Submitted by गणक on 12 July, 2020 - 13:56
तुला गजलेसारखी
नाही वाटली जरी
कविता बनूनी मला
तीच दाटली उरी
नाही शब्द भारदार
नाही वृत्त अलंकार
पण शस्त्र भावनेचे
हाती तिच्या धारधार
साधी सोपी तीची भाषा
चिंता ना , होईल हाशा
मनामध्ये जन्म घेता
दूर पळते निराशा
आहे नवख्या चालीची
कळी शब्दांच्या वेलीची
दर्दी रसिक थोडेसे
आस नाही मैफिलीची
कल्पनेची स्वारी असे
बोलावून येत नसे
माग घेता विचारात
माझ्या ओठांवर हसे
नऊरस सोबतीला
अर्थ गंध भुक जिला
तंत्र नियम जाळ्यात
अडकवू नका तिला
......अविनाश उबाळे
( गणक )
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
"प्रतिसादाबद्सदल" सर्वांचे
"प्रतिसादाबद्दल" सर्वांचे आभार !
""प्रतिसादाबद्दल" सर्वांचे
""प्रतिसादाबद्दल" सर्वांचे आभार !" ---> धीर धरा येतील लोकं कशाला दु:खी होताय. स्वत:करता लिहिताय ना!!
मध्यंतरी मी इथे एका अनुभवी सदस्याकडून एक कमेंट वाचली होती.
"मायबोलीवरील एक कॉमेंट म्हणजे फेसबुक वरच्या 100 कॉमेंट्स"
एकही कॉमेंट नाही आली म्हाणजे
तुम्ही झीरो वर नाही आहात
तर 100 च्या आत आहात.
अजून लिहा ! इथल्या भाषेत ---> "अजून येऊ द्या"
नक्कीच
नक्कीच
पहिले २ उत्कृष्ठ, तिसरा पार
पहिले २ उत्कृष्ठ, तिसरा पार ढेपाळला नंतरचे छान. लिहीत रहा. प्रतिसाद मोजू नका. (८ वर्ष झालीत, माझ्या कवितांवर दोन आकडी प्रतिसाद क्वचितच आहेत!)
@अजिंक्यराव " (८ वर्ष झालीत,
@अजिंक्यराव " (८ वर्ष झालीत, माझ्या कवितांवर दोन आकडी प्रतिसाद क्वचितच आहेत!)" हे कंसातल असल तरी तुम्हाला मिठी माराविशी वाटत आहे या वाक्यासाठी
खरच
@गणक मनापासुन सांगतोय
@गणक मनापासुन सांगतोय इथे टिकायच असलं तर एक करा
कोणाला ताइ-दादा चुकूनहि म्हणू नका
मी देखिल हेच केल आणि तीन आठवड्यात माझा मुक्काम हलवायची वेळ आलिय हा हा हा
टीन महिन्या करता आलो होतो हा हा हा
@ हे वापरायच आणि सरळ तुम्ही एवढच बोलायच भावा