर असतानाचे भावविश्व (झुरणे वगैरे नाही, एकाचे out of sight out of mind), प्रेम असूनही व्यवसायात जम बसेपर्यंत संयम + पाठिंबा..... वगैरे.

क्रमशः असून पण ८ दिवसात ८ भाग आल्याबद्दल खास आभार.

मला हे खूपदा लिहावेसे वाटायचे की जवळजवळ पूर्ण कथेचा ढाचा डोक्यात तयार झाल्यावर मग लिहावे लेखकांनी. ५-६ भाग लिहून तयार झाल्यावर मग पहिला प्रकाशित करायचा, म्हणजे आपले कामधंदे, अडचणी सगळे सांभाळून वेळेवर भाग टाकता येतील. भाग १/५, १/१३ असे टाकल्यास वाचकांना पण अंदाज येतो की किती काळ चालेल कथानक. नाहीतर ते आपले पुभाप्र, पुभाक?, करत रहातात. आणि पुढचा भाग आल्यावर आठवतही नाही बरेचदा की ही कुठली कथा आहे, कुठपर्यंत आली होती. असो.

हे फुलांचे / झाडांचे भावनिक अर्थ खरे आहेत की काल्पनिक? काय सर्च द्यायचा नेटवर? आपल्या भारतीय फुलांचे / झाडांचे पण आहेत?

दोन निरीक्षणे --
१. लाजून चूर होतात. चुर्र आवाज झाकलेले थालिपीठ / आंबोळी करते एक बाजू शिजली की. आवाज आल्यावर उलटतात.
२, प्रणवसारखा matured, प्रियाच्या बाबतीतले विचार स्पष्ट असणारा आणि त्यावर ठाम राहू शकणारा, सभ्यतेचे सारे संकेत पाळणारा इत्यादि --- प्रेम व्यक्त करेल, स्वीकारल्यावर आनंदी होईल, मनात खूप काही येईल पण या टप्प्यावर असा फुलपाखरासारखा भिरभिरणार नाही. फक्त डोळ्यातून आणि खळीतून ओसंडेल, मनाच्या आतल्या कप्प्यातले भरभरून बोलेल असे वाटले.

धन्यवाद उर्मिला Happy

कारवी, सविस्तर प्रतिसादाकरिता धन्यवाद :-). असे प्रतिसाद लेखन फ्लॉलेस करायला मदत करतात.

. लाजून चूर होतात. चुर्र आवाज झाकलेले थालिपीठ / आंबोळी करते एक बाजू शिजली की. आवाज आल्यावर उलटतात.>> खरच की. लिहीण्याच्या ओघात ही चूक झाली. करते दुरुस्त थोड्यावेळात

प्रेम व्यक्त करेल, स्वीकारल्यावर आनंदी होईल, मनात खूप काही येईल पण या टप्प्यावर असा फुलपाखरासारखा भिरभिरणार नाही. फक्त डोळ्यातून आणि खळीतून ओसंडेल, मनाच्या आतल्या कप्प्यातले भरभरून बोलेल असे वाटले>> नोटेड. मी लिहीलेल्याच जस्टिफिकेशन नाही देणार किंवा तुमचा मुद्दाही नाही खोडणार आणि तो लागलीच ॲप्लायही नाही करणार पण मनात हा मुद्दा नक्की घोळवत राहीन. कदाचित पटेल कदाचित नाही किंवा कदाचित असही चालू शकले असते असे वाटेल त्यानंतर. तो नंतरचा भाग अर्थात. सध्या निरीक्षणाची नोंद घेऊन घोळवत राहीन मनात असे म्हणेन यावर.

Meanings of flowers, symbol of carnations or symbol of purple rose symbols of plants असा वेगवेगळा सर्च दिलात तर बरीच इंफॉर्मेशन मिळेल वाचायला.

