ती आणि तो

Submitted by दिव्यल on 24 July, 2020 - 13:39

ती आणि तो

तिला खूप काही सांगायचंय,
बरंच काही बोलायचंय.

पण तोही ऐकत नाही,
आणि तीला विचारत नाही.

तिला नेहमी ऐकायचीच सवय,
पाहिलंय तिने आईला, लहान होतं वय.

निर्णय घरातले कोण तिला घेऊ देतो,
तो लाडेच म्हणतो 'तू म्हणेन तसे करतो'.

त्याला आवडेल तसेच ती करते,
हक्काच्या स्वयंपाक घरात देखील,
तिच्या स्वतःचे असे काहीच नसते.

भाज्या, फळे असोत काहीही,
तिला आवडतं का?,
हे कोणी विचारत नाही.

सासरी येऊन मुळी विसरतेच ती सारे,
आवडी-छंदादी, फक्त त्याचेच असतात कारे?

पैसे कमावण्यातच सारं असतं का,
स्त्रीत्वाशिवाय जीवनही रुक्षच ना.

एवढेच जरी त्याने केले,
तरी तिला अवघे मिळाले.

बायको होता होता, हळूच मैत्रीण व्हावी तिची,
मैत्रीत मग दुःख-सुखे, काय तिची अन काय तुझी.
-दिव्यल बागुल

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users