बरिचशी नावे अभारतीय दिसतील. मग what xyz is named in marathi वगैरे टाईपचा सर्च दिलात तर कधी एखाद्या ब्लॉगवर किंवा कधी एखाद्या वेबसाईटवर त्याची आपल्याकडली नावेही मिळतील. काही नावे अर्थात मित्र मैत्रिणींकडून समजतील Proud माझ्याबाबतीत हेच झालेय

नोटेड. मी लिहीलेल्याच जस्टिफिकेशन नाही देणार किंवा तुमचा मुद्दाही नाही खोडणार आणि तो लागलीच ॲप्लायही नाही करणार >>>>>>>
नाही, त्याची आवश्यकताही नाही. प्रत्येकाचा नजरिया वेगळा. एकाच लिखाणाचे मनाच्या पातळीवर व्यक्तीगणिक वेगळे ठसे उमटतात -- वयाप्रमाणे, अनुभवाप्रमणे, मूळ स्वभावाप्रमाणे, वाचतानाचा मूड, लिहीलेल्याचा अर्थ लावणे यावरून.... प्रत्येक ठसा ज्याच्यात्याच्यापुरता योग्यच. १५ * १५ ठिपके तेच, पण रांगोळी प्रत्येकाची वेगळी.

सगळे भाग एकदम वाचल्याने जो प्रणव माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला त्याने / मी प्रणव असते तर शेवट हा झाला नसता असे वाटून गेले. तुम्हाला असे प्रतिसाद खटकत नाहीत हे प्रतिसादत वाचले म्हणून ते मोकळेपणी लिहीले इतकेच. बाकी काही घडण्या / न घडण्याच्या शक्यता अनंत + थक्क करणार्‍या असतात.

फुलांची. झाडांची नावे, अर्थ बघते शोधून कधीतरी निवांतपणे.

तुम्हाला असे प्रतिसाद खटकत नाहीत हे प्रतिसादत वाचले म्हणून ते मोकळेपणी लिहीले इतकेच. >> हो हो. खटकत नाहीतच उलट आवडतात. हा प्रतिसाद देखील आवडला आहे.

प्रत्येक ठसा ज्याच्यात्याच्यापुरता योग्यच. १५ * १५ ठिपके तेच, पण रांगोळी प्रत्येकाची वेगळी.>> अगदी Happy कथा लिहीताना जो रस्ता पकडला जातो तो जिथे जाईल तशी कथा पूर्ण होते. पूर्ण झाल्यावरही नंतर बाहेरुन बघताना मनात येतच प्रत्येकवेळी अरे समजा चौक आहे इमॅजीन केलं तर जर आपण उजवी ऐवजी डावीकडे वळलो तर मुक्कामाचे ठिकाण वेगळे असते का कथेत? अमुक वळण सोडलं असतं तमुक घेतलं असतं तर काय बदललं असतं? अर्थात असे पूर्वी एका अर्धवट कथेबाबत करुन पाहिले आणि मग हाती काहीच न लागून सगळेच control alt delete केले गेलेय. तेव्हापासून मी त्यावेळी ते कॅरेक्टर काय म्हणतय मला काय ऐकू येतय तो रस्ता पकडते. तो त्याची दिशा ठरवून आलाय आणि मी फक्तं लेखनिक आहे असं स्वतःला सांगत. हे कदाचित वाचताना फार हास्यास्पद वाटेल किंवा चक्रमपणाचं वाटेल. असो एकदा उतरवले की वाचणाऱ्यावर अर्थ सोडून आपण बाहेर पडावे म्हणतात. शब्दांचे तरणे बुडणे त्यांचे ते करतात मॅनेज.

कुठल्यातरी भागात एक रिप्लाय होता की नंतर काय बदल केला कळत नाही. त्याकरता जस्ट नोंदवते - एखाद दोन स्पॅनिश शब्द टाकायचे राहील्याची चुटपूट लागली होती. तेच फक्तं ॲड केले आहेत.

मस्तच. एखाद्या वेब सिरीजचा सीझन पाहिल्यावर येतं तसंच काहीसं फिलींग आलंय.. पुढच्या सिरीजच्या प्रतिक्षेत! -> +++११११ अगदी..७वा भाग वाचताना हेच डोक्यात आले..यावर एक मस्त छोटीसी आल्हाददायक मूव्ही बनेल..

ही गोडुली कथा लिहिल्याबद्दल आणि वेळेत पूर्ण केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नियमित लिहित रहा, कविन!

नितांतसुंदर प्रेमकथा.. कथेतला केळवा बीचचा उल्लेख खूप आवडला कारण मी बीच पासून थोड्याच अंतरावर राहते. .साखरपुडा ते लग्न होईपर्यंतच्या चार महिन्यांच्या कालावधीत मी आणि पतींनी केळवा बीचच्या खूप फेऱ्या मारल्यात. तुमच्या ह्या गोड प्रेमकथेने जुन्या आठवणी ताज्या झाल्या.

Pages